महाकाल ८
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
महाकाल ८ |
राधाबाईंची आता पूर्ण खात्री झाली की भुताने आपल्या सूनबाईला पछाडले नाहीये तर आपल्या मुलाला
पछाडले आहे. काय करावे ? कुणाकडे जावे नि आपल्या
मुलाची त्या महाकालच्या आत्म्यापासून सुटका कशी करावी हे त्याना कळत नव्हते. गोपाळरावाना तर काहीही सांगून उपयोग नव्हता. कारण त्यांचे म्हणणे असे होते की त्या आत्म्यापासून जर आपल्याला काही त्रास नाही तर त्याच्या वाटेला आपण जायचंच कशाला ? तसे पण ते
विवेकला आपला मुलगा मानत नव्हते. त्याना वाटायचं
की आपल्या समोर जो उभा आहे तो आपला मुलगा
नसून महाकाल चा आत्मा आहे. परंतु राधाबाई एक आई
होत्या. त्याचं मन काही ते मान्य करायला तयार नव्हते.
म्हणून त्या यातून काहीतरी मार्ग मिळतो का ? याचा त्या प्रयत्न करत होत्या. त्या शिवाय त्यांच्या मनात अजून एक भीती निर्माण झाली होती की आपल्या सुनेच्या पोटी जन्माला येणार मूल कोणाचे असेल ? वगैरे....
एके दिवशी त्या आपल्या मैत्रिणी सोबत चर्चा करत
असताना एका शेजारीण बाईची गावात राहणारी भावजय
त्यांच्या कडे आलेली होती. गप्पा गोष्टी करताना सहजच
म्हणून भुतांचा विषय निघाला तेव्हा चर्चा करतांना त्यांनी आपल्या गावात घडलेल्या गोष्टी विषयी माहिती देऊ लागली, तेव्हा त्या बाईने समंधा विषयी माहिती देताना सांगितले की समंध फक्त त्याच स्त्री ला दिसतो.ज्या स्त्रीला
समंधाने झपाटले आहे. तिच्या संग गप्पा पण मारतो आणि तो कोणाचे रूप पण धारण करू शकतो. इतकेच
नाही तर त्या बाईला त्या समंधा पासून दिवस पण जातात. " हे ऐकता क्षणी राधाबाईच्या काळजाचा ठोका चुकला. त्यांचे मन एक अनामिक भीतीने थरथरले. पण पुढे काय झालं ते जाणून घेण्याची उत्सुकता त्यांच्या मनात
असल्याने त्यांनी विचारले की पुढे काय झालं ? त्या बाईला त्या भुता पासून मूल पण होते की काय ?"
" जन्माला येत नाही. म्हणजे तीन महिने झाले ना, तो
समंध तिच्या पोटातील गर्भ खाऊन टाकतो."
" काय सांगतेस ?" राधाबाईंनी विचारले
" अहो, खरंच ! आमच्या गावात एका बाई सोबत घडलं
आहे हे."
" अरे बाप रे ! फार भयंकर आहे हे . बरं पुढे काय झालं ?"
" पुढे काय असेच तिच्या सोबत अनेक वेळा घडत राहिलं नि शेवटी मेली बिचारी !"
" आणि तिचा नवरा !"
" नवरा ठार वेडा झाला."
" फार वाईट झालं ग त्या बाईचं."
" अहो त्या बाईचं काय घेऊन बसलाय ती तर मेली
सुटली बिचारी ! पण तिच्या नवऱ्याचं काय तिच्यापाय
तो बिच्चारा वेडा झाला ना ?" राधाबाई चट्कन बोलून
गेल्या. म्हणजे ती बाई म्हणजे त्यांची सुनबाई आणि तिचा
नवरा म्हणजे आपला मुलगा विवेक ? सगळ्या बायकांनी
आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिले. तश्या ओशाळल्या. आणि
दिलगिरी व्यक्त करत म्हणाल्या," मला तसं नव्हतं म्हणायचं म्हणजे मला म्हणायचं होतं की यावर उपाय
नाही आहे का काही ?" त्यावर ती ग्रामीण बाई म्हणाली,
" नाही ना उपाय असता तर त्यांनी केला नसता का ?"
" हो तेही खरंच म्हणा !"
" पण हा समंध असतो कोण ?"
" कोण म्हणजे भुताचा एक प्रकार ."
" ते कळलं. पण ते कोणापासून बनते."
" अतृप्त आत्मा !"
" म्हणजे ?"
" ज्यांच्या इच्छा जिवंतपणी पूर्ण होत नाहीत ना, ते
मेल्यानंतर समंध बनतात आणि गावच्या वेशीवर झाडावर
बसलेल्या असतात. एकटी दुकटी सुंदर स्त्री दिसली की तिला पकडतात आणि मग शेवटपर्यंत सोडत नाही तिला
स्वतः सोबत घेऊनच जातात."
" असं कसं होईल काहीतरी उपाय असेल ना ?"
" ते काही मला माहित नाही. परंतु आमच्या गावात
एका बाई सोबत असं घडलं होतं म्हणून सांगते. बाकी
आम्हाला काही माहीत नाही बुवा !" हे ऐकल्या नंतर
राधाबाईंच्या काळजाचे पाणी पाणी झाले. त्या आपल्या
घरी आल्या पण त्यांच्या डोक्यातून समंधा बद्दल जे ऐकलं
ते काही जाईना. त्यांच्या मतात आता नको नको ते
विचार येऊ लागले. समंध हे भूत अतृप्त राहिलेल्या व्यक्ती
पासून होते. याचा अर्थ सरळ आहे, महाकाल च मेल्यानंतर
समंध बनला असावा. कारण त्याची इच्छा होती ना की
सौंदर्या त्यांची पत्नी बनावी. त्यासाठी तर त्याने तिच्या
प्रमाणे तरुण बनण्यासाठी कित्येक निष्पाप लोकांचा जीव घेतला. पण त्याचा जीव त्याच्याच एका शिष्याने घेतल्यामुळे त्याची इच्छा अपुरी राहिली. आणि त्याची ती
राहिलेली अपुरी इच्छा पूर्ण करण्यासाठी समंध बनला
असावा. आता माझ्या लक्षात आले की गुहेतील तांत्रिकाने
मला सांगितले ते खोटे नव्हते. तो म्हणाला होता की,
तुमच्या सुनेला समंधा ने झपाटले ते खरेच होते आणि सुशीला बाईंना महाकाल म्हणून सांगितले तेही खरंच होतं. कारण दोन्ही एकच व्यक्तीचे तर नावे आहेत ना ? आपण उगाच त्याच्यावर संशय घेतला. परत त्याच्याकडे
जायला हवं. काही मार्ग काढायचं तर तोच काढेल. पण
ती तर बाई म्हणाली की त्यावर काहीच उपाय नाही म्हणून
तर आपण आणलेला तांत्रिक जीव मुठीत घेऊन पळून
गेला. मग काय करावं ? वाट पाहावी. ती बाई जे म्हणत
होती ते जर खरं असेल तर आज ना उद्या तो समंध सुनबाईचा जीव घेतल्या शिवाय राहणार नाहीये. आणि
हे खरं आहे का खोटं हे पण कळेलच लवकर. कारण ती
पोटीशी आहे तिचं तीन महिन्याचे बाळ झाल्यानंतर जर
त्या समंधाने तिचा गर्भ खाऊन टाकला तर समजून
जायचं की तिला तो समंध घेऊन जाईलच. पण आपल्या
मुलाचं काय ? त्याचा जीव कसा वाचवावा त्या समंध पासून ? किंचित विचार मग्न झाल्या. त्याना एक उपाय
सुचला की सुनबाई जे म्हणेल त्या गोष्टीला होकार द्यावा.
म्हणजे तो समंध त्याला काही इजा करणार नाही. हेच
सांगायला हवं आपल्या मुलाला. असा विचार करून
त्याने विवेक ला हांक मारली. तेव्हा विवेक आपल्या
बेडरूम मध्ये होता नि सौंदर्या शी गप्पागोष्टी करत होता.
पण सासूबाईंची हाक ऐकून सौंदर्या विवेकला म्हणाली,
" जा विवेक सासूबाई काय म्हणतात ते बघ." विवेक
तेथून उठला राधाबाई जिथं बसल्या होत्या. तेथे आला
नि तो आपल्या आईला विचारू लागला की, मम्मी
तू हांक मारलीस मला."
" हां ! बैस इथं नि मी सांगतो ते नीट ऐक." तसा विवेक
आपल्या आईच्या बाजूला सोफ्यावर बसला नि म्हणाला,
" हं सांग आता. काय म्हणणं आहे तुझं ."
" तुझी बायको आता पोटीशी आहे."
" बरं मग ?"
" अरे बरं मग म्हणून काय विचारतोस ? अश्या वेळी
पुरुषांनी आपल्या बायकोची फार काळजी घ्यायची असते."
" म्हणजे काय करायचं ?"
" अरे तिला काय हवं नको ते विचारायचं ? तिच्या सर्व
इच्छा पूर्ण करायच्या. तिला काय खावंसं वाटतं ते विचारायचं ? "
" असं म्हणतेस होय."
" बाईच्या पोटात जेव्हा पोर असतं तेव्हा त्यांना काही
इच्छा होतात. म्हणजे खरं तर तिच्या पोटातील बाळाच्या
इच्छा असतात. म्हणून त्या आपण पूर्ण करायच्या असतात."
" बरं अजून काय ?"
" अजून काही नाही, तिला आता जाऊन विचार नि तिची
काय इच्छा असेल तर ती तू पूर्ण कर."
" ठीक आहे, आता जाऊन विचारतो." असे म्हणून विवेक उठला नि आपल्या बेडरूम मध्ये गेला. तेव्हा सौंदर्याने त्याला विचारले," काय म्हणतात सासूबाई ?"
" मम्मी , बाळ पोटात असतांना त्या बाळाच्या आईची सर्व इच्छा पूर्ण करायच्या असतात ?" तशी सौंदर्या एकदम
खुश होऊन विचारते की, खरंच अश्या म्हणाल्या सासूबाई !"
" हां म्हणून मी तुला विचारतो तुझी काय इच्छा आहे."
" नक्की पूर्ण करशील ?"
" म्हणजे काय ? करावीच लागणार ना ?"
" मग माझी पण बऱ्याच दिवसापासून एक इच्छा आहे की आपण दोघांनी बाहेर फिरायला जाऊया नि डिनर पण बाहेरच करायचा. एवढी करशील माझी इच्छा पुरी ?"
" हो नक्कीच !"
" मग चल आताच जाऊया !"
" हो तयारी कर, लगेच निघू या !" तशी सौंदर्या एकदम
खुश झाली नि तिने चक्क त्याच्या गालाचा किस घेतला.
" अरे वा ! बाहेर फिरायला घेऊन जायचे इतके सारे
फायदे असतात ते." तो एकदम खुश होत म्हणाला.
सौंदर्या ने मस्तपैकी शॉर्ट ब्लॅक कलरचा वनपीस घातलं.
त्यावर डायमंडचे छोटेसे गळ्यातले आणि कानातले पण
त्याला मँंचीग घातले. आणि उजव्या हातात मोठ्या डायमंडचे नाजूक छोटेसे कडे. ओठांवर लाल रंगांची
लिपस्टिक फिरविली. आणि डोळ्यात गडद काजळाची
पेन्सिल फिरवत असताना तिची नजर विवेक गेली तर
तिच्या ध्यानात आले की विवेक तिलाच न्याहाळत होता.
तेव्हा सौंदर्या ने आपली नजर लाजेने खाली झुकविली.
तेव्हा विवेक ने तिला जवळ ओढून घेतले...... नि म्हणाला,
" वाव , तुला असं सेक्सी बघून तर बाहेर जायचा मुडच
गेला बघ माझा. मला वाटतं आज नको उद्या गेलो तर !"
" नाही हं ! असं नाही चालायचं , आजच जायचं, ते पण आताच. कारण मी इतकी छान तयार झाली आहे आणि तू प्लॅन कॅन्सल करायचं म्हणतोस .... सौंदर्या ने मुद्दाम रुसायचं नाटक केलं .....तसा विवेक म्हणाला ," अग मस्करी केली मी तुझी !" विवेक ने पण तिला मंचिंग होतील असेच कपडे घातले नि दोघेही बाहेर निघाले. रात्री फार उशिरा घरी परतले. आता त्यांच्या मनातून समंध म्हणजेच महाकाल ची भीती निघून गेली म्हणजे तो काही त्रास देत नव्हता तर त्याला भिण्याचे काय कारण ? परंतु राधाबाईंच्या मनात मात्र कायम भीती होती. जोपर्यंत सौंदर्या जिवंत आहे तोपर्यंत आपल्या पुत्राचे काही खरं नाही. एकदा का समंध सौंदर्याला आपल्या सोबत घेऊन गेला की आपल्या मुलाची सुटका होईल म्हणून की काय त्यांनी आपल्या मुलाला सांगितले होते की सौंदर्या ला कोणत्याच गोष्टीचा विरोध करू नकोस म्हणजे तो समंध तुला काही अपाय करणार नाहीये. म्हणून विवेक देखील तिला कोणत्याही गोष्टीला नाही म्हणत नव्हता. परंतु मनातून त्याला वाटत असे की यातून आपल्या सौंदर्या ची सुटका व्हायला पाहिजे. पण कशी करायची हे बाकी त्याला समजत नव्हतं.
हा हा म्हणता तीन महिन्यांचा काळ लोटला. आणि
आज अमावस्या होती. अर्थात आज भुतांची रात्र आहे असा विचार राधाबाईंच्या मनात येताच त्याना शेजारच्या बाईंनी समंधा विषयी सांगितलेले आठवले. तीन महिने
झाल्यानंतर समंध त्याने झपाटलेल्या स्त्री चा गर्भ खाणार !
म्हणजे आज खरंच समंध सौंदर्याच्या पोटातील गर्भाला खाईल का ? आज आपल्याला लपून पाहायलाच हवं खरं
काय आहे ते. असा विचार करून त्या आपल्या पलंगावरून खाली उतरल्या नि चालत विवेक आणि सौंदर्या च्या बेडरूम जवळ आल्या तेव्हा त्यांच्या ध्यानात आले की त्यांच्या बेडरूम चा दरवाजा उघडाच होता. त्या दरवाजा लोटून आंत डोकावणार होत्या. परंतु लगेच त्यांच्या मनात आला की त्या समंधा ने आपल्याला
बघितले तर असा विचार मनात येताच त्या मागे सरल्या.
आणि दरवाजाच्या फटीतून त्या आंत मधले दृश्य पाहण्याचा प्रयत्न करू लागल्या नि त्यांनी जे पाहिलं ते
फार भयानक होतं. विवेक सौंदर्याच्या पाया जवळ बसला
होता नि त्याने सौंदर्याची साडी तिच्या गुडग्या पर्यंत सरकवली त्यानंतर एक हात साडी च्या आंत टाकला.
नि थोड्याच वेळात त्यांच्या हातात एक रक्ताने माखलेला
मांस चा गोळा होता. अर्थात तो तीन महिन्यांचा गर्भ होता.
त्याने विकट हास्य केलं नि गर्भ खाऊ लागला. आपला
पुत्र विवेक चा गर्भ खात असल्याचे पाहून त्यांच्या पोटातून
एकदम ढवळून आले नि एकदम ओकारी आली. त्या
कशाबशा बाथरूम पर्यंत पोहोचल्या नि चकर येऊन तिथेच कोसळल्या आणि त्यांचे डोळे उघडले. तेव्हा त्याना
जाणवले की भीतीने आपल्याला दरदरून घाम फुटला आहे. तेव्हा त्यानी लगेच आपल्या आजूबाजूला पाहिले तेव्हा त्यांच्या ध्यानात आले की आपण जे पाहिलं ते एक स्वप्न होतं. खरंच असं घडलं असेल का ? तेव्हा त्यांच्या
कानावर कोणाच्या तरी रडण्याचा आवाज ऐकू तेव्हा
त्यांच्या मनात एक विचार आला की खरंच सुनबाई सोबत
असं घडलं असेल का ? परंतु खऱ्या खोट्याची शहानिशा
करण्यासाठी त्यांच्या बेडरूम कडे जाण्याची मात्र हिंमत
नव्हती.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा