यह इश्क नहीं आसान १४ ( अमर प्रेम )
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
यह इश्क नहीं आसान १४ |
सलीम दुसरे लग्न करणार हे समजल्यावर निलोफर
खुश होते की आता आपल्याला तलाक मिळणार, परंतु
सलीम तसे करत नाही हे पाहून निलोफर एके दिवशी
सलीम ला म्हणाली," तू जर दुसरे लग्न करणार आहेस
तर मला तलाक का देत नाहीस ?"
" तुला तलाक दिला तर ते तुझ्यासाठी फायद्याचे ठरेल.
कारण तुला रुद्राशी निकाह करण्याचा मार्ग खुलेल.त्यामुळे
तुझा फायदा होईल असे मी कोणतेच कार्य करणार नाहीये."
" अरे पण त्यात तुझं काय नुकसान आहे ? असं पण तू
दुसरा निकाह करणारच आहेस ना, मग मला का बंधनात
अडकवून ठेवू पाहतो आहेस ?"
" कारण तू माझी बेगम आहेस. आणि तुला तर माहीत
असेलच की इस्लाम धर्मामध्ये आम्हां पुरुषांना चार निकाह
करण्याचा अधिकार दिलेला आहे. असे पाक कुराण मध्ये
लिहिलं आहे."
" हो, बरोबर आहे तुझं ; परंतु ते कोणाला ज्या पुरुषांमध्ये चार पत्नीचा खर्च उचण्याची क्षमता आहे, अश्याच पुरुषांना तो अधिकार दिलेला आहे. आणि ज्या पुरुषांना एकाच पत्नीचे पोट भरता येत नाही त्यांनी दुसरा निकाह करू नये अर्थात एकाच पत्नीशी एकनिष्ठ राहावे.
असं ही कुराण मध्ये लिहिलं आहे ते का नाही सांगत ?
" पण माझ्यात क्षमता आहे ना, दोन बायकांना
सांभाळण्याची ! म्हणून मी करतोय हा दुसरा निकाह.
आणि हे सारं मला तुझ्यामुळे करावे लागत आहे, तू जर
माझ्या होणाऱ्या बाळाचा जीव घेतला नसतास तर मला
दुसरा निकाह करण्याची काही गरज नव्हती."
" जे घडलं त्यात माझा काय दोष ? कदाचित अल्लाह
लाच हे मंजूर नव्हते. म्हणून त्याने अपघात घडवून आणला ना ?" निलोफर उद्गारली.
" सारा दोष तुझाच आहे , कारण तुला माझी पत्नी
म्हणवून घेणे मंजूर नव्हते. म्हणून तू कधी मला आपला शौहर मानले नाहीस शिवाय कधी पत्नी धर्म पण निभावला नाहीस. आणि जे मूल जन्माला येणार होते त्यालाही जन्माला येऊ दिले नाहीस. मग तुझ्या सारख्या पत्नीचा मला उपयोग तरी काय , म्हणून मी दुसरा निकाह करत आहे."
" तू कर ना दुसरा निकाह मी कुठं नको म्हणते, पण
मला ही आझाद कर ना, तुझ्या बंधनातून."
" अजिबात करणार नाही. कारण तसं केलं तर तुझी
जित होईल नि माझी होईल हार, आणि मला हार अजिबात मंजूर नाहीये. कारण मी नेहमी जिंकण्यासाठीच खेळ खेळत असतो. हरण्यासाठी नव्हे ! कळलं ?"
" म्हणजे तू मला तलाक देणार नाहीस तर ?"
" अलबत."
" ठीक आहे, मी पण पाहते तू दुसरा निकाह कसा करतो
ते ."
" असं नेमके काय करणार आहेस तू ?"
" ते आताच जाणून घेणे गरजेचे आहे का ? योग्य वेळ
येताच आपोआप कळेल ना तुला ? तोपर्यंत वाट पहा ना....?" असे निलोफर ने म्हणताच सलीम तेथून चालता झाला. परंतु मनात विचार करू लागला की असं काय करणार ही ? हिच्यावर नजर ठेवायला हवे. ही कोठे जाते नि कोणाला भेटते वगैरे ? हिला कोणाचा तरी सपोट असल्या खेरीज ही एवढी उडणार नाहीये. रुद्र तर हिला मदत करत नसेल ना ? असेल ही , कोणी सांगावे ? खरं काय आहे याचा शोध घ्यायलाच हवा. असा विचार करून चालता झाला. तो निघून गेल्यावर त्याच्या पाठमोरी आकृती कडे पाहत निलोफर विचारू करू लागली की असे काय करायला हवे की जेणेकरून सलीम आपल्याला तलाक देईल. परंतु खूप विचार करूनही उपाय काही सुचत नव्हता. मग तिने गोष्ट रुद्राशी शेअर केली. तेव्हा रुद्र म्हणाला ," काही हरकत नाही. आपण काहीतरी तोड काढू त्यावर. " असे आश्वासन रूद्राने दिल्यानंतर निलोफर ने फोन कट केला. परंतु काही दिवसानंतर रुद्र ने निलोफर ला फोन करून सांगितले की आपले काम झाले आहे, करू दे त्याला दुसरा निकाह !" असे बोलून त्याने निलोफर ला थोडक्यात माहिती दिली की त्याची होणारी पत्नी कोण
आहे नि ती आपलीच मदत करणार आहे ,कारण तिला ही तिच्या पहिल्या शौहर ने धोका दिला आहे नि तलाक पण दिला आहे. त्यामुळे तिला पण अश्या पुरुषांची चीड आहे. म्हणून ती आपल्याला मदत करायला तयार झाली आहे; परंतु सलीम समोर तिला तू ओळखत नसल्याचे भासवायचे आहे. बस्स !" एवढं बोलून फोन कट केला.
सलीम ने एका सलमा नावाच्या तलाक शुदा स्त्री ही निकाह केला. सलमा त्या घरात आली मात्र आणि दोघींची भांडणं सुरू झाली. रोज कोणत्या ना कोणत्या कारणावरून दोघींची भाडणं होत होती. सलमा नेहमी सलीम ला सांगत असे की निलोफर ला तलाक द्या म्हणून. पण सलीम काही ऐकेना. तेव्हा ती सरळ सलीम ला म्हणाली ," ती तुम्हांला इतकी आवडत होती तर माझ्याशी निकाह का केला ?"
तेव्हा सलीम म्हणाला की, तिला पोर होत नव्हतं म्हणून मला तुझ्याशी निकाह करावा लागला." त्यावर सलमा
म्हणाली ," समजा मला ही पोर नाही झालं तर काय
करणार तुम्ही ?"
" तसं होणार नाही."
" आणि झालंच तर काय ?"
" ते नंतरचे नंतर पाहू !" तेव्हा दरवाजा उभी असलेली
निलोफर पुढे येत म्हणाली," तर तुझा शौहर तिसरा निकाह करील. पुरुषांना चार निकाह करण्याचा अधिकार दिलाच आहे ना, इस्लाम धर्मां ने , हो की नाही सलीम ?"
तसा सलीम चिडून म्हणाली ," तू का आलीस इथं ?"
" का ? इथं काय कर्फ्यु लागलाय की काय ? आणि
तसं पण या घरात कोठेही जाण्यासाठी मला कुण्याच्या परवानगीची गरज नाहीये."
" पण एवढं तर तुला कळतं ना, की पती, पत्नी च्या
बेडरूम मध्ये त्यांच्या परवानगीशिवाय कोणी आंत येऊ
नये ?" सलमा उद्गारली.
" खरंय तुझं. पण बेडरूम केवळ तुझाच नाही तर माझा सुध्दा आहे, कारण सलीम अद्याप माझाही शौहर
आहे. मला अजून त्याने तलाक दिलेला नाहीये." निलोफर
उद्गारली.
" पाहिलंत तरी तुम्हांला मी म्हणाले होते की माझ्या
सवती ला तलाक देऊन टाका म्हणून. पण तुम्ही ऐकलं
नाही माझं. हीला अगोदर आपल्या बेडरूम मधून बाहेर
काढा." सलमा रागाने म्हणाली. त्यावर सलीम म्हणाला,
" तुला तर अगोदर माझ्या रूम मध्ये यायला आवडत
नव्हतं. मग आता का येते आहेस कबाब मध्ये हड्डी बनायला ?"
" माझी मर्जी ! आणि तसं पण तुला सुखाने जगू देणार
नाही मी !" निलोफर स्मित हास्य करत म्हणाली.
" मला माहित आहे, तू हे का करते आहेस ते ?"
" मग सांग बरं मी असं का करते ते."
" मी तुला तलाक देत नाही ना, म्हणूनच करतेस ना
हे सगळं ?"
" एकदम करेक्ट !" निलोफर स्मित हास्य करत बोलली.
" पण मला हे कळत नाहीये, की तुम्ही तिला का तलाक देत नाही आहात ?" सलमा चिडून म्हणाली.
" त्याला पण एक कारण आहे." सलीम उद्गारला.
" काय कारण आहे ते मला कळलंच पाहिजे." सलमा
हट्ट करून बसली. तेव्हा निलोफर हसून म्हणाली," आता
सांगून टाक काय कारण आहे ते. किती दिवस लपविणार
आहेस ?" सलीम वैतागून बाहेर निघून गेला. त्या सरशी
त्या दोघींनी एकमेकांच्या हातावर टाळी दिली. सलमा
निलोफर ला म्हणाली," चिंता करू नकोस, तुला मी तलाक
द्यायलाच लावीन. आता जा तू नाहीतर ह्यांना संशय येईल
आपला. " असे सलमा ने म्हटल्यानंतर निलोफर तेथून
बाहेर पडली. आणि सरळ आपल्या बेडरूम मध्ये निघून
गेली. सलीम ला त्याच्या अम्मी ने विचारले की, काय झालं
रे, तुझ्या बेडरूम मधून मोठमोठ्या आवाज येत होता,
आपल्या बायकोशी भांडत होतास की काय ?"
" बायकोशी नाही ती आहे ना, निलोफर तिच्या मुळे
झाले सारे !"
" आता काय केलं तिनं ?"
" दुसरे काय करणार, तिला मी तलाक देत नाही ना,
म्हणून मुद्दाम करते हे सारे नाटक."
" मग देऊन टाक ना तिला तलाक."
" मी तिला तलाक दिला की तिचा मार्ग मोकळा होईल.
आणि तिला तेच तर हवंय."
" म्हणजे ? मी नाही समजली."
" अगं म्हणजे तिचं रुद्रावर प्रेम आहे ना, त्याच्याशी
निकाह करेल ती." तेवढ्यात अनवर तिथं येत म्हणाला,
" ती कुणाशी का करिना ना आपल्याला काय करायचं त्याच्याशी ? "
" असं कसं आपल्या हातातून तिच्या नावावर असलेली
प्रॉपर्टी जाईल त्याचं काय ?"
" काय करायचीय तिची प्रॉपर्टी आपल्या कडे आहे ती
काय कमी आहे का ? " शबाना म्हणाली.
" मला ही आता असंच वाटतंय." अनवर उद्गारला.
" अब्बू तुम्ही म्हणताय हे सर्व."
" हां, कारण वेळच तशी आली आहे. तू तिला दिला नाहीस तर ती तुम्हां दोघांना सुखाचा संसार करू देणार
नाहीये. आणि तसे पण तिच्या प्रॉपर्टी चा आपल्याला फारसा काही फायदा होईल असं वाटत नाही."
" असं का म्हणता अब्बू ?"
" तिचा एक मुलगा पण तर आहे, मग कायद्याने तिच्या
प्रॉपर्टी चा खरा हकदार तोच होईल. आता जरी त्या रुद्राने
प्रॉपर्टी साठी खटला भरला नसला तरी पुढे मागे गप्प
बसणार आहे का तो ? भारतीय कायद्यानुसार आईच्या
प्रॉपर्टी वर तिच्या मुलाचा हक्क राहीलच ना ?"
" ते पाहू नंतरचे नंतर पण मी तिला इतक्या सहजासहजी
तलाक कदापि देणार नाही." असे म्हणून सलीम तेथून
निघून गेला.
सलमा ही रुद्र आणि निलोफर ची कॉलेज मैत्रीण असते. तिचा एका इंजिनिअरशी निकाह झाला. परंतु
तिच्या शौहरचे बाहेर अफेर सुरू होते. हे तिला अगोदर
माहीत नव्हते. तो दररोज उशिरा घरी येत असे. त्यामुळे
दोघांची नेहमी भाडणं होत असे. परंतु नंतर सॉरी बोलून
आपले खरे निस्सीम प्रेम तुझ्यावरच आहे ; परंतु कामाचा
व्याप वाढल्याने घरी लवकर येता येत असे काहीपण कारण सांगून वेळ मारून नेत असे ; परंतु सत्य किती दिवस लपून राहणार ? ते कधी ना कधी सर्वांसमोर येतेच ते. अस्लमच्या बाबतीतही तेच घडले. झाले असे की त्या दोघांच्या लग्नाचा वाढदिवस होता. सलमा ने अस्लम ला सकाळीच बजावून सांगितले होते की निदान आज तरी वेळेवर ये. जेणेकरून लोकांना कळू नये की आपल्या दोघांमध्ये वाद जो सुरू आहे तो लोकांना कळू नये ? " पण म्हणतात ना, माणूस सवयीचा गुलाम आहे ते काही
खोटे नाही. खरं म्हणजे तो स्वतःला सुधारू इच्छित नाही.
म्हणजे त्याला वाटत असते की आपण जे करतोय तेच योग्य आहे, त्यामुळे तो कोणाचेही ऐकत नाही. त्यामुळे होते काय कधी कधी तो स्वतःच्या सवयी मुळे स्वतःच गोत्यात येतो. परंतु त्यावेळी दुसरा पर्याय नसतो त्याच्या
जवळ.म्हणूनच कोणीतरी म्हटलंय ना की बैल गेला नि
झोपा केला.ते काही खोटे नाहीये. म्हणून माणसाने वेळीच सावरले पाहिजे नाहीतर मग असे होते जसे की अस्लम चे झाले. दोघांच्या लग्नाचा वाढदिवस होता पै-पाहुणे मंडळी घरी आले होते ; परंतु अस्लम काही वेळेवर कार्यक्रम च्या ठिकाणी पोहोचला नाही. सलमा वाट पाहून पाहून थकली. लोकांसमोर खोटं तरी किती बोलणार ? शेवटी कंटाळून ती आपल्या खोलीत निघून गेली नि रागाने अंगावरील कपडे उतरवून फेकले. त्याच वेळी अस्लम घरी आला. नि त्याने
पाहिले की सलमा पाहुण्यां जवळ नाहीये हे पाहून त्याचे
माथे ठणकले. भयंकर चिडला नि त्याने रागाच्या भरातच तो आपल्या खोलीत आला नि तिला तलाक तलाक बोलून मोकळा झाला. त्यानंतर सलमा ने त्याचे घर सोडले नि ती आपल्या आई-वडिलांच्या घरी येऊन राहू लागली. साद्दत चे तीन महिन्यांचा अवधी पूर्ण होताच तिच्या आई-वडिलांनी तिचा निकाह सलीम शी ठरविला. ही गोष्ट
जेव्हा रुद्राला कळली तेव्हा रूद्राने तिची भेट घेतली नि
आपल्या सोबत जे घडले त्याची सविस्तर माहिती तिला दिली. तेव्हा सलमा ने रूद्राने आश्वासन दिले की निलोफर नि तुझी मदत जरूर करणार ? आणि त्या प्रमाणे तिचा निकाह सलीम शी होताच तिने आपले काम सुरू केले.
सलीम समोर ती निलोफर शी वाईट वागत असे. जेणेकरून सलीम ला त्या दोघींचा संशय येऊ नये. याची ती काळजी घेत असे. सलीम ला कळत नव्हते की काय करावे ?
शेवटी नाईलाजाने निलोफर ला त्याने तलाक देऊन
टाकला. मग काय निलोफर आपल्या आई-वडिलांच्या
घरी राहू लागली. तलाक दिल्या नंतर त्या दोघी जिवलग मैत्रिणी असल्यागत वागू लागल्या हे पाहून सलीम ला
त्या दोघींचा संशय आला नि त्याने त्या दोघी विषयी एका
प्राव्हेट डिटेक्टिव्ह कडून माहिती काढली असता. सलीम
ला समजले की ह्या दोघी कॉलेज मैत्रीण होत्या. आणि
त्या दोघींचे हे प्लॅन होते. परंतु आता काय फायदा म्हणजे
धनुष्यातुन एकदा सुटलेला एकदा बाण परत घेता येत
नाही तसे झाले सलीम चे. साद्दत चे तीन महिने पूर्ण होताच निलोफर ने रीतसर हिंदू धर्म स्वीकारून रुद्राशी
विवाह केला. त्यानंतर इब्राहिम खान ने रुद्राला आपला
घर जावई बनवून घेण्यास तयार होते. परंतु दुर्गाबाई त्यासाठी अजिबात तयार नव्हत्या. याचा अर्थ दुर्गाबाईंनी
निलोफरला नातसून म्हणून स्वीकार केला. लवकरच त्या दोघांना एक मुलगी सुद्धा झाली. तेव्हा सलीम ला समजले की निलोफर ने आपल्याला फसविले. परंतु आता त्याला पर्याय नव्हता.
समाप्त
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा