महाकाल ९
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
महाकाल ९ |
राधाबाई इतक्या घाबरल्या होत्या की त्यांची हिंम्मत
झाली नाही. आपल्या मुलाच्या बेडरूम मधून रडण्याचा
आवाज कोणाचा येत आहे, परंतु तिची पूर्ण खात्री होती की तो आवाज सूनबाईचाच असावा. म्हणजे आपण
स्वप्नात जे पाहिले ते खरे झाले की काय ? झाले तर बरेच
आहे म्हणा. आपल्या मुलाची सुटका तरी होईल. असा
विचार करून त्या झोपण्याचा प्रयत्न करत होत्या. शेवटी
एकदाची झोप लागली. त्यामुळे सकाळी फार उशिरा उठले. तेव्हा त्यांनी घडाळ्यात पाहिले तर सकाळ चे आठ वाजले तरी सर्व शांत कसं ? इतक्यात सूनबाईंनी रडून सारे घर डोक्यावर घ्यायला हवे होते. परंतु असं काही घडल्याचे
दिसत नाहीये काय कारण असावे ? सुनबाई ते भयानक
दृश्य बेशुद्ध तर झाली नसेल ना ? पण छे बेशुध्द व्हायची
असती तर रात्रीच झाली नसती का बेशुध्द ? असा विचार
करून त्या किचनमध्ये जाऊन पाहतात तर किचनमध्ये
सौंदर्या सकाळच्या नाश्ताची तयारी करत होती. ते पाहून
त्याना आश्चर्य वाटले नि मनातल्या मनात त्या म्हणाल्या,
" अरे ही तर सहीसलामत आहे, हिला काहीच नाही,म्हणजे आपण रात्री जे पाहिलं ते सारं खोटं होतं का ? असेल ही, स्वप्नच होतं ते, सर्व स्वप्ने खरी थोडीच
होतात, काहीपण असतं आपलं ? असं त्या स्वतःच आपल्या मनाची समजूत काढतात आणि तेथून माघारी
वळणार असतात. तेवढ्यात सौंदर्याची नजर राधाबाई वर
पडलो तसे सौंदर्या ने विचारले," काही हवंय का तुम्हाला
सासूबाई ?" तेव्हा त्या गडबडून उद्गारल्या ," अं sss काही
नको." असे म्हणून त्या माघारी वळल्या.
दिवसा मागून दिवस जात होते. सर्वकाही व्यवस्थित
सुरू होते. विवेक नित्यनेमाने ऑफिसमध्ये जात होता. पण तरी देखील राधाबाई बेचैन होत्या. त्याना कळत नव्हतं की असं कसं होऊ शकतं ? नाही म्हणजे समंधाने जर आपल्या मुलाला झपाटले आहे तर तो तिच्या बाळाला जिता का सोडेल बरं ? बरं सोडलं तर सोडलं ते जन्माला
येणार बाळ कसं असेल ? म्हणजे नॉर्मल माणसाच्या
मुलासारखे असेल का भुता सारखे भयानक चेहऱ्याचे असेल ? बापरे नुसत्या विचाराने आपली ही अवस्था तर प्रत्यक्ष पाहिल्यावर काय अवस्था होईल आपली. छे छे छे ! असं होता कामा नये ? काहीतरी उपाय करायला हवा.
पण कोणता उपाय करावा ते कळत नाही. विचार करून
करून शेवटी निर्णय झाला की गुहेतील तांत्रिका कडे
जायला हवं. त्याने मागच्या वेळी जे सांगितले ते खरं ठरलं. कदाचित तोच यातून काहीतरी मार्ग काढेल. असा विचार करून त्या तांत्रिक कडे गेल्या. तेव्हा तो तांत्रिक त्याना पाहून हसला. त्या मागचे कारण..... शेवटी आलातच ना माझ्या कडे, हे असावे.
" या राधाबाई ! काय म्हणणं आहे आपलं."
" महाराज आपल्याकडे काम होतं."
" ते माहितेय मला कामाशिवाय कुणी येत नाही माझ्याकडे.......बोला काय होतं माझ्याकडे ?"
" महाराज माझी सुनबाई पोटीशी आहे."
" ते मला माहित आहे, पुढे बोला."
" तिच्या पोटात असणारे बाळ कोणाचे आहे ?"
" कोणाचे म्हणजे ? तिच्या पोटात असणारे बाळ तिचेच
असणार ना ?"
" तसं नव्हतं म्हणायचं मला."
" मग ?"
" त्या मुलाचा बाप कोण असेल ?"
" कोण म्हणजे ? तिचा नवरा."
" म्हणजे माझा पोरगा ना ?"
" नाही."
" मग ?"
" तिचा प्रेमी महाकाल."
" काय ? महाकाल चं पोर आहे तिच्या पोटात ?"
" बाप रे, म्हणजे भूत होणार तर !"
" असं का वाटतं तुम्हांला ?"
" महाकाल भूत आहे, तर त्याचं होणारं मूल भूतच असणार ना ?"
" नाही. मनुष्या सारखेच असणार ते."
" पण ते दुसऱ्याचं ना, मला नातू माझ्या मुलापासून
झालेला हवाय."
" ते कदापि शक्य आहे, तुमचा मुलगा फक्त नावापुरता
नवरा आहे तिचा. पण खरा नवरा तो महाकाल आहे."
" मग यातून काही उपाय नाही का ? "
" आहे ना उपाय."
" कोणता उपाय ?"
" तुमच्या मुलाने तिला सरळ घटस्फोट देऊन टाकावा.नि
दुसऱ्या एकाद्या चांगल्या मुलीशी लग्न करावे."
" जर माझ्या मुलाने तिला घटस्फोट दिला तर महाकाल
नंतर त्याला काही त्रास देणार नाही ना ?"
" मग का देईल तो तुमच्या मुलाला त्रास ! त्याचा संबंध
तुमच्या मुलाशी नाहीये. त्याला फक्त तुमची सुनबाई पाहिजे."
" मग हा एवढा चांगला उपाय तुम्ही अगोदर का नाही सांगितला ? उगाचच आम्ही एवढा त्रास भोगला."
" तुम्ही विचारालातच कुठं ? आणि तुमच्या मुलाचं
त्या मुलीवर प्रेम होतं. मग दोघांच्या मधला खलनायक मी
का बनू ? म्हणून नाही सांगितले."
" महाराज माझा मुलगा माझं सांगणं ऐकेल असं काहीतरी करा."
" बरं." असे म्हणून त्याने एका कागदात थोडासा भस्म
घेऊन मनातल्या मनात काहीतरी मंत्र पुटपुटला नि विभूति
त्यांच्या हातात देत तांत्रिक म्हणाला," ही घ्या विभूति सकाळ संध्याकाळ चिमूटभर पाण्यात भस्म टाकून ते पाणी त्याला प्यायला द्या." राधाबाईंनी ती विभूति घेतली
नि तिकडून निघाली. घरी आल्यानंतर त्यांनी आपल्या
मुलीला आपल्या जवळ बोलवून घेतले नि त्याला विभूति
टाकलेले पाणी प्यायला दिले. तेव्हा विवेक ने विचारले,
" मम्मी हे कसले पाणी आहे ?"
" अरे तुझ्या सुरक्षेसाठी ही विभूति तांत्रिक महाराजांनी
दिली आहे ती तू रोज पाण्यातून घेत जा." विवेक ने न समजून विचारले," अगं मम्मी पण कशासाठी ?" त्यावर राधाबाई म्हणाल्या," हे बघ आज मी तांत्रिक महाजांकडे गेले होते ?"
" कोण तांत्रिक महाराज ?"
" गुहेतील ते तांत्रिक बाबा आहेत ना त्यांच्याकडे गेले
होते."
" कशाला ?"
" तुझ्या बायकोच्या पोटात जे बाळ आहे ना, ते तुझं नाही त्या महाकाल चं आहे."
" काहीतरीच काय सांगतेस मम्मी ? भुतांना कुठं मुलं
होतात का ?"
" होय होतात. आपल्या शेजारच्या सखुबाई आहेत ना ?"
" त्यांचं काय झालं आता ?"
" तिची भावजय गावातून आली आहे, ती सांगत होती."
" काय सांगत होती."
" हेच की त्यांच्या गावात एका बाईला समंधाने
पछाडले होते."
" बरं मग ?"
" मग काय त्या समंधा पासून तिला लेकरू व्हायचं पण तीन महिने झाले की तो समंध यायचा नि पोटातील लेकराला खाऊन टाकायचा. असा तो दर तीन महिन्यांनी करायचा. आणि एके दिवशी तर त्या समंधाने त्या बाईच्या नवऱ्याचाच ठार मारून टाकले.आणि अखेर त्या बाईला सुद्धा त्याने ठार मारून टाकले."
" काय सांगतेस काय मम्मी ? भीतीने तर माझ्या
अंगावर काटा उभा राहिला.
" खरं तेच सांगतेय. समंध नावाचे भूत फार भयंकर असते बाबा !"
" मग आता काय करायचं ?"
" सरळ घटस्फोट देऊन टाक तिला."
" अगं त्यात तिचा काय दोष ?"
" सारा दोष तिच्या रूपाचा आहे बघ."
" ती दिसायला फार सुंदर आहे, म्हणून ती त्या भुताला
आवडली."
" भुताला नाही ग त्या महाकाल ला आवडली होती."
" तेच ते समंध काय आणि महाकाल काय दोन्ही एकच
की !"
" ते कसं ?"
" ज्या माणसाची जिवंत पणी इच्छा अपुरी राहते ना, तोच मेल्यावर समंध बनतो."
" हे कोणी सांगितले तुला ?"
" त्या बायाच म्हणत होत्या."
" म्हणजे तो समंध मला पण ठार मारणार की काय ?"
" म्हणूनच तर सांगतेय तू तुझ्या बायकोला घटस्फोट दे."
" त्याने काय होईल."
" मग तुला तो त्रास देणार नाही."
" म्हणजे तो मला नंतर मारणार नाही."
" नाही मारणार."
" मग ठीक मी देऊन टाकतो तिला घटस्फोट."
" माझं गुणांचं बाळ ते." असे म्हणून त्या त्याच्या
कानाजवळ आपली बोटे दाबून मोडली. आणि मग त्या पुढे म्हणाल्या , जा आता बायकोशी गोड बोलून तिला घटस्फोट च्या कागदपत्रांवर सह्या करायला भाग पाड. "
आपल्या आई समोर तर विवेक ने होकारार्थी मान डोलावली ; परंतु सौंदर्या समोर तर त्याची बोलती बंद झाली. सौंदर्या ला विचारत होती की सासूबाई काय म्हणाल्या .पण तो काही बोलायला राजी होईना,कदाचित
त्याला वाटत असावे की , मोठी गोष्ट सौंदर्याला कशी सांगावी , म्हणजे जे काय आपल्या सोबत घडतंय त्यात
सौंदर्या तर काही दोष नाहीये. मान्य आहे तिच्या प्रेमात
तो महाकाल पडल्यामुळे आपल्याला हे सारे सोसावे
लागत आहे, आणि खरे सांगायचं तिचं सौंदर्य आज तिच्यासाठी दुःखदायक ठरले आहे. पण त्याला आपण
कारण करणार ना ? शिवाय आई जे म्हणतेय ते पण
खरंच आहे. नाही म्हणजे तिच्या पोटी जे महाकाल चीच
मुलं जन्माला येणार असतील तर तिला महाकाल ची
पत्नी बनून राहायला पाहिजे नाही का ? मग काय करू ?
सौंदर्या पासून घटस्फोट घेऊ का ? घेऊ काय म्हणून काय
विचारतोस , त्या शिवाय दुसरा पर्याय आहे काही ? असे
अनेक प्रश्न त्याच्या मनाला पडले होते. तो काहीच बोलत
नाही, हे पाहून सौंदर्या त्यांच्या खांद्याला पकडून हलवत
मोठ्या ने म्हणाली," अरे मी काय विचारते, बोलत का नाहीस तू ?" त्यावर विवेक बोलला," काय बोलावे तेच
सुचत नाहीये बघ मला."
" म्हणजे ? सासूबाई असं काय म्हणाल्या ?"
" मम्मी ने तुला घटस्फोट द्यायला सांगितला."
असे म्हणताच सौंदर्या ला वाटले गरम गरम शिसे तिच्या
कानात कोणीतरी ओतले. ती एकदम किंचाळून म्हणाली,
" काय....... सासूबाई ने मला घटस्फोट द्यायला सांगितला ? अरे पण माझा गुन्हा काय तो तर सांग ना ?"
" तुला समंधाने झपाटला हाच तुझा गुन्हा !"
" समंधा ने मला झपाटले आहे का तुला ?"
" त्याने मलाच झपाटले आहे, पण ते तुझ्यामुळे ना ?"
" माझ्यामुळे ते कसं बरं ?"
" तुझ्या सौंदर्या वर भाळला आहे तो."
" का ? साऱ्या जगात मी एकटीच सौंदर्यावान आहे का ? काही पण असतं तुझं."
" अगं पण त्याला तूच आवडलीस तर त्याला मी काय
करणार ?"
" त्याला भले मी आवडली असेन पण मी प्रेम तर
तुझ्यावर करते."
" नुसतं प्रेमाने पोट भरते का ?"
" म्हणजे तुला काय म्हणायचं आहे ?"
" मी फक्त तुझा नावाचा नवरा खरा नवरा तर तो महाकाल आहे."
" काय म्हणालास महाकाल माझा नवरा ? तुझ्यान हे
बोलवलं तरी कसं जातं ?"
" हे बघ शरीर माझं असलं तरी आत्मा त्याचा आहे.
तुला होणारं बाळ सुध्दा त्या महाकाल चं आहे."
" खबरदार , माझ्या बाळाला काही बोललास तर ! मला
बोललास ते एक वेळ मी सहन करेन पण माझ्या बाळाला
बोललेलं मी अजिबात सहन करणार नाही."
" हे बघ तुला जर माझं सांगणं खोटं वाटत असेल तर
गुहेत राहणाऱ्या तांत्रिक महाराजांना जाऊन भेट तेच तुला
खरं काय ते सांगतील."
" म्हणजे हे तुला त्या तांत्रिका ने सांगितले."
" मला नाही, आईला सांगितले. आज आई गेली त्या
तांत्रिका कडे."
" अस्सं म्हणून तू आलास होय मला सांगायला."
" त्या शिवाय दुसरा पर्याय नाहीये म्हणून आलो."
" घटस्फोट घेतल्याने सर्व प्रश्न सुटणार आहेत का ?"
" हो."
" ते कसे ?"
" आपण दोघांनी घटस्फोट घेतला ना, मग तो समंध
मला सोडेल."
" मग पुढे."
" पुढे काय ज्याच्याशी तू लग्न करशील त्याला तो पकडेल तुला. "
" अच्छा म्हणजे तुला स्वतःचा प्राण वाचवायचा असं
म्हण ना."
" हो खरंय !"
" हेच का तुझं माझ्यावरचं प्रेम !"
" नुसतं प्रेम करून पोट भरतं का ?"
" कळलं मला तुझं प्रेम.आता एक काम कर घटस्फोटाचे
कागदपत्रे तयार करून आण. मी त्यावर सह्या करून देते.
पण एक गोष्ट लक्षात ठेव. घटस्फोटा नंतर तुझा माझ्या होणाऱ्या बाळावर काहीही अधिकार राहणार नाहीये.मी एकटीच त्याचं लालन पालन करिन."
" हे बघ माझ्या विषयी गैरसमज करून घेऊ नकोस.
एकवेळ तुझ्यासाठी समंधाला पण झेलले असते पण
तुला होणारी मुलं सुध्दा त्या समंधा ची असतील तर माझा
माझा उपयोग तरी काय ?"
" मला होणारी मुलं समंधा पासून असतील असं कोणी
सांगितलं तुला ?"
" त्या तांत्रिक बाबा ने सांगितले."
" त्या तांत्रिकाचे काय ऐकतोस ? ते काय पण सांगतात."
" पण त्याने जे सांगितले ते सगळं खरं ठरलं."
" हो का ? मग आपण DNA टेस्ट रिपोर्ट करू म्हणजे
खरे काय ते कळेल."
" ठीक आहे, ते पण करून पाहू. आणि समज डीएन ए
टेस्ट रिपोर्ट मध्ये सुद्धा ते बाळ माझं नाहीये हे सिध्द झालं
तर !"
" तसं झालं तर मी स्वतःहून तुला घटस्फोट देईन.पण
मला माहित आहे,डीएन ए मध्ये हेच सिध्द होईल की ते
बाळ आपलं दोघांचेच आहे."
" असं झालं तर मी तुला घटस्फोट नाही देणार !"
" पण मग मी तुला घटस्फोट देणार."
" ते का बरं ?"
" कारण तुला आपल्या प्रेमावर विश्वास नाही म्हणून."
" प्रश्न विश्वासाचा नाही."
" मग कशाचा आहे."
" जीवनाचा. कारण जीवच जर राहिला नाही तर नुस्त्या
विश्वासाचं काय लोणचे घालायचे आहे."
" आता डीएन ए टेस्ट रिपोर्ट ची पण गरज नाहीये.
माझ्या पोटातील बाळ तुझं नाहीये असं म्हणतोस ना,
मग हरकत मीच त्याचा बाप आणि मीच त्याची आई !
तू फक्त मला लवकरात लवकर घटस्फोट दे बस्स ! आणि
उद्याच मला माझ्या आई कडे नेऊन सोड. मला आता इथं
एक क्षण ही थांबायचं नाहीये."
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा