महाकाल ७
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
महाकाल ७ |
राधाबाईना काही कळेना की कोणाचे खरे मानावे ? खरंच का माझ्या महाकाल ने झपाटले आहे का ? का ?
झोपेत चालायची सवय आहे त्याला ? छे छे छे ! असं कसं
होईल त्याला जर झोपेत चालायची असती तर त्यापूर्वी
झोपेत चालला नसता का ? झोपेत जर चालायची सवय
नसेल तर हा सासुरवाडीला कसा पोहोचला ? सुशीला बाईला त्या तांत्रिकाने सांगितले की माझ्या मुलाला महाकाल नावाच्या तांत्रिकाच्या भुताने झपाटले. असे जर
असेल तर त्याने मला असं का सांगितले की तुमच्या सुनेला
समंधाने झपाटले आहे. मला एक कळत नाहीये की तांत्रिक आमची दिशाभूल का करतोय ? त्या मागचा उद्देश काय असावा ? असं तर नाही ना ? त्या तांत्रिका च्या तोंडून दुसराच कोणी वदवतोय. नाहीतर आम्हां दोघींची दिशाभूल करतोय ? खरे काय आहे तेच कळेनासे झालंय. काय केलं म्हणजे सर्वकाही ठीक होईल ? " असे म्हणून त्या किंचित विचारमग्न झाल्या. दुसऱ्या क्षणी त्यांच्या मनात एक विचार आला की आपण असं केलं तर ! म्हणजे दुसऱ्या एखाद्या तांत्रिका कडे चौकशी करू ? म्हणजे खरे काय आहे ते कळेल. असा विचार करून
त्यांनी गोपाळरावांशी चर्चा केली तेव्हा गोपाळराव म्हणाले," मला काय वाटतं माहितेय तुला."
" काय वाटतं तुम्हाला ?"
" हेच की आपला जो विवेक आहे ना, तो विवेक नसून
महाकाल आहे."
" काहीतरीच काय बोलताय ?"
" आपल्या विवेकचं जेव्हा अक्सिडेंट झालं तेव्हाच
तो गेला आता जो आपल्या घरात आहे तो विवेक नसून
महाकाल आहे. फक्त शरीर विवेकचं आहे."
" काहीतरीच तुमचं असं कधी झालंय."
" मग सांग इस्पितळात तर डॉक्टरांनी त्याला मृत म्हणून
घोषित केलं होतं ना, मग परत जिवंत कसा झाला ?"
" ती देवाची करणी दुसरे काय ?"
" मला नाही वाटत ती देवाची करणी असेल."
" म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की आपल्या घरात
वावरतोय तो आपला पोरगा विवेक नाहीये."
" असं मी म्हणत नाही तर त्याची कर्तृत्व सांगते."
" असं काय केलं त्याने ?"
" काय केलं ते तुला माहीत नाही."
" तुम्ही सांगा त्याने काय केलं ते."
" रात्री बारा वाजता सूनबाईच्या घरी कुणी जातं का ?
आणि ते पण दरवाजा न उघडता घरात शिरणे हे फक्त
देवाला शक्य आहे, आणि आत्म्याला."
" म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की आपला विवेक पूर्वीचा विवेक नाहीये.?"
" हां !"
" असं तुमच्याने बोलवतं तरी कसं ? आणि ते पण आपल्या मुलाबद्दल ?"
" हे बघ जे सत्य आहे तेच सांगतोय. आता तुला मानायचं नसेल तर मी काय करू शकतो ?"
" पण दरवाजा चुकून उघडा राहिला असेल तर !"
" एक वेळ बेडरूम चा दरवाजा उघडा राहू शकतो पण
बाहेरचा कसा राहील ? शिवाय त्याला आठवत नाही तो
आंत कसा आला ते. यावरून काय समजायचं तूच सांग
बरं."
" अहो, डोळ्यांवर झोप असल्यावर लक्षात राहते का
कुणाच्या ?"
" ठिक आहे, दरवाजा उघडा होता, मग तो आपोआप
बंद कसा झाला ?"
" कोण सांगतं दरवाजा बंद होता म्हणून."
" सुनबाई म्हणत नव्हती का ?"
" अहो ती खोटं बोलतेय."
" ती का खोटं बोलेल."
" आपलं भिंग फुटू नये म्हणून."
" तिचं कसलं आलंय भिंग ?"
" अहो, तिच्या अंगावर एका समंधा ची छाया नाहीये का ?"
" असं कोणी सांगितले तुला ?"
" तांत्रिक नाही का म्हणाला होता."
" त्याच तांत्रिक ने सुशीला बाईंना असं का सांगितले
की आपल्या मुलाला महाकाल ने झपाटले आहे म्हणून."
" तेच काही कळत नाही, त्यांनी असं का म्हणून."
" अगं असतं एकाच तांत्रिकाकडे किंवा देवस्की करणाऱ्या कडे दोन दुश्मन जर जात असतील तर त्यांना
ते तेच सांगतात की तुमच्या वैऱ्याने तुमच्यावर करणी केली आहे म्हणून.मग ते आपसात राहतात भांडत. तेच
बहुधा तुम्हां दोघी सोबत झालं आहे."
" तुमचं आपलं काहीतरीच."
" काहीतरीच नाही, खरं आहे तेच सांगतोय. तुला खोटं
वाटतं परंतु हे अनुभवाचे बोल आहेत."
" तर तर म्हणे अनुभवाचे बोल.स्वतः काही करीत नाही
आणि मला ही काही करू देत नाहीत.परंतु मी गप्प बसायची नाही, दुसऱ्या तांत्रिकाला आपल्या घरी बोलवून
आणते.मग बघा तुमच्या सुनबाई ला ह्या घरातून बाहेर
कशी काढते ती."
" तू काय ऐकणार आहेस कुणाचं ? जा काय हवं ते कर."
" म्हणजे तुम्ही मला साथ देणार नाही तर !"
" हे बघ ज्या गोष्टी माझ्या मनाला पटत नाहीत ते मी
कदापि करणार नाही."
" तुम्हांला कधी काय पटलं आहे का ? ते आता पटेल."
" अगं तू फक्त आपल्या सूनबाईचा दोष काढत असतेस
आपल्या मुलात काय कमी आहे, हे कधी शोधण्याचा प्रयत्न केलास का ? नाही ना ?"
" माझ्या मुला मध्ये दोष नाहीच आहे मुळी !"
" दोष नाहीये मग तो एकदम सूनबाईच्या घरी कसा
पोहोचला ? तेही नाही सांगितलेस ?"
" एकदा सांगितलं ना, तो झोपेत गेला म्हणून."
" हो का ? मग इतर दिवशी का नाही गेला झोपेत ?"
" इतर दिवशी तो का जाईल त्याची बायको घरात
असताना ?"
" अच्छा म्हणजे सुनबाई आपल्या माहेरी गेली होती
म्हणून गेला काय ? फार प्रेम दिसतंय त्याचं त्याच्या बायकोवर."
" मग आहेच मुळी त्याचं प्रेम आपल्या बायकोवर."
" हो का ? मग तू का त्या दोघांच्या प्रेमाच्या आड येतेस ?"
" मी आड येते काय पण बोलणं तुमचं."
" बरं राहिलं." गोपाळरावांनी चक्क माघार घेतली.
तश्या राधाबाई चिडून म्हणाल्या," तुम्ही मला कधीच
साथ देणार नाही हे माहिती आहे मला.आता मीच माझ्या
मुलांसाठी काहीतरी करते." असे म्हणून त्या तिकडून
निघून गेल्या.पण त्या गप्प बसल्या नाहीत.त्या एका
मैत्रिणीच्या मदतीने दुसऱ्या एका तांत्रिका जवळ गेल्या.
नि त्यांनी आपल्या सुने विषयी नि मुलांविषयी सांगितले.
तेव्हा तांत्रिका ने आपले डोळे मिटले नि क्षणभराने डोळे
उघडले नि म्हटलं," तुमच्या मुलाला एका तांत्रिका ने वश
केले आहे, परकाया या योग शक्तीचा तो वापर करून
तो आपल्या इच्छेची पूर्ती करतोय."
" म्हणजे ? मला कळलं नाही महाराज."
" मला सांगा तुमच्या सुनबाईचं कुण्या मुलाचं प्रेम होतं
का ?"
" हो.माझ्याच मुलावर प्रेम होतं तिचं."
" नाही.त्या व्यतिरिक्त ?"
" ते मला कसं माहीत असणार ?"
" मग आधी तुमच्या सूनबाईला जाऊन विचारा."
" तिला एका समंधाने झपाटले होते."
" समंधाने नाही हो, हा मनुष्य आहे."
" मग त्यासाठी काय करावं लागेल ?"
" त्यासाठी मला तुमच्या घरी यावे लागेल."
" मग या ना कधी यायला जमेल ?"
" पुढच्या अमावस्याला."
" ठीक आहे, तोपर्यंत काहीतरी तावीज वगैरे द्या. म्हणजे हातात बांधायला." तेव्हा त्या तांत्रिकाने एक
तावीज दिला मंतरुन."राधाबाईनी तो तावीज घेतला नि
त्या घरी आल्या. आणि त्यांनी आपल्या मुलाला हांक
मारली.तसा विवेक तिच्या जवळ आला नि तिला विचारू
लागला की काय मम्मी ?"
" इकडे ये तुझ्या दंडाला तावीज बांधते." असे म्हणून
त्यांनी तावीज त्याच्या दंडाला बांधला. त्याला माहित होतं
की ह्या तावीज चा काहीही उपयोग नाहीये. परंतु तो आपल्या आईला नाही म्हणण्याची हिंम्मत नव्हती.म्हणून
त्याने तावीज चुपचाप बांधून घेतला. तेव्हा त्याच्या आईने
त्याला बजावले की आपल्या बायकोला ह्या तावीज बद्दल
काहीही सांगू नकोस.म्हणून त्याने आपल्या बायकोला
म्हणजे सौंदर्या ला त्या तावीज बद्दल काहीच सांगितले
नाही.पुढच्या अमावस्येला तो तांत्रिक त्यांच्या घरी आला
नि त्याने हवन पेटविले.एक मनुष्याची खोपडी समोर ठेवून
मंत्र पठण करू लागला. त्यावेळी सौंदर्या आणि विवेक
समोर बसले होते. परंतु त्यांच्यावर काहीच परिणाम झालेला दिसून आला नाही. परंतु खोपडी उंच उडाली
नि मोठ्या ने हसू लागली. तेव्हा तांत्रिक विचारू लागला
की कुठं असशील तेथून इकडे ये ? तेव्हा विवेक अचानक डोलू लागला नि म्हणाला," कशाला बोलविलेस मला ?"
" तू कोण आहेस ते सांग."
" मी महाकाल आहे."
" खोटं बोलू नकोस, खरं काय ते सांग."
" खरं ऐकायचंय तुला ?"
" हो !"
" मग आता तुलाच पाठवतो वैकुंठाला ?" असं म्हणून
त्याने हातवारे केले.तसा तांत्रिकच निर्जीव होऊन पडला.
आणि ते खोपडी गयावया करत म्हणाला," मला क्षमा
कर मी तुझी ताकद नाही ओळखली.जीवदान दे मला.
" ठीक आहे, आता मी तुला जीवदान देतोय पण इथं
फिरकायचं नाही."
" नाही फिरकणार ."
" राहील ना लक्षात ?"
" हो."
" मग ठीक आहे." असे म्हणून विवेक ने समिधा हवन
मध्ये टाकली. तसा अग्निने पेट घेतला. आणि थोड्याच
वेळात तांत्रिक च्या मृतदेहात प्राण आला तसा तो तांत्रिक
उठून बसला. तसा विवेक म्हणाला," आता उचल तुझं हे
पूजा साहित्य नि चालायला लाग इथून ." असे म्हणताच
त्या तांत्रिकाने पूजेचे साहित्य गोळा केले नि पळत सुटला
तिकडून. आणि थोड्याच वेळात विवेक पूर्व स्थितीत आला. तसा तो आपल्या आईला विचारू लागला की, मम्मी , ते तांत्रिक महाराज कोठे गेले ?" परंतु त्याच्या
प्रश्नाला उत्तर देण्याची हिंम्मत राधाबाई मध्ये नव्हती.
आपल्या मुलाचे ते भयानक रूप पाहून त्या फार घाबरल्या
होत्या.आता त्यांची पूर्ण खात्री झाली की आपल्या मुलालाच महाकाल भुताने पछाडले आहे. त्या आत्म्या
पासून आपल्या मुलाची सुटका कशी करावी हे त्यांना कळत नव्हतं. सौंदर्या ने देखील विवेकचे ते भयानक रूप
पाहिलं होतं.ती तर त्याच्या जवळ सुध्दा बसायला घाबरत
होती. तेव्हा विवेक म्हणाला," अगं सौंदर्या मी विवेक आहे.
तू का माझ्यापासून दूर पळतेस ."
" मी पळत नाहीये, पण तू कधी नॉर्मल असतोस आणि
कधी नाही हे कसं कळणार मला ?"
" आता मला एक सांग मी नॉर्मल नसतो तेव्हा काही
त्रास देतो का ?"
" नाही रे, त्यावेळी तर तू जास्त वागतोस प्रेमाने."
" मग तुला प्रॉब्लेम काय आहे, मी जसा आहे तसा स्वीकार कर ना माझा."
" प्रश्न स्वीकार करण्याचा नाहीये."
" मग कशाचा आहे ?"
" उद्या समजा मी प्रेग्नेंट राहिली तर माझ्या पोटात
वाढणारे मूल कोणाचं असेल ? "
" कोणाचं म्हणजे माझंच असेल ना ?"
" तुझंच असलं तर ठीक आहे रे, पण समज त्या आत्म्याचे असलं तर !"
" काहीतरीच काय बोलतेस , भुताचं मूल कसं असेल."
" माझ्या मनात तीच भीती तर लागून राहिली आहे."
" काही काळजी करण्याची काही गरज नाहीये.भुतांना मूल होत नाहीत."
" आणि झालं तर !"
" झालं तर झालं बघू मग."
" मग काय बघणार डोमलं."
" अगं पण कुठं ऐकलं आहेस का असं भुताला मूल
झालेले ?"
" अरे हे कलयुग आहे, या कलयुगात काय पण होऊ
शकतं."
" मग काय करायचं म्हणतेस ?"
" आपण एखाद्या तांत्रिका जवळ जाऊ या का ?"
" तांत्रिका जवळ....मुळीच नको."
" का रे ?"
" मघाशी पाहिलं नाहीस का काय झालं ते ."
" हो रे , पण माझ्या भित्र्या मनाला कसं समजावू ?"
" असं काही होणार नाही, फक्त आपण तांत्रिकाच्या
नादाला लागायचं नाही.मग आपल्याला काहीच त्रास
द्यायचा नाही बघ तो."
" हो खरंय आपण असंच करू."
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा