दुनिया ना माने २७
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
दुनिया ना माने २७ |
कांचन ने समजून विचारले , " कशाबद्दल ?"
" माझ्या मुलांना तू आपली मुलं मानल्या बद्दल."
" आज म्हटलतात ते म्हटलतात पुन्हा असं कधी म्हणू नका. का माहितेय ?"
" का ? "
" अहो,ती मुलं फक्त तुमचीच राहिली नाहीत आता .
माझा पण आता तितकाच अधिकार आहे त्यांच्यावर. बहुधा
तुमच्या पेक्षा जास्तच ." विराज हसून म्हणाला ," खरंय."
" आहे ना खरं ,मग यापुढे माझे आभार अजिबात मानावयाचे नाहीत. कारण माझ्यावर तुम्ही जे उपकार केलेत
त्या उपकाराची फेड मी ह्या जन्मतःच काय असे अनेक जन्म
घेऊन सुध्दा फेडता येणार नाहीत."
" असे मी काय केलंय तुझ्यासाठी ?"
" तुम्ही जे केलेत माझ्यासाठी ते कदापि दुसऱ्या माणसाने केले नसते."
" असं तुला वाटतं ; पण खरं सांगायचं तर तूच माझ्यावर
उपकार केलेस. माझ्या मुलांना आपले करून."
" बस्स ! यापुढे कोणी कोणाचे उपकार मानावयाचे नाहीत. जे काय आपण करतो किंवा करणार आहोत ते आपल्या दोघांचे कर्तव्यच आहे."
" येस माय डार्लींग !"
" ओके ओके !"
" कांचन एक विचारू ?"
" काय ?"
" शंका आली म्हणून."
" बेशक .".
" समज उद्या तुला एखादं मूल झालं की मग इतके प्रेम करशील का माझ्या मुलावर ? आय मीन आपल्या मुलावर.?"
" अजून शंका असेल तर तुम्ही आता चला माझ्याबरोबर."
" कोठे ?"
" कुटुंब नियोजनाच्या केंद्रावर."
" कशाला ?"
" नसबंधी करायला." एकदम लज्जित होत तो म्हणाला," सॉरी कांचन खरंच माफ कर मला."
" माफ करेन पण एका अटीवर."
" कोणत्या अटीवर ?"
" पुन्हा अशी वाय्यात भाषा करायची नाहीये. कळलं."
" ओके ! "
" माफी एकदाच मिळते."
" मान्य ."
" मग हसा पाहू !" असे म्हणताच विराज हसला. तशी ती पण हसली. तसे विराज ने तिला आपल्या मिठीत घेतले. नि तिच्यावर चुंबनांचा वर्षाव केला. तेव्हा कांचन त्याला लाडात बोलली," बस बस्स ! थोडे उद्या साठी पण ठेवा. आजच संपूर्ण स्टॉप संपून टाकला तर उद्याचं काय ?"
असे म्हणून ती सुध्दा त्याला अधिकच बिलगली.
कांचन सारखी सुशील आणि चांगल्या स्वभावाची सून मिळाल्याने सुधाकर मनापासून सुखावला. त्याने मनातल्या मनात देवाचे आभार मानले. कारण देवाची लीला खरंच अगाद आहे .कारण कोणत्या वेळी तो कोणती लीला करेल
हे सांगता येणार नाही. म्हणूनच की काय त्याला जगन्नियंता म्हणतात. " खरंय " सुधाकर स्वत:शीच पुटपुटला.
कांचन सासऱ्यांची खूप शुश्रूषा करीत असे. त्याचे हात पाय चेपून देई , त्यांच्या डोक्यावर तेल घालून मालिश करून करून देत असे. आणि सुधाकर सुद्धा तिला आपली सुन न समजता मुलगी समजत असे. तिच्याशी आपल्या मुली सारखा प्रेम करीत असत. त्यामुळे कांचन पण हे प्रेम पाहून
सुखावली. जी अगोदर आपल्या नशिबाला दोष देत होती. तीच आता आपले नशीब बदलणाऱ्या त्या भाग्य देवतेचे ती
फार आभार मानत होती. एके काळी ती म्हणत असे की जगात देवच नाहीये.देवाला आपली कीव पण येतच नाही. असे तिला वाटत असे. परंतु आपले नशीब इतक्या जलद गतीने परमेश्वर बदलेल याची तिने कधी कल्पना केली नव्हती. असो. परमेश्वराची किमया परमेश्वरच जाणे !
लवकरच कांचन ला दिवस गेलेत. तिच्या गरोदर पानात तिच्या सासर्याने म्हणजेच सुधाकरने तिची फार काळजी घेतली. तिला वेळच्या वेळी तपासणीसाठी दवाखान्यात स्वतः घेऊन जात. किंवा विराजला वेळ असेल तर त्याला घेऊन जायला सांगत असंत. तसेच डॉक्टरानी लिहून दिलेली औषधे वेळच्या वेळी घेते की नाही. हे देखील ते आवर्जून पाहत असत.
नऊ महिने नऊ दिवस पूर्ण होताच तिने एका कन्येला जन्म दिला. मुलीचा बारसा मोठ्या थाटामाटात पार पाडला. मुलीचे नाव परी ठेवण्यात आले. परी सर्वांची लाडकी बनली. तिन्ही मोठी भावंड तर तिला जमिनीवर ठेवू देत नसत. एकाने खाली ठेवले की लगेच दुसरा उचलून घेई. अशी
चढा ओढ चालत असे. तिला स्वतःला मुल झाले तरी ही तिच्या प्रेमात काही ही फरक पडला नाही. ती आपल्या चारही मुलावर सारखेच प्रेम करीत असे. ते पाहून विराज मन ही मन सुखावला. त्याच्या मनात असलेली मुलांविषयीची निरर्थक शंका कायमची दुर झाली. कारण कांचन ने त्याच्या ही पुढचे पाऊल उचलले. कुटुंबनियोजन केंद्रात जाऊन स्वतःची नसबंदी करून घेतली; परंतु ही गोष्ट जेव्हा विराजला समजली , तेव्हा विराजला तिचा राग आला. घरी आल्यावर तो तिच्यावर रागवत म्हणाला ," एवढी काय घाई होती, ऑपरेशन करून घेण्याची ? अजून एखादे मुल झालं असते ना ? " तेव्हा ती त्याच्यावर न रागावता हसत म्हणाली ," मिस्टर तुम्ही अगोदर सरकारचा नियम मोडला आहेत. दोन मुला ऐवजी चार मुलं जन्माला घातलीत. सध्याच्या सरकारच्या नियमानुसार फक्त एकच मुला नंतर
कुटुंब नियोजन केंद्रात जाऊन ऑपरेशन करून घ्यावे ; परंतु
त्या वेळी तुम्ही सरकारचा नियम पाळला नाही.निदान आता तरी पाळा. चार मुलं बस्स झालीत आपल्याला. असं नाही का वाटत तुम्हाला ? " विराज ओशाळून म्हणाला ," खरंय तुझं.
" नक्की ना ?"
" म्हणजे काय ?"
" नाही म्हणजे नाकावरचा राग अजून गेलेला दिसत नाही तुमच्या ."
" असं कशावरून म्हणतेस ? "
" नाही म्हणजे तुमचं नाक अजून लाल दिसते."
" खरंच का ?" असे बोलून तो लगेच आपले नाक आरशात पाहतो , तेव्हा त्याच्याकडे पाहून मिश्कीलपणे
गालातल्या गालात हसत असते. तेव्हा त्यांच्या द्यानात आले
की कांचन आपली थट्टा करतेय. हे द्यानात येताच ती पण हसू लागली.
एके दिवशी वृत्तपत्रात वृत्त छापून आले की पंढरपूरची यात्रा करायला गेलेल्या एका कुटुंबाच्या अपघातात मृत्यू झाला. त्या कुटुंबातील माणसांची नावे वाचताच सुधाकरला
एकदम धक्काच बसला. कारण त्या अपघातात प्रीतीचे आई वडील भाऊ-भावजय सर्वजण जागच्या जागी ठार झाले होते. टाटाच्या सुमो गाडीने ते सर्वजण पंढरपूरच्या यात्रेला निघाले होते .इतक्यात एका ट्रक ची टाटा च्या सुमो
गाडीशी टक्कर झाली. नि भीषण अपघातात झाला. त्यात ड्रायव्हर सहित संपूर्ण कुटूंब मृत्युमुखी पडले. बातमी वाचून
क्षणभर सुचलच नाही की काय करावे ? क्षणभर वेळानंतर
त्यांनी ही बातमी विरारला दिली. विराज ला पण फार वाईट वाटले. त्यानंतर सर्वांनी गावाला जायचे ठरवले . तेव्हा
विराज म्हणाला ," त्यापेक्षा फक्त तुम्हीच जाऊन या. वाटल्यास प्रतीक ला सोबत न्या." सुधाकरला त्याच्या ह्या म्हणण्याचा अर्थ कळला. तसे सुधाकरला त्यांचे म्हणणे रास्त वाटले मग त्याने फक्त प्रतीक ला सोबत घेतले नि आपल्या गावाला गेला. प्रीतीच्या आई-वडिलांच्या उत्तरक्रियेला तिचे काका काकी , चुलत भाऊ आणि मामा वगैरे आले होते. सर्व धार्मिक विधी आटोपल्यानंतर सुधाकर प्रतीक सोबत पुन्हा पुण्याला परतले होते.
विराज चे आता प्रमोशन झाले होते. तो आता कंपनीचा मॅनेजर बनला होता. त्यामुळे कंपनी ने त्याला
राहावयास एक फ्लॅट आणि इंडिका कार दिली होती. विराज
आता आपल्या पूर्ण परिवारासह त्या फ्लॅट मध्ये राहावयास
गेला होता. आता त्याला प्रीतीच्या आणि त्याच्या नात्यासंबंधी विचारणारे कोणीच शिल्लक राहिली नव्हती.
सुधाकर ची प्रकृती आता वरचेवर बिघडत असे. कारण आता त्यांचे वय झाले होते. प्रतीक आता मॅट्रिक ची परीक्षा पास करून पुढील शिक्षणासाठी महाविद्यालयात आता जाऊ लागला होता. त्याच्या मागचा किशोर नववी
इयत्ता शिकत होता. त्यामागची त्यांची बहीण आठवीत शिकत होती. आणि सर्वात धाकटी परी आता पाचवी इयत्तेत शिकत होती. सर्व मुलं बुद्धिमान होती. प्रतिवर्षी त्यांचा नंबर 1 ते 3 या अनुक्रमान आतच असे. प्रतिक ला इंजिनियर व्हायचे होते , म्हणून त्याने विज्ञान शाखेत प्रवेश मिळविला होता.
सर्व काही व्यवस्थित आणि सुरळीत सुरू होते. पण एके दिवशी मात्र होऊ नये झाले. झाले असे की, दिवाळीचा सण जवळ आला होता, घराला रंग रंगोटी देण्याचे काम ठरले. म्हणून प्रथम घर झाडून स्वच्छ करावयास घेतले.
स्टोर रुम मध्ये जुन्या अनेक फाईल्स पडल्या होत्या. त्यातील अनेक कागदपत्रे कामाचे नव्हते . जसे की अनेक वर्षांपासून ची भरलेली लाईट बिल,भाडेपावती,वगैरे असे अनेक कागदपत्रे , फाईल्स मध्ये पडल्या होत्या. म्हणून प्रतीक ने आपल्या वडिलांना विचारले ," दादा या फाईल्समध्ये सर्व कागदपत्र आता काही कामाचे आहेत का ? त्यावर विराज बोलला," सर्व कागदपत्र निट तपासून बघ. आणि मगच नको असलेले कागदपत्र रद्दीला देऊन टाक. अथवा जाळून टाक." तेव्हा विराजच्या द्याना मनात ही नसतं की त्यात काही महत्वाचे कागदपत्र पण असू शकते. तो सहज बोलून गेला.
पण जेव्हा प्रतीक कागदपत्रे नीट वाचून पाहत होता आणि नको असलेल्या कागदपत्र फाइल्स मधून काढून बाहेर फेकत होता. असे करता करता त्याने सर्व फाइल्स तपासल्या. शेवटी एकच फाईल शिल्लक होती. ती चाळत असताना त्याला एक असा पेपर सापडला की तो पेपर त्याच्या मनात वादळ निर्माण करणारा ठरला. तो पेपर दुसरा कसला नसून त्याच्या जन्माचा दाखला होता. त्या दाखला व त्याच्या आई-वडिलांचे नाव सुधाकर जाधव आणि आईचे नाव सौभाग्यवती प्रीती सुधाकर जाधव असे लिहिले होते.ते वाचून तो मोठ्या संभ्रमात पडला.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा