Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

दुनिया ना माने -२५

दुनिया ना माने -२५
दुनिया ना माने -२५

 


     आपल्या आईवडिलांच्या प्रश्नांना कसे उत्तर द्यायचे असा विचार करत होती तेवढ्यात तिची आई तिला म्हणाली," नीच ! नालायक ! बेशर्म !  कार्टे असे ते कृत्य करताना तुला लाज कशी नाही वाटली ? " असे म्हणून तिच्या कानशिलावर
दोन तीन थप्पड मारत  त्या पुढे म्हणाल्या ," असे नीच कृत्य करण्यापूर्वी विष खाऊन मेलीस का नाही ?" प्रीतीला ते
सहन झाल्याने ती म्हणाली ," का विष खाऊन मरु मी ? काय
अपराध आहे माझा ? फक्त माझ्या वयाला शोभेल अशा
मुलाशी प्रेम केलं इतकेच ना ? "
      " नालायक ,बेशर्म ,पाप करूंनच्या  करून  वर विचारतेस मी काय केलं म्हणून ?"
       " हां ,कारण मी कोणतेही पाप केलेले नाहीये."
       " सावत्र मुलाशी अनैतिक संबंध करणे हे पाप नव्हे का ?"
      " मी त्याच्यावर मनापासून प्रेम केले तोच पुढे माझा सावत्र मुलगा निघाला तर त्यात माझा काय दोष ?"
       " म्हणजे हे प्रेम प्रकरण कधीपासून सुरू आहे म्हणनायचे ?"
      " शाळेत असल्यापासून चे प्रेम आहे आमचे एकमेकांवर."
      " ओह ! आलं लक्षात. म्हणजे हा तोच मुलगा आहे, ज्याच्या मुळे शाळेत तुझे नाव बदनाम झाले होते आणि
त्याचा परिणाम स्वरूप तुला शाळेतून रस्टिकेट केले गेले होते
होय ना ?" महिपताराव बोलले.
     " हां ; पण त्यात त्याचा काहीच दोष नव्हता."
     " दोष  कुणाचा होता हे मी तुला विचारले नाही ."
     " पण मी सांगते ना, माझं त्याच्यावर जीवापाड प्रेम आहे."
     "  अगं , पण कार्टे तुझं लग्न त्याच्या बापाची झाले हे तू कशी विसरलीस ?" कावेरीबाई संतापाने म्हणाल्या.
     " तेव्हा मला माहीत नव्हते की मी ज्यांच्याशी लग्न
करत आहे ,ते माझ्या प्रियकरा चे वडील आहेत ते. माहीत
असते तर मी त्यांच्याशी लग्नच केलं नसतं."
      " अग पण कार्टे ,तू त्या दोघां मधले नाते कसे विसरलीस ?"
      " केवळ  अग्नि सभोवती सात फेरे मारल्याने मी त्यांची सात जन्माची पत्नी झाली का ? मला माझे मन नाहीये ? मला काही स्वतःच्या इच्छा नाहीयेत का ?  का  राहू मी मला बाप शोभेल अश्या पुरुषां बरोबर. "
      " अग कार्टे तन-मन-धन सर्वकाही पतीचे चरणी  असते.
आणि  तिने ते गोड मानून घ्यायचे असते."
    "  हे तुमच्या काळात असेल आणि आताचा काळ वेगळा आहे, त्यामुळे मी काही वावगं केलेले नाहीये. "
    " अग चांडाळणी !  कलंक लावलास तु आज वाडवडिलांच्या नावाला. आज पासून तुझा बाप तुला मेला.
चल ग एक क्षण पण आता इथं थांबायचं नाही."
     "  थांबा आबा. " असे रागवू  नका. जरा शांत डोक्याने विचार करा." सुधाकर बोलला.
      " काहीही सांगू नका आम्हांला, तुम्ही पण तेवढेच जबाबदार आहेत याला."
       "  मी  ?"
       " हो !"
       " कसे ?"
        " ज्या दिवशी ह्या दोघांना हे नीच कृत्य करताना पाहिले
त्याच दिवशी या पाप्यांना बंदुकीच्या गोळ्या घालून ठार मारायला हवे होते." महिपतरावांचा राग अनावर झाला. या
क्षणी जर  त्यांच्या हातात पिस्तुल असते तर  त्यांनी मागचा पुढचा काहीही विचार न करता सरळ त्या दोघांना नक्कीच  गोळ्या घालून ठार केले असते. हे त्यांच्या पुढील वक्तव्यावरून ध्यानात येते. ते पुढे म्हणाले ," तुम्हाला  जे जमले नाही ते काम करतो. पिस्तुल, बंदूक जे काय तुमच्याकडे असेल तर घेऊन या माझ्याकडे. मीच हिला संपवून टाकतो." असे म्हणून ते तिचा गळाच पकडतात. पण मध्ये सुधाकर  पडतात म्हणून प्रीतीचा जीव तरी वाचतो.
रागाला डोळे नसतात. असे  म्हणतात ते खरंय. रागाच्या भरात माणूस कोणतेही कृत्य करायला मागे पुढे पाहत नाही.
कारण तेव्हा त्याची विवेज बुद्धी हरवलेली असते. असो-
त्यांचा हेतू साध्य झाला नाही म्हणून ते सुधाकरवर चिडून
बोलले ," तुम्ही का आलेत मध्ये ?"
      " अहो,आबा चूक फक्त त्या दोघांचीच नाहीये."
      " मग आणखीन कोणाची आहे ?"
      " त्याच आपली पण तेवढीच चूक आहे."
      " आपली चूक ...? ती कशी ?"
      " पन्नास वय झालेल्या म्हाताऱ्याशी जर वीस वर्षाच्या
मुलीशी लग्न लावून दिल्यानंतर आणखीन दुसरं काय घडणार?"
      " जगा मध्ये तुमचं एकच जोडपे आहे का ? ज्यांच्या
वयामध्ये एवढा फरक आहे."
     " मान्य आहे ,अशी अनेक कपल आहेत. परंतु.....?
     " परंतु काय ?"
     " त्या दोघांचे प्रेम लग्न होण्यापूर्वी पासूनचे होते."
     " म्हणून काय झालं ? लग्न झाल्यानंतर जुनी नाती
विसरायची असतात."
      " खरंय तुमचं. पण तिची पण मजबुरी समजून घ्या."
      " त्यात तिची कसली आलीय लाचारी ?"
      " तिची लाचारी ही की अचानक तिचं प्रेम तिच्या समोर
आल्यानंतर तिचे जुने प्रेम उफाळून आले नि त्यात तिचा पाय
घसरला."
      " जावई बापू ही कारणे तुम्ही आम्हाला सांगू नका.
आम्हाला ती पटणार पण नाहीत."
      " ठीक आहे, पण त्या दोघांनी पाप केले नाही."
       " पाप नाही तर काय पुण्य केलं ?" माहिपतराव म्हणाले," लग्न एकाशी आणि पोरं दुसऱ्या पासून."
     " त्या दोघानी रितसर लग्न केलं." हे वक्तव्य ऐकून त्याना
अजून एक धक्का बसला. कावेरीबाई चिडून बोलल्या," काय
बोलताय हे जावई बापू !"
     " खरे तेच. " असे म्हणून त्यांनी सविस्तर माहिती दिली.
     " वा ! शाब्बास ! मानलं मी तुम्हाला. दोघांच्या पापात
तुम्ही पण तेवढेच भागीदार."
     " मग काय करायला हवं होतं ते तुम्हीच सांगा."
     " दोघांना पण गोळ्या घालून ठार मारायला हवे होते."
     " आबा,तुम्ही असं कसं म्हणता ?"
     " असं कसं म्हणतो म्हणजे ,तुमच्या ह्या कृत्याला कोणीच
मान्यता देणार नाही. समाज तर नाहीच नाही."
      " गरज काय त्यांची ?" मध्येच प्रीती बोलली.
      " गरज काय  ? अजून तुला जगाचा न्याय  माहीत नाहीये. म्हणून तू अशी बोलतेस." कावेरीबाई बोलल्या ," उद्या जर तुमचे हे पाप जगाला कळलं ना ? तर लोक आमच्या तोंडात
शेण तर घालतीलच ,परंतु तुम्हां लोकांनाही ते सोडणार नाहीत. गाढवावरून तुमची ते धिंड काढतील. आणि इतकेच
करून ते थांबणार नाहीत. तुमचं घर वाळीत टाकतील. आणि
ज्या मुलांना तू जन्म दिला आहेस ना, त्या मुलांना आपली कोणी मुलगी देणार नाही.शिवाय तुम्हां लोकांचे जगणं मुश्किल करून टाकतील. तेव्हा काय कराल ? कोणा- कोणाला समजवायला जाल ?"
     " आबा, जरा माझं ऐका."
     " अजून काही सांगावयाचे राहायलय का ?"
     " मी काय म्हणतोय ,झाकली मूठ सव्वा लाखाची ! इथं
कोणालाच माहीत नाहीये. तुम्ही पण कोणाला सांगू नका."
      " त्याने काय होणार आहे,समुद्राच्या तळाशी गेलेले कधीतरी वरती येतेच की ! तसंच तुमचं हे पाप कधीतरी
लोकांसमोर आल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा काय कराल ?"
    " ते तेव्हाच तेव्हा पाहता येईल ; पण सध्या तरी गुप्तता
पाळायला काय हरकत आहे ?"
     " ते तुमचं तुम्ही पहा.आम्हांला त्यात अजिबात भागीदार
करू नका. आणि आज पासून तुमचं आमचं नातं एकदम संपलं. या पुढे तुम्ही आमच्यासाठी मेलात नि आम्ही तुमच्यासाठी मेलो असे आता समजा." असे म्हणून ते आपल्या पत्नीकडे पाहत बोलले ," चल ग ,आता इथं क्षणभर थांबन म्हणजे पाप्याना क्षमा केल्या सारखे आहे."
    असे म्हणून ते जाऊ लागतात. तेव्हा प्रीती आपल्या
आईला अडवत म्हणाली ," आई, आता तू तरी थांब ना ?"
     " ऐकले नाहीस आता तुझ्या बापाने काय सांगितले ते.
तू आम्हाला आज पासून मेलीस म्हणून. चल हो बाजूला."
असे म्हणून तिला बाजूला लोटून त्या महिपतरावांच्या मागोमाग आतल्या खोलीत निघून जातात.
     " देवा आता मी काय करू ?" प्रीती बोलली.
     " ते होणारच होते कधी ना कधीतरी ! पण इतक्या लवकर
होईल असे मात्र वाटले नव्हते." सुधाकरने खंत व्यक्त केली.
     " पण आबा बोलले तसे माझ्या मुलांना सोसावे तर लागणार नाही ना ?" प्रीती ने शंका व्यक्त केली.
     " ते आता येणारा काळच ठरविल. आणि तसे पण आई-वडिलांच्या कर्माची शिक्षा त्यांच्या मुलांना भोगावी लागतेच.
मग तो कोणी असो. असे म्हणून तो आपल्या खोलीत निघून
गेला.
     
क्रमश:

 



टिप्पण्या

Popular posts

रामायण -१ | Ramayana episode 1 | Author :- mahendranath prabhu

Janmashtami 2022: 18 या 19 अगस्त कब मनाई जाएगी जन्माष्टमी?

शादी से पहले अपनी बेटी सोनाक्षी सिन्हा से अनबन पर शत्रुघ्न सिन्हा की प्रतिक्रिया..