दुनिया ना माने २२
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
दुनिया ना माने २२ |
दुसऱ्या दिवशी तिचे वडील महिपतराव सकाळच्या गाडीने गावाला निघून गेले. प्रीती त्यांच्याच येण्याची वाट पहात होती. कारण तिचे मन भीतीने ग्रासले होते. नेमके काय घडले आहे पुण्याला ,ते कुणास ठाऊक ? आपले सत्य उघडकिस तर आले नसेल ना ? कसं कळेल बरं हे ? तेथे नेमके काय घडलंय तेच कळत नाहीये. देवा माझे गुपित सर्वा समोर आणू नकोस . नाहीतर मला गावाला कोणाला तोंड सुध्दा दाखविण्याची जागा शिल्लक राहणार नाही. असे म्हणून लगेच मनात एक विचार आला की, नेमके काय घडलं असेल पुण्याला ? पण त्याचा काही अंदाज लागत नव्हता.
त्यामुळेच की काय ती मनातल्या मनात देवा जवळ धावा करीत होती की, परमेश्वराला वाचव मला यातून." काय गंमत आहे पहा. पाप करणारा सुध्दा म्हणतोय की देवा, मला वाचव यातून. आणि पुण्यवाण सुध्दा देवा जवळ तेच बोलतो. मग देवाने ऐकावे तरी कोणाचे ? फर जटिल प्रश्न आहे हा , पण आपल्याला काय त्याचं ? जे जे होईल ते ते पहावे."
महिपतराव पुण्यावरून जसे परतले तसे तिच्या आईने प्रथम चौकशी केली. त्या म्हणाल्या ," काय हो , जावई बापू काय म्हणाले ? म्हणजे लग्नाला येणार आहेस ना ?"
" अगं न येऊन सांगतील कोणाला ? "
" म्हणजे ते यायला तयार झाले ? " प्रीती ने भीतीने घाबरून विचारले.
" हां म्हणजे अगोदर तयार नव्हते म्हणा. पण मी सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाही. चांगले कोंडीत पकडले मी त्यांना. तसे स्वतःच तयार झाले लग्नाला यायला."
" म्हणजे काय केलं तुम्ही ? ते नाराज तर नाही ना झाले?" तिच्या आईने विचारले.
" नाराज कशाचे होताहेत ? उगाचच काय काय पण कारणं सांगतात. म्हणे, मुलाच्या जेवणाचे हाल होतील. त्याला जेवण बनवता येत नाही. "
" मग खरं आहे ते नाहीच बनवता येत जेवण."
मध्येच प्रीती बोलली.
" मी म्हणतो नाही बनवता येत, तर दोन दिवस बाहेर जेवायचे. बिघडलं कुठं ? "
" त्याला बाहेरचे जेवण पचत नाही." प्रीती बोलली.
" हे तू मला सांगतेस ? मग हात गाडीवरचा वडापाव कसा चालतो ? तो काय घरातला असतो ?"
" कोण खातोय गाडीवरचे उघडे पदार्थ ? प्रीती ने न कळल्याने प्रश्न केला.
" तुझा तो पोरगा खातो. मी प्रत्यक्ष या माझ्या डोळ्यांनी पाहिलेय त्याला. रस्त्यावरच्या हातगाडीवरचा वडापाव खाताना."
" अहो,वडापावची गोष्ट वेगळी आहे, जेवण जेवायचे म्हणजे .....?"
" काही होत नाही , आणि तू मला सांगू नकोस."
त्यावर प्रीती काहीच बोलली नाही. तसे महिपतराव पुढे म्हणाले," शेवटी तुझ्या नवऱ्याचे यायचे कबूल केलं. कळलं ."
असे बोलून ते आपल्या खोलीत निघून गेले ; परंतु प्रीतीला मात्र खूप टेन्शनमध्ये आलं, कारण सुधाकर लग्नाला येतोय हे ऐकून तिचा चेहरा चिंतामय झाला. पण इलाज नव्हता त्याला. आता ते आल्यानंतर त्यांच्या सोबत ते येथे असेपर्यंत तरी आपल्याला त्यांची पत्नी बनून राहायला लागेल. आणि खरं सांगायचं तर त्याचे फारसे दु:ख नाही. पण मुलं काही गडबड करणार नाही, असं कसं म्हणता येईल. असं ती आपल्या मनात विचार करत होती ; परंतु ही चिंता तिची निरर्थक होती. कारण सुधाकर लग्नाच्या दिवशीच आला नि लग्न होताच त्याच दिवशी संध्याकाळी पुण्याला जायला निघाला. एक दिवस देखील त्यांच्या घरी वस्तीला थांबला नाही. याचा फार अत्यानंद प्रीतीला झाला. मात्र प्रीतीच्या आईला वाईट वाटले. आणि त्या म्हणाल्या देखील की,जावई बापू रागवलेत वाटतं. " त्यावर प्रितीने विचारले ," असे कशावरून म्हणतेस ?" तेव्हा तिची आई बोलली," अगं एक दिवस देखील तुझा नवरा इथं थांबला नाही. याचा अर्थ काय समजावा आम्ही ? "
" तसं काही नाही आई तू उगाचच चिंता करतेस आपली."
" नाही कसं ? आम्ही रस्त्यावरून चालणाऱ्या माणसाची
त्याच्या चालीवरून त्याची पारख करतो."
" ठीक आहे, ते जर का ते खरोखर रागावले असतील तर मी त्यांची नाराजी दूर नक्की करेन. तू अजिबात चिंता करू नकोस त्याबद्दल." असे म्हणत असताना तिच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झाला . कारण तिची आता चिंता मिटली होती. म्हणून दोन दिवस अजून माहेरी मुक्काम करून तिसर्या दिवशी मात्र तिने पुण्याला जाण्याचा आपला निर्णय आपल्या आईला सांगितला. आणि ठरल्याप्रमाणे ती
तिसऱ्या दिवशी ती निघाली पण पुण्याला जायला. तेव्हा तिची आई तिला म्हणाली," प्रीती तू आता आपल्या घरी जाते आहेस , तेव्हा माझ्यातर्फे जावई बापुची माग. त्याना म्हणावं , राग धरू नका मनात. काही चुकलं असेल तर क्षमा करा आम्हाला ; पण त्याचा राग माझ्या लेकीवर काढू नका. " तशी प्रीती मनात विचार करू लागली की, खरंच आईला आपल्या लेकीची किती चिंता असते याची तुलना
शब्दात करू शकत नाही. शेवटी काही एक गडबड न
होता प्रीती आपल्या तिन्ही मुलांना घेऊन पुण्याला परतली.
हे पाहून सुधाकर आणि विराजला फार आनंद झाला. इतक्या दिवस मनावर असलेले दडपण दुर झाले. लग्न कसे पार पडलं याची चौकशी विराज ने तर केलीच ; परंतु विपरीत काही घडलं नाही ना , याची पण चौकशी तितक्याच आपुलकीने केली. तशी प्रीती हर्षभराने बोलली ," हो, एकदम
सुरळीत पार पडले. पण लग्नाच्या दिवशी जेव्हा तुझे बाबा
आले , तेव्हा मी मनातून घाबरली होती; परंतु तुझे बाबा थांबलेच नाहीत. लग्न होताच ते पसार झाले. त्यामुळे म्हणावी तशी काही गडबड झाली नाही. "
" तुझे आई बाबा रागावले असतील ना माझ्या बाबावर ?"
" ते कसले रागावतात ? उलट त्यांनाच असे वाटले की त्यांचे जावई बापू त्यांच्यावर रागवलेत फार , म्हणून एक दिवस पण सासरी मुक्कामाला न थांबता परस्पर निघून आले, त्याबद्दल आईने माफी मागितली त्यांची. काय सांगू तुला , मला तर खूप आनंद झाला त्यावेळी ; पण मी तसं दाखवून दिलं नाही हं!"
" वा हे फार छान केलेस . म्हणजे एक चिंता मिटली म्हणायची तर ."
" हो ना ? " असे बोलून तिने त्याच्या सुरात आपला स्वर
मिळविला. आणि खरं सांगायचं तर त्या दोघांचा आनंद
दवगुणीत झाला होता. त्यानंतर पंधरा दिवस काळ लोटला.
एक दिवस अचानक प्रीतीचे आई-वडील तिच्या घरी येऊन थडकले. दोघांना पण आपल्या घरी आल्याचे पाहून
प्रीतीच्या पाया खालची जमीनच सरकली. असं काही होईल याची कल्पनाच केली नव्हती. त्या दोघांना हॉल मध्ये बसवून
ती पळतच आपल्या खोलीत गेली. आणि विराज ला आई-बाबा आल्याची खबर दिली नि पळतच ती सुधाकरच्या
खोलीत गेली नि त्याना सुध्दा आई-बाबा ना खबर दिली. तसे त्या दोघांनी पण आपापले बेडरूम चेंज केले. सुधाकर तिच्या खोलीत जाऊन बसला. थोड्या वेळाने झोपेतून उठल्याचा बहाणा करत प्रीतीच्या खोलीतून बाहेर निघत हॉलम मध्ये आला. आणि मोठ्या आपुलकीने विचारपूस केली.
प्रवाश करून आल्यामुळे त्यांच्या अंगाला घामासानीचा
वास मारत होता. म्हणून अगोदर स्नानास पाणी मागितले.
प्रितीने त्याना अंगोळी साठी गरम पाणी दिले.स्नान आटोपल्यावर गरमागरम चहा-नाश्ता झाला. विराज उठला.
स्नान संध्या केल्यानंतर चहा-नाश्ता करून ऑफिस ला निघून
गेला. त्यानंतर प्रीतीने आपल्या आईला आपल्याकडे येण्याचे
कारण विचारले.तेव्हा प्रीतीची आई ,कावेरीबाई बोलली की,
जावई बापू आमच्यवर रागावून आले ना, म्हणून आम्ही आलो,त्यांची माफी मागायला आलो."
" कोणी सांगितले तुम्हाला की, आम्ही तुमच्यावर
रागावलो म्हणून."
" कोण कशाला सांगायला पाहिजे ? आम्हाला कळत
नाहीये का ?" महिपतराव बोलले.
" आपला काहीतरी गैरसमज झालाय मामासाहेब ?
मी आपल्यावर खरंच रागावलो नाहीये."
" मग तडकाफडकी निघून का आले ?"
" अहो,सासूबाई ,मी तुम्हाला सांगितले होते ना,की इथं
विराजच्या जेवणाची गैरसोय होते म्हणून."
" फक्त हेच कारण आहे ?"
" हो ."
" नक्की ?"
" म्हणजे तुमचा माझ्यावर विश्वास नाही असं म्हणा की !"
" विश्वास आहे हो ; पण कसं आहे, आम्ही पडलो मुलीचे आई-बाप अर्थात मुलीच्या संसारात काही विघ्न येऊ नये,असेच वाटणार ना आम्हाला ?"
" पण आता गैरसमज झाला ना तुमचा दूर ?" सुधाकर बोलला.
" हो ."
" मग मी तुम्हाला काय म्हणाली होती गावाला ?" प्रीती
बोलली.
" हो गं पण भीती वाटतेच ना ?" कावेरीबाई बोलल्या.
" बरं बरं , आता हा विषय इथंच संपवा." प्रीती बोलली.
" बरं तो विषय संपला. आता दुसरा विषय ...."
" दुसरा विषय ....कोणता ?" प्रीती ने न समजून विचारले.
" आम्हां दोघाचं असं मत आहे की एकवेळ तू तुझ्या
मुलाला विचारून पहा ."
" कशासबंधी ?"
" त्याच्या लग्नासबंधी."
" लग्नासबंधी ss ते तर मी तुम्हाला मागच्या वेळी गावलाच सांगितले होते ना, की त्याचे एका मुलीवर प्रेम आहे
म्हणून."
" अग मग असू दे ना, प्रेम केलेल्या मुलींशीच लग्न करायला हवं ,असं कुठं लिहिलं आहे ?"
" म्हणजे काय ? प्रेम एका शी आणि लग्न दुसऱ्याशी !
असं कुठं झालंय ?"
" असं कित्येक लोक करतात."
" करत असतील पण आमचा विराज तसा नाहीये.'
" अगं पण त्याला विचारून तर बघ."
" काहीही विचारायला नको."
" त्याला न विचारताच आपल्या मनाचं सांगतेस ?"
" मला माहित आहे त्याचा निर्णय काय असेल तो ?"
" पण आम्हाला त्याच्या तोंडून ऐकायचं आहे."
" ठीक आहे, मग संध्याकाळी कामावरून आला की नाही
मग तुम्हीच विचारून पहा त्याला. " पुढे मनात म्हणाली, हे
आई-बाबा पण ना ,माझ्याच नवऱ्याच्या मागे का लागलेत
ते कोण जाणे ?
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा