वंशवेल १
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
वंशवेल १ |
वंशवेल १
( ही कथा सत्य घटनेवर आधारित आहे फक्त त्यात थोडा
बदल केला आहे, त्याना फक्त एक मुलगीच होती मुलगा नव्हता. म्हणून त्यांनी अनाथालय मधून एक दत्तक मुलगा
घेतला परंतु तो मुलगा इतका त्रासदायक ठरला की त्याना
असं वाटू लागलं की का घेतला मी दत्तक पुत्र )
पुरुषोत्तम आंबेरकर हे एका बँकेचे मॅनेजर म्हणून कार्यरत
होते. त्यांच्या पत्नीचे नाव मिराबाई होते. त्याना एक कन्या होती. मुलीचे नाव प्रतीक्षा असे होते. त्यानंतर त्याना एक
मुलगा झाला.परंतु ते गणपतीच्या सणाच्या निमित्ताने ते
आपल्या गावाला जात होते.मोटार स्वतः पुरुषोत्तम चालवत
होते. पहाटेची वेळ होती नि त्याना झोप येत होती. झोप
येऊ नये म्हणून त्यांनी आपल्या तोंडावर पाणी मारले. तेव्हा
त्यांची पत्नी म्हणाली ,की झोप येत असेल तर मोटार कुठंतरी
चांगल्या ठिकाणी उभी करा नि जरा झोप काढा." परंतु ते
म्हणाले ," तोंड धुतले ना, उडेल ती आता ! " असे म्हणून
ते मोटार पळवत होते. पुढे नदीचा पूल सुरू झाला.
नदीच्या पुलावरून मोटार जात असताना त्यांच्या डोळ्यांवर
झापड आली नि स्टेरींग वरील ताबा सुटला. आणि समोरून
भर वेगाने ट्रक येत होता. तेव्हा ट्रक ड्रायव्हरच्या ते द्यानात
आले की मोटार मधला ड्रायव्हर झोपला आहे त्याने लगेच
मोठ्या ने हॉर्न वाजविला नि करकचून ब्रेक घेतला. परुषोत्तम
ही सावध झाले नि स्टेरींग फिरविली परंतु ट्रकची धडक बसलीच. त्यावेळी दरवाजा उघडला गेला नि मुलगा गाडीतून बाहेर फेकला गेला तो थेट खोल नदीत कोसळला. पुरुषोत्तम
चे पुढे डोके आपटून ते बेशुध्द झाले. मागच्या सीटवर बसलेली त्यांची पत्नी दरवाजातून बाहेर पडली. परंतु पुलाच्या बाजूला संरक्षण भिंतीमुळे वाचली. आणि तिच्या शेजारी मोठी मुलगी सुध्दा बेशुध्द अवस्थेत पडली होती. पाठीमागून येणाऱ्या मोटार मधली माणसे खाली उतरली नि त्यांनी लगेच पोलीस स्टेशनला फोन करून घडलेल्या अपघाता विषयी माहिती दिली. थोडयाच वेळात तेथे पोलीस हजर झाले. पोलिसांनी घटना स्थळाचा पंचनामा केला नि जखमी अवस्थेत असलेल्या त्या सर्वांना इस्पितळात ऍडमिट करण्यात आले.शुध्दीवर आल्यानंतर ती आपल्या छोट्या
मुला विषयी चौकशी करू लागली. परंतु त्या मुला विषयी
कुणालाच माहीत नाही.मग कोण काय सांगणार ? पण
नंतर सर्वांनी अंदाज बांधला की अपघात झाला तेव्हा तो
छोटा मुलगा दूर फेकला गेला असेल नि नदीत पडून त्याला
जल समाधी मिळाली असेल. परंतु माणसाचे मन सहज कधी
हे मान्य करत नाही. अर्थात पुरुषोत्तम यांनी सुध्दा मुलाचा
शोघ घेण्याचा प्रयत्न केला. म्हणजे नदीच्या जवळपास च्या
गावात जाऊन चौकशी केली. परंतु कुणा कडून त्या मुला
विषयी शेवटी हताश होऊन आपल्या नशिबाला दोष देत
विसरून गेले त्याला. त्यानंतर अजून दोन तीन मुलं झालीत ; परंतु ती जगली नाहीत. मुलं का जगत नाहीत. याचे कारण मात्र त्यांना काही मिळत नव्हते. म्हणजे क्षुल्लकशा आजाराने ही त्यांची मुलं दगावली . त्यांनी एका ज्योतिषा कडे चौकशी केली. त्या ज्योतिषाने त्यांना सांगितले की , तुमच्या नशिबात जेवढी मुलं होती तेवढी झाली. या पुढे तुम्हाला मुलं होणार नाहीत. आणि झाली तरी ती जगणार नाही. शेवटी मुलांचा
नाद सोडून आपल्या नशिबाला बोल लावत एकाच मुलीच्या
संगोपन करण्याच्या दृष्टीने तिच्या कडे जास्त लक्ष देऊ लागले. परंतु वंशाला दिवा पाहिजे अशी प्रत्येक माणसांची
इच्छा असतेच. मग पुरुषोत्तम कसा मागे राहील.
त्याने विचार केला की आपण दुसरे लग्न करावे. एकीला
नाही झाले तर काय झाले दुसरीला होणार असे थोडेच आहे ?" त्यावर त्यांची पत्नी त्याना म्हणाली ," ज्योतिषी काय
म्हणाले ते विसरलात का ?" त्यावर ते म्हणाले ," अगं त्या
ज्योतिषांचे काय ऐकतेस ? त्यांनी बोलले कधी खरे होते का ? उगाच काहीपण सांगतात ते ." त्यावर त्या म्हणाल्या,
" असं कसं काहीपण सांगितले ते. आणि त्यांनी सांगितले ले खोटे ठरले का ? त्यांनी सांगितले होते की तुमच्या नशिबात दोनच मुलं आहेत. आणि मोठ्या मुलाला घोका
आहे, त्याला घेऊन प्रवास करू नका. तुम्ही ऐकलांत का
माझं ? मला नेहमी मूर्खांत काढत होता तुम्ही ! शेवटी घडले
ना तेच ! " तेव्हा पुरुषोत्तम उद्गारला ," अगं तो अपघात होता.
आणि अपघातात काहीपण घडू शकते. त्यात काय ? कावळा
फांदीवर बसायला नि फांदी मोडायला. निमित्त मात्र कावळ्याचे. तुम्हां बायांचा ना अंधश्रद्धेवर जास्त विश्वास.
त्यावर त्या म्हणाल्या ," ही अंधश्रद्धा नाहीये."
" गप्प बैस ! तुला काय कळते." असे बोलून त्यांनी
तिला गप्प केले.तिच्या विरोधाला न जुमानता त्यांनी दुसरे
लग्न केले. सुरुवातीचे नवीन नवलाईचे दिवस चांगले गेले.
परंतु त्यानंतर त्या दोघी मध्ये भांडणे होऊ लागली. म्हणजे
मोठी चा स्वभाव चांगला होता. परंतु धाकटीचा स्वभाव
चांगला नव्हता. तिला मोठी सोबत एकत्र राहायचे नव्हते.
म्हणून ती आपल्या नवऱ्याचे सारखे कान भरीत असे. आणि
त्याना ही तिचे म्हणणे खरे वाटे ,कारण मोठीचा त्यांच्या
लग्नाला विरोध असताना पण त्यांनी लग्न केले. म्हणून ती
आपल्या सवतीला त्रास देते असा त्यांचा समज झाला. म्हणून
नाईलाजाने छोटीच्या इच्छेनुसार त्यांनी तिच्या साठी नवीन
फ्लॅट घेऊन दिला. तिच्या सोबत ते राहायला गेले. आता
मोठी सोबत त्यांची मुलगी राहिली.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा