Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

महाकाल ५

महाकाल ५
महाकाल ५

 


          विवेक आपल्या बेडरूम जवळ गेला तसा दरवाजा
आपोआपच उघडला. त्याने आंत प्रवेश करताच त्याचे
पाय जागीच स्थिरावले. कारण समोरील दृश्य पाहून त्याच्या मनात अनेक विचार येऊन गेले ते असे,
  " सौंदर्या कोणाशी तरी बोलतेय , पण कोणाशी ?
कदाचित त्या समंधाशीच ती बोलत असावी. असं त्याला वाटलं, तेव्हा त्याच्या मनात एक विचार आला की  पण समंध कसा असेल बरं ? तो तर तिच्या शरीरावर ताबा मिळवून बसला आहे ना, मग हा दुसरा कोण ? काही कळत नाही. मी जातो माघारी असा मनात विचार करून मागे वळला तसा त्याच्या कानावर एक आवाज पडला ," थांब चाललास कुठं ?"  तसा विवेक दचकला. कारण
आवाज पुरुषाचा होता. त्याने झट्कन मागे वळून पाहिले.
तर सौंदर्या चट्कन उठून बसत म्हणाली," अरे विवेक तू
कधी आलास ?" विवेक पुरता गोंधळला. क्षणापूर्वी पुरुषी
आवाज आला तो कोणाचा होता ? सौंदर्या च्या मुखातून
तो बोलला का ? असेल ही कुणी सांगावे ? काही कळत
नाही बुवा !" इतका विचार त्याच्या मनात येईपर्यंत सौंदर्या
ने लगेच दुसरा प्रश्न केलाच. त्यांनी विचारले की, अरे असं का पाहतोस वेड्यासारखा !" विवेक ला काय बोलावे ते सुचेना , तो भीतभितच तिच्या जवळ गेला. तसे सौंदर्या ने त्याचा हात पकडून त्याला स्वतः कडे खेचले. तसा तो तिच्या अंगावर कोसळला. तेव्हा क्षणभर तिला वाटले की त्याच्या शरीरात प्राणच नाही की काय ? तिने घाबरून विचारले," विवेक काय झालंय तुला ? पण हुं नाही की चू नाही पण क्षणभरच. दुसऱ्या क्षणी झोपेतून उठल्यागत तो तिच्याकडे पाहत म्हणाला," हं ss काय झालं ? तू अशी काय पाहतेस माझ्याकडे ?" सौंदर्या एकदम गोंधळून गेली की काय खरं आहे ? म्हणजे आता मी जे विवेक चे रूप पाहतेय ते खरं आहे का  ? क्षणापूर्वी जे रूप मी विवेक चे  पाहिले ते खरं आहे. काहीही कळत नाहीये. "
   " अगं काय विचारतो आहे मी ?" असे विवेक ने विचारताच सौंदर्या भानावर येत म्हणाली," हं काय म्हणतोस बोल." त्यावर विवेक म्हणाला," म्हणजे मी जेव्हा बोलत होतो त्यावेळी तुझं लक्ष नव्हतं तर !"
सौंदर्या एकदम गोंधळली तिला काय उत्तर द्यावे ते कळेना
ती म्हणाली," नाही लक्ष होतं, डोक्यात दुसरे विचार सुरू
होते, त्यामुळे तू काय म्हटलेस ते मी ऐकलं नाही." त्यावर
विवेक उद्गारला," मी सांगू तुझ्या मनात काय विचार सुरू
होते ते.?" असे विचारताच तिच्या मनाला विचार पडला की खरंच ह्याला दुसऱ्याच्या मनातले विचार कळतात की
काय ?" विवेक उद्गारला," हां, तुला माहीत नाही मग ऐक,
तुझ्या मनात आता काही क्षणापूर्वी हा विचार आला होता
की, खरंच ह्याला दुसऱ्याच्या मनातले विचार कळतात की
काय ? हाच विचार तुझ्या मनात सुरू होता ना ?"
    " होय, पण तुला कसा कळला ?"
    " मला तुझ्या मनातील सारे विचार कळतात बरं का ?"
    " अरे बाप रे, फार अवघडच काम म्हणायचं आहे तर !"
    " काही अवघड नाही. तू फक्त मी म्हणेन तसे वाग मग
काही होणार नाही तुला. लवकरच तुझ्या पोटात माझा अंकुर फुटणार आहे बरं का ? बाळ तीन महिन्याचे होईपर्यंत कुणालाही हे गुपित सांगायचं नाही बरं का ?"
    " अरे पण ते लपून राहते का ? कळते ते आपोआपच
सर्वांना."
    " कळेल तेव्हा कळू दे, पण तू सांगायचं नाहीये."
   " पण का ?"
   " का ते विचारू नकोस. फक्त सांगितले तेवढे कर."
   " ठीक आहे. " सौंदर्या उद्गारली. त्यानंतर विवेक ने तिला
आपल्या मिठी मध्ये घेतले तेव्हा तोच स्पर्श तिला जाणवला. तेव्हा तिच्या द्यानात आले की या क्षणी आपल्या सोबत जो आहे तो विवेक नसून समंध आहे. परंतु आपण त्याचं काहीच वाकडं करू शकणार नाही. अर्थात त्याला त्याच्या मना सारखे करू द्यावे हाच एकमेव मार्ग उरला आपल्या हाती. विवेक तिच्या सोबत मनसोक्त प्रणयक्रीडा करून तिच्या शेजारी मस्त झोपी गेला. सौंदर्या ला मात्र  झोप येत नव्हती राहून राहून एकच गोष्ट तिच्या डोळ्यासमोर उभी राहात होती आणि ती गोष्ट म्हणजे आपल्या पोटी आपल्या पतीचे बाळ असणार नाही तर त्या संमधाचे असणार आहे, म्हणजे भूत सुध्दा माणसा प्रमाणे मुलं जन्माला घालतात की काय ? फार भयंकर गोष्ट आहे ही ? म्हणजे आपल्याला होणारं बाळ मनुष्य नाही तर भूत असणार  ...बाप रे ! नुसत्या विचारानेच तिच्या अंगावर काटा उभा राहिला. आणि खरोखरच समंधाचे बाळ जन्माला आले तर काय होईल ? एक भयानक चेहरा तिच्या समोर आला नाक मोठे हत्तीच्या दाता प्रमाणे दोन मोठे दात, केस लांबलचक हाताची बोटे लांब आणि त्या बोटाना मोठमोठी नखे ती नखे पाहून तिला क्षणभर वाटले की त्या धारदार नखांनी तो आपले तोंड ओरबाडून काढतोय आणि ओरबडलेल्या नखांच्या जखमातून रक्त वाहते आहे आणि ते रक्त ते बाळ दूध समजून चोकतोय असे दृश्य पाहून ती मोठ्या ने किंचाळलीच. तसा दचकून विवेक जागा झाला नि म्हणाला," काय झालं सौंदर्या ?" विवेक चा बदललेला आवाज पाहून तिला थोडा धीर आला. ती त्याला बिलगली. तसा विवेक तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत म्हणाला," अगं सौंदर्या काय झालं ते नीट बोल तरी !" तशी ती त्याच्या खुशीत अधिकच शिरत म्हणाली,
    "  काय सांगू विवेक तुला , आपलं नशीबच फुटलं." विवेक ने न समजून विचारले," असं बरं का म्हणतेस सौंदर्या ?" तेव्हा सौंदर्या मुसमुसत म्हणाली, "  मग आणखीन काय म्हणू ? मला काही पण सुचत नाही बघ."
    " अगं पण झालं तरी काय ते सांग ना ?"
    "  आता हे कसं सांगू तुला, अवघड जागी दुखणं नि
डॉक्टर जाई, अशी अवस्था झालीय बघ माझी!"
     " अगं पण तू मला सांगितलं नाहीस तर मला कळणार
तरी कसं ?"
     " मी तुला काही पण सांगू शकत नाही, हीच तर सर्वात
मोठी अडचण आहे बघ."
    " तू काय सांगतेस ते खरंच कळत नाही बघ मला. म्हणून मी काय म्हणतोय की तू आता शांत झोप सकाळी
उठलीस ना, मग शांतपणे काय घडलं ते सांग मला. मग त्यातून काहीतरी मार्ग काढू." असे म्हणून तिला आपल्या
मिठीत घेतले. थोड्या वेळानंतर दोघांना पण झोप लागली.

   राधाबाई च्या मात्र डोळ्याला डोळा लागत नव्हता. तिच्या डोक्यात अनेक विचारांनी थैमान घातले होते. पण
त्याना ही काही उपाय सुचत नव्हता. त्यांच्या शेजारी
गोपाळराव मात्र शांत झोपले होते. ते पाहून राधाबाई त्यांचा फार राग आला. त्यांनी गोपाळरावाना हलवत
उठविण्याचा प्रयत्न करत म्हणाल्या," अहो , जरा उठा ना ?" ते न उठता झोपेतच म्हणाले," अगं राधे झोपू दे गं की मला." त्यावर राधाबाई चिडून म्हणाल्या," इथं जीव माझा कंठाशी आलाय नि तुम्हाला झोपायचं सुचतंय, चला उठा आधी !" असे म्हणताच गोपाळराव नाईलाजाने उठत म्हणाले," अगं राधे काय तुझं इतक्या रात्रीला काय
बोलायचं आहे तुला ? हे काय प्रेमाच्या गोष्टी करायचं
वय आहे का आपलं ?"
   " मला प्रेमाच्या गोष्टी नाही करायच्या आहेत तुमच्या
सोबत."
    "  मग कशापायी उठविलेस मला, ते सांग ना ?"
    " ते तर सांगायचं आहे तुम्हांला पण तुम्ही शांतपणे
ऐकून घ्याल तेव्हा ना ?"
    " बरं ऐकतो मी. सांग काय सांगायचंय तुला ?"
    " तुम्हांला माहीत तरी आहे का , आपल्या घरात काय
चाललंय ते."
    " काय चाललंय आपल्या घरात ?"
    " म्हणजे ? तुम्हाला काहीच माहीत नाही, असं म्हणा की !"
     " खरंच मला माहित नाही. तू सांग बरं काय घडलं ते."
   तेव्हा मग राधाबाई ने सौंदर्या विषयी थोडक्यात संपूर्ण
माहिती देऊन त्या आपल्या नवऱ्या ला विचारू लागल्या
की ,आता काय करायचं वो आता ?" त्यावर गोपाळराव
म्हणाले," हे इतक्या दिवस सुरू आहे, नि तू आता मला
सांगते." त्यावर राधाबाई म्हणाल्या, " मला वाटलं सर्वकाही सुरळीत होईल तुम्हांला कशाला उगाचच त्रास
द्यायचा." त्यावर गोपाळराव म्हणाले," त्रास कसला ?
आपल्या घरावर आलेले संकट दूर नको का करायला ?"
    " हो पण ते दूर करणार  कसं ?"
   " काहीतरी उपाय असेलच ना त्यावर.?"
   " उपाय असता तर मी केला नसता का ?"
   " अगं प्रत्येक रोगावर काहीतरी उपाय असतोच ना, मग
यावर सुध्दा असेलच की !"
    " उपाय एकच आहे, ती मरेपर्यंत वाट पाहावी लागेल
आपल्याला."
    " असं काय बोलतेस , ती सून आहे आपली."
    " हो, पण नको ती ब्याद घेऊन आली ना ती आपल्या
घरी  !"
    " त्यात त्या बिच्चारीचा काय दोष ?"
    " सगळा दोष तिचाच आहे."
    " तो कसा काय ?"
    " तिच्या बालपणी तिला एका समंधा ने झपाटले आहे,
हे माहीत होते ना ?"
    " अगं पण तूच तर मागे म्हणाली होतीस ना, महाकाल
तांत्रिका ने मागे सांगितले होते की ते सर्व खोटे होते म्हणून."
     " हां पण ते सगळं खरं आहे. कारण मी एका तांत्रिका कडे गेली होती तेव्हा त्याने मला सांगितले की समंध च
आहे नि तो तिला स्वतः सोबत घेऊन जाणार."
    " जाणार म्हणाला ना तो मग कशाला चिंता करतेस ?"
    " अहो पण तोपर्यंत जीवाला घोर नाही का ?"
    " काही घोर भिर नाही शांत झोप. आणि मला पण
जरा शांत झोपू दे." असे म्हणून त्यांनी तिच्या कडे पाठ
फिरविली नि झोपण्याचा प्रयत्न करू लागले. राधाबाई
विचार करू लागल्या की आता काय करावं ?"  फार
उशिरा दोघांना पण झोप लागली.

           सौंदर्या सकाळी लवकर उठली नि स्नान करून
किचनमध्ये प्रवेश केला. राधाबाई पण उठल्या नि स्नान केली नि किचनमध्ये जाऊन आंत डोकावून पाहिले. सौंदर्या किचनमध्ये सकाळच्या चहा-नाश्ता ची तयारी करत होती. त्याना वाटत होते की किचनमध्ये जाऊन सुनबाई ला मदत करावी. परंतु तिच्यावर एका प्रेतात्मा सावली आहे म्हटल्यावर त्यांची आंत जाण्याची हिंम्मत काही झाली नाही. त्या माघारी फिरल्या नि देवघरात गेल्या नि देवा समोर देवाला हात जोडून म्हणाल्या," देवा माझं काय बरं चुकलं म्हणून तू सून मला दिलीस. आता यातून आमची रक्षा पण तूच कर बाबा."असे म्हणून त्या तिथंच देवा समोर आसन घालून बसल्या. जपमाळ घेऊन मंत्र म्हणत बसल्या.

     खूप दिवस झाले तरी काही भेटायला आली नाही की
तिची काही खुशखबर मिळाली म्हणून सुशीला बाई
स्वतःच आपल्या मुलीला भेटायला मुलीच्या सासरी आल्या. आपली आई आपल्याला भेटायला आली म्हणून
सौंदर्याला फार आनंद झाला. तिने आपल्या आईची नि
वडिलांची चौकशी केली नि आपल्या धाकट्या भावाची
पण चौकशी केली. तेव्हा सुशीला बाई म्हणाल्या," अगं पोरी नको करुस चिंता सगळे खुशाल आहेत बघ. आम्हाला फक्त तुझी खुशाली मिळत नव्हती बघ म्हणून आले बघ. सर्वकाही ठीक आहे ना ?" त्यावर राधाबाई मघापासून ज्या चूप होत्या त्या म्हणाल्या," कशाचं ठीक होतंय ह्या तुमच्या पोरी ने स्वतः सोबत समंध आणलाय म्हटल्यावर कशाचं सुख मिळतंय ह्या घरालातील सगळ्या लोकांना." समंधा चे नाव ऐकताच सुशीला बाई च्या काळजात एकदम चर्रर्र झालं. पण काय बोलावे ते सुचल्याने त्या गप्प राहिल्या. क्षणभर वेळाने त्या थोड्या सावध झाल्यावर त्या म्हणाल्या ," राधाताई तुम्ही म्हणता ते मला अजिबात कळलं नाही बघा." तश्या त्या चिडून म्हणाल्या," उगाच वेड पांघरून पेंड गावाला जाण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हांला चांगले माहीत होते की तुमच्या पोरीला धरलं आहे ,  तरी देखील ही गोष्ट तुम्ही आमच्यापासून लपून ठेवली. म्हणून आता आल्याच आहात तर घेऊन जा आपल्या मुलीला आपल्या सोबत."
    " अहो असं काय बोलता ? तुम्ही पण होता ना तेव्हा
तांत्रिकाने सगळ्यांसमोर सांगितले होते की सौंदर्याला
कोणत्याही भुताने झपाटले नाहीये म्हणून."
    " असं मग आपल्या पोरीलाच विचारा ती एकटी असताना कुणासंगत बोलत असते ते."
   " अहो, ती स्वतःशीच बोलत असेल."
  " तुम्हाला काय मी चेहऱ्यावरून मूर्ख बाई वाटले का ?"
   " असं कसं मी म्हणेन बरं ?"
   " मग मी काय सांगते ते नीट ऐका, तुम्ही आता इथं
आलातच आहात तर जाताना आपल्या पोरीला पण घेऊन
जा. आम्ही कुठवर सोसायचंय ?" तेव्हा सुशीला बाई म्हणाल्या," हे बघा, तुम्ही म्हणता त्या प्रमाणे जर का माझ्या पोरीच्या अंगावर भुताची छाया असेल तर ती मी
दूर करण्याचा प्रयत्न जरूर करेन. परंतु माझ्या मुलीला
माहेरी पाठवू नका हो, मी हात जोडते तुम्हाला." आणि
खरोखरच त्यांनी दोन्ही हात जोडले. परंतु राधाबाईच्या वर
त्याचा काहीच परिणाम झाला नाही त्या उलट म्हणाल्या,
   " तुम्ही आपल्या पोरीला इथून घेऊन जा, आणि जेव्हा
तुमच्या पोरीला समंध सोडेल तेव्हाच तिला इथं आणून
सोडा. पण मला नाही वाटत की तो समंध या जन्मात
तरी सोडेल त्याला." सुशीलाबाईंनी त्याना खूप विनवणी
केली पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. सौंदर्या ने
खूप सांगण्याचा प्रयत्न केला की भुताने मला नाही तर
आपल्या मुलाला झपाटले आहे." असे म्हणताच विवेक
पण चिडला म्हणाला," काय बोलतेस तू सौंदर्या ?"
    " अरे खरंच सांगतेय मी." सौंदर्या उद्गारली. परंतु तिचे
म्हणणे कोणालाही पटले नाही. उलट तिच्या ह्या म्हणण्यामुळे विवेक सहित सर्वजणच चिडले नि सर्वांचे
एकच मत झाले की सौंदर्याला तिच्या आईने आपल्या
सोबत घेऊन जावे बस्स ! शेवटी नाईलाजाने सौंदर्या ला
आपल्या आई सोबत माहेरी यावे लागले. सुशीला बाई
लागलीच आपल्या मुलीला घेऊन त्या तांत्रिका कडे गेल्या.
तांत्रिकाने सुध्दा तेच सांगितले जे सौंदर्या ने सांगितले की
तुमच्या मुलीला भुताने झपाटले नसून तुमच्या जावयाला
महाकाल नावाच्या भुताने झपाटले आहे, परंतु तुमच्या
मुलीला त्या महाकाल पासून त्याला काहीपण धोका नाहीये."
    " असं कसं म्हणता महाराज, कसा असला तरी तो माझा जावई आहे, त्याच्या जीवाला काही वाईट बरं
झालं म्हणजे ?"
    " असं काहीही होणार नाही बघा, उलट झालं तर चांगलंच होईल बघा. तुमच्या मुलीचा संसार सुखाचा होईल बघा."
    " तुम्ही काय म्हणता ते मला खरंच कळत नाही बघा.
तेव्हा काय ते नीट समजावून सांगा."
    " अहो, तुमच्या मुलीच्या केसाला ही धक्का लागणार
नाही. फक्त तुमचा जावई कधी कधी वेड्या सारखा वागेल
बघा. त्याच्या अंगी ते भूत असल्यामुळे, पण हिला काहीही
त्याच्या पासून त्रास होणार नाही. तेव्हा आता शांत मनाने
घरी जा."
   " अहो पण कशी घरी जाऊ माझ्या जावयाने माझ्या
मुलीला कायमची माहेरी पाठवून दिले आहे."
    " काहीही चिंता करू नका. थोड्या दिवसांनी त्याला त्याची चूक कळेल नि तो स्वतःच तिला आपल्या घरी
घेऊन जाईल बघा."
     " खरं सांगता ?"
     " मी कधीच खोटं सांगत नाही आजच्या रात्री त्याचा
अनुभव येईल बघा. ही विभूती घ्या नि थोडी थोडी पाण्यातून पाजा आपल्या मुलीला. सर्वकाही ठीक होईल
चिंता करू नका."
    " महाराज एक विचारू ?"
   " अवश्य विचारा."
    " त्या भुता पासून माझ्या जावयाची मुक्तता नाही करता
येणार का ?"
   " नाही. कारण ते भूत महाकाल नावाच्या तांत्रिकाचे आहे, त्याचे खूप प्रेम होते तुमच्या मुलीवर. पण ते पूर्ण
होऊ शकले नाही. म्हणून तो आत्म्याच्या रुपात तुमच्या
जावयाच्या अंगात शिरला आहे, त्याला हटविणे एवढे
सोपे नाही आणि समजा त्याला हटविण्याचा कुणी प्रयत्न जर केला तर तुमच्या जावयाचा जीव जाईल. चालेल तुम्हांला , नाही ना ?  म्हणून मी काय सांगतो ते ऐका , राहू दे त्याला त्यांच्या अंगी. तुमचं काही नुकसान नाही ना त्यामुळे."

    " असं हो कसं म्हणता , आपल्या नवऱ्याच्या अंगात भूत आहे, हे माहीत असल्यावर भीती तर वाटेल च


ना ? हिणं कसं राहायचं त्याच्या बरोबर?"


    " भ्यायचं काय कारण , तो काहीही करणार नाही.खोटं
वाटत असेल तर आपल्या लेकीलाच विचारा की !"
   " काय गं काय म्हणतात हे ?"
   " खरं आहे त्यांचं मला त्यांचा स्पर्श सांगतो की हा माझ्या नवऱ्याचा स्पर्श नाहीये. पण बाकी काहीही त्रास
नाहीये मला."
    " तुमचं काम झालं ना, आता कसला ही विचार न घरला
जा, आजच संध्याकाळी जावई येईल तुमच्या घरी ! तुमच्या लेकीला भेटायला." त्यानंतर त्या मायलेकीने
त्यांचे आभार मानले नि निघाले आपल्या घरी !"

   संध्याकाळी खरंच येतो का जावई त्यांच्या घरी हे पुढील
भागात वाचा.

      क्रमशः

टिप्पण्या

Popular posts

रामायण -१ | Ramayana episode 1 | Author :- mahendranath prabhu

Janmashtami 2022: 18 या 19 अगस्त कब मनाई जाएगी जन्माष्टमी?

शादी से पहले अपनी बेटी सोनाक्षी सिन्हा से अनबन पर शत्रुघ्न सिन्हा की प्रतिक्रिया..