दुनिया ना माने -२६
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
दुनिया ना माने -२६ |
प्रीती स्वतःशीच प्रश्न करते की, म्हणजे मी माझ्या मुलांचे
भविष्य पार बिघडवून टाकले तर ! पण याला उपाय ? किंचित थांबून दिर्ग श्वास सोडून ती स्वत:शीच म्हणाली , उपाय आहे ना, नाही कसा ? मी माझ्या कर्माची शिक्षा मुलांना
भोगू देणार नाही. तर मी भोंगेन ती शिक्षा ! असे म्हणून ती
पळतच स्वयंपाक घरात गेली नि स्वयंपाक घराचा दरवाजा आतून बंद केला. आणि किचनमध्ये असलेलं पाच लिटर रॉकेल चे कॅन स्वतःच्या अंगावर ओतून घेतले. नि माचीस ची कांडी पेटवून स्वतःच्या साडीला लावली. रॉकेल ने भिजविलेल्या साडीने लगेच पेट घेतला. स्वयंपाक घरातून धूर कसा येऊ लागला , म्हणून सुधाकर ने स्वयंपाक खोलीच्या दिशेने धाव घेतली ; पण दरवाजा आतून बंद होता ; म्हणून ते मोठ्याने आरडाओरडा करू लागले. शेजारी-पाजारी धावून आले आणि धक्के मारून दरवाजा तोडला. दरवाजा तुटताच
सुधाकरने घरातून ब्लँकेट आणले नि तिच्या अंगाला लपेटले. तशी थोड्याच वेळात आग विजली. पण तोपर्यंत
प्रीती नव्वद टक्के भाजलेली होती. तिला ताबडतोब रिक्षे मध्ये घालून इस्पितळात नेण्यात आले. आत्महत्येची केस म्हणून डॉक्टर केस घ्यायला तयार नव्हते. परंतु शेवटी पोलीस स्टेशनला फोन करून घटनेची खबर देण्यात आली. पोलीस आले. पोलिसांनी सर्वांची साक्ष घेतली. तेव्हा प्रितीने
स्वतःच कबूल केले की मी स्वतःच्या मर्जीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यात कोणाचा ही दोष नाही. त्यामुळे
स्वतःच्या इच्छेने केलेली आत्महत्या अशी नोंद पोलिसांनी
केली.
दुसऱ्या दिवशी प्रीतीने आपला प्राण सोडला. त्यानंतर
तिचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आला.
शवविच्छेदन झाल्यानंतर तिचा मृतदेह तिच्या नातेवाईकांच्या
स्वाधीन करण्यात आला. त्यानंतर तिच्या पार्थिव शरीरावर विधिपूर्वक अंत्यसंस्कार करण्यात आला. प्रीतीच्या आई-वडिलांना खूप वाईट वाटले. तिच्या आत्महत्येला आपणच
कारणीभूत आहे, असे ते स्वत:शीच म्हणाले.
विराज ने आपल्या वडिलांना विचारले की, हे कसे घडले
बाबा ?" तेव्हा सुधाकरने सविस्तर माहिती दिली. ते ऐकून
विराज भयंकर चिडला नि आपल्या सासू-सासऱ्यांना बोलला," झाले तुमच्या मनासारखे ? आता कशाला थांबलेत
इथे ? चला चालायला लागा." तेव्हा महिपतराव म्हणाले," जावई बापू चूक झाली आमची. हे आम्ही मान्य करतो.पण खरं सांगतो की आम्हाला असं अजिबात वाटलं नव्हतं की
प्रीती असा तडकाफडकी निर्णय घेईल ती."
" तुम्हीच म्हणाला होता ना, की आता माझ्या हातात पिस्तुल असतं तर तिला गोळ्या घालून ठार केले असते."
" जावई बापू आता शांत व्हा .आता डोक्यात राख घालून
काही फायदा होणार आहे का ?"
" मला कळतंय ते ,म्हणूनच सांगतोय मी तुम्हाला ,की यापुढे तुमचं आमचं नातं संपलं. तेव्हा पुन्हा इथं येऊ नका."
" जावई बापू आमचा एवढा तिरस्कार करू नका. आमची मुलगी तर आता राहिली नाही या जगात. परंतु तिची
मुलं......"
" त्याची चिंता तुम्ही करू नका. त्यांचा बाप अजून जिवंत
आहे इथं , त्यांची काळजी घ्यायला." तेव्हा महिपतराव म्हणाले ," मुलं अजून लहान आहेत. त्याना आईची मायेची
गरज आहे. तेव्हा तुम्ही आमच्या अनुसयेशी दुसरे लग्न करा."
" दुसरं लग्न अजिबात करायचे नाही मला."
" जरा शांत डोक्याने विचार करा. म्हणजे तुम्हाला माझे
म्हणणे पटेल."
" तुमचं मला काही एक ऐकायचं नाहीये. तुम्हाला जर माझ्या मुलांसाठी खरंच काय करायचं असेल तर एवढंच करा
आणि ते म्हणजे प्रीती विषयी जे तुम्हाला कळलंय ते इतर
कोणाला कळू देऊ नका. बस्स एवढेच उपकार करा माझ्यावर."
" ठीक आहे,जशी तुमची मर्जी ! परंतु यदाकदाचित जर
तुमचा विचार बदलला तर आम्हाला जरूर कळवा."
" अवश्य." प्रीतीचे आई-वडील नाराज मनाने आपल्या
गावाला निघून गेले. सुधाकर ने सुध्दा त्या दोघांमध्ये मध्यस्थी केली नाही.
भाग ४ था
प्रीतीच्या मृत्यूनंतर घराची आणि मुलांची सर्व जबाबदारी विराज वर आली. आणि विराज आपल्या साऱ्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पडू लागला होता; पण म्हणतात ना, घराला स्त्री शिवाय शोभा नाही. आणि घरपण येत नाही. पुरुषा ने घराला स्त्री सारखे कितीही सांभाळण्याचा प्रयत्न केला तरी त्याला ते शक्य नाहीये.एकटी स्त्री घरातील सर्व जबाबदाऱ्या मोठ्या कौशल्याने पार पाडत असते , म्हणून तर स्त्री ला परमेश्वराच्या खालोखाल दर्जा दिला आहे. कारण परमेश्वराने स्त्री ची घडवणूकच तशी केली आहे,
स्त्री ही नेहमी सौजळ आणि सोशिक असते. ती कोणत्याही परिस्थितीमध्ये नवऱ्याची साथ सोडत नाही. सुखात ही आणि दुःखात ही सदैव नवऱ्याला साथ पुरविते. म्हणून स्त्रीला पुरुषाची अर्धांगिनी असे म्हटले आहे , ते काय उगाचच !
नोकरी आणि घर या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडत असताना विराजची नुसती तारांबळ उडत असे ; पण तरी देखील मोठ्या हिंमतीने तो साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचा प्रयत्न करत होता ; पण म्हणतात ना, स्त्री ची जागा दुसरा कोणी घेऊ शकत नाही. त्याला स्त्री च पाहिजे.
सुधाकरने ते ओळखले. म्हणून शेवटी सुधाकरने विराज ला दुसरा विवाह करण्याचे सुचविले. तेव्हा विराज त्याना म्हणाला ," नको बाबा माझ्या मुलांना सावत्र आई नको. ती
त्यांचा नीट सांभाळ करणार नाही. उलट त्याना ती जाच करील." तेव्हा सुधाकर त्याला म्हणाले ," अरे प्रत्येक सावत्र
आई वाईटच असते असं का वाटतंय तुला ."
" नाही नको. विषाची परीक्षा नको."
" सवयीने विष ही पचविले जाते, असे म्हणतात."
" असेल ही ! पण त्याची चव घ्यावयाची नाहीये. कारण तुमच्या बाबतीत जे घडलं तेच माझ्या बाबतीत घडायला नको."
" जे माझ्या बाबतीत घडले तेच तुझ्या बाबतीत ही घडेल हे जरुरी तर नाहीये. आणि असे पण मी तुला कुठे सांगतो की तू तरुण मुलींशीच लग्न कर म्हणून."
" म्हणजे ?"
" म्हणजे असं की एखादी घटस्फोटीता किंवा विधवा स्त्रीशी लग्न केले तरी चालेल." त्यावर विराज किंचित विचारात पडला. विचार करून तो पुढे म्हणाला," बरं. विचार
करून मग सांगतो."
" विचार करायला पाहिजे तेवढा वेळ घे. हरकत नाही; पण एक वेळ स्वतःचा नाहीतर तुझ्या लहान मुलांचा विचार कर. त्यानाआईच्या मायेची फार गरज आहे. शिवाय तुझं वय सुद्धा फार झालेले नाही. मी लग्न केलं तेव्हा मी पन्नाशी गाठली होती ; परंतु तुझे तसं नाहीये तू अजून पस्तीस च्या
घरामध्येच आहेस. म्हणून सांगतोय. तू तुझ्या लग्नाचा विचार
कर. कारण म्हातारपण फार वाईट असते रे, मी अनुभवलंय
ते एकाकी पण काटणं फार कठीण असतं रे, तुला अजून त्याची झळ लागली नाहीये म्हणा. म्हणून तू असं बोलतोयेस." त्यावेळी विराज काहीच बोलला नाही ; परंतु वडिलांच्या विधानावर त्यांने जरूर विचार करायला सुरुवात
केली. खूप विचार केल्यानंतर शेवटी योग्य निर्णयावर पोहोचला. आणि त्यानंतर त्यांने मुलीचे स्थळ शोधायला सुरुवात केली. नशिबाने त्याला एक स्थळ सापडले. त्या मुलीचे नाव कांचन असे होते. त्या मुलीचे लग्न होऊन वर्ष होण्याच्या आत तिचा नवरा एका कार दुर्घटनेत मरण पावला. तिच्या सासरच्या माणसांनी तिला अपशकुनी आणि पांढऱ्या पायाची ठरवून तिला घरातून हाकलून दिले होते, म्हणून सध्या ती आपल्या माहेरी भावाच्या घरी राहत होती ; परंतु तिथे तिच्या भावाच्या पत्नीने तिचे जीवन जगणे मुश्कील करून टाकले होते . पावलोपावली तिला अपशकुनी बोलून तिचा अपमान करत असे . सतत तिला टोचून बोलत असे.
म्हणत असे की, अपशकुनी मेली ! एक वर्षाच्या आंत नवऱ्याला खाल्लं ! आणि आता आम्हाला देखील खायला आली आमच्या घरी ! एकदा आम्हाला पण खाल्सस की मोकळी झालीस गाव भटकायला." तिला कधी कधी आपल्या वहिनीचे हे बोल असह्य होत असत. पण नाईलाज होता तिचा. भावाचे घर हाच एक मात्र सहारा होता तिच्यासाठी ! त्यामुळे किती अपमान झाला तरी तिला ते घर सोडता येईना, एक असह्य आणि विधवा स्त्री ला समाजामध्ये कवडीचीही किंमत नाही. शिवाय लंपट आणि आंबटशौकीन लोकांची समाजात काही कमी नाही.अशी लोकं तिच्यावर वाईट नजरेने पाहतात. आणि संधी मिळाली तर तिचा नाहक बदनाम करायला ही मागेपुढे पाहत नाहीत. अशा परिस्थितीत सन्मानाने जगणं तर दूरच राहिलं .आणि अशा स्त्री, चा उद्गार करणे म्हणजे समाजाविरुद्ध केलेले बंडच होय.
खरं सांगायचं म्हणजे हे पुण्यांचे काम आहे; परंतु समाज ते करू देत नाही. कारण जुन्या रूढी, परंपरा ,यांच्या आड येतात , म्हणून अशा समाजाच्या विरोधात कोणीतरी आवाज उठवला पाहिजे. तरच लोकांची उन्नती होईल. विराजने ते आव्हान स्वीकारले. समाजाला न जुमानता त्याने कांचन शी
पुनर्विवाह केला. लोकांना त्याचा भयंकर राग आला. त्यांनी त्याचा उठाव केला. ते म्हणाले ," आमचीही इथं बायका मुलं
राहतात. त्यांच्यावर फार वाईट परिणाम होईल, म्हणून समाजाविरुद्ध काम करणाऱ्या ह्या लोकांना आमच्या सोसायटीत अजिबात होऊ देऊ नका. असे लोकांनी सोसायटीच्या सेक्रेटरी ला सांगितले. शेवटी लोकांच्या दबावाखाली येऊन घरमालकाने त्यांना घर खाली करायला लावले. विराज आपल्या परिवाराला घेऊन दुसऱ्या ठिकाणी राहायला गेला. असे म्हणतात की, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आणि ते अगदी खरे आहे. विराज ला जुन्या ठिकाणी त्रास होत होता. पण नवीन ठिकाणी मात्र ह्या गोष्टीचा अजिबात त्रास झाला नाही. याचं कारण काय ते माहितेय ? नाही ना ? याचं कारण एकच आहे ते म्हणजे नवीन गेलेल्या ठिकाणच्या लोकांना विराजच्या पूर्वायुष्याबद्दल काहीच माहित नव्हते. त्यामुळे लोकांचा त्याला विरोध होण्याची शक्यताच नव्हती. अर्थात हिंमत करणे सर्वात फार महत्वाचे. नाही का ?
कांचन स्वभावाने चांगली होती. तशीच ती खूप प्रेमळ आणि मायाळू पण होती. आणि तिने हे आपल्या कृतीने सिद्ध करून दाखविले. सवतीच्या मुलांना स्वतःची मुलं असल्यासारखे ती वागू लागली. प्रथम मुलांनी सुद्धा तिला खूप त्रास दिला; पण कांचन ने त्यांचा तिरस्कार न करता फार मोठ्या प्रेमाने आपलेसे केले.जी मुलं तिच्या वाऱ्यालाही उभे राहत नसत. तीच मुलं मधूमाशी सारखी चिटकली. इतकेच नाही तर जी मुलं तिला स्वतःची आई मानायला तयार नव्हती. नंतर तीच मुलं तिला आई आई म्हणायला त्यांचे तोंड
थकत नसे.जी मुलं तिच्या वाऱ्याला ही उभी राहत नसत ,तीच मुलं तिच्या अवती भवती पिंगा घालू लागली. ते
पाहून विराज ला ही बरे वाटले. तेव्हा कोणीतरी म्हटले आहेच ना की, प्रेमाने जग जिंकता येते.ही तर चिमुकली मुलं
आहेत , नाही का ? विराज हर्षभराने तिला म्हणाला ," कांचन फार आभारी आहे मी तुझा."
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा