Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

यह इश्क नहीं आसांन १३ ( अमर प्रेम )

यह इश्क नहीं आसांन १३
यह इश्क नहीं आसांन १३ 

 


       सलीम फार खुशीत होता. त्याला वाटत असते की
निलोफरला एकदा बाळ झालं की तिला आपला स्वीकार
करावाच लागेल. तिच्या घरचेही सर्वजण खुश असतात.
पण त्याना माहीत नाहीये की पुढे काय वाढून ठेवलं आहे
ते. निलोफर प्रेग्नेंट आहे असे समजून तिला काही काम
करायला देत नाहीत. निलोफर ला तेच हवं होतं. दिवसभर
आपल्या खोलीतून बाहेर पडत नाही. फक्त आपल्या आईच्या घरी जाऊन आपल्या आई-बाबांना भेटून येते बस्स ! त्याप्रमाणे आज पण ती आपल्या आईला भेटायला
आईच्या घरी गेली तेव्हा तिच्या आई ने विचारले की,  आम्ही जे ऐकलं ते खरं आहे का ? "
    " काय ऐकलं आहेस तू ?"
    " हेच की तू सलीम ला माफ केलेस नि आता त्याच्या
बाळाची आई होणार आहेस."
    " आई, तू ऐकलं आहेस ते खरं आहे, पण अर्ध्यसत्य
आहे ते."
    " म्हणजे ?"
   " मी सलीम ला माफ केलेले नाहीये, फक्त तसे नाटक
करते. राहिला प्रश्न त्याच्या मुलाची आई होण्याचा तर ह्या
जन्मात तर ते शक्य नाहीये."
    " म्हणजे तू प्रेग्नेंट नाहीयेस ?"
    " होती पण त्याच्या मुलाची नाही."
    " तू काय म्हणतेस ते मला खरंच कळत नाहीये. मागे
म्हणालीस की गर्भपात करून आलीस म्हणून. मग हे बाळ
कोणाचे ?" मग तिने काय झालं ते थोडक्यात सांगितले. त्यावर त्या खुश होत म्हणाल्या," जर ते बाळ रुद्राचे होते तर ते पाडायची काय गरज होती, राहू द्यायचेस ना ?"
    " अगं आई, ते बाळ जरी रुद्राचे होते तरी त्या मुलाच्या
नावापुढे सलीम चे नाव लागले असते ना ?"
    " बरं मग आता पुढे काय करायचं विचार केला आहेस ? म्हणजे आज ना उद्या सत्य उघडकीस येणारच
ना ? की तू प्रेग्नेंट नाहीयेस फक्त नाटक करत होतीस."
   " त्याचा उपाय पण शोधला आहे मी ."
   " कोणता उपाय ?"
   " इकडे जवळ ये, कानात सांगतो तुझ्या." असे बोलून
निलोफर ने आपल्या आईच्या कानात पुढच्या प्लॅन विषयी
थोडक्यात सांगितले. त्यावर त्या खुश होत म्हणाल्या,
    "  वा ! फार चांगली योजना आहे तुझी ! पण नीट पार
पडेल ना ?"
    " अवश्य ! शिवाय प्रयत्न करणं आपलं काम आहे
बाकी सर्व खुदा जाणे !"
    " बरं जा तू नि स्वतःची काळजी घे." निलोफर गेल्यानंतर इब्राहिम ने विचारले ," काय गं काय म्हणत होती आपली निलू  ?"
    " काही नाही हो."
    " मला सांगण्या सारखं नाहीये का ?"
    " तसं नाहीये हो ."
    " मग का सांगत नाहीयेस मला ."
    " तुम्हांला ऐकायचंच आहे तर ऐका." असे म्हणून त्यांनी सविस्तर माहिती दिली. ते ऐकून इब्राहिम म्हणाले,
    " मग आपण ही आपल्या मुलीला साथ देऊया की !"
    " अवश्य कारण आपल्या मुलीला ह्या लोकांनी जी
वागणूक दिली आहे ती मी कदापि विसरणार नाही. मी
एक काम करतो."
    " काय करायचं म्हणता ?"
    " ही सारी माहिती आपल्या जावयाला देऊन येतो."
    " रुद्राला का ?"
    " हां तर आणखीन कोण जावई आहे आपला ?"
    " रुद्राला हे सर्व माहीत असेलच कारण हे त्या दोघांचे
प्लॅन आहे."
    " तरी पण जाऊन येतो म्हणजे नातवाला पण पाहून
येता येईल."
    " मला पण आपल्या नातवाला भेटण्याची फार इच्छा
आहे, पण कसे भेटणार ? रुद्राची आजी असेल ना तिथं ?"
   " असू दे, त्या करून करून काय करतील आपला
अपमानच ना, करू दे, नातवाला पाहण्यासाठी ते पण
सहन करू."
    " ठीक आहे, चला मी पण येते."
    " थांब. मी अगोदर जावई बापुना फोन करून सांगतो."
असे म्हणून त्यांनी रुद्राचा फोन नंबर डायल केला. पलीकडून ताबडतोब कॉल रिसिव्ह केला गेला.
    " बोला , पप्पा !"
   " आम्ही दोघेही आमच्या नातवाला भेटायला तुमच्या
घरी येत आहोत ,चालेल ना आलं तर ?"
    " हे काय विचारता पप्पा , तुम्हांला पूर्ण अधिकार आहे,
आपल्या नातवाला भेटायला कधी पण येऊ शकता."
    " थँक्सू बेटा !" असे म्हणून इब्राहिम ने फोन कट केला.
त्यानंतर दोघेही घरातून बाहेर पडले नि सरळ रिक्षा करून
रुद्राच्या घरी पोहोचले. रुद्र त्यांची वाट पाहत बाहेरच
उभा होता. ते जसे रिक्षातून खाली उतरून रुद्रा जवळ
आले तसा रुद्र खाली वाकला नि त्या दोघांचे चरणस्पर्श
केले. त्या दोघांनी त्याला आशीर्वाद दिला. त्यानंतर रुद्र
त्या दोघांना घेऊन घरात आला नि त्याने प्रेम ला हांक
मारली. प्रेम बाहेर येत म्हणाला," काय दादा ?"
   " वेदांत ला घेऊन ये बाहेर." इब्राहिम आणि त्यांच्या
सायरा बेगमला पाहताच प्रेम समजला नि लगेच आपल्या
बेडरूम मध्ये गेला नि वेदांत ला घेऊन आला. परंतु त्याच
क्षणी दुर्गाबाई पण बाहेर आल्या. इब्राहिम आणि त्याच्या
बायकोला पाहून त्यांच्या तळ पायाची आग मस्तकाला
भिडली. त्या कडाडल्या ," खबरदार, प्रेम वेदांत ला त्यांच्या हातात देशील तर !" तसा प्रेम अचानक ब्रेक लागल्या सारखा थांबला. तसा रुद्र पुढे सरसावला नि वेदांत ला आपल्या कडे घेतले नि सरळ इब्राहिम च्या हाती द्यायला गेला तश्या दुर्गाबाई चिडल्या म्हणाल्या ," थांब रुद्र, मी दिलेला आदेश फक्त प्रेम साठीच नाहीये तर तुझ्यासाठी पण आहे."
    " माहीत आहे ते मला." असे म्हणून रुद्राने  वेदांत ला इब्राहिमच्या हाती दिलं. तश्या त्या अधिकच चिडल्या नि म्हणाल्या," माझ्या आज्ञेचे उल्लंघन करणाऱ्या ला काय शिक्षा मिळते ते माहीत आहे ना तुला ?"
    " हो माहीत आहे मला."
   " तरी सुद्धा पुन्हा पुन्हा तोच गुन्हा करतोस."
  " हो. आणि एक वेळ नाही अनेकदा करेन मी हा गुन्हा !"
  " म्हणजे तू ठरवूनच टाकलेस तर माझं काही ऐकायचंच
नाहीये."
  " जे काय समजायचं ते समज तू आजी !"
  " हे बघा आजीबाई तुम्ही उगाच नका भांडण करू ?"
इब्राहिम ने मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा दुर्गाबाईंनी
त्याना खडसावले म्हणाले," तुम्हांला कोणी मध्ये बोलायला सांगितले आहे का ? नाही ना ? मग कशाला बोलताय ?"
    " आजी, माझ्या सासू-सासऱ्यांचा अपमान तू करू नकोस."
    " अरे मग सांग की तुझ्या सासू-सासऱ्यांना आमच्या
घरी येऊन आम्हालाच शहाणपणा शिकवू नका म्हणून."   
   तेवढ्यात तिथं विद्याधरपंत येतात नि ते आपल्या आईला समजावत म्हणाले," आई ,  आपल्याला घरी
आलेल्या पाहुण्यांचा असा अपमान करणे योग्य आहे का ?" त्यावर त्या चिडून म्हणाल्या," आता तू आलास होय आपल्या लेकाची बाजू घ्यायला ?"
    " मी कोणाचीही बाजू घेत नाही आई , खरं आहे तेच सांगतोय."
    " काय खरं आहे ते सांग बरं." दुर्गाबाई उद्गारल्या
    " इब्राहिम खान कसे झाले तरी ते आता आपले व्याही आहेत, त्यांचा अपमान करणे योग्य आहे का ?"
     " अरे तुम्ही लोकांनी आपला धर्मभ्रष्ट केला आहे, आधीच मुस्लिम लोकांशी सोयरिक केली म्हणून लोकं खूप संतापले आहेत, मंदिरात पूजापाठ करण्याचे काम सुद्धा
गेले हातातून. आता काय गाववाल्यांचा रोष पण ओढवून घ्यायचा आहे का तुला ? " त्यावर सायरा बानू म्हणाल्या,
   " माफ करा मला, आम्ही पुन्हा नाही यायचे इथं." असे
म्हणून वेदांत ला प्रितिच्या हातात देऊन इब्राहिम आणि
सायरा बानू तिकडून निघून गेले. तसा रुद्र म्हणाला,
    "  आजी आता झालं तुझं समाधान ?" त्यावर दुर्गाबाई म्हणाल्या,
    " मी जे काही करते ते तुमच्या हितासाठीच करते ना, गाववाल्यांच्या विरुध्द जाऊन इथं राहायला जमेल का आपल्याला ? उद्या जर गाववाल्यांनी आपल्याला गावा बाहेर काढलं म्हणजे कुठं जायचं आपण ?"
    " का ? जाऊ कुठंतरी दुसरीकडे, आपले गाव म्हणजे
सारे जग नाही काही."
    " एक सांगून ठेवते मी हे घर सोडून कुठंही जाणार
नाही." दुर्गाबाई उद्गारल्या.
     " कोणालाही कोठे जायची गरज नाहीये, मीच जातो
इथून, म्हणजे सुंठी वाचून खोखला गेला असं होईल. नाही
का ?" असे म्हणून लागलीच रुद्र आपल्या खोलीत गेला
नि एका बॅगेत आपले नि मुलाचे कपडे भरले. तेव्हा तिथं
प्रेम आला नि त्याला बॅगेत कपडे भरताना पाहून विचारले,
    " दादा , कपडे का भरतो आहेस तू ?"
    " मी हे घर सोडून चाललोय."
    " का ?"
    " निलोफर च्या आई-वडिलांचा इथं अपमान होत असेल तर मला इथून जाणेच योग्य आहे."
     " अरे दादा, आजी चे बोलणे नको मनावर घेऊस तुला
आजीचा स्वभाव माहीत नाही आहे का  ?"
   " अरे म्हणून काय झालं ? घरी आलेल्या पाहुण्यांचा
असा अपमान केला जातोय का ?"
   " आजी तर्फे मी मागतो त्यांची ! मग तर झालं."
   " हा एक दिवसांचा प्रश्न नाहीये प्रेम."
   " ठाऊक आहे मला."
   " तरी पण असा बोलतोस ?"
   " हां ! का ? ते नाही विचारणार ?"
   "  आता तूच सांग ना "
   " वहिनीच्या आई-वडिलांना इथं येण्याची मनाई आहे,
परंतु तुला त्यांच्या घरी जाण्याची मनाई तर नाही आहे ना ? मला म्हणायचं आहे की , जेव्हा त्याना वेदांत ला
भेटण्याची इच्छा होईल तेव्हा तू बाळाला  घेऊन जायचे त्यांच्या घरी बस्स !"
   " अरे वा ! फार चांगली आयडिया सांगितलीस. मला तर
हे सुचलंच नाही." असं म्हणून रूद्राने प्रेमला अलिंगन दिले.
त्यानंतर रुद्रा ने निलोफरला फोन करून सांगितले की तिला किंवा तिच्या आई-वडिलांना वेदांत ला भेटण्याची इच्छा झाल्यास मला फक्त कॉल करणे मी स्वतःच घेऊन येइन त्याला." असे म्हणून फोन कट केला.
      त्यानंतर कधीही निलोफर ला किंवा तिच्या आई-वडिलांना वेदांत ला भेटायची इच्छा झाली की ते सरळ
फोन करून रुद्राला सांगू लागले. मग काय काही ना काही
बहाणा करून रुद्र वेदांत ला घेऊन जात असे. त्यामुळे
निलोफर ला देखील आपल्या बाळाला भेटता येत असे.
   
     तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण होताच निलोफर ने
आपले पुढील प्लॅन यशस्वी करण्याच्या हेतूने स्वतःच
जिन्यावरून घसरून  पडली नि खाली आली.ते पाहून
शबाना बानू ने  मोठ्या ने ओरड घातली.तसे सर्वजण
तेथे पळत आले.त्यानंतर सलीम ने तिला ताबडतोब इस्पितळात घेऊन गेला. तसे तिला इमर्जन्सी वार्ड मध्ये
ऍडमिट करण्यात आले. त्यानंतर थोड्याच वेळात निलोफरच्या घरची सारी मंडळी इस्पितळात हजर झाली. सलीम ला विचारू लागली की काय सांगितले डॉक्टर ने
तेव्हा सलीम म्हणाला," जिन्यावरून खाली पडल्यामुळे तिच्या पोटातील बाळाला  फार मार लागल्या मुळे
केस फार क्लिटिकल झाली आहे, ऑपरेशन सुरू आहे
पाहू काय होते ते." सर्वजण बेचैन होऊन डॉक्टर कधी
बाहेर येतात ते वाट पाहत होते. थोड्या वेळाने डॉक्टर
ऑपरेशन थिएटर मधून बाहेर आले तसे सर्वजण डॉक्टरच्या दिशेने धावले नि डॉक्टराना विचारू लागले की
तिच्या पोटातील बाळ तर सुखरूप आहे ना ?" तेव्हा डॉक्टर ने सांगितले की पेशंटच्या जीवाला आता धोका
नाही, परंतु बाळाला आम्ही वाचवू शकलो नाही." असे
म्हणताच सर्वांचे चेहरे काळे ठिक्कर पडले. डॉक्टर ने
सलीम ला आपल्या केबिन मध्ये बोलविले नि त्याला
सांगितले की तुमची पत्नी पुन्हा कधीच आई बनू शकणार
नाही." हे ऐकताच सलीम च्या पाया खालची जमीनच
सरकली. पण करणार , झाले त्याला काही इलाज नव्हता. निलोफरला तिचे आई-वडील, सासू-सासरे भेटायला
तिच्या वार्ड मध्ये गेले तर त्यांच्या समोर रडण्याचे छान
नाटक निलोफर ने वठविले. निलोफरच्या आई-वडिलांना
खरं काय आहे हे माहीत असल्याने त्यांना फारसे वाईट
वाटले नाही उलट आनंदच झाला. परंतु त्यांनी तसे त्यांच्या
समोर दर्शविले नाही.  डिस्चार्ज मिळताच निलोफर ला घरी
आणले तेव्हा सासू ने निलोफर वर तोंडसुख घेतले. नीट
काळजी घेतली असतीस तर असे झाले नसते. वगैरे....?
निलोफर अंतरातून खुश होती की तिचे प्लॅन एकदम
यशस्वी झाले होते. परंतु थोड्याच दिवसांत शबाना बानू
च्या द्यानात आले की, पोट चं पोर गेल्याचं दुःख निलोफरच्या चेहऱ्यावर अजिबात दिसत नाही. ती तर फार खुश दिसते. याचा अर्थ तिने स्वतःच हे मुद्दाम केले नसेल ना ? कारण जिच्या पोटचं पोर असं अचानक जातं ती बाई वेडीपीसी होते. दुसरे मूल जोपर्यंत तिच्या कुशीत येत नाही तोपर्यंत तिचं कशातच मन लागत नाही. परंतु इथं तर असं कोणतंच लक्षण दिसत नाहीये. याचा अर्थ तिनेच तर हे मुद्दाम घडवून आणलं नसेल ना ? असे अनेक विचार त्याच्या मनात येऊ लागले होते. मग त्याने ती ही गोष्ट त्यांनी सलीम शी शेअर केली तेव्हा सलीम सुध्दा तिला म्हणाला," अम्मी मला सुध्दा तोच संशय येऊ लागला आता."
    " परंतु तुझ्याशी तरी नीट वागते का ती ? "
    " कसली नीट , मला आपल्या खोलीत येऊ देखील
देत नाही."
    " याचा अर्थ तिने हे स्वतःहून घडवून आणले असावे."
    " मग आता काय करायचं ?"
    " दुसरे काय करणार , तलाक देऊन टाक तिला."
    " तिला तर तेच हवंय."
    " तिला स्वता जवळ बाळगून तरी काय करणार आहेस
तिला पोर तर होणार नाही. मग आपल्याला तिचा काय
उपयोग ? देऊन टाक तलाक तिला." शबाना बानू उद्गारली.
   " तिला तलाक दिला तर तिच्यासाठी ते वरदान ठरेल."
    " ते कसं ?"
    " तिचा जुना हिरो नाही का ? त्याच्याशी पुन्हा निकाह
करेल ती."
   " असा कसा करेल निकाह ती ? तिला तीन महिने साद्दत
चे पाळावे लागतील. त्यानंतर इस्लाम धर्माच्या कायद्यानुसार हलाला करावा लागेल. त्यानंतर तिच्या बरोबर जो व्यक्ती निकाह करील त्याने तिला तलाक दिला तर ना पहिल्या शौअर शी निकाह करता येईल तिला."
    " अगं अम्मी हा आपल्या धर्माचा नियम आहे. सनातन धर्मात असा रिवाज नाहीये."
    " नसेन ना का ? पण ती तर मुस्लिम आहे ना ? शिवाय
रुद्र आता तिच्याशी लग्न करणार नाही."
     " का नाही करणार ?"
     " सनातन धर्मातील लोक दुसऱ्याने सोडलेली बायको
करत नाहीत कधी."
     " अगं अम्मी त्या जुन्या काळाच्या गोष्टी होत्या.आता कोण मानतेय जुन्या काळाच्या गोष्टी !"
    " ते काही असो रुद्र करणार नाही तिच्या बरोबर लग्न."
    " कशावरून सांगतेस ?"
   " तिला पोरं तर होणार नाही, मग  अश्या बाईशी कोण लग्न करेल बरं ?"
    " पण तिला पहिलं झालेलं एक पोर आहे ना, दुसरे मूल कशाला पाहिजे आता ?"
    " हं तू म्हणतोस ते पण बरोबर आहे म्हणा."
    " म्हणून मी तिला तलाक तर देणार नाही, परंतु मी दुसरे लग्न करिन, तसे पण इस्लाम धर्मात आम्हाला चार विवाह
करण्याची मुभा आहे."
   " हां हे ठीक होईल बघ." त्यानंतर सलीम साठी स्थळ
शोधण्याचे काम सुरू झाले.

    सलीम निलोफर ला तलाक  देईल किंवा नाही ?
शिवाय निलोफर पुढचा डाव कोणता असेल हे जाणून
घेण्यासाठी पुढचा भाग अवश्य वाचा.

क्रमशः



टिप्पण्या

Popular posts

रामायण -१ | Ramayana episode 1 | Author :- mahendranath prabhu

Janmashtami 2022: 18 या 19 अगस्त कब मनाई जाएगी जन्माष्टमी?

शादी से पहले अपनी बेटी सोनाक्षी सिन्हा से अनबन पर शत्रुघ्न सिन्हा की प्रतिक्रिया..