पंखरूपी मानव -८
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
पंखरूपी मानव -८ |
बॉडीलेस आणि डॉ . विश्वजित मध्ये सुरू असलेले संभाषण त्या कैद खाण्याच्या बाहेर सर्वाना ऐकू येत असते. परंतु पाहणाऱ्याला फक्त एकच व्यक्ती बोलतो आहे,असे दिसत असते. अर्थात डॉ. विश्वजितच दिसत असतात. याचे आश्चर्य डॉ. डेव्हिड नाच नाहीतर डॉ. डाबर आणि इतर लोक
ही करत असतात. छोट्यात छोटी वस्तू म्हणजे हवेत तरंगत असणारे कण जे सामान्य डोळ्यांना दिसत नाहीत. ते कण सुध्दा त्या कॅमेरा मध्ये दिसत असतात. त्याच कॅमेरात बॉडीलेस का दिसत नाही ? याचेच घोर आश्चर्य सर्वाना पडलेले असते.
तेव्हा डॉ. डेव्हिड कैद खाण्याचा दरवाजा उघडून आंत प्रवेश
करतात नि डॉ. विश्वजित च्या अवती भवती सर्वत्र फिरून
बॉडीलेस ला शोधतात. परंतु बॉडीलेस कोणाचा दिसत नाही.
शेवटी डॉ. डेव्हिड डॉ. विश्वजित ना विनंती करतात की एकवेळ आम्हाला त्याचे दर्शन घडवा. आम्हाला पाहायचे
आहे तो दिसतो कसा ?" तेव्हा डॉ. विश्वजित ने बॉडीलेसला
आदेश दिला की , एक मिनिटं साठी सर्वा समोर प्रगट हो."
असे म्हणताच बॉडीलेस सर्वा समोर प्रगट झाला. सेम
टू सेम दुसरे डॉ. विश्वजित फक्त दोघां मध्ये फरक एकच
होता की डॉ. विश्वजित ना पक्षां प्रमाणे पंख नव्हते. नि
बॉडीलेस ला पंख होते. हे घोर आश्चर्य सर्वांनी पाहिले नि आपापल्या कॅमेरा मध्ये ते दुर्मिळ दृश्य टिपले. आणि एका मिनिटात बॉडीलेस पुन्हा दिसेनासा झाला. तेव्हा डॉ. डेव्हिड
म्हणाले ," डॉ. विश्वजित आम्हाला हा बॉडीलेस विकत द्या.
तुम्ही सांगाल ती किंमत डॉलर च्या रुपात देवू. " त्यावर डॉ. विश्वजित हसून म्हणाले, " डॉ. डेव्हिड सॉरी ! हर चीज बिकावू नहीं होती. आणि हा बॉडीलेस एक वस्तू नसून माझा पुत्र आहे. आणि संतान कधी विकले जात नाही. कोणत्याही किंमतीत असे तुम्हाला माहीत असायला हवे." तेव्हा डॉ. डेव्हिड म्हणाले ," ठीक आहे हा तुमचा बॉडीलेस जर तुम्ही विकू शकत नसाल तर काही हरकत नाही. परंतु तुमच्या शिष्यांनी बनविलेले बॉडीलेस तरी आम्हाला तुमच्या बॉडीलेस सारखे बनवून द्या."
" सॉरी ! डॉ. डेव्हिड मी व्यापारी नाही. आणि मला प्रसद्धीचा मोह सुध्दा नाही. मी जे काही करतो ते फक्त
स्वतःसाठी च करतो. अर्थात मी हा बॉडीलेस अंतराळातील
रहस्य शोधून काढण्यासाठी त्याची निमिती केली आहे.
अर्थात मी अंतराळात जाऊन नवीन ग्रह ताऱ्याचा शोध घेणार
आहे." त्यावर डॉ. डेव्हिड म्हणाले ," घ्या ना, आम्ही कोठे नको म्हणतोय ,परंतु आपल्या जवळ असलेले ज्ञान दुसऱ्या ला द्यायचे असते. ही तर जगाची रीत आहे."
" असेल. परंतु ज्या ज्ञानाचा जर दुरुपयोग होणार असेल
असे ज्ञान न वाटलेले बरे."
" डॉ. विश्वजित हे तुम्ही नाहीतर तुमचे घमंड बोलतेय."
डॉ. डेव्हिड बोलले.
" जे तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही समजा. मला काहीच फरक पडत नाही. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या. ती गोष्ट म्हणजे डॉ. विश्वजित फक्त आपल्या देशासाठीच मरणार
आणि जगणार ही ! " असे म्हणून त्यांनी बॉडीलेस ला आदेश
दिला की जॉन आणि सलीम ह्या दोघांना घेऊन ह्यांच्या मुक्कामी नेऊन सोड नि वापस ये." असे म्हणताच जॉन आणि सलीम लगेच दिसेनासे झाले. ते कसे गायब झाले हे कोणालाही कळले नाही. फक्त रिपोर्टर मशीन मध्ये एक बिंदू अति वेगाने उंच आकाश मार्गाने जाताना दिसला. डॉ. डेव्हिड ने त्या बिंदूंचा हेलिकॉप्टर मध्ये बसून पाठलाग केला. परंतु
काही अंतरांतर तो बिंदू देखील दिसेनासा झाला. त्यामुळे डॉ. डेव्हिडचा नाईलाज झाला ,म्हणून ते माघारी परतले.
तेव्हा डॉ. डेव्हिड ने डॉ. विश्वजित ला विचारले की हा
काय प्रकार आहे ? " तेव्हा डॉ. विश्वजित हसून म्हणाले,
" माझी उपकरणे माझ्याच इशाऱ्याचे पालन करतात."
" म्हणजे ?"
" मला माहित होते तुम्ही त्यांचा पाठलाग करणार म्हणून
मी रिपोर्टर मशीन चा पासवर्ड बदली केला. बिंदू ब्लॉक
झाला. "
" पण कसं शक्य ? तुम्ही तर इथं बंदिस्त आहात. आणि रिपोर्टर मशीन ह्या रूमच्या बाहेर एका सुरक्षित ठिकाणी ठेवली आहे." त्यावर डॉ. विश्वजित हसून म्हणाले ," डॉ. डेव्हिड तुम्ही स्वतः एक वैज्ञानिक आहात , तुम्हाला एवढे तर
कळायला पाहिजे की प्रत्येक गोष्टीची मर्यादा असते. अर्थात
रिपोर्टर मशीन सुध्दा काही अंतरापर्यंत च तुम्हाला रिपोर्ट देणार ना ? जास्त दूर गेल्यानंतर ती कसा रिपोर्ट देणार ना ?"
" अस्सं आहे का ? तरीच म्हटलं असा कसा सिग्नल बंद झाला . पण हरकत नाही तुम्ही आहेत ना आमच्या ताब्यात.
तशी पण त्या दोघांची आम्हांला गरज नाहीये. खरी गरज
आम्हाला तुमची आहे, आणि आम्ही तुम्हांला इथून कोठे ही
जाऊ देणार नाहीये." डॉ. डेव्हिड बोलला.
" डॉ. डेव्हिड चुकीची समजूत आहे तुमची !"
" कशी काय ?"
" जो बॉडीलेस तुमचा एवढा पक्का बंदोबस्त असताना देखील तुमच्या कैद खान्यातून कैदी घेऊन फरार होतोय. त्याला कितीसा उशीर लागणार आहे,माझी इथून सुटका
कारायला."
" परंतु आता तुम्हांला इथं ठेवणारच नाही ना ?"
" म्हणजे ?"
" आम्ही तुम्हाला दुसऱ्या गुप्त स्थानांवर नेऊन ठेवू. तिथं
बॉडीलेस काय ? हवा सुध्दा आमच्या परवानगीशिवाय आंत
दाखल होणार नाही." असे विधान डॉ. डेव्हिड करताच
डॉ. विश्वजित मोठमोठ्या ने खळखळून हसले. ते पाहून
डॉ. डेव्हिड नि डॉ. डाबर यांना आश्चर्य वाटले. ते दोघेही
डॉ. विश्वजित कडे गोंधळलेल्या नजरेने पाहत म्हणाले ,
" डॉ. विश्वजित त्यात हसण्या सारखे काय आहे ?"
व्हॉट इज जोक ?" डॉ. विश्वजित आपले हसणे थांबवत म्हणाले," तुम्ही माझ्या बॉडीलेस ला पुरतं ओळखले नाही
अजून ? जहाँ परिंदा भी पर नहीं मार सकता है ना,वहाँ
बॉडीलेस जरूर पहुँच जाता हैं ? ऎसा क्या देख रहे हो ?
यकीन नहीं आता ना ? तो कोशिश करके देख लो. बाद में
पछताना नहीं. चूँकि हर सवाल का जबाब ही बॉडीलेस हैं।"
डॉ. विश्वजित च्या या विधानावर डॉ. डेव्हिड आणि
डॉ. डाबर विचारमग झाले. की असे कसे होऊ शकते.
जर डॉ. विश्वजित ना अंधार कोठरीत नेऊन ठेवले तर
बॉडीलेस कसे काय कळू शकते ? तो काय ईश्वर आहे का ?
मला वाटतं डॉ. विश्वजित आपल्याला उल्लू बनवत असावेत.
आपण त्याना गुप्त स्थानावर घेऊन जाऊ नये म्हणून. त्यांनी
ही युक्ती केली असावी. त्यावर डॉ. विश्वजित मनात बोलले
की, मला कल्पना आहे , तुमचा आता क्षणी तुमच्या मनात
कोणते विचार सुरू आहेत, तुमचा नक्कीच माझ्या या विधानावर विश्वास अजिबात बसला नसेल. आणि मला
माहीत आहे की शेवटी तीच चूक करणार जी तुम्हांला करायला नको होती. कारण बॉडीलेस ला माझ्या पर्यंत पोहोचण्यासाठी त्याच्या कडे अनेक मार्ग आहेत. आणि
त्याची प्रचिती तुम्हांला लवकरच होईल. आणि स्वतःच घेऊन
याल त्याला माझ्यापर्यंत. नाक दाबलं म्हणजे तोंड उघडतेच की ! परंतु ही भारतवाशीयांची भाषा आहे, तुम्हाला नाही कळणार ती. असा विचार सुरू असतानाच एक कर्मचारी धावत डॉ. डेव्हिड जवळ आला नि म्हणाला," बॉडीलेस
येण्याचे संकेत रिपोर्टर मशीनवर येऊ लागलेत." हे ऐकता क्षणी डॉ. डेव्हिड बोलला ," इथं बॉडीलेस पोहोचण्या अगोदर
डॉ. विश्वजित ना इथून दुसरीकडे घेऊन चला. " असे म्हणता
क्षणी दोन शिपाई आंत आले नि डॉ. विश्वजित ना पकडून
एका गुप्त स्थळावर घेऊन गेले. ते गुप्त स्थान म्हणजे एक
तळघर होते. तेथे विद्युत सप्लायर्स पण नव्हती. तेथे फक्त मेणबत्तीच्या प्रकाशात डॉ. विश्वजित ना कोंडून ठेवले.
कारण विद्युत सप्लाय शिवाय बॉडीलेस ला कोणतीही सूचना मिळणे शक्य नाही. अशी समजूत डॉ. डेव्हिड ची होती. परंतु
त्याना हे माहीत नव्हते की बॉडीलेस फक्त विद्युत पॉवर वरच अवलंबून नव्हता. त्याला सूर्याची ऊर्जा एकदा मिळाली आणि
त्याची बॅटरी पूर्ण चार्ज झाली की तो सतत २४ तास कार्यरत राहू शकतो. हे गुपित फक्त डॉ. विश्वजित ना माहीत होते.
त्यामुळे ते एकदम बिनदास्त होते.
सर्वजण रिपोर्टर मशीन जवळ जमा झाले नि बॉडीलेस
पुढे काय करतो. म्हणजे बिंदू कोणत्या दिशेला सरकलेला दिसेल त्या दिशेला बॉडीलेस चाललाय हे ओळखण्याचे
एक साधन होते. कारण तो अदृश्य असल्याने त्याला ओळखण्याचा दुसरा कोणताही मार्ग नव्हता.
बिंदू एका ठिकाणी स्थिर झाला. याचा अर्थ बॉडीलेस
रिपोर्टर माशीनपाशी येऊन पोहोचला आहे. आता तो कोणत्या दिशेला सरकतो ते पाहायला सर्वजण उत्सुक होते.
तो बिंदू हळूहळू पश्चिम दिशेला सरकू लागला. तसे सर्वांचे चेहऱ्यावर हर्षानंदाचे स्मित पटले. परंतु क्षणभरच . कारण
बिंदू पुन्हा आपल्या स्थानावर आला. त्यानंतर तो उत्तर दिशेला सरकला तसे पुन्हा सर्वांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटले कारण बॉडीलेस पुन्हा चुकीच्या दिशेने जात होता.
परंतु पुन्हा तेच झाले. बिंदू पुन्हा आपल्या मूळ स्थानी आला
नंतर तो दक्षिणेकडे सरकला तसे पुन्हा सर्वांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटले. परंतु क्षणभरच पुन्हा बिंदू पूर्व स्थानी आला नि मग पूर्व दिशेला जसा सरकला तसा सर्वांच्या चेहऱ्यावर भयभीत चिन्ह उमटले. परंतु बिंदू पुन्हा पूर्व स्थानी आला तसे सर्वांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटले.
डॉ. डेव्हिड चा तर आनंद पारावर राहिला नाही. त्याला वाटले की बॉडीलेस पुरता गोंधळला आहे. त्याला मार्ग सापडत नाहीये. त्याची ही अवस्था पाहून चक्रयुहू मध्ये फसलेल्या अभिमन्यू आठवण झाली . परंतु एक गोष्ट ते विसरले की वाघ दोन पाहुले मागे सरकतो याचा अर्थ असा नव्हे की तो घाबरला आहे, तर सावज ला पकडण्यासाठी झेप घेत आहे. बॉडीलेस ने ही किंचित त्यातलाच प्रकार केला. म्हणजे पुन्हा आपल्या स्थानी येऊन चट्कन पुन्हा त्याच दिशेला सरकला तो थेट मुख्य दरवाजापाशी जाऊन थांबला. जो दरवाजा त्या गुप्त स्थानावर घेऊन जातो. डॉ. डेव्हिड समजले की बॉडीलेस डॉ. विश्वजित जवळ पोहोचणार म्हणून त्याला थांबविण्यासाठी त्याने एक धमकी दिली ती अशी- थांब बॉडीलेस एक पाऊल जरी पुढे टाकलेस तरी डॉ. विश्वजित ना जीवानिशी ठार मारले जाईल. तेव्हा मुकाट्याने मागे फिर." या विधानावर बॉडीलेस खळखळून हसला नि म्हणाला," डॉक्टर विश्वजित को मारनेवाला अभी तक कोई पैदा नहीं हुआ है. और सुनो डॉ. विश्वजित को मारनेका सपना देखने वाले खुद मर जाओ गे हिम्मत है तो आगे बढ़ो." तेव्हा डॉ. डेव्हिड बोलला," मी केवळ धमकी देत नाहीये."
" तो कोशीश करके भी देख लो." बॉडीलेस उद्गारला.
असे म्हणताच डॉ. डेव्हिड आपला खिशातून मोबाईल
बाहेर काढून नि त्यात एक नंबर डायल केला . परंतु फोन लागत नव्हता . कारण ती व्यक्ती कव्हर क्षेत्राच्या बाहेर होती.
तसा बॉडीलेस खळखळून हसला नि म्हणाला ," क्या कहा था मैने. सही कहा ना ? " त्यावर डॉ. डेव्हिड काही बोलला
नाही ; परंतु ए ४७ गन एका शिपाईच्या हातून खेचून घेतली नि आवाजाच्या दिशेने रोखून म्हंटले ," हिंम्मत असेल तर
समोर ये."
" यह खिलौना मेरा कुछ नहीं बिघाड पायेगा . देखना चाहोगे ? ये लो " असे म्हटले नि प्रगट पण झाला. तसा
डॉ. डेव्हिड ने आपल्या शिपाई ना इशारा केला. तसा चोहीकडून त्यांच्या वर गोळ्यांचा पाऊस पाडला ; परंतु बॉडीलेसच्या अंगावर फुलं पडत असल्या सारखे जाणवत होते. सर्व गोळ्या फक्त अंगाला चिटकल्या. परंतु बॉडीलेस वर त्या बंदुकीच्या गोळ्यांनी काहीच परिणाम झालेला दिसून आला नाही. उलट तो मोठमोठ्या ने हसू लागला. हे पाहून डॉ. डेव्हिड ला काय करावे ते सुचेना.
क्रमश:
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा