दुनिया ना माने -२३
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
दुनिया ना माने -२३ |
आपली मुलगी ऐकत हे पाहून ते सुधाकर कडे पाहत
बोलले," अहो,जावई बापू ! तुम्हीच समजावा आता हिला.
ती मुकगी स्वभावाने कशी असेल कोण जाणे ? पण आमची अनुसया स्वभावाने इतकी गोड आहे ना, शिवाय नात्यातली
आहे. प्रीती बरोबर चांगले जुळेल तिचं."
" ते सारं खरं ,पण विराज अजिबात तयार होणार नाही."
" हां बाबा विराज अजिबात मान्य करणार नाही."
" अहो, मग तुम्ही समजावा ना त्याला."
" माझ्या समजविण्याने तो जर समजला असता तर मग
कशाला हवं होतं ?" सुधाकर हताशपणे बोलला.
" म्हणजे नाहीच जमणार असं म्हणा की !"
" अहो ,बाबा आता तुम्हांला कसं समजावू ?"
" काहीही समजविण्याची गरज नाहीये. आम्हांला आपलं
वाटलं की तू आपली आहेस भाची साठी काहीतरी खटाटोप
करशील ; पण तुझ्या बोलण्यावरून असं वाटत नाही की तू
आपल्या भाची साठी काय करशील ? खरं तर आमचंच चुकलं ,आम्हांला इथं यायला नको हवं होतं ."
" बाबा तुम्ही उगाच गैरसमज करून घेत आहात. तुमच्या काळातला जमाना राहिला नाही आता. तुमच्या काळात त्याच्याशी गाठ बांधून दिली जात होती. त्याच्या सोबतच पूर्ण आयुष्य काढायच्या मुली. परंतु आताचा काळ
जरा वेगळा आहे, आज काल ची मुलं आपल्या मर्जी नुसार नि त्याना पसंत असलेल्या मुलींशीच लग्न करतात. जबरदस्ती केलेली चालत नाही आता." प्रीती बोलली.
" आज्याला नातू शिकवतो तशी तू लागलीस आता मला
शिकवायला."
" मी काय शिकविणार तुम्हाला , जे खरं आहे तेच सांगितले."
" ठीक आहे, आता तुम्हां दोघांनाच वाटत नसेल की आमची अनुसया तुमच्या घरची सून होऊ दे,तर पुढचा विचारच खुंटला." महिपतराव बोलले. तशी प्रीती मनात
बोलली की, बाबा ,आता तुम्हांला कसं समजावू ? अवघड जागीचं दुःख न नि डॉक्टर जाई ! अशी अवस्था झालीय माझी ! तेवढ्यात कावेरीबाई बोलली," बाई ग,तुम्हां दोघां ना
पण जर असं वाटत नाही की, आपल्या अनुसायेचे भलं व्हावे. तर पुढे काय बोलणार आम्ही ! " त्यावर सुधाकर ने
आपले कोणतेच मत प्रकट केलं नाही. कारण त्या मागचे
खरे कारण त्याना सांगू शकत नाही. हीच सर्वात मोठी अडचण होती. कारण ते सत्य फार मोठा स्फोट घडवून
आणणार होतं. कदाचित भूकंप वाणी हादरा बसेल ,यात
तीळ मात्र शंका नाही. म्हणून दोघेही गप्प होते ; पण सत्य ते
सत्यच त्याला कितीही पाताळात जरी लपवून ठेवलात तरी ते
एक ना एक दिवस उसळी मारून प्रकट होतेच सर्वासमोर.
अगदी तसेच झाले प्रीतीच्या बाबतीत .
सुधाकरने आणि प्रीतीने प्रीतीच्या आई-वलडीलासमोर
सत्य लपविण्याचा काटोकाट प्रयत्न केला ; पण शेवटी
उघडकीस आलेच. , झाले असे की, रात्री झोपण्यासाठी मुलं
सुधाकरच्या खोलीत जायला तयार होईनत , त्यांचे म्हणणे की ,मम्मी तू आज आम्हांला बाबांच्या खोलीत झोपायला का
सांगते ? आम्ही रोज तर दादांच्या खोलीत झोपतोय. " असे
प्रतीक बोलला. तरी बरं तिने सुधाकरला बाबा नि विराजला दादा म्हणायला शिकविले होते. काही ठिकाणी वडिलांना दादा म्हणण्याची पद्धत आहे, म्हणून प्रीतीच्या आई-वडिलांना संशय आला नाही. शिवाय प्रिती उद्गारली ," बरं बरं,
तू तुझ्या दादांच्याच खोलीत झोप. आम्ही आपले झोपतो बाबांच्या खोलीत. तशी किशोर,नि किशोरी हट्ट धरतात की
आम्ही दादांच्या खोलीतच झोपणार. तसा त्या दोघांचा प्रीतीला आला,तिने त्या दोघांच्या पाठीत धपाटा घातला. नि
म्हणाली ," फार लाडावलात तुम्ही ! मुकाट्याने चला झोपायला नाहीतर एकेकाला ......." असे म्हणून दोघांच्या पण बकोटीला पकडून ती त्यांना खेचत घेऊन जाऊ लागली. तशी तिची आई कावेरीबाई म्हणाली," अगं असं काय करतेस? त्यांना त्यांच्या भावाच्या खोलीत झोपायचं तर झोपू दे ना," लगेच प्रीतीला समजावत सुधाकर बोलला," हां प्रीती झोपू दे त्याना विराजच्या खोलीत ." प्रीतीचा एकदम नाईलाज झाला. प्रीती त्या तिघांना घेऊन विराजच्या खोलीत गेली. ते तिघेही झोपेपर्यंत ती विराज च्या खोलीत थांबली. ते तिघे झोपल्यानंतर मात्र ती हळूच उठून बाहेर आली. आणि आपले आई-वडील झोपले किंवा नाही याचा अगोदर कानोसा घेतला. ते दोघेही झोपल्याची खात्री होताच ती विराजच्या खोलीत गेली नि विराजच्या शेजारी निर्धास्तपणे
झोपली. परंतु त्याच वेळी दुसऱ्या खोलीत तिचे आई-वडील
झोपले होते. मात्र कावेरीबाई ना झोप येत नव्हती. त्यांच्या
डोक्यात काही वेगळेच विचार सुरू होते. आणि ते विचार म्हणजे त्यांच्या मनात एक संशयाची पाल चुकचुकली होती.
मुलांनी विराजच्या खोलीत झोपण्याचा हट्ट का धरला असावा ? आणि प्रतीक असं का म्हणाला की आम्ही रोजच
दादाच्या खोलीत झोपतो म्हणून. आम्ही म्हणजे ते तिघेपण
का फक्त प्रतीक झोपतो मोठ्या भावाच्या खोलीत ? आणि
तो कामावरून आल्या बरोबर त्याला तिन्ही पोरं जाऊन का बिलगली असावीत .? काय कारण असावे ? कारण काय , मोठा भाऊ आहे,ना तो त्यांचा ,मग मोठ्या भावाला बिलगु शकतात ना पोरं ? त्यांचे मन काही स्वस्थ बसू देईना ,
तेवढ्यात त्यांना तहान लागली. म्हणून पाणी पिण्यासाठी
त्या उठल्या नि बाहेर आल्या. मे महिन्याचे दिवस असल्याने
जाम उकडत होते. म्हणून सुधाकरने खिडकीची कवाड उघडेच ठेवले होते. कावेरीबाई त्यांच्या खोलीच्या बाजूने जात
असता नकळत त्यांची नजर सुधाकर वर गेली. सुधाकर पलंगावर एकटाच झोपला आहे , हे त्याना नाईट बल्फ च्या मंद प्रकाशात दिसले. त्यांना वाटले की मुलांना झोपवता झोपवता प्रीती पण तेथेच झोपली की काय ? त्या मागे वळणार तोच बाजूच्या खोलीतून कोणीतरी कुजबुजत असल्याचा त्याना जाणवले. तशी त्यांची पाऊल त्या खोलीच्या दिशेने वळली. त्यांनी दरवाजा लोटून पाहिला तर
दरवाजा आतून बंद. म्हणून त्यांनी दरवाजा ला कान लाविला
नि आतील संभाषण ऐकण्याचा प्रयत्न करू लागल्या. परंतु
आतील आवाज इतका हळू होता की तो स्पष्ट ऐकू येत नव्हता. परंतु त्यांच्या मनात एक विचार आला की असं कोणाच्या ही दरवाजा ला कान लावून चोरून ऐकणे पाप
तर नाही ना करत आहोत आपण ? शिवाय ती आपली
मुलगी आहे, आपल्या मुली विषयी असा वाईट विचार करणे
योग्य आहे का ? असा विचार करून त्या तेथून जाऊ लागल्या तेवढ्यात विराजचा आवाज तिच्या कानी पडला.
वेळ रात्रीची असल्याने शांत वातावरणात कुजबुजले शब्द
पण स्पष्टपणे ऐकू येतात. त्यामुळेच की काय विराज आणि
प्रीती बोलत असलेले वक्तव्य स्पष्टपणे ऐकू येऊ लागले.
विराज बोलला ," काय ग अजून किती दिवस राहणार आहेत
तुझे आई-बाबा ?" कावेरीबाईना एकदम धक्का च बसला.
आपल्या आईशी हा असा काय बोलतो ? लगेच प्रीतीचा तिच्या कानी पडला की, अहो,जरा हळू बोला,कोणी ऐकलं
म्हणजे ?" प्रीतीचे वक्तव्य ऐकून तर अजूनच त्याना धक्का
बसला. नि त्यांच्या मनात एक विचार आला की, ही अशी
काय बोलते त्याच्याशी नवरा असल्यागत ? काय भांडगड आहे ही ? याचा शोध घेतलाच पाहिजे. असा विचार करून
त्यांनी पुन्हा आपला कान दरवाजाला लाविला. तेव्हा विराज
चे स्वर कानी पडले - अग पण किती दिवस चोरा सारखे राहावे लागेल आपल्याला ?" तशी प्रीती वैतागुन म्हणाली,
मग त्याला मी काय करू ?" त्यावर तो चिडून बोलला,
" तुला काही करायला सांगितले का मी ?"
" चिडू नका. माझी किती दिवसभर तारांबळ होते ती
तुम्हांला काय सांगून उपयोग आहे त्याचा ? तुम्ही मार मस्त
ऑफिसमध्ये निघून जाता ,माझी इथं किती पंचायत होते
याची तुम्हाला काय कल्पना ? आज तर दोघांनी हट्टच धरला
होता. "
" कशाचा हट्ट ?"
" तुमच्या लग्नाचा आणि कशाचा ?"
" काय ss माझ्या लग्नाचा ?"
" नाही. माझ्या लग्नाचा."
" आता नीट सांगणार आहेस का ?"
" अहो, माझ्या मामे भावाच्या मुलीशी तुमचे लग्न ठरवायला आले आहेत ते."
" अग मग त्याना सांगायचे होते ना की, माझं एका मुलीशी
प्रेम आहे म्हणून."
" सांगितले."
" मग काय म्हणाले ?"
" म्हणाले त्या मुलीशी लग्न करू नका त्याचे ?"
" पण हे सांगणारे ते कोण ,?"
" ते कोण आहेत ते माहीत नाहीये तुम्हांला ?"
" सॉरी ! लक्षात नाही राहिलं."
" मला ना कंटाळा आला असल्या जीवनाचा."
" तुमच्या पेक्षा मला आलाय. किती लपवायचं ?"
" मी काय म्हणतो, एकदा स्पष्ट सांगूनच टाकावे. जे होईल ते होईल."
" लोकं शेण घालतील आपल्या तोंडात."
" अगं पण असं किती दिवस लपविणार हे आपले नाते ?"
" जेवढ्या दिवस लपविता येईल तेवढे दिवस लपवायचं."
" काय करावे ते सुचतच नाही बघ."
" ही सर्व माझ्यामुळे घडले. मी माहेरी गेली नसती तर
हा प्रसंग आपल्यावर ओढवला नसता."
" किती मस्त पाच वर्षे गेली होती आपली."
" हो ना ?"
" तू आता एक काम कर."
" काय करू ?"
" तू बाबांच्या खोलीत जाऊन झोप आता."
" का पण ?"
" तुझ्या आईने उद्या सकाळी माझ्या खोलीतून बाहेर पडताना पाहिले तर तिला नक्कीच आपल्या दोघांचा संशय
येईल."
" हो ; पण ह्या मुलांचं काय करू ?"
" त्यांना झोपू दे,माझ्या खोलीत."
" आणि मी एकटी कशी झोपू तुझ्या बाबांच्या खोलीत?"
" जशी पहिल्यांदा झोपायचीस."
" तेव्हाची गोष्ट फार वेगळी होती. तेव्हा मी तुझ्या बाबांची पत्नी होती. आता मी तुझी पत्नी आहे. कसं वाटतं ते ?"
" कसं वाटतं ते महत्वाचे नाहीये. आजची वेळ महत्वाची
आहे."
" मान्य ,पण मला नाही जमणार हे."
" अगं थोड्या दिवसाचा तर प्रश्न आहे, एकदा आई-बाबा
गावाला गेले की मग आपणच दोघे राजा-राणी. कसं ?"
" मी असं करते किशोरीला घेते सोबत." असे म्हणून ती
उठली नि किशोरीला उचलून घेतले नि दरवाजा उघडला नि जरा आजूबाजूला नजर फिरविली नि सुधाकरच्या खोलीच्या
दिशेने निघाली. तिच्या पाठोपाठ तिची आई चालत होती हे
तिला माहीत नव्हते. प्रीती जशी आंत शिरली. तश्या कावेरीबाई बाजूला सरकल्या.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा