दुनिया ना माने २९
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
दुनिया ना माने २९ |
काहीतरी गडबड जरूर आहे, आपल्या पासून काहीतरी लपविले जात आहे ; परंतु काय ? बाबा एक सांगताहेत तर दादा दुसरंच काहीतरी सांगतोय. खरं काय आहे ,हे जर शोधवयाचे असेल तर आपल्याला कळलंय हे
दाखवून न देता अजून काय काय बाबा सांगताहेत ते ऐकू नि
त्यानंतर आपल्याला पडलेले प्रश्न विचारू असा मनात विचार
सुरू असतानाच बाबा पुढे म्हणाले ," आता तुझ्या साऱ्या शंका दूर झाल्या असतील तर मी जाऊ ?"
" अजून एका प्रश्नाचे उत्तर द्या मला."
" कोणत्या ?"
" दादाने तुमच्या नावाच्या ऐवजी आपले नाव का लावले?"
" त्याला पण एक कारण आहे ."
" कोणतं ?"
" कालांतराने तुझ्या वहिनीला कळलं असतं की तू तिचा बाळ नाही आहेस तर तिच्या मनावर विपरीत परिणाम झाला असता. म्हणून जन्म दाखल्यावरचे माझे नाव त्याने बदलले . पण ते माझ्या सांगण्यावरून. अजून काही प्रश्न विचारायचं असेल तर विचार." असे सुधाकरने विचारताच त्याने नकारात्मक मान डोलावली. तसा सुधाकर पुढे म्हणाला ,
" आता तुझ्या मनातील सारे किंतु-परंतु काढून टाक. आणि एक गोष्ट लक्षात घे. जन्म देणाऱ्या पेक्षा मुलाचे लालनपालन करणारा कधीही महान असतो. जसा तुझा दादा नि वहिनी आहे त्यांनी तुला खऱ्या आई बापाचे प्रेम दिले आहे. नाही का ?" असे विचारताच त्याने होकारार्थी मान डोलावली. तसा सुधाकरने दीर्घ श्वास सोडत म्हणाला ," हो ना, मग तुझ्या वहिनीने तुला आपल्या स्तनाचेचे दूध पाजले. असे फक्त त्या मुलाची आईच करू शकते. आणि ते तुझ्या वहिनीने केले. अर्थात खऱ्या अर्थाने तीच तुझी आई आहे.
नि तिच्या दुधाचे उपकार तिच्या पोटी दहा जन्म घेऊनही फेडू शकणार नाहीस तू . आता तूच काय ते ठरव तुझे खरे आई वडील तुझे दादा वहिनीच आहेत की नाही ते ." तेव्हा तो
एकदम म्हणाला ," तुमच्यावर नाहक संशय घेतला ; परंतु मला अजून एका प्रश्नाचे उत्तर हवंय."
" कोणत्या ?"
" माझ्या आईचे नि वहिनीचे नाव एकच होते का ?"
" हो ; तिचे माहेरचे नाव प्रीती होते नि इथले शांती होते."
" असे जर आहे तर तुम्ही घटस्फोट दिलेली प्रीती कोण ?" असे म्हणताच त्यांच्या पाया खालील जमीनच सरकली. आणि त्यांच्या मनात प्रश्न उभा राहिला की, प्रीतीचा माझा घटस्फोट झाला हे ह्याला कसे समजले ? ह्याला घटस्फोटाचे कागदपत्रे नाही ना मिळाली. ? छे छे छे तसे नसणार तसे नसणार , कारण तसे असते तर त्याने मला ते
कागदपत्र जरूर दाखविले असते. मग ह्याला कोणी सांगितले? विराज ने सांगितले असेल का ? छे छे छे विराज
असा मूर्खपणा कदापी करणार नाही ? मग ह्याला कोणी सांगितले असेल बरे ? काही कळत नाही. असा विचार सुरू
असतानाच प्रतीक ने विचारले ," बाबा , तुम्ही माझ्या प्रश्नाचे
उत्तर दिले नाही अजून ?"
" कोणत्या प्रश्नाचे ?" माहीत असूनही माहीत नसल्याचा
अभिर्वाव करत बोलले. त्यावर प्रतीक बोलला ," माझ्या आईचे नाव प्रीती आणि वाहिनीचे नाव देखील प्रीती हा योगायोग असू शकतो. हे मला मान्य ; परंतु माझी आई जर
मी जन्माचा मरण पावली तर तुम्ही घटस्फोट दिलेली प्रीती
कोण ? म्हणजे एकाच नावाच्या दोन आई होत्या का ?"
" पण माझा घटस्फोट झालेलाच नाही. कोणी सांगितले तुला हे ?"
" कोणी सांगितले ?"
" हां !"
" थांबा. मी आता पुरावाच घेऊन येतो." असे म्हणून तो
स्टोअर रुम च्या दिशेने निघाला ; परंतु काहीतरी आठवले तसे
तो वळून विराजच्या खोलीच्या दिशेने निघाला. ते पाहून ते
स्वतःशीच म्हणाले ," शेवटी माझीच शंका खरी ठरली तर !
विराज ने प्रीती विषयी सांगितले असणार , सत्य कितीही लपविण्याचा प्रयत्न केला तरी ते उघडकीस येतेच. आता
खरं तेच सांगायला हवं. कारण नंतर फार उशीर झालेला असेल. असा विचार करत असतानाच तेथे विराज आला.
विराज ला पाहून सुधाकर म्हणाले ," अरे,विराज काय हा
गोंधळ घालून बसलाहेस ? "
" मी कशाचा गोंधळ घातलाय ?"
" प्रीतीचा नि माझा घटस्फोट झालाय हे तू प्रतीक ला
कशाला सांगितलेस ?"
" मी कोठे सांगितले ?"
" खरंच नाही सांगितलेस ?"
" खरंच नाही."
" मग त्याला कसे समजले ?"
" कुणाला ? प्रतिकला ?"
" हो !" हे ऐकून प्रतीक पण विचारमग्न झाला. तेव्हा त्याला आठवले की आपण ती सर्व कागदपत्रे एका फाईल्स
मध्ये ठेवली होती नि फाईल्स स्टोअर रुम मध्ये ठेवली होती.
अर्थात ती फाईल्स प्रतिकच्या हाती सापडली असावी. हो
असेच झाले असणार. असा विचार मनात सुरू असतानाच
प्रतीक दोन्ही कागदपत्र घेऊन येतो. त्याच्या हातातील
कागदपत्र सुधाकर काय समजायचं ते समजला. परंतु काही
न बोलता चुपचाप उभा राहिला. प्रतीक ते दोन्ही कागदपत्र
त्यांच्या समीर धरत बोलला ," हे दोन्ही कागदपत्रे पहा नि
माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या."
तेव्हा सुधाकर ने ते दोन्ही कागदपत्र आपल्या हातात घेतली नि त्यांच्यावर एक नजर फिरविली. नि मग घडलेली
घटना सविस्तर पणे कथन केली. तेव्हा रागाने आपल्या बापाकडे पाहत बोलला," दादा, हे कृत्य करताना तुला लाज कशी वाटली नाही." विराज बोलला ," माझं ऐक जरा."
" काही एक ऐकायचं नाही मला. पापी आहात तुम्ही.
प्रीती भले तुमची प्रेयसी होती. परंतु तिचे बाबांशी लग्न झाल्यावर ती बाबांची पत्नी झाली. अर्थात तुझी पण आईच
झाली ती. आणि आईशी व्याभिचार करताना तुला काहीच कस वाटलं नाही. शी ! तुला बापच काय पण भाऊ म्हणायला
सुध्दा लाज वाटते. म्हणून आज पासून तुम्ही माझे बाप नाहीत. कारण माझा जन्म तुमच्या लग्ना पूर्वीचा आहे, अर्थात अनैतिक संबंधातून झालेला हे जरी खरे असले तरी माझी आई तेव्हा माझ्या वडिलांची पत्नी होती. अर्थात मी स्वतःला बाबाचाच मुलगा म्हणून घेऊ इच्छितोय."
सुधाकर बोलले ," बाळ तू माझं ऐकतो का जरा ?"
" जरूर ऐकेन. बोला."
" आपल्या जन्मदात्या आई-वडीलाबद्दल असे बोलू नये."
" हो बरोबर तुमचं बाबा. पण तुम्हीच सांगा असल्या जन्मदात्या कडून आदर्श तरी काय घ्यावा."
" आता झालं गेलं विसरून जा आता. आणि खरं सांगायचं तर माझंच चुकलं. मला मुलगी शोभेल अश्या मुलीशी लग्न नको करायला हवं होतं."
" हा झाला तुमचा मोठेपणा , जगामध्ये फक्त तुम्हीच एकटे नाहीत. की म्हातारपणी एका लहान वयाच्या मुली सोबत लग्न केलं. असे कित्येक जण आहेत. मग त्या लोकांनी का नाही व्याभिचार केला."
" हो रे, तू म्हणतोयस ते सर्व बरोबर आहे , परंतु झाल्या
गोष्टीला पर्याय काय ?"
" पर्याय जरी नसला तरी ह्यांना मी कधी बापाचा दर्जा
देईन असे मला तरी वाटत नाही."
" माझं एक ऐकशील ?"
" हो जरूर ऐकेन."
" मग माझी अशी इच्छा आहे की, तू तुझ्या दादाला मोठ्या मनाने माफ करावे."
" बाबा माझं तुमच्या एवढं मोठे मन नाहीये. परंतु मी प्रयत्न जरूर करेन."
" मग माझ्या इच्छेचा मान ठेवून एकवेळ माफी मांग
आपल्या दादाची."
" ठीक आहे. " असे म्हणून प्रतीक बोलला ," दादा मला
क्षमा करा." असे बोलला नि थेट आपल्या खोलीत निघून
गेला. विराज काही न बोलता त्याच्या पाठमोरी आकृतीकडे
एकटक पाहत राहिला. तेव्हा सुधाकर म्हणाले ," विराज त्याला थोडा वेळ येईल तो शांत."
" बाबा मला वाटलं नव्हतं की माझं सत्य अश्या प्रकारे
माझ्या मुला समोर येईल."
" तरी एक बरं झालं सुनबाई , मुलांना सोडायला शाळेत
गेली आहे ती. तिला जर कळलं असतं तर कल्पना करवत
नाही. की काय घडलं असतं ?"
" मीही त्याचाच विचार करतोय की जेव्हा तिच्या समोर
हे सत्य येईल तेव्हा ती कशी रिअँक्ट करील ?"
" खरंय ,पण तसं होऊ देऊ नकोस. त्यासाठी हे सर्व पुरावे तुला नष्ट करावे लागतील."
" पण प्रतीक ने सांगितले तर ?"
" तो असं करणार नाही. याची मी हमी घेतो."
" ठीक आहे ." असे म्हणून त्याने प्रतिकच्या जन्माचा दाखला नि घटस्फोटाचा कागदपत्रणा माचीस ची कांडी पेटवून आग लावली नि जाळून टाकले. तसे सुधाकर आपल्या खोलीत निघून गेले. विराज मात्र वेगळ्याच विचारात गर्क झाला. नि तोंडातल्या तोंडात पुटपुटला की , म्हणजे स्वतःच्या मुलाला आता भावाचे नाव नाते लावावे लागणार तर ! पण असे कसे हे जगावेगळे नाते ? किंचित थांबून पुढे म्हणाला , माझं चुकलं . क्षणिक सुखाच्या बळी पडलो. आणि दोघां मधले मी नाते विसरलो . त्याचेच हे फळ अशाप्रकारे मिळाले मला ; पण त्यात माझा एकट्याचा दोष होता का ? कदाचित माझ्या पेक्षा प्रीतीचा दोष जास्त होता.
आगी जवळ मेण ठेवले तर ते वितळणारच ना ! तसेच माझें ही झाले तिचे अर्ध नग्न शरीर पाहून माझी कामवासना भडकली नि माझ्या कडून हे पाप घडले. पण त्यानंतर तरी
मी स्वतःला सावरायला हवे होते ना ? पण कसं सावरणार ?
एकदा शारीरिक सुखाची चट लागली की ती सहजासहजी
सुटणार आहे का ? नेमकं तेच घडलं माझ्याकडून. आणि मी वाहतच गेलो आणि मग जेव्हा भानावर आलो, तेव्हा आमच्या पापाचे बीज पेरलं गेलं होतं तिच्या उदरी. म्हणून माणसाने क्षणिक भावनेच्या आहारी जाऊन आपसा मधले
खरे नाते विसरायचे नसते . नाहीतर मग असे जगावेगळे नाते निर्माण होते.
आणि खरे सांगावयाचे तात्पर्य इतकेच की हे घोर कलयुग आहे , ह्या कलियुगात काहीपण घडण्याची शक्यता आहे . आणि ही केवळ शक्यताच नाहीतर आता तसे घडू ही लागलय .आपल्या आसपासच बघा . अशी एखादी तरी घडलेली सत्यकथा तुमच्यासमोर येईल. आमच्याकडे अश्या दोन घटना घडल्या आहेत. एका मावशी ने आपल्या बहिणीच्या मुला सोबत लग्न केले. अर्थात लहानपणी
दोघेही एकाच शाळेत शिकले. नि कालांतराने त्या दोघां मध्ये
प्रेमाचा अंकुर फुटला. नि तिने आपल्या आई-वडिलांना चक्क सांगितले की मला ह्या मुलाशीच लग्न करायचे आहे, पहिल्या मुलीच्या बाबतीत घडलेली घटना लक्षात घेऊन त्यांनी नाईलाजाने तिचे लग्न तिच्याच मोठ्या बहिणीच्या मुलाशी करून दिले. आता मला सांगा बहिणीचा मुलगा तो तिला पण मुलगा सारखा असायला हवा ना ? पण नाही. लोकांची नितीश बदलली आहे ,आपण हे पाप करतो आहे असे त्याना वाटतच नाही मुळी ! म्हणून असे प्रकार घडू लागले आहेत. यावरून येणारा काळ किती भयंकर असेल याची कल्पना करा, मला तर असं वाटतं काही काळा नंतर माणसं सुध्दा पशु पक्षांसारखी वागू लागली. नातेच राहणार नाही. पण काळ कधी येईल हे सद्या तरी सांगता येणार नाही.
समाप्त
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा