दुनिया ना माने - २१
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
दुनिया ना माने - २१ |
" तुझी मुलं कुठं आहे गं ? बाबांनी ,प्रीती कडे पाहत विचारले. तेव्हा प्रीती उत्तरली," ती काय मामासंग खेळताहेत ? " बाबा बोलले ," मामा काय त्यांच्या सारखा लहान झालाय त्यांच्या सोबत खेळायला ?"
" लहान मुला सोबत होऊ लागतं " आई उत्तरली. त्यानंतर दुपारची जेवणे झाली आणि इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या. शांती प्रत्येक शब्द तोलून मापून बोलत होती. जणू चुकुन आपल्याकडून काही बोलले जाऊ नये, हीच भीती तिच्या मनात सतत येत होती. तरी बरं मुलांना आजोबा म्हणण्याऐवजी बाबा म्हणाला शिकविले होते. म्हणून थोडीशी चिंता दूर झाली होती. समजा उद्या जर आपल्या वडिलांनी पुण्याला जाऊन विराजच्या वडिलांना सोबत आणालच तरी काही भीती नव्हती. ती उगाच आपली घाबरत होती. होऊन होऊन दुसरं काय होणार ? चार दिवस
विराज च्या वडीला सोबत नवरा बायकोचे होते नाटक करावे लागेल ना ? त्यात काय विशेष आणि ते आपल्याला नवीन का आहे ? असे तिचे मन तिला सांगू लागले होते , तेव्हा कुठे तिच्या मनावरील दडपण कमी झाले . मग तिने मनात द्वड निश्चय केला की येईल त्या प्रसंगाला तोंड द्यायचे. दुसऱ्या दिवशी प्रीतीचे वडील पुण्याहून मुंबईला निघाले.
दरवाजावरील बेल दाबताच सुधाकरने दरवाजा उघडला. समोर अचानक प्रीतिच्या वडिलांना पाहून मनात थोडा घाबरलाच ! प्रीती कडून ह्यांना सत्य कळलं की काय ?
आशी उगाचंच त्याच्या मनात शंका येउन गेली. क्षणभर काय बोलावे ते सुचलंच नाही. भांबावल्या गत होऊन नुसतं पाहतच राहिला त्यांच्या कडे. त्याना आत मध्ये बोलवायचे पण ते विसरून गेला. पण तेवढ्यात प्रीतीचे वडील म्हणाले,
असे काय पाहताय जावई बापू ? भूत पाहिल्या गत ?"
तेव्हा भावनावर येत उद्गारल्या ," अं sss काय म्हणालात ?
" म्हटलं आता आंत यायला सांगणार आहात का दरवाजात मला असे उभे करून ठेवणार आहात ?"
" मला माफ करा. मी तुम्हाला आंत मध्ये बोलवायचे
विसरूनच गेलो." सुधाकर दिलगिरी व्यक्त केली.
" तेच म्हणतोय मी , असं काय पाहत होता माझ्याकडे ?" सुधाकरला चटकन उत्तर सुचलत नाही काय उत्तर द्यावे ? परंतु त्यावेळी ते सहज सुचलं ते बोलून मोकळे झाले. तो म्हणाला ," तसं नाही काही. तुम्हाला असे अचानक आलेले पाहून मी जरा गडबडलो. म्हटलं कालच तर प्रीती गावाला गेली , मी आजच तुम्ही कसे हजर झाले इथे ?
" अहो त्याचे असे आहे की आमच्या धाकट्या चिरजीवांचे नं लग्न ठरले त्याचे आमंत्रण द्यायला आलोय मी."
" अस्सं होय, मला वाटलं वेगळंच वाटलं." सुधाकरच्या
मानतील थोडीशी भीती कमी झाली. तसा तो नि:श्वास टाकला.
" म्हणजे तुम्हाला काय वाटलं होतं ?"
" तसं काही नाही हो,असं अचानक झाल्यावर भीतीच वाटते ना जराशी ! काही वाईट बातमी तर नाही ना आणली ?"
" छे , छे ,छे असं अभ्रद्र बोलू नका काही ."
" बरं ते जाऊदे , मी काय म्हणतो." असे म्हणून लगेच
विषय बदली करत सुधाकर बोलला ," बाकी ठीक चाललंय ना तुमचं ?"
" हो हो , तुमचं देवाच्या कृपेने सर्व ठीक चालले म्हणायचं." प्रीतीचे वडील उत्तरले.
त्यानंतर त्यांनी स्नान केले. आणि सोफ्यावर येऊन बसले. घरात कोणी नव्हतं. विराज ऑफिसला गेला होता. त्यामुळे स्वयंपाक बनवायचे काम सुद्धा सुधाकरलाच करायला लागणार होते, म्हणून सुधाकर ने स्वयंपाक बनवला घेतला. तेव्हा सहज म्हणून तिच्या वडिलांनी विचारले ," घरात दुसरं बाई माणूस नाहीये का ?"
" दुसरा बाई माणूस ? " न कळल्याने सुधाकर बोलला.
" म्हणजे, मला म्हणायचे होते की , विराज च लग्न का नाही केले अजून ?" काय उत्तर द्यावे त्यांच्या प्रश्नाचे सुधाकरला. पण लगेच स्वतःला सावरत म्हणाला," या वर्षी त्याचे लग्न करायचा विचार आहे." तसे ते लगेच म्हणाले," एक काम करता का ? "
" सांगा . काय करू म्हणता ?"
" आमच्या मेहुण्याची एक मुलगी आहे तिच्या सोबत जुळवून टाका तुमच्या विराज ची सोयरिक. कसं ?"
" अरे , बापरे ! हे काय भलताच विचार करून राहिले. ह्यांना आता काय उत्तर द्यावे बरं ?" असे मनात म्हणून सुधाकर जरा विचारात पडला. तसे प्रीतीचे चे वडील म्हणाले ," काय हो ,एवढा काय विचार करू राहिले ? आमचा विचार पटला नाही वाटतं तुम्हाला ?"
" तसं नाही."
" कसं ? "
" अहो , नवीन जमाना आहे ,मुलान अगोदरच कुठे
दुसरिकडे ....... म्हणजे , मला म्हणायचे होते की त्याचं कुण्या दुसऱ्या मुलीवर प्रेम वगैरे असेल तर......."
असे असेल तर आमची काही जोर जबरदस्ती नाही
तुमच्यावर. पण एकवेळ विचारुन तर बघा त्याला."
" हो हो , नक्की विचारतो मी त्याला."
" तुम्ही कशाला त्रास घेताय मीच विचारतो ना त्याला.
संध्याकाळी कामावरून येईल ना घरी !"
" तुम्ही नका विचारू,"
" का ?"
" तुम्हाला नाही सांगायचं ,तो ?"
" म्हणजे आपल्या मनातलं हो म्हणजे मला म्हणावयाचे
होतं की, तो फार लाजकुळा आहे."
" असं म्हणताय ठीक आहे ,मग तुम्हीच विचारा."
" हो हो मीच विचारतो." असे म्हणून त्याने सुटकेचा नि:श्वास टाकला.
त्यानंतर जेवणं झाली. मग इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या. सुधाकर त्याच्याबरोबर गप्पा मारण्यात बिलकुल रस नव्हता ; परंतु नाईलाज होता , म्हणून तू फक्त त्यांच्या हो ला हो आणि नाही ला नाही म्हणत होता; पण ही गोष्ट लवकरच त्यांच्या देण्यात आली. तसे ते सुधाकरला म्हणाले ," जावई बापू तुम्हाला आमच्या बरोबर बोलण्याचा
रस दिसत नाही. काही आमचं चुकलं का ?"
" छे छे छे उगाच काहीतरी गैरसमज करून घेऊ नका."
" उगाच कसं ? मी मघा पासुन बोलतोय तुमच्याशी ! परंतु तुमची आमच्याशी बोलण्याची अजिबात इच्छा दिसत नाही.
का बरं ?"
" बाबासाहेब , उगाच गैरसमज करून घेतला आहात. तसे काही झालेले नाहीये. आणि खरे सांगायचे म्हणजे माझी जरा ची तब्येत ठीक नाही आहे."
" असेल ही तसं कदाचित. आमच्या समजण्यात काहीतरी घोळ झाला असावा. माफ करा. मला नव्हतं माहिती तुमची तब्येत खराब आहे ती."
" तसं फार काही झालेलं नाही. पण जरा मन उदास झालेय बस्स इतकेच ! "
तसे ते हसून म्हणाले ," आलं लक्षात ."
" काय आलं लक्षात ?"
" हेच की आमची कन्या नाही ना इथं . तेव्हा ......."
" हे काय हो बाबा sss काहीतरीच तुमचं आपलं."
" खोटं नाही ते खरं तेच सांगतोय आणि हा प्रश्न फक्त
तुमच्या पुरताच मर्यादित नाहीये. तर सर्वांच्या बाबतीत असंच
घडतं. खोटे सांगत नाही मी. तुमची सासूबाई जेव्हा आपल्या
माहेरी जाते ना, तेव्हा आमची पण अशीच गत होते, तुमच्यासारखी ! अगदी सेम टू सेम ! " असे म्हणून खळखळून
दोघेही हसतात.
संध्याकाळी विराज जसा कामावरून घरी आला तसा सुधाकर ने त्याला सविस्तर माहिती दिली की प्रीतीचे बाबा गावरून आले आहेत, त्यांनी तुझ्यासाठी एक स्थळ आणलं आहे, ते जेव्हा तुझ्या लग्नाविषयी तुला विचारतील तेव्हा त्यांना सांगायचे की माझे एका मुलीवर प्रेम आहे म्हणून. " विराज ने आपली होकारार्थी मान डोलावली. आणि जसा त्यांनी त्याच्या लग्नाचा विषय काढला. तसा विराज लगेच
बोलला की माझं एका मुलीवर प्रेम आहे." त्यावर प्रीतीचे
वडील म्हणाले ," अलीकडच्या मुलांचा अभ्यास कडे लक्ष
फार कमी. प्रेम करण्यात मात्र पटाईत . हो की नाही ?" त्यावर विराज काहीच बोलला नाही. तसे ते म्हणाले ," मग कधी करतोस लग्न ?"
" याच वर्षी करायचे म्हणतोय."
" बरं मग आम्हाला बोलविणार की नाही ?"
" बोलविणार ना , तुम्हाला न बोलवून कसं चालेल ?"
" काय भरवसा द्यावा. लग्ना अगोदर पाळणा हलायचा."
असे म्हणून मनमुराद हसतात. नाईलाजाने सुधाकर ना पण त्याना साथ द्यावी लागते. किंचित थांबून पुढे म्हणाले,
" आज कालच्या मुलांचे काही सांगता येत नाही हो, आमच्या वेळचा काळ फार वेगळा होता. तेव्हा एवढे स्वातंत्र्य दिले जात नव्हते हो मुलांना. पण आता काळच बदलला ना ?"
" हो ; काळाप्रमाणे आपल्याला पण बदलायला हवं. नाही का ? " सुधाकरने लगेच दुजोरा दिला.
" खरंय." किंचित थांबून ते पुढे म्हणाले," मग लग्नाला
तरी येणार की नाही आमच्या मुलाच्या ?"
" हो ; येणार ना ! " पण जसे त्याच्या लक्षात आले की तेथे प्रीती नि मुलं आहेत. आपण तेथे गेलो तर फार घोटाळा होईल. हे जसे त्याचे ध्यानात आले, तसा तो म्हणाला ," पण
मला रजा मिळाली तर !"
" का ? दोन दिवसाची पण रजा मिळणार नाही ."
" बघतो प्रयत्न करून . पण पण मला नाही वाटत मला
रजा मिळेल अशी ! "
" बरं तुम्ही तर याल ना ? " सुधाकरकडे पाहत म्हणाले.
" हो हो मी नक्की येईन."
" नक्की येईन काय ? माझ्या जेवणाचा कसं होणार मग ? " आपले वडील जरी गावाला गेले तरी ही लफडं होणार हे निश्चित होते म्हणून काही ना काही दोघेही बाप-बेटे
करत होते.
" बाबासाहेब, बरोबर आहे त्याचं , त्याला जेवण बनवता येत नाही ना , म्हणून मला पण येता येणार नाही.
" अहो, म्हणून काय झालं त्यानं चक्क बापाला आचारी
बनवायचं म्हणजे ?"
" बाबासाहेब , अगोदर तुम्ही शांत व्हा पाहू !"
" कसा शांत राहू ? मला नाही हे पटत."
" मला तरी कुठे पटते हे ? पण दोन दिवसाचा प्रश्न आहे. म्हणून मीच म्हणालो तिला की स्वयंपाकाचे बघतो मी ,"
" दोन दिवसात प्रीती येणार नाही आता."
" म्हणजे ?"
" लग्न आठ दिवसावर आलं आहे , लग्न झाल्यावरच येईल ती आता. "
" बरं बरं लग्न झाल्यावर पाठवा. मग तर झालं."
" आणि तुम्ही पण येण्याचा प्रयत्न करा."
" बरं बघतो प्रयत्न करून."
" आम्ही आजच गावाला निघायचं म्हणतो."
" आजच जायचं म्हणता ?"
" उद्या गेला असता तर नाही चाललं असतं का ?"
" तिथे कामं आहेत. इथं राहून कसे चालेल."
" मी पण आलो असतो ,परंतु इथं सुध्दा अडचण आहे,
काय करणार ?"
" अडचण कोणाला येत नसते ? पण असं कार्याच्या वेळी तरी माणसाने आपल्या साऱ्या अडचणी बाजूला ठेऊन यायचं असतं. परंतु हे तुम्हाला कसं कळणार ? पाच वर्षात एकदा पण तुम्हाला सासुरवाडीच्या माणसाची खबर घ्यावी असं वाटली नाही." महिपतराव संतापाने बोलत होते.
एकदा सुधाकरच्या मनात आले की बोलून टाकावे की,तुम्ही तरी कुठं घेतलात आमची खुशाली ? परंतु बोलू मात्र शकले नाहीत. ते फक्त इतकेच म्हणाले," चूक झाली आमची बाबा,क्षमा करा."
" मग ती चूक सुधारण्याची एक संधी देतो तुम्हाला."
" कोणती ?"
" आज आठा दिवसा तुम्ही दोघांनी पण लग्नाला यायचं
आहे,बस्स ! मला तुमची कारणे नको आहेत."
" बरं."
" चला आता आम्हांला आमची झोपायची खोली दाखवा. आम्हाला थोडासा आराम करायचा आहे. कारण सकाळी लवकर उठायचं आहे."
" हो,चला." असे म्हणून सुधाकर निमूटपणे त्याना गेस्टरूम मध्ये घेऊन गेले. विराज काही न बोलता चुपचाप
ते गेलेल्या दिशेकडे पाहतच राहिला.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा