यह इश्क नहीं आसान १० (अमर प्रेम)
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
यह इश्क नहीं आसान १० |
हा भाग वाचून तुम्ही नाराज व्हाल पण हा भाग लिहिणे गरजेचं होता कारण त्या शिवाय का त्या दोघांचे
प्रेम अमर होतं हे सिध्द कसे करणार ना ? पण पुढे कथा
वाचत जाल तशी ती तुम्हाला नक्की आवडेल.
पुढ-
दुर्गाबाईंनी आंतून दरवाजा बंद करून घेतला .तो
काही केल्या उघडत नव्हत्या. सर्वांनी आपापल्या परी ने
समजावून पाहिले. पण त्या कोणाचेच ऐकायला तयार नव्हत्या. शिवाय त्यांनी अन्न पाण्याचा ही त्याग केला होता. त्यांच्या. मुलाने अर्थात विद्याधरपंतांनी त्यांना खूप विनवण्या केल्या. पण त्या ऐकायलाच तयार नव्हत्या.
त्यांचे म्हणणे एकच होतं आणि ते म्हणजे जोपर्यंत ह्या दुसऱ्या धर्माच्या सुनेला तू घरातून बाहेर काढत नाही. तोपर्यंत मी अन्न पाणी काहीच ग्रहण करणार नाही. " असे स्पष्ट शब्दात सांगितले आणि दुसरी गोष्ट म्हणजे ब्राह्मण समाजाने सुध्दा त्यांच्या घरावर बहिष्कार टाकला. त्यांचं ही तेच म्हणणे ही तेच होते की तुम्ही दुसऱ्या धर्माची मुलगी सून करून घेतली नि धर्म बाटविला. असे सांगून त्यांनी मंदिरात पूजा करण्याचा अधिकार ही त्यांचा काढून
घेतला. त्यांचे म्हणणे एकच होते की, तुमच्या सुनेला
घराच्या बाहेर काढा. तेव्हाच तुम्हाला मंदिरात पूजा करण्याचा अधिकार राहील. अन्यता तुम्हाला बहिष्कृत
करण्यात येईल."
दोन दिवस झाले तरी दुर्गाबाईं दरवाजा उघडला
नव्हता. शेवटी निलोफर दरवाजा जवळ गेली नि त्याना म्हणाली," आजी ! दरवाजा उघडा ना, तुम्ही माझ्यावर रागावलात आहात ना ? मग त्याचा राग इतरांवर का काढत आहात ? मला सांगा तुमचं काय म्हणणं आहे ते ?" त्यावर त्यांनी दरवाजा उघडला नि बाहेर येत त्या म्हणाल्या ," तुला ऐकायचंय ना माझं काय म्हणणं आहे ते."
" हो,नक्कीच !"
" मग ऐक. आताच्या आता तू हे घर सोडून तू निघून जा."
" मी ह्या घरची सून आहे,अर्थात हे घर माझं ही आहे."
" वा गं दोन दिवस झाले नाहीत येऊन तर लगेच घरावर अधिकार पण गाजवायला लगलीस."
" मी त्या हेतूने नाही म्हणाली आजी ! "
" तू कोणत्याही हेतूने म्हण. तुझा इथं येण्या मागचा
हेतू काय आहे तो मला माहित आहे."
" काय हेतू आहे माझा सांगा बरं."
" आम्हां ब्राम्हंणाचे घर बाटवायला आली आहेस ना तू इथं ?"
" बाटवीणे म्हणजे नेमके काय ते सांगाल का मला
अगोदर ? म्हणजे माणूस कसा काय बाटतो वगैरे.....
" मला तुझ्याशी वाद घालण्यात काहीच रस नाहीये. तू
इथून जा बरं."
" कुठं जाऊ ते सांगाल का मला ?"
" कुठं ही जा पण आमच्या घरात नको आहेस तू !"
" मी जाईन पण एकटी जाणार नाही , माझ्या सोबत
माझा नवऱ्याला ही घेऊन जाईन , चालेल का तुम्हांला ?"
" हां त्याला ही घेऊन जा. ज्या दिवशी तो तुझ्या प्रेमात
पडला त्याच दिवशी त्याचं ह्या घराशी असलेले नाते तुटलं."
" ठीक आहे, मी जाते घर सोडून." असे म्हणून ती
तेथून निघून गेली. तिच्या पाठोपाठ रुद्र पण गेला. आपल्या बेडरूम मध्ये आले दोघेपण. त्यानंतर त्या दोघांनी कपडे भरले. तेव्हा तिच्या सासूबाई तिथं आल्या नि त्या दोघांना म्हणाल्या," तुम्ही दोघांनी कुठं ही जायचं नाही."
" आई , आमचा नाईलाज आहे, आम्हाला जावेच
लागणार, कारण आजी आपला हट्ट सोडायला तयार नाहीत आणि त्यांच्या जीवाला काही बरं-वाईट झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही, म्हणून
जाऊ दे आम्हाला. "
" पण तुम्ही दोघं जाणार कुठं ?"
" जग खूप मोठे आहे, जाऊ कुठंतरी ! पण तुम्ही नका
चिंता करू . आम्ही कुठं असलो तरी तुम्हाला विसरणार नाही."
" हां आई ! तू आमची चिंता अजिबात करू नकोस."
" चिंता कशी नको करूं ? आई आहे मी तुझी ! मूल
जेव्हा आईपासून दूर जाते तेव्हा त्या आईला किती वेदना
होतात हे कसं सांगू मी तुला."
" मला कल्पना आहे त्याची आई ! परंतु नशीबापुढे कोणालाही जाता येत नाही हेही तितकंच खरं ! येतो आम्ही ! " असे म्हणून ते दोघेही आपल्या बँग्या उचलून बेडरूम मधून बाहेर पडले. तेव्हा हॉलमध्ये सर्वजण उपस्थित होते. प्रथम त्या दोघांनी विद्याधरपंतांचे चरणस्पर्श केले. पण त्यांना कळेना की काय आशीर्वाद द्यावा आपल्या मुलाला ? शेवटी जड अंतकरणाने ते म्हणाले," कुठं ही रहा, पण सुखी रहा." तेवढ्यात तिथं शारदा बाई आल्या नि त्या आपल्या पतीला म्हणाल्या,
" अहो, तुम्ही तरी सांगा ना ह्या दोघांना , माझं ऐकत नाहीत ते दोघेही! " त्यावर विद्याधरपंत म्हणाले, " ते जर तुझं ऐकत नसतील तर ते माझं कशावरून ऐकतील बरं ?"
" तुम्ही बाप आहात ना त्याचे ?"
" हो ; परंतु बापा पेक्षा आईचा अधिकार जास्त असतो
आपल्या मुलांवर."
" माझं ऐकत नाही म्हणून तुम्हाला सांगते ,तर तुम्ही...."
" शारदा ते आता कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाहीत तेव्हा जाऊ दे त्या दोघांना." ते दोघेही जेव्हा दुर्गाबाईंच्या पाया पडायला गेले तेव्हा त्यांनी त्या दोघांना आपल्या पायी पडू दिलं नाही . ते दोघेही खाली वाकले तश्या त्या चटकन त्या मागे हटल्या. त्यानंतर रूद्राने आपल्या धाकट्या भावाला म्हणजेच प्रेम ला अलिंगन देत म्हटलं," प्रेम , तू आई आणि बाबांची नीट काळजी घे. मी तुला वरचे वर फोन करून त्यांची क्षेमकुशलता घेत जाईन. कळलं " असे म्हणून त्या दोघांनी शारदाबाई चे चरणस्पर्श केले. त्यांनी जड अंतकरणाने त्या दोघांना आशीर्वाद दिला. तेव्ह विद्याधरपंतानी रुद्राच्या हातात काही रुपये दिले आणि सांगितले की अजून लागले तर माग जोपर्यंत तुला नोकरी लागत नाही तोपर्यंत आम्ही तुला थोडी फार मदत करू ." आपल्या वडिलांचे हे बोल ऐकून रुद्राचे डोळे अश्रूंनी भरून आले. त्याने आपल्या वडिलांना मिठी मारली.
रुद्र आणि नीलिमा अर्थात निलोफर ते दोघेही मुंबईला निघून आले , कारण मुंबईला रुद्राचा एक मित्र राहात होता. अगोदर ते दोघेही त्याच्या पाशी आले. त्यानंतर त्याच मित्राच्या मदतीने मुंबईला एक खोली भाड्याने घेतली नि त्यात निलोफर नि स्वतः राहू लागला. परंतु
रुद्राला जॉब काही मिळेना, तेव्हा त्याचा मित्र म्हणाला," तू ब्राम्हंण आहेस ना ?"
" हो ; मग काय झालं ?"
" नोकरी शोधायची काय गरज आहे तुला ?"
" म्हणजे ? मी समजलो नाही ?"
" अरे भटजी चा व्यवसाय कर ना, तसे पण शहरात
लवकर कुणी भटजी भेटत नाही. कारण तुझ्या सारखी
शिकलेली मुलं भटजी व्यवसाय करायला तयार होत नाहीत. ते जॉबच्या मागे लागतात. जसा तू शोधतो आहेस जॉब ! अरे भटजी चा व्यवसाय इतका सुन्दर आहे की मागतील तेवढा पैसे द्यायला तयार असतात लोकं , कारण भटजी शिवाय सनातन धर्मावाल्यांचे पान हलत नाही ना ? त्यांना सगळ्या गोष्टींना भटजी लागतो. वास्तूशांतू करायची झाली तर भटजी पाहिजे, ग्रहशांती करायची झाली तर भटजी पाहिजे, सत्यनारायण पूजा करायची झाली तर त्या पूजेलाही भटजी पाहिजे, साखर पुडा करायचा झाला तरी भटजी पाहिजे, भूमी पूजन करायचं झालं तरी भटजी पाहिजे, कशाला भटजी नको ते सांग ना ?" निलोफर म्हणाली ," बरोबर बोलताहेत भाऊजी ! तुम्हाला भटजी चा धंदा सुरू करायला काही हरकत नाहीये."
" अगं पण माझ्या कडून पूजा करून घेईल कोण ? "
" का नाही घेणार ? "
" मी इस्लाम मुलीशी बरोबर लग्न केलं म्हटल्यानंतर
माझ्या हातून कुणी पूजा करून घेईल का ?"
" इथं कोणाला माहीत आहे की मी मुसलमान आहे ती ? आणि शहरात एवढा भेदभाव पळत नाहीत कुणी. ग्रामीण भागातच भेदभाव जास्त असतो."
" खरं आहे तुझं. पण मला वाटत नाही की ह्यात यशस्वी होईन असं "
" अगोदरच हात पाय गाळू नकोस. हे बघ प्रयत्न करून
बघायला काय हरकत आहे. बाकी त्या परमेश्वरावर सोडून द्यायचं. गीते मध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितलेच आहे ना, अर्जुनाला केवळ कर्म करणे तुझ्या हातात बाकीचे माझ्यावर सोड. एवढा चांगला उपदेश दिलाय भगवंताने पण त्याच्या कडे कुणाचे लक्षच जात नाही." रुद्राला निलोफरचे म्हणणे पटले नि त्याने आपल्या दरवाजा वर एक फलक लावून टाकले. की इथं भटजी भेटेल." बस्स लोकांना माहीत पडलं की इथं ब्राह्मंण
राहतात. बस्स लोक त्यांच्या कडे येऊ लागले. कुठं सत्यनारायण, ग्रह शांती वगैरे अशी कामे त्याला मिळू लागली. त्यांचा उदरनिर्वाह चांगल्या पैकी होऊ लागला. लवकरच निलोफरला दिवस गेले. आणि त्यानंतर जे घडलं ते तुम्हाला माहीतच आहे." त्यावर खोली मालकीण म्हणाली," तुझी आजी तर फार जुन्या विचारांची आहे, त्या घेतील का तुला आपल्या घरात ?"
" आता माझ्या सोबत निलोफर नाहीये. म्हणून घेईल
कदाचित आणि मुख्य म्हणजे माझी निलोफर तिकडे
आहे, मग मी इथं राहून काय करू ? मला निलोफर वापस
मिळवायची असेल तर मला तिकडेच जायला हवं."
रुद्र आपल्या मुलाला घेऊन आपल्या घरी परतला. घरात
पाऊल ठेवणार तोच दुर्गाबाईंचा करारी आवाज त्याच्या
कानावर पडला ," तिथंच थांब." रुद्र जाग्यावरच थांबला.
" का आलास तू इथं ?"
" सासूबाई , का बोलताय तुम्ही असं ?"
" तो घर सोडून गेला होता ना ? तो परत का आला ?"
" अहो, सासूबाई ते नंतर विचारा अगोदर घरात तर येऊ
दे त्याला."
" नाही. मी विचारलेल्या प्रश्नांची अगोदर उत्तरे द्यायची
मगच आंत यायचं त्याने ."
" अहो, सासूबाई पहिल्यांदाच आपल्या घरी बाळ आलंय त्याला दरवाजातच तिष्ठत ठेवायचं का ?"
" बाळाच्या अंगावर एक मुदी भात काढून टाक, मगच त्याला घरात घे." शारदा बाई आंत गेल्या नि एक मुठी भात घेऊन आल्या नि त्याच्या अंगावरून काढून बाहेर फेकून दिला. त्यानंतर शारदा बाईंनी बाळाला आपल्या हातात घेतले आणि पटापट त्याच्या गालाचे मुखे घेतले.
नि विचारले," अरे तुम्ही दोघेच आलात ते , सुनबाई कुठं आहे ?"
" ती आपल्या माहेरी गेली आहे."
" माहेरी गेली..... मुलाला सोडून ? अरे सांगतोस काय ?"
" मला माहित होतं असंच होणार ते. गेली ना शेवटी
तुझ्या हातावर तुरी देऊन." दुर्गाबाई खोचकपणे बोलल्या.
" तुम्हां दोघांमध्ये काही भांडण वगैरे झालंय का ?" शारदा बाईंनी विचारले.
" नाही गं आई, भांडण वगैरे काही झालेलं नाहीये आमचं."
" मग का गेली ती लहान बाळाला टाकून . " शारदा बाईंनी विचारले.
" तान्हा बाळाची पण कीव आली नाही का तिला ?" दुर्गाबाई खोचकपणे म्हणाल्या.
" तुम्ही समजता तसं काहीही झालेलं नाहीये."
" अरे मग तू सांग ना, काय झालं ते."
" आई ! दादाला अगोदर आंत तर येऊ दे . मग सांगेल तो काय झालंय ते." प्रेम उद्गारला. त्यानंतर रुद्र घरात शिरला आणि सोफ्यावर बसला. त्यानंतर त्याने घडलेली सारी हकीकत सविस्तर पणे सांगितली. ते ऐकल्या नंतर दुर्गाबाई म्हणाला," बरं झालं सुंठी वाचून खोखला गेला तो." विद्याधरपंत म्हणाले ," आई काय बोलतेस तू हे ?"
" काय चुकीचे बोलले मी ? ज्याची होती त्याने ती नेली.
उलट बरं झालं ना ?"
" काय बरं झालं ? ह्या घरची सून आहे ती." शारदा बाई
" आहे नाही होती ती ह्या घरची सून पण आता नाहीये.
घटस्फोट झालाय ह्या दोघांचा. हो ना रुद्र ? दुर्गाबाई उद्गारल्या.
" आजी , घटस्फोट झाला नाहीये, जबरदस्तीने केला गेलाय तो " प्रेम उद्गारला.
" ते काही असो. पण कोर्टाच्या नियमानुसार घटस्फोट
कागदोपत्री झाला ना तुमचा ? " त्या दोघांनी ही 'हो'म्हटले. मग संपलं सारं."
" नाही. मी असल्या घटस्फोट पद्दतीला मान्य करत नाही. आणि आम्हां दोघांना कोर्टच काय पण देव जरी
वरून खाली आला ना, तरी तो आम्हाला वेगळं करू
शकणार नाही. अर्थात मी आज देखील तिचा पती आहे. "
" हां पण ती आता कुठं राहिली तुझी पत्नी आतापर्यंत
तिने लग्न केलंच असेल ही दुसरे !"
" नाही. ती असं मुळीच करणार नाही. तशीच वेळ आली तर ती मरण पत्करेल पण लग्न करणार नाही कुणाशी ? आणि समजा तिच्या बरोबर जबरदस्ती ने
जरी कुणी लग्न केलं तरी ती मनाने माझीच पत्नी राहील. कारण तिचा आत्मा नि माझा आत्मा एकच आहे. त्याला
वेगळं करू शकणार नाही कुणी !"असे म्हणून तो आपल्या खोलीच्या दिशेने निघाला.
" माझ्या शरीराचे जरी तुकडे तुकडे केलात ना, तरी
त्या प्रत्येक तुकड्यातून रुद्र रुद्र असा नाद येईल. कारण
माझं लग्न रुद्राच्या आत्म्याशी झालंय, आम्हां दोघांचा आत्म्या एकच आहे त्याला कसं वेगळं करणार तुम्ही ?" निलोफर एकदम ठामपणे म्हणाली. त्यावर सलीम म्हणाला," असं काय ? मग अन्न पाणीच बंद करतो तुझं."
" त्या पेक्षा असं का करत नाहीस ? माझ्या बाळाला तर मारलेस ना तू , मग आता माझा ही जीव घे. म्हणजे
तुझा बदला पूर्ण होईल."
" तुला मारून तुला मुक्त करायचं नाही तर तुम्हां दोघांना
एकमेकांपासून दूर ठेवणे हेच तर माझं मुख्य ध्येय्य आहे."
" आम्ही शरीराने दूर असलो तरी मनाने अगदी जवळ
आहोत."
" म्हणजे तू माझ्याशी निकाह करायला तयार नाहीस तर ?"
" ह्या जन्मांतच काय मी तुझ्याशी कोणत्याच जन्मात
निकाह करणार नाही."
" असं काय ? बरं बघतो." असं म्हणून तो आपल्या
एका साथीदाराला म्हणाला," जा आणि काका काकींना
धरून आण. कसं निकाह करायला तयार होत नाही तेच
बघतो." असे म्हणताच दोन माणसे तिच्या आई-वडिलांना
आणायला गेले. याचा अर्थ तिला आपल्या घरी न नेता
एका गोडाऊन मध्ये तिला एका खुर्चीवर बसवून तिचे
हात पाय बांधून ठेवले होते. प्रथम तिच्या गळ्यात असलेले
रुद्राच्या नावाचे मंगळसूत्र सलीम ने खेचून तोडले नि फेकून दिले. परंतु फेकलेले मंगळसूत्र वर पंख्याला अडकून लटकत होते. तिच्या कपाळावर असलेले कुंकू त्याने आपल्या हाताने पुसून टाकले होते. त्यावेळी कुत्सितपणे हसून निलोफर म्हणाली," माझ्या माथ्यावर असेलेले कुंकू जरी पुसलेस तरी माझ्या हृदयावर जे कोरले गेले आहे ते कसे पुसणार तू ?" त्यावर चिडून म्हणाला," पुसेन तेही पुसेन मी !" तेव्हा तेथे आणलेला काझी म्हणाला, " एक तर हिंदू मुलाशी लग्न करून इस्लाम धर्माचा अपमान केलास. वरून म्हणतेस त्याच्या नावाचे कुंकू तू तुझ्या हृदयावर कोरलेस , हा तर फार मोठा गुन्हा
केला आहेस तू !"
" हां काझी गुन्हा तर झालाय परंतु माझ्या कडून नाही
तर तुम्हां लोकांकडून. एका विवाहित स्त्री चा विवाह तिच्या मर्जी विरुद्ध दुसऱ्या गैर पुरुषांशी करायला निघाले
आहे तुम्ही ! हा गुन्हा नव्हे काय ?"
" तुझा तलाक झाला आहे. अर्थात इस्लाम धर्माच्या
नियमानुसार तुझा दुसरा विवाह होऊ शकतो."
" माझा तलाक होऊन फक्त दोनच दिवस झाले आहेत.
इस्लाम धर्माच्या नियमानुसार साद्दत चे तीन महिन्याचा काळ पूर्ण झाल्याशिवाय मी दुसऱ्या कोणत्याही पुरुषांशी निकाह करू शकत नाही. हे तर मान्य ?" असा प्रश्न निलोफर ने विचारल्या मुळे काझी थोडा वरमला खरा पण सलीम लगेच म्हणाला , " हां पण नियम मूलसलमान व्यक्तिशी निकाह करणाऱ्यांसाठी आहे, दुसऱ्या धर्मातल्या व्यतीशी निकाह केल्यास हा नियम तिला लागू पडत नाहीये."
" वा नियम सुध्दा तुमच्या इच्छेनुसार बदलतात वाटतं."
" इथं नियम बनविणारे पण आम्हीच आणि नियम तोडणारे पण आम्हीच ! कळलं." असे म्हणून काझी ला म्हणाले," चाचा चाची ला येऊ देत मग पुढील कार्यक्रमाला
सुरुवात करू , कसं ? काझी त्याच्या सोबत बाहेर येऊन बसले.
रुद्र निलोफर ला भेटायला निलोफरच्या घरी गेला.
पण तिथं गेल्यावर कळलं की निलोफर तिथं पोहोचलीच
नाही अजून. निलोफर बद्दल त्याना काहीच माहिती नव्हती. उलट निलोफर चे सलीम अपहरण केले आहे, हे ऐकून त्यांना धक्काच बसला. त्यांनी विचारले ," काय
सांगतोस काय ? कधी घडलं हे ?" तेव्हा रूद्राने घडलेल्या
घटने विषयी थोडक्यात माहिती दिली. इब्राहिम खान
आपल्या भावाला त्या गोष्टीचा जाब विचारायला जाणारच
होता . तेवढ्यात सलीम ने पाठविलेली दोन माणसे तिथं आली नि म्हणाली ," चाचाजी आपल्याला सलीम भाईजान
ने बोलविले आहे."
" मला अगोदर हे सांग तो आहे कोठे आणि निलोफर
कोठे आहे ?"
" तिकडेच आहेत दोघेपण."
" तिकडे म्हणजे कुठं ?"
" चला आम्ही घेऊन चलतो तिकडे, चाची ला पण
सोबत घ्या."
" मी पण येतो तुमच्या सोबत." रुद्र म्हणाला.
" तू रुद्र आहेस ना, निलोफर चा पहिला शौहर ."
" हां !"
" चलो, तुम भी अपनी बेगम ची दुसरी शादी देखो."
तेवढ्यात दुसरा साथीदार म्हणाला," अरे थांब अगोदर
भाईजान ला तर विचार , निलोफर च्या शौहर ला आणायचं की नाही ते." मग लगेच त्याने सलीम ला कॉल
केला नि विचारले ," इथं निलोफर आलेला आहे त्याला
पण आणायचं का सोबत ?" तेव्हा सलीम म्हणाला ,
" घेऊन या त्याला....त्याला सुध्दा पाहू दे आपल्या बेगमचे दुसरं लग्न ?" मग पिस्तुल धाक दाखवून रुद्र ला
पण घेऊन गेले. मोटार मधून खाली उतल्यानंतर रुद्राच्या
पाठीला पिस्तुल लावून म्हणाला," चल पुढे आणि अजिबात चलाखी करायची नाही." रूद्राने वर हात केले
होते. रुद्राला, जिथं निलोफरला बांधून ठेवले होते तिथेच
नेले नि त्याला सुध्दा तिच्याच शेजारी खुर्चीला बांधले.
रुद्राला पाहून निलोफर ने विचारले ," तू कसा सापडलास ह्यांच्या तावडीत ?" त्यावर रुद्र म्हणालो ," मी सापडलो नाही. स्वतःहून आलो इकडे. "
" अरे पण काय गरज होती इथं येण्याची ?"
" गरज कशी नाही ? इथं तू नि मी तिथं कसं शक्य आहे ? म्हणून मी स्वतःच आलो आणि तुला एक खुशखबर पण द्यायची होती."
" कोणती खुशखबर ?"
" हीच की आपलं बाळ जिवंत आहे."
" काय ? बाळ जिवंत आहे ?" निलोफर ने हर्षभराने
म्हणाली," आपला लाख लाख शुक्रिया आल्हामिय्या !" हे
ऐकून मात्र सलीम मोठं आश्चर्य वाटलं की इतक्या. उंचावरून मी खाली फेकलं तरी ते कार्ट वाचलं ?" सलीम
" फानूस बनकर जिसकी हिफाजत हवा करे वो शमा क्या बुझे जिसे रोशन खुदा करे ! " निलोफर उद्गारली.
" तुम्हारे बच्चे को तो खुदा ने बचा लिया लेकीन तुम्हारे
माँ-बाप को कौन बचाएगा ?"
" पण तू माझ्या आई-वडिलांना का मारू इच्छितोस ?"
" तू माझ्याशी निकाह करायला तयार नाहीस म्हणून."
" निलू अजिबात ह्या नराधमाशी लग्न करू नकोस तू ?
आम्हाला ठार मारले तरी चालेल." इब्राहिम उद्गारला
" हां पोरी अजिबात लग्नाला तयार होऊ नकोस तू
हा करून करून काय करेल आम्हाला ठार मारेल ना ? इतकंच ना मारू दे मारलं तर ! असं पण आम्ही मेल्यातच जमा आहोत." तेव्हा सलीम हसून म्हणाला," नाही. मी आता विचार बदलला . तुम्हां दोघांना मारून मला काहीच साध्य होणार नाही, त्या पेक्षा मी रुद्रालाच ठार मारतो. ना रहेगा बांस न बझेगी बांसुरी है ना ? हां यहीं ठीक रहेगा ? " असे म्हणून त्याने निलोफर च्या कांनशीलावर ठेवलेले पिस्तुल लगेच हटविले नि रुद्राच्या कांनशीलावर ठेवत सलीम म्हणाला,
" आता बोल , माझ्याशी विवाह करणार की नाही ?"
" निलू, मला मारलं तरी चालेल, पण तू ह्याच्याशी लग्न
करू नकोस." रुद्र म्हणाला.
" हो का ? मग तुलाच आधी स्वर्गात पाठवितो." असे
म्हणून चाप ओढण्याचे नाटक केले. तशी निलोफर
म्हणाली ," मी तयार आहे, तुझ्याशी निकाह करायला. पण
त्यासाठी तुला वादा करावा लागेल."
" कोणता वादा ?"
" ह्या सर्वाना तू सोडून द्यायचे आहे, त्यांच्या जीवाला
काहीही धोका होता कामा नये." निलोफर उद्गारली.
" मान्य !"
" निलू नको करुस ह्याच्याशी लग्न." रुद्र उद्गारला
" रुद्र तुझ्या पेक्षा मला अधिक प्रिय काही नाही आहे."
त्यानंतर निलोफर ला खुर्चीला बांधून ठेवले होते ते
सोडायला लावले. त्यानंतर तिला कपडे नि शृंगार करायला
लावला. शेवटी नाईलाजाने निलोफर ला कबूल आहे असे तीन वेळा म्हणावे लागले. आणि एकदाच सलीम शी
निलोफर चा निकाह झाला. तेव्हा रुद्राला स्वतःचा भयंकर
राग आला. आपण जर इथं आलो नसतो तर निलोफरला
माघार घ्यावी लागली नाही. निकाह झाल्यानंतर रुद्राला
सोडण्यात आले. तेव्हा रुद्र निलोफर ला म्हणाला," मला माफ कर माझ्या मुळे तुला हा निर्णय घ्यावा लागला." त्यावर निलोफर म्हणाली," माझ्याशी लग्न करून पसतावणार आहे तो. कारण ह्याने फक्त माझ्या शरीरावर अधिकार मिळविला आहे आत्म्यावर नाही. आत्मा हा अमर असतो. तो फक्त एकाशीच एकरूप होतो. आणि तो तुझ्या आत्म्याशी एकरूप झालाय. त्याला कोणीही दूर करू शकत नाही. ह्या जन्मतःच नाही तर पुढील साथ जन्मात तो एकाशीच संलग्न असेल. बाकी राहिलं माझं शरीर ते तर शरीर ते तर नाशिवन्त आहे. शेवटी मातीतच जाणार आहे ते. त्याचा मोह कशासाठी ? आपल्या बाळाचा नीट सांभाळ करा."
क्रमशः
हा भाग वाचून वाचकांना जरूर प्रश्न पडेल की अशी
कशी प्रेम कथा ? असा प्रश्न पडणे साहजिकच आहे परंतु
मला या कथेतून वेगळं काही सुचवायचं आहे? एकमेकां
सोबत राहणे आणि जिवापाड एकमेकांनावर प्रेम करणे
म्हणजेच प्रेम कथा नव्हे ! एकमेकांवर दूर राहून सुध्दा
ते एकमेकांनावर जिवापाड प्रेम करू शकतात. हेच मला
यातून सुचवायचे आहे, आपल्या लोकांना आवडेल की
नाही माहीत नाही. परंतु आपल्या कमेंट वरून कळेलच.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा