दुनिया ना माने -२८
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
दुनिया ना माने -२८ |
मग त्याने स्वतःचा जन्माचा दाखला तपासून पाहिला. त्यात जन्मतारीख आणि जन्मवेळ सारख्याच ; परंतु आई वडिलांचे नाव वेगवेगळे, शिवाय जन्मस्थ ही वेगळे , हे पाहून त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले .ते असे की हा जन्माचा दाखला कुणाचा ? आपल्या वडिलांचा एक भाऊ होता का ? जर होता तर तो आता कुठे आहे ? शिवाय त्याची नि माझी जन्मतारीख सारखी कशी ? शिवाय दोघांचे नावं पण एकच ! फक्त दोघांच्या आई वडिलांचे नाव वेगवेगळे. शिवाय लहानपणापासून मी त्याला कधी पाहिले नाही. ना आजीला ना त्याला ? बाबांना सोडून गेले का ते ? पण असं कसं होईल बरं ? आता या प्रश्नांची उत्तरे आपल्याला बाबांकडून मिळतील कदाचित. चला बाबानाच विचारू. असा विचार करून तो सुधाकरच्या खोलीत आला नि त्यांना स्टोअर रूममध्ये जुन्या पडलेल्या फाईल्स मध्ये सापडलेला दाखला दाखवत म्हणाला ," बाबा हा कोणाचा दाखला ?"
सुधाकरने तो दाखला आपल्या हातात घेतला नि वाचला. आणि मागचा पुढचा विचार न करता पटकन बोलला ,"
" तुझाच की रे हा दाखला."
" अच्छा हा माझा तर हा कुणाचा ? " दुसरा जन्माचा दाखला त्यांने त्यांच्या पुढे केला. तो देखील आपल्या हातात
दाखला घेतला नि वाचला. आणि क्षणाचा ही विलंब न करता
सुधाकर बोलला ," हा पण तुझाच !"
" दोन्ही माझेच दाखले आहेत का ? "
" हो दोन्ही तुझेच दाखले आहेत. त्या दोन्ही दाखल्यावरचे नाव वाच की रे , तुझेच आहे."
" वाचलं. नाव माझंच आहे ; परंतु आई- बाबांचे नाव वेगवेगळे आहे , ते का ?....... कोण आहेत माझे असली आई -बाबा ? तुम्ही का दादा ? "
असे विचारताच सुधाकरच्या पायाखालची जमीन सरकली. आता ह्याला ह्याचा प्रश्नाचे उत्तर काय द्यावे बरे ? असा अवघड प्रश्न त्यांच्या डोळ्या समोर उभा राहिला. क्षणभर सुचलच नाही त्यांना. प्रतीकच्या प्रश्नाचे उत्तर काय द्यावे ? पण क्षणभर वेळानंतर विचार करून बोलला ," त्याचं
असं झालं की, तू जन्मलास तेव्हा तुझा बाप इथं नव्हता. तर
पुण्याला होता. आणि अचानक तुझ्या आईच्या पोटात दुखू लागले , म्हणून मी तिला इस्पितळात नेले ; परंतु ऑपरेशनच्या वेळी डॉक्टर एका फॉर्मवर सही घेतात. तुझा बाप तेव्हा येऊ शकत नसल्याने मी त्या फॉर्मवर तुझा बाप माणूस आहे, म्हणून हस्ताक्षर केले. म्हणून इस्पितळातून
डॉक्टरानी जो दाखला त्यावर तुझ्या बापाच्या नावा ऐवजी माझे नाव होते. अर्थात महानगरपालिका ने सुध्दा जन्माच्या
दाखल्यावर माझे नाव लिहिले. ही गोष्ट नंतर आमच्या द्यानात
आली. म्हणून पुन्हा हा दुसरा हा दाखला बनविला." सुधाकर
थाप मारली. त्यावेळी लागू पडली. कारण त्यावर काहीच काहीच बोलला नाही. चुपचाप पुन्हा स्टोअर रूम मध्ये गेला नि शिल्लक राहिलेले कागदपत्रे चाळत असताना त्याला अजून दोन कागदपत्रे सापडले. एक होते सुधाकर नि प्रीतीचा घटस्फोट झाल्याचा दाखला. नि दुसरा होता प्रीती नि विराज चे कोर्ट मॅरेज सर्टिफिकेट झाल्याचा दाखला. प्रतीक मोठ्या सम्रमात पडला. की आजी चे नाव पण प्रीती नि माझ्या
आईचे नाव पण प्रीती हे कसे शक्य आहे ? शिवाय दादांच्या मॅरेज सर्टिफिकेट वर लग्नाची तारीख वेगळी आहे नि माझ्या
जन्माच्या दाखल्यावर जन्म तारीख वेगळी आहे ? म्हणजे माझा जन्म मम्मी- दादांच्या लग्नाच्या अगोदर झाला का ? म्हणजे दोघांचा प्रेम विवाह होता का ? तसं ही असेल कदाचित. या बद्दल आपण दादानाच विचारू ? पण त्या
अगोदर आजीचे नि मम्मीचे नाव एकच कसे ? असा विचार करून तो मग जन्माचा दाखला नि मॅरेज सर्टिफिकेट घेऊन विराज पाशी गेला. नि विराज ला तो दाखला दाखवत विचारले ,
" हा दाखला कोणाचा आहे दादा ?" विराज ने तो दाखला
पाहिला मात्र त्याच्या पाया खालची जमीन सरकल्याचा त्याला भास झाला. क्षणभर तो गांगरलाच काय उत्तर द्यावे
हे त्याला कळेना , इतक्या दिवस लपविलेले सत्य शेवटी
सगळ्या समोर येणार तर ! आणि मुलाला काय उत्तर द्यावे
हे त्याला कळेना ? त्याला आता स्वतःचाच राग येऊ लागला
होता. आपण हे कागदपत्रे अजून का सांभाळून ठेवली होती
असे त्याला आता वाटू लागले होते ; परंतु ती वेळ आता निघून गेली. आता प्रतीक ला त्याच्या प्रश्नांचे उत्तर द्यावेच लागणार होते. काय उत्तर देवू असा विचार करत असतानाच
त्याला एक भन्नाट कल्पना सुचली. तो त्याला म्हणजे प्रतीक
ला म्हणाला ," हा ना तुझ्या काकाचा जन्मदाखला आहे."
प्रतीकच्या चटकन ध्यानात आले की आपला बाप किंवा आजोबा खोटे बोलत आहेत. पण तसे न दाखवता त्याने
विचारले ," मग ते काका कुठे आहेत ?"
" तो माझा भाऊ लहानपणीच हरवला होता." तेव्हा प्रतीक ने मुद्दाम विचारले ," कोठे ? म्हणजे जत्रे मध्ये का ?"
" हो जत्रे मध्येच. पण तुला कसे कळले ?"
" त्याचं काय आहे दादा हरवणारी मुलं नेहमी जत्रेमध्ये हरवतात. असे आपण चित्रपटात नाही का पाहतो ?"
" हो हो बरोबर आहे तुझं म्हणणे ."
" काय बरोबर आहे ? तुम्ही सर्वजण खोटे बोलत
आहात. "
" असं कसं बरं तू बोलु शकतोस ? "
" खरं तेच बोलतोय."
" मग काय आम्ही खोटं बोलतोय.?
" हो तुम्ही सर्वजण खोटे बोलत आहेत."
" हे कशावरून बोलतोयस तू ?
" बाबा बोलताहेत की हे दोन्ही दाखले माझेच आहेत.
आणि तुम्ही म्हणताय मला एक काका होता म्हणून. आता कोणाचे खरे मानायचे ते आता तुम्हीच सांगा."
" म्हणजे तू बाबा पण विचारलेस ?"
" हो ."
" अरे, पण वेड्या त्या दोन्ही दाखल्यावर आई वडिलांचे नाव बघ ना ! दोन्ही दाखल्यावर वेगवेगळे आहेत. शिवाय दोघांचे जन्मस्थळ ही वेगळे आहे .त्यावरून तर खरं काय ते
समज ना ? "
" तुम्ही दोघं पण एकदम खोटे बोलत आहात. आता मलाच शोध घ्यावा लागेल की, मी खरा मुलगा कोणाचा आहे? तुमचा की बाबांचा ?"
" अरे, पण त्याने काय फरक पडतो ? मी तुला खऱ्या बापाचे प्रेम दिलं नाहीये का ?"
" दिले ना, परंतु माझा खरा बाप कोण आहे , हे मला
कळायलाच पाहीजेल. आणि मी त्याचा शोध घेणारच!"
असे म्हणून तो थेट निघून गेला त्यांच्या खोलीतून.
क्षणभर काय करावे ते विराजला सुचत नाही. पण थोड्या
वेळाने तो उठला आणि आपल्या खोलीतून बाहेर आला. आणि सुधाकरच्या खोलीत तो शिरला. त्याला पाहताच सुधाकर म्हणाला," बरं झालं तूच आलास तो इथं. नाहीतर
मीच येणार होतो,तुझ्याकडे."
" का बरं ? " तेव्हा मग घडलेली सारी हकीकत त्याला सांगितली. तेव्हा तो नाराज होऊन म्हणाला," हे तुम्ही त्याला सांगितलं होतं तर आधी मला नाही का सांगायचं , मी त्याला वेगळेच कारण सांगितलं ."
" तू काय सांगितले त्याला ? "
" मी त्याला सांगितले की मला एक भाऊ होता म्हणून."
" अरे बाप रे ! मग घोटाळा झाला म्हणायचा तर ! "
" नुसता घोटाळा नाही तर त्याने मला चांगलेच कात्रीत पकडलेय." त्यावर थोड्या वेळ विचारून सुधाकर बोलला,"
" तू अजिबात चिंता करू नकोस, मी सांगतो त्याला काय सांगायचं ते."
" काय सांगणार आहात ते आधी मला सांगून ठेवा. म्हणजे माघासारखा घोटाळा व्हायला नको."
" बरं ऐक. " असे म्हणून त्याच्या कानात काहीतरी सांगितले . तसा तो खूष होऊन बोलला ," हां, कारण मात्र पटण्यासारखे आहे."
" आहे ना पटण्यासारखे ? "
" हो , म्हणजे कारण त्याला नक्कीच पटेल."
" आता तू जा आपल्या खोलीत. मी त्याच्या खोलीत
काहीतरी निमित्त काढून जातो."
" ठीक आहे ; पण त्यावर तो काय म्हणतोय ते मला सांगायला विसरू नका. म्हणजे झालं."
" हो हो . तुला लगेच येऊन सांगतो."
तसा विराज उठला आणि आपल्या खोलीत निघून गेला. थोड्यावेळाने सुधाकर ही उठला आणि प्रतीकच्या
खोलीत गेला , तेव्हा प्रतीक त्याला एका खुर्चीवर बसलेला
दिसला आणि कोणत्या तरी गहन विषयावर विचार करत असल्याचा जाणवला. सुधाकर समजून चुकला की त्याच्या
डोक्यात काय विचार सुरू आहेत ते. सुधाकर त्याच्या जवळ गेला नि जसा त्याच्या खांद्यावर त्याने हात ठेवला , तसा तो दचकला आणि प्रश्नार्थक नजरेने सुधाकर पाहत बोलला,
" बाबा तुम्ही मघाशी खोटे का बोललेत ते आधी सांगा."
" अरे, तुझ्याच भल्यासाठी !"
" माझं काय भलं आहे त्यात ?"
" सांगतो ऐक."
" ऐकेन, पण एका अटीवर."
" कोणत्या ?"
" जे सांगाल ते एकदम सत्य असायला पाहिजे ."
" सत्य सांगणार आहे मी आता."
" हो का ? मग सांगा बरं."
" अरे, तू माझा मुलगा आहेस ." हे ऐकून तो हर्षभराने
बोलला ," हे खरंच सांगतोय ना ? "
" हो ."
" मग अगोदर खोटे का सांगितलेत ?"
" त्याला पण एक कारण आहे ."
" काय कारण आहे ?"
" सांगतो. पण त्या अगोदर मी काय सांगतो ते ध्यानात
घे. आणि मग तूच मी तुला तसं का सांगितले. "
" ठीक आहे , सांगा."
" तुझी आई बाळंत होऊन तुझा जन्म झाला. त्याचवेळी तुझी वहिनी सुद्धा बाळंत झाली . पण तुझ्या वहिनीचे बाळ
मृत पावले. आणि त्या वेळी तुझ्या वहिनीची स्थिती फार नाजूक हाती. जर त्यावेळी तुझ्या वहिनीला तिचे बाळ मृत
पावल्याची खबर दिली असती तर तिचे प्राण वाचले नसते. म्हणून तुझ्या आईने आपले बाळ म्हणजेच तुला तिच्या ओटीत टाकले. नि माझ्याकडून वचन घेतले की हे सत्य कोणाजवळ बोलू नका ." असे म्हणून तिने आपला प्राण सोडला. तुझ्या वहिनींना एका बाळाची गरज होती ,तर तुला एका आईची गरज होती आणि तुझ्या आईची पण शेवटची इच्छा पण मला पूर्ण करायची होती, म्हणून नाईलाजाने मला हा निर्णय घ्यावा लागला. आता तूच ठरव की त्या वेळी मला कोणता निर्णय घ्यायला हवा होता ?" असे म्हणून सुधाकर तिथून जायला वळला . तसा प्रतीक मनात म्हणाला, बाबा तुम्ही चक्क खोटे बोलताय ; कारण मी जन्माला आलो तेव्हा दादाचे लग्न झालेच न्हवते. शिवाय तुमचा घटस्फोट कोणा सोबत झाला ते अजून कळायचे आहे ; पण हरकत नाही. मी सत्याच्या मुळाशी गेल्याशिवाय राहणार नाही."
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा