पोस्ट्स

ऑगस्ट, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

महाकाल ९

इमेज
महाकाल ९         राधाबाई इतक्या घाबरल्या होत्या की त्यांची हिंम्मत झाली नाही. आपल्या मुलाच्या बेडरूम मधून रडण्याचा आवाज कोणाचा येत आहे, परंतु तिची पूर्ण खात्री होती की तो आवाज सूनबाईचाच असावा. म्हणजे आपण स्वप्नात जे पाहिले ते खरे झाले की काय ? झाले तर बरेच आहे म्हणा. आपल्या मुलाची सुटका तरी होईल. असा विचार करून त्या झोपण्याचा प्रयत्न करत होत्या. शेवटी एकदाची झोप लागली. त्यामुळे सकाळी फार उशिरा उठले. तेव्हा त्यांनी घडाळ्यात पाहिले तर सकाळ चे आठ वाजले तरी सर्व शांत कसं ? इतक्यात सूनबाईंनी रडून सारे घर डोक्यावर घ्यायला हवे होते. परंतु असं काही घडल्याचे दिसत नाहीये काय कारण असावे ? सुनबाई ते भयानक दृश्य बेशुद्ध तर झाली नसेल ना ? पण छे बेशुध्द व्हायची असती तर रात्रीच झाली नसती का बेशुध्द ? असा विचार करून त्या किचनमध्ये जाऊन पाहतात तर किचनमध्ये सौंदर्या सकाळच्या नाश्ताची तयारी करत होती. ते पाहून त्याना आश्चर्य वाटले नि मनातल्या मनात त्या म्हणाल्या,    " अरे ही तर सहीसलामत आहे, हिला काहीच नाही,म्हणजे आपण रात्री जे पाहिलं ते सारं खोटं होतं का ? असेल ही, स्वप्नच होतं ते, सर्व

महाकाल ८

इमेज
महाकाल ८        राधाबाईंची आता पूर्ण खात्री झाली की भुताने आपल्या सूनबाईला पछाडले नाहीये तर आपल्या मुलाला पछाडले आहे. काय करावे ? कुणाकडे जावे नि आपल्या मुलाची त्या महाकालच्या आत्म्यापासून सुटका कशी करावी हे त्याना कळत नव्हते. गोपाळरावाना तर काहीही सांगून उपयोग नव्हता. कारण त्यांचे म्हणणे असे होते की त्या आत्म्यापासून जर आपल्याला काही त्रास नाही तर त्याच्या वाटेला आपण जायचंच कशाला ? तसे पण ते विवेकला  आपला मुलगा मानत नव्हते. त्याना वाटायचं की आपल्या समोर जो उभा आहे तो आपला मुलगा नसून महाकाल चा आत्मा आहे. परंतु राधाबाई एक आई होत्या. त्याचं मन काही ते मान्य करायला तयार नव्हते. म्हणून त्या यातून काहीतरी  मार्ग मिळतो का ? याचा त्या प्रयत्न करत होत्या. त्या शिवाय त्यांच्या मनात अजून एक भीती निर्माण झाली होती की आपल्या सुनेच्या पोटी जन्माला येणार मूल कोणाचे असेल ? वगैरे....   एके दिवशी  त्या आपल्या मैत्रिणी सोबत चर्चा करत असताना एका शेजारीण बाईची गावात राहणारी भावजय त्यांच्या कडे आलेली होती. गप्पा गोष्टी करताना सहजच म्हणून भुतांचा विषय निघाला तेव्हा चर्चा करतांना त्यांनी आपल्या गा

कुरुक्षेत्र ४

इमेज
कुरुक्षेत्र ४      एक दिवस झाला. दोन दिवस झाले. असे लागोपाठ पाच दिवस झाले. आईने काही दरवाजा उघडला नाही. शेवटी नाईलाजाने दरवाजा मी तोडला. आई निर्विकार चेहऱ्याने अंथरुणावर निजलेली होती. मी तिचे चरण धरले आणि तिच्या चरणावर आपले डोके ठेऊन ढसढसा रडलो. आईने आपले डोळे किलकिले करून माझ्याकडे पाहिले आणि करुणामय स्वरात बोलले ," माझी शेवटी आज्ञा  देखील मोडली ना तू ? तू कोणत्याही परीक्षेत उत्तीर्ण झाला नाहीस."     " आई तू मला मार  माझा जीव घे. पण असा स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. प्लिज ऐक ना माझं ?" मी एकदम आर्त स्वरात बोललो. त्यावर आई म्हणाली," शौनक रडू नकोस बाळ मला जायला हवं आता."      " आई तू असं नको ना बोलुस ? मला तू हवी आहेस ."      " किती स्वार्थी आहेस रे तू  इतकी वर्षे राहिली मी तुझ्या सोबत  तरी अजुन रहा म्हणतोयस ? तुझ्या बाबांनी किती वाट पहायची रे माझी. त्यांच्याकडे आता मला जायला नको का ?"       " आई ,मी तुझ्या इच्छे प्रमाणे करतो सारे,पण हा हट्ट सोड ना गं आई कृपा कर ना माझ्यावर एवढी." पण आई काहीच बोलली नाही. एकदम स्तब्द

कुरुक्षेत्र -३

इमेज
कुरुक्षेत्र -३               महिन्याचा पगार ही ठरला आणि एक दिवस गळ्यात फुलांचे हार घालून वधू- वरा सारखे आम्ही घरात शिरलो. आम्हांला पाहून आई आश्चर्याने उद्गारली ," अरे , लग्न ही करून आलास ?" त्यावर मी म्हणालो ," हो ,आई तुझी होती ना,मी लग्न करावे म्हणून." आई नाराज होत म्हणाली ," हो ; पण असे ? वाजंत्री नाही , वरात नाही , पाहुणे मंडळी नाही , असे लग्न करायला सांगितले होते का मी तुला ? "      " माफ कर ना आता ! वेळ मारून न्यायच्या हेतूने मी म्हणालो ," झाले ना ? आता काय त्याचे ?"   "  थांब. ओवाळायला आरती आणते." असे म्हणून आई आंत जायला वळते. तेवढ्यात मी तिला  म्हणालो ," पण आम्हाला ओवाळणार कोण  ?" तसे ते आईच्या द्यानात येते तशी ओशाळून म्हणाली ," हो ; खरंच की . मी तुला ओवाळू शकणार नाही. थांब जरा मी शेजारच्या सखुबाईला बोलावते. असे म्हणून आई बाहेर गेली.तशी ती नाटक कंपनीवाली म्हणाली ," आता हे आणखीन काय ?" तेव्हा मी तिची समजूत काढत म्हणाली ," अहो , आपल्यासाठी जरी हे नाटक असले तरी तिच्यासाठी हे नाटक नाहीये ना ?

महाकाल ७

इमेज
महाकाल ७        राधाबाईना काही कळेना की कोणाचे खरे मानावे ? खरंच का माझ्या महाकाल ने झपाटले आहे का ? का ? झोपेत चालायची सवय आहे त्याला ? छे छे छे ! असं कसं होईल त्याला जर झोपेत चालायची असती तर त्यापूर्वी झोपेत चालला नसता का ? झोपेत जर चालायची सवय नसेल तर हा सासुरवाडीला कसा पोहोचला ? सुशीला बाईला त्या तांत्रिकाने सांगितले की माझ्या मुलाला महाकाल नावाच्या तांत्रिकाच्या भुताने झपाटले. असे जर असेल तर त्याने मला असं का सांगितले की तुमच्या सुनेला समंधाने झपाटले आहे. मला एक कळत नाहीये की तांत्रिक आमची दिशाभूल का करतोय ? त्या मागचा उद्देश काय असावा ? असं तर नाही ना ? त्या तांत्रिका च्या तोंडून दुसराच कोणी वदवतोय. नाहीतर आम्हां दोघींची दिशाभूल करतोय ? खरे काय आहे तेच  कळेनासे झालंय. काय केलं म्हणजे सर्वकाही ठीक होईल ? " असे म्हणून त्या किंचित विचारमग्न झाल्या. दुसऱ्या क्षणी त्यांच्या मनात एक विचार आला की आपण असं केलं तर ! म्हणजे दुसऱ्या एखाद्या तांत्रिका कडे चौकशी करू ? म्हणजे खरे काय आहे ते कळेल. असा विचार करून त्यांनी गोपाळरावांशी चर्चा  केली तेव्हा गोपाळराव म्हणाले," मला काय

महाकाल ६

इमेज
महाकाल ६         रात्रीची जेवणे झाली नि सर्वजण आपापल्या खोलीत झोपायला गेले. तशी सौंदर्या सुध्दा आपल्या खोलीत झोपायला गेली तेव्हा तिला राहून राहून एकच गोष्टीची चिंता होती की तांत्रिक महाराज जे म्हणाला ते खरंच खरं होईल का ? विवेक खरंच येईल का आपल्या घरी ? असा विचार करत सौंदर्या पलंगावर पडून विचार करत होती. विचार करता करता तिचा डोळा लागला. आणि थोड्या वेळाने खट्ट असा आवाज आला नि दरवाजा उघडला. तशी सौंदर्या ला पण जाग आली. भीतभित तिने हळूच डोळे उघडले. बेडरूम मध्ये काळोख असल्याने   एक काळी आकृती तिच्या जवळ येत असलेली तिला दिसली. त्या आकृती ला पाहून तिच्या पोटात  एक भीतीने गोळा उठला. काय करावे ते तिला सुचेना. इथून पळून जावे का इथंच थांबावे ? पण पळणार तरी कसं ? ती आकृती तिच्या अगदी जवळ आली होती. तशी तिच्या हृदयाची धडधड अधिक वाढली. तिला वाटले की आपण मोठ्या ने ओरडावे म्हणजे कोणीतरी मदतीला पळत येईल असा विचार करून  ती मोठ्या ने ओरडणार होती. पण त्या अगोदरच त्या काळ्या आकृतीने  तिच्या तोंडावर आपला एक हात ठेवला नि ती काळी आकृती उद्गारली ,    "  ओरडू नकोस मी आहे विवेक ?" आवाज ओळख

दुनिया ना माने २९

इमेज
दुनिया ना माने २९                       काहीतरी गडबड जरूर आहे, आपल्या पासून काहीतरी लपविले जात आहे ; परंतु काय ? बाबा एक सांगताहेत तर दादा दुसरंच काहीतरी सांगतोय. खरं काय आहे ,हे जर शोधवयाचे असेल तर आपल्याला कळलंय हे दाखवून न देता अजून काय काय बाबा सांगताहेत ते ऐकू नि त्यानंतर आपल्याला पडलेले प्रश्न विचारू असा मनात विचार सुरू असतानाच  बाबा पुढे म्हणाले ,"  आता तुझ्या साऱ्या शंका दूर झाल्या असतील तर मी जाऊ ?"       " अजून एका प्रश्नाचे उत्तर द्या मला."       " कोणत्या ?"       "  दादाने तुमच्या नावाच्या ऐवजी आपले नाव का लावले?"      "  त्याला पण एक कारण आहे ."      " कोणतं ?"      " कालांतराने तुझ्या वहिनीला कळलं असतं की तू तिचा बाळ नाही आहेस  तर तिच्या मनावर विपरीत परिणाम झाला असता. म्हणून जन्म दाखल्यावरचे माझे नाव त्याने बदलले . पण ते माझ्या सांगण्यावरून. अजून काही प्रश्न विचारायचं असेल तर विचार." असे सुधाकरने विचारताच त्याने नकारात्मक मान डोला वली. तसा सुधाकर पुढे म्हणाला ,     "  आता तुझ्या मनातील

दुनिया ना माने -२८

इमेज
दुनिया ना माने -२८       मग त्याने स्वतःचा जन्माचा दाखला तपासून पाहिला. त्यात जन्मतारीख आणि जन्मवेळ सारख्याच ; परंतु आई वडिलांचे नाव वेगवेगळे, शिवाय जन्मस्थ ही वेगळे , हे पाहून त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले .ते असे की हा जन्माचा दाखला कुणाचा ?  आपल्या वडिलांचा एक भाऊ होता का ? जर होता तर तो आता कुठे आहे ? शिवाय त्याची नि माझी जन्मतारीख सारखी कशी ? शिवाय दोघांचे नावं पण  एकच ! फक्त दोघांच्या आई वडिलांचे नाव वेगवेगळे. शिवाय लहानपणापासून मी  त्याला कधी पाहिले नाही. ना आजीला ना त्याला ?  बाबांना सोडून गेले का ते ? पण असं कसं होईल बरं ? आता या प्रश्नांची उत्तरे आपल्याला बाबांकडून मिळतील कदाचित. चला बाबानाच विचारू.  असा विचार करून तो सुधाकरच्या खोलीत आला नि  त्यांना स्टोअर रूममध्ये जुन्या पडलेल्या फाईल्स मध्ये सापडलेला दाखला दाखवत म्हणाला ," बाबा हा कोणाचा दाखला ?" सुधाकरने तो दाखला आपल्या हातात घेतला नि वाचला. आणि मागचा पुढचा विचार न करता पटकन बोलला ,"       "  तुझाच की रे हा दाखला."       " अच्छा हा माझा तर हा कुणाचा ? " दुसरा जन्माचा दाखला त्