वंशवेल ७
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
वंशवेल ७ |
मिराबाई ना डिस्चार्ज मिळाला तेव्हा त्या दीपक ला
म्हणाल्या," तू आमचा मुलगा आहेस तर आमच्या सोबत चल."त्यावर दीपक म्हणाला , " आई , जरी तू माझी जन्मदाती आई असलीस तरी ती माझी पालनकर्ती आई आहे, तेव्हा त्या दोघांना त्यांच्या या वृद्ध अवस्थेत सोडून मी तुझ्याकडे कसा येऊ ?"
" म्हणजे तू आमच्याकडे कधी येणारच नाहीस का ?"
" येणार ना ? तुझ्याकडे पण येईन परंतु कायमस्वरूपी
तुझ्या कडे राहायला येणार नाही. वाटल्यास मी तुमच्याकडे
येऊन जाऊन राहीन."
" म्हणजे जन्मदात्या आई-वडीला पेक्षा पाळणारे आई-वडील तुझ्यासाठी फार मोलाचे आहेत असेच म्हण की !"
" मी नदीत पडलो तेव्हा आई त्यांनीच माझा प्राण वाचविला ना अर्थात ते माझ्यासाठी मोलाचे राहणारच ना ? मी नदीत बुडून मेलो असतो तर आज तुला मी इथं दिसलो असतो का ? नाही ना ?" त्यावर पुरुषोत्तम उद्गारले ," बरोबर बोलतोय तो त्या माणसाने ह्याचा प्राण वाचविला म्हणूनच हा आज आपल्याला दिसतोय अर्थात आपल्या पेक्षा त्या लोकांचाच अधिकार जास्त आहे ह्याच्यावर ,जन्म देणाऱ्या पेक्षा त्याला तारणारा केव्हाही मोठा असतो."
" म्हणजे मुलगा असूनही मी निपुत्रिक म्हणून मरणार तर ! "
" निपुत्रिक का मुलगी नाही आहे का आपल्याला ?"
" हो पण ते परक्याचे धन आहे ना ?"
" असेन ना परक्याचे पण नाव तर आपलंच सांगणार ना ?" पुरुषोत्तम उत्तरला.
" ते मला काही कळत नाही. मला फक्त इतकेच समजते
की मुलगा आपला नि मुलगी दुसऱ्याची !" मिराबाई उद्गारली.
" असं नसतं म्हणायची आई, आणि मुलगा मुलगी असा
भेदभाव ही करायचा नसतो. दोन्ही सारखेच दोघानाही सारखेच कष्ट करायला लागतात ना ? शिवाय मुला पेक्षा
मुलगीच चांगली. का ? माहितेय....... मुलीला जाणीव असते
आपल्या आई-वडिलांनी आपल्यासाठी घेतलेल्या कष्टाची !
मुलाला ती नसते. मुलगा काय म्हणतो माहितेय ....तो म्हणतो की काय झालं आमच्यासाठी कष्ट केलात तर तुमचं
ते कर्तव्यच होतं नाही का ? पण मुलगी असं कदापि म्हणत
नाही." दीपक उद्गारला.
" म्हणजे आमच्या पेक्षा ते तुला जास्त प्रिय आहेत असं
म्हणणं की " तसं नाही आई मला तुम्ही प्रिय सारखेच प्रिय
आहेत. परंतु तू विचार कर एक मुलगी तरी आहे,परंतु त्याना
तर माझ्या व्यतिरिक्त दुसरं कुणी नाही. अश्या परिस्थिती मध्ये
कसे सोडून देऊ मी त्याना !"
" बरोबर आहे तुझं. ज्यांनी तुला लहानाचे मोठे केले त्यांना असं विसरून चालणार नाही."
" काय बोलताय तुम्ही हे ?"
" आई, तू चिंता करू नलोस. वाटल्यास तू आणि बाबा
दोघेही माझ्या कडे येऊन रहा."
" मग तूच का येऊन राहात नाही आमच्याकडे ?"
" तुमच्याकडे येऊन राहायला माझी काहीच हरकत नाही
परंतु ह्या माझ्या आई-वडिलांना कुठं सोडून देऊ ते पण या
वृद्ध अवस्थेत ?"
