दुनिया ना माने - २४
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
दुनिया ना माने - २४ |
प्रीती आपल्या खोलीत गेल्यानंतर कावेरीबाई स्वयंपाक
घरात येऊन पाणी प्याल्या आणि मग आपल्या खोलीत
येऊन अंथरूणावर पहुडल्या. पण त्याना झोप अशी काय
येत नव्हती. जणू त्यांची झोप कोणीतरी चोरली होती. त्या
सारख्या ह्या कुशीवरून त्या कुशीवर वळत होत्या. त्यांच्या
विचारांचे काहूर मांजले होते. ते दोघे एकांतात काय बोलत
असावेत ? म्हणजे त्याना आतील बोलणे अस्पष्टपणे ऐकू आले होते ; परंतु नीट काय ते समजले नव्हते. परंतु त्यांच्या
मनात एक शंका निर्माण जरूर झाली. की ह्या दोघां मध्ये
काही ना काही खिचडी जरूर शिजते आहे. परंतु कोणती
ते कळत नाहीये. विचार करता करता एक विचार मनात आला की ,ह्या दोघां मध्ये अनैतिक संबंध तर नसतील ना ?
छे ,छे,छे ! मी काहीतरीच अभद्र विचार करतंय, असे म्हणून
त्या स्वतःच स्वतःच्या थोबाडीत मारून घेतात.
खूप विचार करून ही त्या योग्य निर्णयावर पोहोचू शकल्या नाहीत. तश्या त्या स्वतःशीच पुटपुटल्या , आपण
उगाचच संशय घेत नाही ना त्या दोघावर ? नाहीतर दोघां मध्ये
समजतो तसे काही नसायचे. जाळ शिवाय आग नाही आणि
आगी शिवाय धूर नाही. काही ना काहीतरी दोघां मध्ये नाते अवश्य आहे. कारण सावत्र मुलाशी कोणी इतकी जवळीक
करत नाही. या दोघां मध्ये नेमके कोणते नाते आहे, याचा शोध घ्यालाच पाहीजेल. असा मनात विचार करून त्या झोपण्याचा प्रयत्न करू लागल्या. परंतु झोप त्यांच्या पासून
खूप दूर होती. विचार करता-करता चट्कन कधी निद्रा देवतेने
त्यांच्यावर ताबा मिळविला हे त्याना सुध्दा कळले नाही.
सकाळी उठल्यानंतर संधिग्नपणे त्या दोघांवर नजर
ठेवून होत्या. त्या दोघांच्या हालचालीवर बारीक नजर ठेवून
होत्या. विराज नेहमी प्रमाणे उठला आणि स्नान संध्या करून
तो कामावर निघून ही गेला. त्याला सोडायला प्रीती दरवाजा पर्यंत गेली आणि आपला हात हलवून तिने त्याला बाय केले.
ते सुध्दा कावेरीबाई ने पाहिले. त्यानंतर मुलांची शाळेत जाण्यासाठी तयारी सुरू झाली. तेव्हा लेकीला मदत करण्याच्या हेतूने त्या म्हणाल्या," प्रीती आण त्याना मी तयार
करते." त्यावर प्रीती म्हणाली," नको आई, तयारी झाली त्यांची." कावेरीबाई बोलल्या ," अग किशोरीचे केस विंचरायचे
आहेत ना, दे मी विंचरते."
" किशोरी जा बाळ,आजी तुझे चांगल्या घट्ट वेण्या घालून देईल." ती जात नाही,म्हणून लाडीकपणे परंतु किंचित
रागावून म्हणाली ," जा,ना !" किशोरी मुकाट्याने कावेरीबाई
जवळ जाऊन उभी राहिली. तेव्हा कावेरीबाई ने तिला जवळ
घेऊन गोंजारले. मग केस विंचरण्याच्या बहाण्याने त्यांनी तिला विचारले ," किशोरी बाळ नाव काय तुझं ?"
" माझं नाव किशोरी."
" अगं ते मला माहित आहे,पूर्ण नाव सांग तुझं."
तेव्हा किशोरी बोलण्या अगोदर प्रीती म्हणाली, किशोरी
सुधाकर जाधव ." तेव्हा कावेरीबाई आपल्या लेकीवर रागवत
म्हणाल्या ," मी तुला नाही विचारले तिचे नाव ,तिलाच आपलं
नाव सांगू दे." असे म्हणून त्या किशोरीकडे पाहत बोलल्या,
बाळ तुझं नाव सांग बरं." तेव्हा तेथे प्रतीक आला नि म्हणाला," अग मम्मी , तू तिचे चुकीचे नाव सांगितले."
" तू चूप रे , आलाय मोठा मला शिकवायला." त्याच्याकडे
डोळे वटारून पाहत बोलली. तशी किशोरी बोलली," हा, मम्मी दादा बरोबर बोलतोय. माझं नाव किशोरी ....तिला पुढे
बोलू न देता पर ती बोलली ," चूप बैस ! कालची चिमुरडी
पोर मला अक्कल शिकवू लागली." मुलं फार गोंधळली.
त्याना कळत नव्हतं की आज आपण बरोबर बोलत असताना पण आपली मम्मी आपल्यावर का चिडते आहे ?
पण तेवढ्यात प्रीती सुधाकर वर चिडत बोलली," तुला शाळेत नाही जायचंय ?"
" जायचंय ना ?"
" मग अजून का इथं थांबला आहेस ?"
" मी किशोरीला सोबत घेण्यासाठी थांबलोय."
" काही गरज नाही, मी नेऊन सोडे न तिला."
आपली मम्मी रागावली हे पाहून तो निमूटपणे तेथून
निघून गेला. तशी ती आपल्या आईकडे वळून बोलली, आई,
तू बाजूला हो पाहू. मला तिचे चट्कन केस विंचरून शाळेत
घेऊन जाऊ दे, फार उशीर झालाय. त्यावर ती चिमुरडी किशोरी बोलली ," कुठे उशीर झालाय मम्मी, रोज तर आपण
ह्या पेक्षा ही उशिरा जातो."
" उशिरा जातो म्हणूनच सर ओरडतात ना ?"
त्यावर ती काहीच बोलली नाही. परंतु कावेरीबाई मात्र
समजून गेल्या की कुठंतरी पाणी मुरतंय. पण त्या हार मानण्यातल्या नव्हत्या. त्या म्हणाल्या," अग पण तू तिला आपलं नाव सांगू का देत नाहीयेस ?"
" काय आई, पण तू पण नाव कुठं पळून जात आहे का ?
सांगेल आल्यावर."
" अगं नाव सांगायला कितीसा उशीर लागतो. आणि एवढ्यात सांगून पण झाली असती ती. तू तिला थांबविले नसते तर." असे म्हणून त्या किशोरी कडे पाहत बोलल्या,
" सांग बाळ नाव काय तुझं ?" प्रीतीचा पण नाईलाज
झाला. काय करावे ते सुचेना. तेवढ्यात किशोरीने आपले
पूर्ण नाव सांगितले. " किशोरी विराज जाधव." तशी प्रीती
लगेच बोलली ," बाळ नाव चुकलं तुझं ,मी म्हणतो तसे म्हण." तेवढ्यात तेथे सुधाकर आले नि बोलले," आज सकाळीच नाव सांगायची स्पर्धा लावली आहे की काय ?"
" जावई बापू तुम्ही थांबा.त्याना आपलं नाव सांगता
आलं पाहिजे." असे म्हणून त्या मोठ्या नातवाकडे पाहत
म्हणाल्या ," तू सांग रे,तुझं नाव."
" सांग प्रतीक .......सुधाकरने मध्येच बोलण्याचा प्रयत्न
केला तश्या कावेरीबाई त्यांच्यावर चिडत बोलल्या," मला
हे कळत नाहीये की तुम्ही दोघे मुलांना आपली नाव का सांगू
देत नाहीत ?" सुधाकर आणि प्रीतीचा एकदम नाईलाज झाला. काय करावे ते दोघांना ही सुचेना. तेवढ्यात च प्रतीक
ने आपले पूर्ण नाव सांगितले. ते ऐकून दोघांच्या ही पाया
खालील जमीन सरकली. तेव्हा सुधाकर ने तेथून पाय काढण्याचा प्रयत्न केला तश्या कावेरीबाई गर्जल्या ," जावई
बापू ,थांबा. जाताय कुठं ?"
" कुठं नाही. जरा फेरफटका मारून येतो."
" कुठं जायचं नाही इथंच थांबा."
" अगं आई , उशीर होतोय शाळेत जायला."
" हरकत नाही ,उशीर झाला तरी, पण मला माझ्या
प्रश्नांची सर्व उत्तरे पाहिजेत." तशी प्रीती समजली की आज
आपले भिंग फुटणार परंतु मुलांसमोर हे व्हायला नको म्हणून
त्या म्हणाली ," अगं आई, मी अगोदर शाळेत जाऊन आणि
मग तुझ्या साऱ्या प्रश्नांची उत्तरे देते." असे म्हणून ती आपल्या
मुलांकडे पाहत बोलली," चला रें लवकर शाळेत जायला
उशीर झाला." असे म्हणून प्रीती मुलांना घेऊन तेथून निसटली. मात्र सुधाकर त्यांच्या तावडीत सापडला. त्या
म्हणाल्या ," बोला,जावई बापू काय भानगड आहे ही ?"
तेवढ्यात तेथे माहिपतराव येतात नि विचारू लागतात की
कशाची भानगड ?"
" तुम्ही गप्प बसा हो," कावेरीबाई चिडून बोलल्या.
" आई ,तुम्ही उगाचच संशय घेताय, आमच्यावर."
" मग मला सांगा. मुलं बापाचे नाव विराज का सांगतात."
" तो त्यांना आपल्या मुलासारखाच प्रेम करतो ना ?
शिवाय मोठा भाऊ वडिलांच्या जागी मानले जाते ना ?"
" अगदीं बरोबर." महिपतराव म्हणाले.
" तुम्ही गप्प बसा हो,मध्ये मध्ये उगाचच बोलत राहतील."
" तुम्ही समजता तसं काहीही नाहीये."
" अस्सं ! मग मला सांगा तुमची मुलं तुमच्या मुलाच्या
खोलीत झोपण्याचा हट्ट का करताय ?"
" अहो,त्यांचा तो मोठा भाऊ आहे ना ?"
" मोठा भाऊ का जन्मदाता बाप ?"
" कावेरी काहीतरीच काय बोलतेस ?"
" काहीतरीच नाही खरं तेच बोलतेय. मी पाहिलंय
त्या दोघांना."
" काय पाहिलेस तू ?" महिपतारावनी विचारले. तेव्हा त्यांनी रात्री काय पाहिले हे सांगितले. शेवटी नाईलाजाने सुधाकरला सारे सत्य सांगावे लागले. ते ऐकल्यानंतर मात्र कावेरीबाई आणि माहिपतराव खानविलकरांचा पारा एकदम चढला. ते म्हणाले ," जावई बापू तुम्हांला कळतंय का तुम्ही काय केलेत ते ?"
" माझं ऐका ना जरा."
" आम्हाला काही ऐकायचं नाही तुमचं. असे नीच काम
करताना तुम्हाला काहीच कसं नाही वाटलं ? जणांची नाहीतर
मनाची तरी लाज असायला हवी होती तुम्हांला." तेवढ्यात च
प्रीती भितभितच घरात प्रवेश केला. तिला पाहताच त्यांचा पारा अधिकच चढला. ते म्हणाले," ये तुझीच वाट पाहत होतो आम्ही !" तशी ती समजली की आपले भिंग फुटले आहे. आता आपले आई-वडील आपली उलट तपासणी घेतल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही .असा विचार करून ती स्वतःला तयार करू लागली.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा