Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

कुरुक्षेत्र -३

कुरुक्षेत्र -३
कुरुक्षेत्र -३

 


    

       महिन्याचा पगार ही ठरला आणि एक दिवस गळ्यात
फुलांचे हार घालून वधू- वरा सारखे आम्ही घरात शिरलो. आम्हांला पाहून आई आश्चर्याने उद्गारली ," अरे , लग्न ही करून आलास ?" त्यावर मी म्हणालो ," हो ,आई तुझी होती ना,मी लग्न करावे म्हणून." आई नाराज होत म्हणाली ," हो ;
पण असे ? वाजंत्री नाही , वरात नाही , पाहुणे मंडळी नाही ,
असे लग्न करायला सांगितले होते का मी तुला ? "
     " माफ कर ना आता ! वेळ मारून न्यायच्या हेतूने मी म्हणालो ," झाले ना ? आता काय त्याचे ?"

  "  थांब. ओवाळायला आरती आणते." असे म्हणून आई आंत जायला वळते. तेवढ्यात मी तिला  म्हणालो ," पण आम्हाला ओवाळणार कोण  ?" तसे ते आईच्या द्यानात येते तशी ओशाळून म्हणाली ," हो ; खरंच की . मी तुला ओवाळू शकणार नाही. थांब जरा मी शेजारच्या सखुबाईला बोलावते. असे म्हणून आई बाहेर गेली.तशी ती नाटक कंपनीवाली म्हणाली ," आता हे आणखीन काय ?" तेव्हा मी तिची समजूत काढत म्हणाली ," अहो , आपल्यासाठी जरी हे नाटक असले तरी तिच्यासाठी हे नाटक नाहीये ना ? अर्थात रितीरीवाजा प्रमाणे ती सर्व विधी करणार."
" म्हणजे ? " ती घाबरून म्हणाली. त्यावर मी म्हणालो ," घाबरू नकोस. सर्व विधी म्हणजे ? लग्न झाल्यानंतर नवरा नवरी प्रथम आपल्या घरी येतात तेव्हा ग्रह प्रवेशाच्यावेळी ज्या विधी केल्या जातात. म्हणजे , उंबरठ्यावर माफ वगैरे जे ठेवले जाते ते सर्व विधी ! आलं लक्षात.
    " अहो पण हे नाटक आहे ना ? "
     " हो पण ते तुमच्या आणि माझ्यासाठी ! पण तिच्यासाठी हे वास्तविकता आहे ना , शिवाय  नाटका मध्ये पण तर या विधी केल्या जातात की कंटाळून का होईना पण तिला थोड्यावेळ उभी  राहतेच. तेवढ्यात शेजारच्या सखुबाई येतात आणि आरती चे ताट घेऊन त्या दोघांना ओवाळतात. त्यानंतर उंबरठ्यावर ठेवलेले माप ही ओलांडुन यावे लागले तिला. मी आईच्या पाया पडलो. बाबांच्या फोटोला हात जोडताना मात्र मनाला जरासे खटकले. बाबा समोर ही मला हे नाटक करावे लागत होते. पण करणार काय दुसरा विकल्प नव्हता. आईने शेजारच्या सखुबाईला सांगून आमचा पलंग पण सजवून घेतला. मधुचंद्राची पहिली रात्र म्हणून. पण तिला कुठं माहीत होते की हे सारे नाटक आहे ते. देवधर बरोबर सुध्दा मला खोटेच बोलावे लागले होते आणि कुणीतरी म्हटलेच आहे ना की एक खोटे पचविण्यासाठी शंभर वेळा खोटे बोलावे लागते. याचाच प्रत्यय येत होता मला. अजुन काय काय खोटे बोलावे लागणार आहे ते देवच जाणे. रात्री शयनग्रहात आलो तेव्हा ती झोपली पलंगावर आणि मी झोपलो जमिनीवर. संपूर्ण रात्र जागून काढली. कारण झोप काही लागलीच नाही.
        दुसऱ्या दिवशी मला माझ्या मुलाने विचारले की, बाबा तुम्ही तर म्हणाला होता की आई देवाघरी गेली म्हणून. मग ही कोणती आई ?" आता झाली का पंचाईत याच्या प्रश्नाला काय उत्तर द्यावे मी विचार करू लागलो. तसे त्याने मला पुन्हा विचारले," सांगा ना बाबा ?" मग आयत्या वेळी जे सुचलं ते उत्तर देऊन मी मोकळा झालो. म्हणालो ," अरे तुझ्यासाठी देवाने पाठविलेली ही दुसरी आई आहे. " त्यावर देवधर बोलला ," पण मी कुठं मागितली होती दुसरी आई ? मला तर माझीच आई पाहिजे. तुम्ही देवाला सांगा. ही आई नको. मला माझीच आई पाहिजे म्हणून."
    " अरे एकदा देवा जवळ गेलेले परत येत नाही कुणी ?"
   " मग ही कशी आली देवा कडून ?"
   " अरे ही देवा कडून नाही आली."
    " आता तुम्हीच तर म्हणालात ना ,हिला देवाने पाठविली म्हणून." देवधरने अचूक प्रश्न विचारला होता. मी कल्पना सुध्दा केली नव्हती. हा असा काही प्रश्न विचारेल आणि त्या प्रश्नांचे उत्तर माझ्या जवळ त्यावेळी नसेल. आता काय बरं उत्तर द्यावे ह्याच्या प्रश्नांचे. शिवाय हा जोपर्यंत त्याच्या प्रश्नाचे समाधान कारक उत्तर मिळणार नाही तोपर्यंत तो गप्प बसणार नाही. हे मला माहित होते म्हणून मी त्याच्या प्रश्नाचे
काय द्यावे म्हणजे त्याला पटेल ह्याचा मी विचार करतच होतो. एवढ्यात त्यानेच मला विचारले ," बाबा सांगा ना ?"
पण मला उत्तर काही सुचले नाही. म्हणून मी गप्प राहिलो. तशी ती नाटक कंपणीवाली बाई म्हणाली ," अरे मी तुझीच आहे.  फक्त माझे रूप बदलले." मी लगेच तिच्या वक्तव्याला दुजोरा देत म्हटले ," हां हां हीच तुझी आई." त्यावर तो म्हणाला ," पण तुम्ही म्हणाला की ही दुसरी आई म्हणून."
     " चुकलंच माझं. मी तुला अगोदरच सांगायला हवं होतं. की , देवाकडे गेलेले माणूस परत येताना दुसऱ्या रुपात येते
म्हणून." त्यावर तो म्हणाला ," काही हरकत नाही बाबा. मला
ही आई सुध्दा चालेल. " तसा मी मनात म्हणालो , सध्या पुरते हे ठीक आहे, पण उद्या हिचं काम संपल्या वर हिला जावे लागेल तेव्हा देवधर काय सांगावे बरे ? काहीच सुचत नाही.
नंतर अचानक मनात विचार आला की तेव्हाच तेव्हा पाहू.
सध्याचा प्रश्न सुटला ना ? आईच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसले. पण माझे मन फार अस्वस्थ झाले होते. शिवाय
आम्ही रंगविलेले नाटक फार दिवस चालले नाही. एके दिवशी
आई समोर ते उघडकीस आले. त्याला कारणच तसे घडले.
आईची तब्बेत बरी नव्हती. म्हणून ती आपल्या खोलीत
स्वस्थ झोपली होती. आणि नाटक वाली बाई हॉल मध्ये
बसून टीव्ही पाहत होत्या आणि नेमकी त्याच वेळी फोनची
बेल वाजली. त्या बाईने टीव्हीचा आवाज कमी केला आणि मग रिसिव्हर जाऊन उचलला. "हॅलो sss "
     " हॅलो , माली आहे का ?"
     " अगं मी मालीच बोलतेय."
    " काय गं आम्हांला विसरलीस शी तिथं जाऊन ?"
    " नाही गं , तुम्हांला कसं विसरेन मी ."
    " पण फार मजा असेल ना तिथं ?"
    " मजा तर आहे , पण सजा पण तितकीच आहे."
    " सजा ? मारहानी करतात का गं ते तुला ?" मुद्दाम बोलली.
    " मारहानी करायला काय मी काय त्याची लग्नाची बायको आहे ?"
    " मग सजा कसली गं ?
    " सजा म्हणजे , ती सजा नव्हे!"
    " मग ?"
    " कुठं बाहेर जाता येत नाही. पिंऱ्यात कोंढल्यागत राहावे
लागते इथे ."
    " का ? बाहेर जायची मनाई आहे ?"
    " मनाई नाही गं पण बाहेर जाऊन सांगणार काय कुणी विचारले तर ?"
    " सांगायचे मी त्यांची बायको आहे म्हणून."
    " हूं ss नाटक वाली मी ,माझ्याशी लग्न करणार आहे का तो ?"
     " विचारून बघ कदाचित तुझ्या रूपावर भाळून तुझ्याशी
लग्न करायला होईल तयार."
     " रूपावर आणि तो शेठ भाळणार ? अग ढुंकूनही पाहत नाही तो माझ्याकडे."
      " पण एकाच बिस्तरात झोपताना ?" मुद्दाम चिडविण्याच्या उद्देशाने ती बोलली.
      " एकाच बिस्तरात झोपायला  तो काय माझा नवरा आहे.?"
      " खोटं खोटं गं जसं चित्रपटात दाखवितात."
      " छे , छे , छे ! तसं काय पण करत नाही मी."
      " मग झोपतात कुठं तुम्ही दोघे ?"
      " मी पलंगावर महाराणी सारखी झोपते मऊ मऊ गादीवर  आणि तो शेठ जमिनीवर झोपतो. बिचाऱ्याला
जमिनीवर झोप येत नाही. नुस्ता रात्रभर तळमळत असतो."
      " म्हणजे तू बघत असतेस की काय ?"
      " काय करणार भीती वाटते ना ? एखाद्या वेळेस शेठ उठून माझ्या अंथरुणात आला म्हणजे ? "
      " अंग आला अंगावर तर घेतला शिंगावर. त्यात काय ?"
      " हो गं पण मला नाही वाटत तो शेठ तसं काही करील म्हणून. त्याला बाई बद्दल अजिबात आकर्षणच नाही. नाहीतर बंद खोलीत दुसरा एखादा पुरुष गप्प बसला का ? "
      " मग तू का नाही करत त्याची तपश्चर्या भंग ? जशी मेनके ने विश्वमित्राची तपश्चर्या भंग केली होती."
     " तुझं आपलं काहीतरीच हं ! मी इथं फक्त नाटक करायला आली आहे. स्वप्न रंगवायला नाही." तेवढ्यात तिची
नजर दरवाजावर जाते तशी चपापते. कारण दरवाज्यात  उभी तिला माझी आई दिसली . तशी ती घाईघाईने म्हणाली ," बरं मी तुला नंतर कॉल करते. " असे म्हणून फोन कट केला.
आणि काही घडलेच नाही. असा बहाणा करत ती आई जवळ पट्कन गेली नि बोलली ," तुम्ही का उठून आलेत ? मला हांक मारायची होती ना ? " त्यावर आई त्रासिक पणे
बोलली ," मी जर उठून आली नसती तर मला तुझा हा खरा चेहरा मला कधी दिसलाच नसता. तसा माझा तुझ्यावर राग
नाहीये. कारण तू सांगून सवरून नाटक कंपनीची नटी.
तुला जे काम दिले जाईल ते तू प्रामाणिकपणे करणारच. पण
मला आश्चर्य वाटते ते माझ्या मुलाचे ? माझ्या पोटच्या पोराने
माझ्याशी नाटक करावे ? याहून मोठे दुःख ते कोणते असावे बरे ? " असे म्हणून आई तेथून निघून गेली.
    मालीला काय करावे ते सुचेना . शेवटी नाईलाजाने तिने मला फोन केला नि घडलेली हकीगत जशीच्या तशी मला सांगितली. खरं सांगायचं तर त्यावेळी मला त्या नटी चा भयंकर राग आला. परंतु  आता तिच्यावर रागावून तरी काय
प्राप्त होणार होते. म्हणून तिला ताबडतोब तेथून निघून जाण्यास सांगितले. तसे तिने आपले करार प्रमाणे पैसे मागितले. मी तिला म्हटलं की तुझे पैसे तुझ्या घरी घरपोच होतील. परंतु तू तेथून ताबडतोब निघून जा.

     संध्याकाळी मी घरीं आल्यावर नेहमी प्रमाणे माली ला हांक मारली. जणू जसे काही घडलेच नाही. असे दाखवत
म्हणालो ," माली अगं ए माली sss कुठं गेली ही ?"
     आई दरवाजातून बाहेर येत म्हणाली ," ती आपल्या माहेरी गेली कायमची." मला प्रश्न पडला की आई असं का म्हणाली ? कारण तिला माहेर नव्हतेच. ती नाटकात काम
करणारी अभिनेत्री होती. मी न कळून म्हटले ," माहेरी ?
पण तिला....." परंतु मी बोलण्याच्या अगोदर आईनंच उत्तर दिले की, तिला माहेर नाहीये. असंच ना ?" त्यावर मी काय बोलणार? मी गप्प च राहिलो. तशी आई रागावून बोलली ,
  " अजुन किती खोटे बोलशील.? आणि लाज नाही वाटत माझ्याशी असं खोटं नाटक करायला ?" तेव्हा मी गहिवरून
म्हणालो ," आई मला माफ कर. मी चुकलो."
     " केवळ चुकला नाहीस तू. आपल्या आईचा फार मोठा
विश्वासघात केलास तू . तुझ्या या अपराधाला क्षमा नाही.
कदापि नाही. " असे बोलून ती आपल्या खोलीत जाऊ लागली. तसे मी तिच्या पायांना विळखा घातला नि गयावया करत  बोललो ," आई फक्त एकवेळ क्षमा कर आपल्या या मुलाला." त्यावर ती संतापाने म्हणाली ," मी कोण तुला क्षमा
करणार ? आणि मी देव नाही. सामान्य एक स्त्री आहे आणि तू जे केलेस त्याचा मी स्वप्नात ही कधी विचार केला नव्हता की , माझे पोट चे पोर माझ्याशी असा खेळ खेळेल ? माझी
सारी तपश्या वाया गेली रे. तुझे बाबा गेले त्याच वेळी जर मला मरण आले असते तर हे दिवस मला पाहावे लागले नसते. फार पुण्यवन्त होते तुझे बाबा. ते आधीच गेले. तुझे
प्रताप पाहायला जिवंत राहिले नाहीत. मीच मेली कपाळ
करंटी , म्हणून मागे राहिले , तुझे प्रताप पाहायला." आईचा स्वर कंपित होता. मला राहवले नाही. मी लहान मुलासारखा
ढसा ढसा रडलो. पण आईचा त्यावर काहीच परिणाम झाला
नाही. ती मला म्हणाली ," शौनक माझे पाय सोड. नाहीतर मी पडेन. "  मी म्हटलं ," आधी मला क्षमा केलेस का ते सांग. तरच मी तुझे पाय सोडेन."  आई म्हणाली ," शौनक बाळा
प्रत्येक वेळी जिद्द करणे हे बरे नव्हे आणि माझे अगोदर पाय
सोड. नाहीतर मी माझा प्राण इथंच देईन." असे आईने म्हणताच मी चट्कन तिच्या पायाला मारलेली मिठी सोडली.
तशी आई आपल्या खोलीत निघून गेली नि दरवाजा बंद करून घेतला.
       मी खूप विनवणी केली. पण तिने दरवाजा नाही उघडला. माझ्या हृदयात कालवा कालव झाली नि  माझ्या मनात एक वेगळीच शंका आली. म्हणून मी खिडकी उघडली
नि काचेतून आंत पाहण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आई पलंगावर पालथी पडून स्फुंदत स्फुंदत रडताना दिसली. माझ्या अंगावर एकदम वीज कोसळल्यागत झाले मला.
माझ्या डोक्यावर कुणीतरी मोठाले घन घालत असल्यासारखा भास झाला.आईला मी आता कायमचा मुकलो. असा विचार माझ्या मनात येऊन गेला. पण क्षणभरच.  दुसऱ्या क्षणी मला असे जाणवले की, आई आहे ती फार काळ आपल्या मुलावर नाराज राहू शकणार नाही.
राग थंड झाला म्हणजे ती आपणच बाहेर येईल. असा विचार
करून मी आपल्या खोलीत गेलो आणि पंलगावर पहुडलो.
परंतु मनाला शांती काही लाभेना. आई रात्री जेवायला सुध्दा
उठली नाही. खूप दरवाजा पिटला. पण तिने तो उघडला नाही. आई जेवली नाही , म्हणून मी पण जेवलो नाही. तसाच
उपाशी पोटी झोपलो. परंतु रिकाम्या पोटी झोप येत नव्हती.
या कुशिवरून त्या कुशीवर सारखा वळत होतो. मग कधी
झोप लागली ते मलाच कळले नाही.
      सकाळी नेहमी सारख मी उठलो स्नान केले नि ऑफिसला निघून गेलो. परंतु ऑफिसमध्ये पण चित्त लागेना. शेवटी दुपारीच घरी आलो. घरी येताच माधवला विचारले ," माधव सकाळी आई आपल्या खोलीतून बाहेर आली होती का रे ?"
   " नाय मी लयवेळ दरवाजो ठोकलंय पन आई सायेबानी
दरवाजो अजिबात उघडुक नाय. "
     मी खूप वेळा आईला हाका मारून पाहिल्या. पण आई हूं की चू करी ना मला एका वेगळ्याच शंकेने ग्रासले. म्हणून मी
दरवाजा तोडायचा निश्चय केला आणि मी जशी जोराने दरवाज्याला धडक देवू लागलो. तसा आतून आईचा आवाज कानी पडला.ती मला म्हणाली," दरवाजा तोडू नकोस. मी जिवंत आहे अजुन." मी आईला विनंती करत म्हटलं ," आई ,
दरवाजा उघड ना गं ,मी पाया पडतो तुझ्या. तू सांगशील तसा मी वागेन. पण दरवाजा उघड." त्यावर आई म्हणाली ," तुला
जर वाटत असेल की मी चार दिवस जास्त जगावे तर या
पुढे दरवाजा तोडायचा प्रयत्न करू नकोस. मला जेव्हा बाहेर
यावे सारखे वाटेल तेव्हा मी स्वतःच बाहेर येईन." मला काय
करावे ते सुचेना. शेवटचा उपाय म्हणून देवधरला जवळ
बोलविले नि त्याला म्हटले की , तुझी आजी बाहेर येत नाहीये. तेव्हा तू आपल्या आजीला हांक मार नि तिला बाहेर
यायला सांग. देवधरने सुध्दा खूप प्रयत्न केला. परंतु काहीच
उपयोग झाला नाही. शेवटी देवधर रडकुंडीला आला नि म्हणाला ," आजी दार उघड ना गं मला तुझ्या संग बोलायचे आहे नि खेळायचे आहे. दार उघड ना ?" त्यावर आई म्हणाली ," बाळ माझी तब्बेत बरी नाहीये. मी बरी झाले ना , मग तुझ्या संग बोलेन बरं का ? पण आता मला त्रास देवू
नकोस बरं." तो ही प्रयत्न फसला. आता काय करावे ? मला
काहीच सुचत नव्हतं. दरवाजा तोडावा तरी आईची आज्ञा मोडली असे होईल आणि अजूनच रागवायची म्हणून दरवाजा न तोडता आई कधी बाहेर येते याची मी वाट पाहत
बसलो. मी ऑफिसला पण जायचे बंद केले.

   
क्रमशः



टिप्पण्या

Popular posts

रामायण -१ | Ramayana episode 1 | Author :- mahendranath prabhu

Janmashtami 2022: 18 या 19 अगस्त कब मनाई जाएगी जन्माष्टमी?

शादी से पहले अपनी बेटी सोनाक्षी सिन्हा से अनबन पर शत्रुघ्न सिन्हा की प्रतिक्रिया..