" मग त्याना पण घेऊन ये आमच्या घरी ! "
" हां हे सर्वात उत्तम होईल." दिपकचा दुसरा बाप म्हणाला.
" मग आपलं घर हो ?" दिपकच्या आई ने विचारले.
" ते पण राहील." दीपक उद्गारला.
त्यानंतर दिपकचे पालनपोषण करणारे आई- वडील ,
दिपकची पत्नी आणि एक १० वर्षाची मुलगी होती. मुलीचे
नाव होते वर्षा ! ते सर्वजण पुरुषोत्तमच्या घरी येऊन राहू लागले. परंतु माणसे वाढल्याने जागा कमी पडू लागली म्हणून तो फ्लॅट विकून दुसरा मोठा फ्लॅट घेतला. नि त्यात
सर्वजण आता राहू लागले.
दुसरा मुलगा कुंज त्याना भेटायला आला नि त्यांची माफी मागितली. सोबत कांताबाई पण आली होती तिने ही आपल्या सवतीची नि नवऱ्याची माफी मागितली. तेव्हा
कुंज दीपक ला मी तुला दादा म्हणू शकतो का ?"
" अर्थात ! तुझा तो अधिकारच आहे." असे म्हणून त्या
दोघांनी एकमेकांना आलिंगन दिले. त्यानंतर कुंज कुठं कामधंदा करत नव्हता , म्हणून कुणीही त्याला आपली मुलगी देईना , तेव्हा दीपक ने त्याला समजावले की हे बघ वडिलांच्या जीवावर किती दिवस जगणार आहेस तू ? आणि बाबांना मिळणारी पेन्शन फक्त बाबा जिवंत असेपर्यंतच मिळणार , त्यानंतरचे काय ? कसा जगणार तू ? म्हणून आतापासून काही ना काही करायला शिक. कारण आपलं पोट आपणच भरायचं असतं, दुसऱ्या वर अवलंबून कधी राहायचं नसतं. मी भाऊ म्हणून तुला मदत करीन ही परंतु किती दिवस ? कारण कोणत्याही गोष्टीला मर्यादाही असतेच ना ? तेव्हा काहीतरी काम धंदा करायला शिक ! " तेव्हा म्हणाला ," दादा तूच बघ ना माझ्यासाठी काम !"
" ठीक आहे बघतो."
मग त्याने आपल्याच कंपनीत हेल्पर ची नोकरी दिली. कुंज आता बराच सुधारला होता. त्यानंतर त्याच्यासाठी
एक स्थळ शोधण्यात आले नि लवकरच मोठ्या थाटामाटात लग्न करण्यात आले. कुंजची पत्नी बनून आलेली मुलगी अर्थात वृंदा स्वभावाणे खूप चांगली आणि प्रेमळ होती. त्यामुळे घरात कधी वाद झाला नाही. लवकरच तिला दिवस गेले नि नऊ महिने पूर्ण होताच तिने एका कन्येला जन्म दिला. त्याने आपल्या कन्येचे नाव आपल्या नावा वरूनच कांचन असे ठेवले. कांचन घरात सर्वांची लाडकी होती. तेव्हा त्याची
आई म्हणाली ," तुला ही मुलगी तुझ्या मोठ्या भावाला पण
मुलगीच मग आपली वंचवेल पुढे वाढायची ?"
तेव्हा दीपक म्हणाला ," का ? मुलगा असला तरच वंशवेल वाढते असं थोडेच आहे, मुलगी जरी दुसऱ्या घरी
गेली तरी ती कुणाची मुलगी म्हणून कुणाचे नाव सांगणार
आपलंच सांगणार टाटा सारखा मोठा उद्योजक मुलगी झाली
म्हणून त्याने दत्तक मुलगा घेतला नाही. आज त्याच्या त्या
मुलींचाच वंशज सुरू आहे ना ? लोक काय म्हणतात टाटाची
कंपनीच ना ? तेव्हा मुलगी अथवा मुलगा असा भेद न करता
दोघांनाही समान दृष्टीने पाहत चला. तेव्हाच आपली प्रगती
होईल.
समाप्त
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा