पंखरूपी मानव ११
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
पंखरूपी मानव ११ |
मग इतर देशांच्या वैज्ञानिकानी पण तसा प्रयत्न करून पाहिला परंतु ते लोक सुध्दा त्याच्या शस्त्र सामुग्री सहित
पकडले गेले. मग सर्व देशातील वैज्ञानिकाना प्रश्न पडला की
हमला करण्या पूर्वीच आपल्या शत्रू देशाला कसे कळते ?
तेव्हा त्यांच्या द्यानात येते की ही कमाल डॉ. विश्वजितच्या
रिपोर्टर मशीनची असणार , त्यांनी पुन्हा दुसरी रिपोर्टर मशीन नक्कीच बनविली असणार. कारण त्यात ते प्रवीण आहेत. शिवाय डॉ. विश्वजित पंखरूपी मानवांच्या देशात जे गेलेत ते अजून माघारी म्हणजे भारतात परतलेले नाहीत. म्हणूनच
की भारताने या युद्धात भाग घेतलेला नाहीये. हे जसे द्यानात
आले तसे त्यांच्या द्यानात हे देखील यायला वेळ लागला नाही की हे सारे काम जरूर बॉडीलेसचेच असणार. आता याला एकच उपाय आणि तो म्हणजे सर्व राष्टानी एकदम
चोहीकडून पंखरूपी मानवाच्या देशावर हल्ला करावा.
म्हणजे एकटा बॉडीलेस काय करणार ? सर्वाना त्यांचे म्हणणे
पटले नि मग सर्वांनी एकदम हल्ला केला ; परंतु वार खाली गेला. उलट तेच सर्व जायबंदी झाले. कारण डॉ. विश्वजित ने
अनेक बॉडीलेसची पूर्ण फौज उभी केली होती. त्यामुळे सर्वांचा प्रयत्न फसला. शेवटी सगळ्या अपाराध्याना चंद्रसेन महाराज समोर उभे करण्यात आले ,तेव्हा चंद्रसेन महाराज म्हणाले,आम्ही तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास दिला नसताना आमच्या देशावर आक्रमण करण्या मागचा तुमचा
हेतू काय तो स्पष्ट करावा."
तेव्हा डॉ. डेव्हिड म्हणाले ," आम्हाला ही ह्या देशावर वास्तव्य करावयाचे आहे. आणि जर तुमचा सोबत डॉ. विश्वजित नसते तर आतापर्यंत आम्ही तुमच्या देशावर विजय
मिळवून तुम्हां साऱ्या पंखरूपी मानवांना कैद केले असते. परंतु केवळ डॉ. विश्वजित च्या बॉडीलेस मुळे ते आम्हांला शक्य झाले नाहीये."
" आणि शक्य होणार ही नाही. कारण आमच्या कडे
डॉ. विश्वजित ,डॉ. विश्वनाथ सारखे वैज्ञानिक असताना आम्हाला कोणाची ही भीती उरलेली नाहीये. आणि तसे पण
तुम्ही या ग्रहांवर जिवंत राहू शकत नाहीये. तुम्हाला या खोलीच्या बाहेर काढले की माशा प्रमाणे तडपडून मराला
कारण तुम्हाला हवा असलेला ऑक्सिजन इथं नाहीये. आणि
जो ऑक्सिजन इथं आहे,तो तुम्ही घेऊ शकणार नाही. कारण
पाण्यातील ऑक्सिजन जसा मासाच घेऊ शकतो. मनुष्य प्राणी नाही. तसाच जमिनीवरील ऑक्सिजन मासा घेऊ शकत नाही. देवाने प्रत्येक जीवाची घडवणूक त्या त्या परिस्थिती नुसार केली आहे. म्हणून आमच्या देशातील
पंखरूपी मानव तुमच्या पृथ्वीवर जगू शकणार नाही. म्हणून
आम्ही देशात खुश आणि तुम्ही तुमच्या देशात खुश राहायला
हवे. परंतु पृथ्वीवरील माणसांनाची हाव मोठीच ! आपले ते
आपलेच पण दुसऱ्याचे ही आपलेच. ही वृत्ती चांगली नाही.
माणसाजवळ अशी वृत्ती असायला पाहिजे की तुम्ही जगा नि
इतरांना पण त्यांच्या इच्छेनुसार जगू द्या.
शेवटी सर्वांनी चंद्रसेन महाराजांची माफी मागितली नि
आम्हाला आपल्या मायदेशी जाण्याची अनुमती द्यावी अशी
सर्वांनी विनंती केली. तेव्हा डॉ. विश्वजित म्हणाले," महाराज
ह्यांना सुधारण्याची एक संधी द्या. नि ह्यांना आपल्या मायदेशी
जाऊ द्या."
" बघा. शिका डॉ. विश्वजित कडून , तुम्ही त्याना बळजबरीने पकडून नेले कैदेत ठेवले पण तरी देखील त्यांनी तुमच्यावरण राग द्वेष न ठेवता तुम्हाला सोडून देण्यासाठी आमच्या जवळ विनंती करताहेत. म्हणून मी त्यांच्या विनंतीचा मान ठेवून तुम्हाला मुक्त करत आहे ; परंतु पुन्हा आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहणार नाही याची ग्वाही द्यावी."
" आम्हाला पोषक असलेले हवामान जर इथे नाहीये तर इथं येऊन काय हासिल होणार आहे ? " डॉ. डेव्हिड बोलला. तसे बाकीच्या लोकानी सुध्दा त्याला दुजोरा दिला.
शेवटी सर्वाना मुक्त करण्यात आले. त्या रूमच्या बाहेर येताच
ऑक्सिजन न मिळाल्याने त्याना गुदमरल्या सारखे होऊ लागले तेव्हा त्या सर्वांनी लगेच नाका ला ऑक्सिजन चा पाईप लावला. तेव्हा त्यांची खात्री पटली. की चंद्रसेन महाराज जे काही बोलला ते सत्य होते. त्या बंद खोलीच्या बाहेर ऑक्सिजन अजिबात नव्हता. अर्थात इथं राहायचे असेल तर पिजऱ्यातल्या पक्षावानी राहावे लागेल. कैदी असल्यागत असले जीवन काय कामाचे ? त्या पेक्षा पृथ्वीवरील जीवन किती सुखाचे नि समुद्रीचे आहे, हे यावरून दिसून येते. ह्या विश्वाचा चालक नि सर्वात मोठा वैज्ञानिक जर कोणी असेल तर तो फक्त नि फक्त ईश्वरच आहे. म्हणून ईश्वरला शरण जा ! सर्वजण आपल्या मायदेशी परतले. मात्र
डॉ. विश्वजित , डॉ. विश्वनाथ आणि त्यांचे असिस्टंट सलीम, जॉन याना तेथेच ठेवून घेतले. कारण त्याना पृथ्वीवरील
माणसावर विश्वास नाही. पुन्हा चढाई केली तर ! म्हणून
डॉ. विश्वजित कायम तेथेच राहणार तिथले रहिवाशी बनून
पण भारतात ही जाऊन पुन्हा परत येण्याची त्याना पूर्ण परवानगी मिळाली. डॉ. विश्वजित मुळे त्यांच्या देशाचे रक्षण
झाले म्हणून त्यांनी आपल्या देशाचे नाव बदलून भारतवर्ष असे नाव ठेविले. आणि त्यानंतर चंद्रसेन महाराजांनी आपल्या कन्येशी त्यांचा विवाह लावून दिला. आता त्याच्या पासून होणारी संतती भारतात ही राहू शकेल नि पंखरूपी मानव च्या दुनियेत ही. अर्थात दुसऱ्या दुनियेत ही भारतीय लोक राहणार. हे विषेश !
समाप्त
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा