महाकाल १
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
महाकाल १ |
हे सारं तुझ्यासाठी ह्या कथेचा शेवटचं थोडेसे
जेणे करून ही कथा कोठे संपली होती हे कळण्यासाठीशीच बस्स !"
अजय ने महाकाल च्या तोंडून ऐकले की तो स्वतः सौंदर्याशी लग्न करणार आहे, तर तो स्वतःवर काबू ठेवू शकला नाही आणि महाकाल चा गळा कापून त्याने महाकाल ची हत्या केली. त्यावर इन्स्पेक्टर विजय म्हणाले ," परंतु मला एक कळत नाही की त्याला मारायचेच होते तर एवढा उशीर का लावला ? म्हणजे मला म्हणायचंय की जरा अगोदर मारले असते तर धनराज आणि त्याच्या साऱ्या मित्रांचा प्राण वाचला असता ना " त्यावर अजय म्हणाला," त्याना या साठी वाचविले नाही की त्यांनी माझ्या ह्या (सीमा) मैत्रिणीवर बलात्कार केला नि तिला जीवानिशी ठार ही मारले. ते सारे गुन्हेगार होते. त्याना जगण्याचा काही अधिकार नव्हता. म्हणून त्याना मी वाचविले नाही." पोलीस सर्वजण आंत आले नि त्या सर्व मृतदेहाचे पोलीस पंचनामे केले नि सर्वांचे मृतदेह पोष्टमार्टम साठी सिव्हिल इस्पितळात पाठविण्यात आले. सौंदर्याला आणि विवेक ला मुक्त करण्यात आले. त्यानंतर सर्वजण पोलीस स्टेशनला आले. विवेक आणि सौंदर्या ने अजयचे आभार मानले.
खरे म्हटलं तर हे सारे तुझ्यासाठीच ही कथा
संपली नव्हती. परंतु वाचक संख्या पाहून मुड ऑफ झाले
कथा इथंच संपविली. परंतु मला आता असं वाटतं की कथा जशी मला संपवायची होती तशीच संपली पाहिजे
म्हणून पुढील कथा पुन्हा लिहिण्यास घेतली. कथा आवडली तर कमेंट द्या. इथून पुढे -
महाकाल
पोलीस स्टेशन मधून दोन्हीही परिवार बाहेर पडले.
त्यांच्या मधील गैरसमज दूर झाल्याने त्यांनी एकमेकांची
माफी मागितली. आणि दोन्ही परिवार एका हॉटेलमध्ये
शिरले. सौंदर्यानी सर्वांसाठी नाश्ता मागविला.
सौंदर्याच्या आईची आता खात्री झाली की विवेक चा ह्यात काही हात नव्हता. आपण ज्याच्यावर फार विश्वास केला त्यानेच आपला विश्वासघात केला. त्यामुळेच की काय विवेकच्या आई- वडिलांची त्यांनी हात जोडून माफी मागितली. त्यावेळी विवेके ची आई त्याना म्हणाल्या," माफी कसली मागताय तुमच्या जागी मी जरी असती तरी मी देखील असाच रिअँक्ट केला असता. " तेव्हा सौंदर्याचे बाबा म्हणाले,
" आता सर्व सुरळीत झालं ना, त्यातच समाधान मानायचे."
" बरं मी काय म्हणते की आपली मुलं एकमेकांवर
प्रेम करतातच आहेत तर ह्या दोघांचे लग्न लावून दिलं तर !नाही म्हणजे आपली काही हरकत आहे नसेल तर ?" विवेक ची आई राधाबाई ने विचारले.
" अगदी माझ्या मनातले बोललात तुम्ही !" सुशीला बाई
उद्गारल्या.
" मग शुभ से शिग्रम ! चांगल्या कामाला उशीर कशाला? " मोहनराव म्हणाले. त्यानंतर त्यांच्या इकडच्या
तिकडच्या वार्ता झाल्या. लग्नाची नंतर दोन्ही परिवार
एकत्र बसून करू वगैरे ठरले नि मग घरी जाण्यास निघाले.
पोलिसांनी धनराज आणि त्याच्या मित्रांचे मृतदेह त्यांच्या
आई-वडिलांच्या स्वाधीन केले. धनराज चे आई-वडील
शोकाकुल झाले. आपल्या मुलाचा मृतदेह पाहून तर धनराज च्या आई ने हंबरडाच फोडला. रडता रडता ती
आपल्या नवऱ्याला दोष देऊ लागली की, हे सारे तुमच्यामुळे घडले. तुमच्या जास्त लाडानेच फार बिघडून गेला तो." तेव्हा विश्वासराव म्हणाले," मान्य आहे मला मी त्याला जास्त सूट दिली होती. हा त्याचाच परिणाम आहे. खरं म्हटलं तर त्याचे प्रत्येक लाड मी पुरवित गेलो.हेच
माझं चुकलं.माझ्या अति लाडाने पोरगं वाया गेलं. त्याच्या प्रत्येक अपराध मी पाठीशी घालत गेलो. त्यामुळेच तो
फार बिघडत गेला. आणि अक्षम्य अपराध करून स्वतःचा
जीव घालवून बसला. त्यावर इन्स्पेक्टर विजय म्हणाले,
" जर आपण त्याला त्याच्या पहिल्याच अपराधाची शिक्षा भोगायला लावली असती तर आज ही परिस्थिती ओढवली नसती तुमच्यावर.पण जे झालं त्याला आता
इलाज नाहीये. म्हणून स्वतःच मन घट्ट करा नि पुढच्या
तयारीला लागा."
" खरं आहे, तुमचं म्हणणं अपराध हा अपराधच असतो. मग तो छोटा असो वा मोठा त्या अपराधाची ही शिक्षा ही झालीच पाहिजे. तरच पुन्हा अपराध करण्याची हिंम्मत होणार नाही कोणाला."
" आता प्रश्चात्ताप करून त्याचा काय उपयोग आहे, जे
घडू नये ते घडून गेलं." तेथे उपस्थित असलेल्या लोकां
मधून कोणीतरी म्हणाले. कोणी सहानुभूतीचे सांत्वन देत
होते तर कोणी ओल्या जखमेवर मोठी चोळण्याचा काम
कर होते. समाजामध्ये प्रत्येक ठिकाणी अशीच माणसे
असतात. बरं का ? असो सवयी ला औषध नसते म्हणा.
त्यानंतर त्या सर्वांची प्रेतयात्रा निघाली. मोक्षधाम भूमीवर
येताच त्या सर्वांवर विधिपूर्वक अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी कॉलेज ची काही मुलं देखील आली होती.
दुसऱ्या दिवशी सौंदर्या आणि विवेक कॉलेज मध्ये
गेल्यावर त्या दोघांच्या सभोवती मित्र- मैत्रिणी गोळा झाले
होते. सर्वांच्या मनात एकच उत्सुकता होती की ,धनराज
आणखीन त्याच्या मित्रा सोबत काय घडले ? हे जाणून
घेण्याची ! अर्थात त्या संपूर्ण घटनांचे साथीदार सौंदर्या नि
विवेक होते. म्हणून त्या दोघांच्या सभोवती गोळा झाले
होते सर्वजण. तेव्हा विवेक ने धनराज आणि त्याच्या
त्या मित्रांचा बळी महाकाल ने कश्या पद्दतीत दिला त्या
विषयी संपूर्ण माहिती दिली. ते ऐकून अक्षरशः सर्वांची
बोबडीच वळली. परंतु त्याच बरोबर वाईट काम करणाऱ्या ना चांगलाच धडा मिळाला. असे काही स्टुडंट चे म्हणणे
होते. तर काहीजणांना वाटत होते की असं नको घडायला
पाहिजे होतं. तर काहीजण म्हणत होते की, बरे झाले त्यांच्या सोबत असे घडले ते. अश्या हरामखोर लोकांना अशीच अद्दल घडायला पाहीजे." तेव्हा त्यातील एकजण बोलला खरी कमाल तर त्या अजय ची आहे. नाही का ? त्याच्या मुळेच तर हे दोघेजण वाचले. पण त्या बिच्चाराला
काय मिळालं. साधी शाबासकी नाही.अररेरे बिच्चारा! "
" हो, खरंय.अजय च्या चलाखी मुळेच आम्ही वाचलो." विवेक उद्गारला.
" एकंदरीत काय सौंदर्याच्या आसिक नेच ह्या दोघांचे प्राण वाचविले असे म्हणा की !" डिंपल उद्गारली.
" बिच्चारा अजय बालपणापासून प्रेम करतोय हिच्यावर. असा आसिक यार आम्हाला भेटायला पाहिजे
होता. नाही का गं ?" जया आपल्या मैत्रिणीला हळूच म्हणाली.
" हा ना, सर्वजण तिच्यावरच मरतात. असे काय तिच्यामध्ये आहे जे आमच्यात नाहीये." मीना म्हणाली. दोघीपण जलीस झाल्या होत्या.
लग्नाचा मुहूर्त निघाला तारीख ठरली. त्यामुळे दोन्ही
परिवा मध्ये लग्नाची तयारी फार जोरात सुरू होत्या.
लग्नासाठी लागणारे कपडे काढण्याचा दिवस ठरला.
वधू कडील मंडळी आणि वर कडील मंडळी कपडे
काढायला एका नामांकित शोरूम मध्ये गेले. सौंदर्या आपल्या पसंतीच्या साड्या काढत असतांना का कोण
जाणे तिला असे का जाणवत होते की तिच्या पाठीमागे कोणीतरी उभा आहे. म्हणजे तिच्या मानेला गरम गरम श्वासाचा स्पर्श होत होता , म्हणून तिने मागे वळून पाहिले.
परंतु तिला कोणीच दिसले नाही. म्हणून तिच्या मनाला
प्रश्न पडला की आपल्याला असे का जाणवते आहे की
आपल्या पाठीमागे कोणीतरी उभा आहे म्हणून. ह्याला
काय म्हणावं बरं आभास का ? खरोखरच त्याचं इथं
अस्तित्व आहे. त्याचं म्हणजे कुणाचं ? हा देखील प्रश्न
उदभवतोच की ! एकदा दोनदा तीनदा तिने मागे वळून पाहीले म्हणून तिच्या आईने तिला विचारले देखील की , सौंदर्या तू सारखी मागे का पाहत आहेस ? " त्यावर ती म्हणाली," नाही गं आई ! मला ना सारखं असं जाणवते की माझ्या पाठीमागे कोणीतरी उभा आहे म्हणून पाहते मी " त्यावर तिची आई हसून म्हणाली," अगं भास होत असेल तो तुला ? इतकी वर्षे तू घाबरून काढलीस ना , समंध च्या भीतीने. म्हणून तुला तो भास होतोय. तू माझ्या पुढे येऊन
उभी रहा बरं !" तशी सौंदर्या आपल्या आईच्या पुढे येऊन उभी राहिली. तरी ही तिला तो स्पर्श जाणवत होता. परंतु तिला आता वाटलं की आई सांगते तेच असावे. अर्थात तो भासच होता. नाहीतर आई असताना कोण कसे माझ्या मागे येऊन उभे राहू शकते. ? उगाच काहीतरी विचार करत असते मी !" असे म्हणून स्वतःची समजूत काढते.
खरेदी झाल्यावर ते सर्वजण घरी जाण्यासाठी भाड्याने
कैफ केली.कैफ मध्ये बसल्यानंतर मला असे जाणवू
लागले की माझ्या बाजूला कोणीतरी बसले आहे नि त्याचा त्याचा हात माझ्या मांडीवर आहे, असे मला जाणवले. म्हणून मी आपली मांडी निरखून पाहिले, परंतु मांडी तर रिकामी आहे, हे पाहताच मी मनातून फार घाबरली. नक्कीच कोणीतरी आहे नि तो आपला पाठलाग
करतोय कोण असेल बरं हा ? समंध तर नव्हे ? छे छे छे !
महाकाल तर मरण्यापूर्वी म्हणाला होता की समंध वगैरे
कोणी नव्हता म्हणून. समंध नाही मग दुसरा कोण ? मी
खूप विचार केला पण उत्तर काही सापडले नाही. शेवटी
घर आले तशी मी मोटारीतून खाली उतरली नि घरच्या
दिशेने चालू लागली तसे मला जाणवले की माझ्या बरोबरीने कोणीतरी चालतंय.पण कोण ते काळी कळेना,
म्हणून माझे अंग भीतीने सारे अंग थरथर कापू लागले. तसे तिच्या आई ने विचारले,
" काय झालं ग तुला ? अशी काय घाबरल्यावणी
करते आहेस ?"
" आई, हा बघ माझ्या सोबत चालतोय."
" अगं काय वेड्या सारखं बरळतेस कुणी नाहीये तुझ्या
सोबत."
" नाही गं आई , खरंच कोणीतरी आहे."
" कप्पाळ तुझं ! ये इकडे मी तुझ्या हाताला पकडते." असे म्हणून त्या थांबल्या. माझा हात त्यांनी पकडला नि
मला विचारले ," आता कसं वाटतंय ?"
" एकदम छान !" मी म्हटलं
" हो ना, मग आता नीट चल. उगाच तमाशा नको करुस."
" आई , तुला काय वाटतंय मी मुद्दाम करतेय."
" मुद्दाम नाही गं पण तू अशी जर झपाटल्यांनी
करायला लागलीस तर उद्या लोक काय म्हणतील की
नवरी वेडसर आहे, काही पण बरळत असते. "
" मग मी काय करू ते तूच सांग बरं."
" तू काही ही करू नकोस, मुकाट्याने चल घरी !"
आणि कपड्याच्या थैल्या घेऊन सर्वजण घरात शिरले. हातातील थैल्या एकत्र ठेवून सर्वजणी सोफ्यावर
बसल्या. त्यातील एकजण म्हणाली," खूप थकायला
झालं , थोडासा चहा मिळाला असता तर बरं झालं असतं.
तश्या सुशीला बाई सौंदर्याला म्हणाल्या," सौदर्या सर्वांसाठी
जरा चहा करायला टाक बरं !" सौदर्या ने आपली मान
डोलावली नि किचन मध्ये गेली. तिने लाईटर ने गॅस पेटविला नि गॅस वर चहाचे आधण ठेविले मात्र तिच्या पाठीमागे कोणीतरी उभा आहे, असे तिला पुन्हा जाणवले आणि तिच्या मानेवर गरम गरम श्वासांचा स्पर्श ही जाणवू लागला. तिच्या पोटात भीतीने गोळा उठला. तिने चहा पत्ती चा डबा तिथंच फेकला नि पळतच ओरडत बाहेर आली. आई आई किचनमध्ये कोणीतरी आहे." सुशीला बाई समजल्या की हिला पुन्हा भास होऊ लागला आहे. त्या म्हणाल्या, " कोण आहे दाखव चल मला." असे म्हणून तिचा हात पकडला नि तिला आपल्या सोबत किचनमध्ये आणले नि विचारले ," कोठे आहे तो दाखव मला."
" आई मी खरंच सांगते माझ्या पाठीमागे कोणीतरी
उभा होता."
" असं काय वेड्या सारखं करतेस , तुझं आता लग्न
ठरलंय कळतंय का तुला ? आणि बाहेर माणसं बसली
आहेत, त्यांना जर कळलं की तू वेड्या सारखं काहीतरी
बरळत असतेस, तर ठरलेलं लग्न मोडेल. तेव्हा जरा शांत
रहा." असे म्हणून त्यांनी स्वतःचहा केला नि त्या स्वतःच
बाहेर घेऊन गेल्या. त्यांनी सर्वांना चहा दिला. आणि एक
स्वत:साठी घेतला नि त्या ही बसल्या सोफ्यावर. बाकीच्या
चुपचाप चहा पीत होत्या. परंतु त्यातील एकीने विचारले,
" काय हो, तुमची लेक कुठं झपाटली आहे का ?"
" नाही हो ; पण तुम्ही असं का विचारता ?"
" नाही म्हणजे मघापासून पाहतेय मी तिला ....ती थोडीसी बावरल्या सारखी करत नाहीये का ?"
" झपाटली वगैरे नाही तिचं काय झालं ? " असे म्हणून
तिच्या कॉलेज मधल्या मुला सोबत घटलेली घटना थोडक्यात सांगितली. आणि शेवटी त्या म्हणाल्या," महाकाल ने त्या मुलांच्या माना कापलेल्या पाहिल्या पासून
ती फार घाबरली आहे. ती जिथं जिथं जात होती तिथं तिथं तोच प्रसंग डोळ्यासमोर दिसत होतं
" मग तुम्ही कुण्या तांत्रिका कडे का घेऊन जात नाही."
" नको गं बाई ! एकदा एका तांत्रिका कडे नेलं तेवढं
पुरे आहे, मेल्या त्या तांत्रिकांची नजर पण चांगली नसते.
म्हाताऱ्याना जवान बायको हवी असते. हलकट मेले !"
" अहो, एक वाईट निघाला म्हणून सर्वच काही वाईट
नसतात हो !"
" नको मुळीच नको तांत्रिकांच्या नादाला लागायला."
" बघा बाई तुम्हाला जायचं असेल तर जा, माझी
काही जबरदस्ती नही तुमच्यावर. विचारालात म्हणून सांगितले." थोड्या वेळानंतर त्या बाया निघून गेल्या. सुशीला बाई मोठ्या चिंतेत पडल्या. आता काय करावयाचे ? कुठं घेऊन जाऊ हिला मी ? म्हणजे कोणत्या तांत्रिकाकडे ? तो तरी चांगला असेल कशावरून ? बरं
करू काहीतरी !" असं म्हणून त्या किचनमध्ये गेल्या.
रात्रीची जेवणं उरकली नि सर्वजण झोपायला गेले.
परंतु सौंदर्या झोपायला आपल्या खोलीत जायला तयार
नव्हती. ती आपल्या आईला म्हणाली ," मम्मी नि आज
तुझ्याच खोलीत झोपते."
" का गं ?"
" मला फार भीती वाटते आपल्या खोलीत एकटीला
झोपायला."
" आतापर्यंत तर एकटीच झोपत होतीस ना, मग आज
काय झालं ?"
" मला ना, सारखा त्याचा भास होतोय ?"
" त्याचा कुणाचा ?"
" माहीत नाही."
" अगं तसं काय नसतं तुझ्या मनात भीती निर्माण झाली
आहे, म्हणून तुला तसं वाटतं,एकदा झोपलीस की तुला
काही आठवणार नाही ते."
" मग मला झोप येइपर्यंत तरी माझ्या बाजूला बैस !"
" ठीक आहे, चल." असे म्हणून सुशीला बाई तिच्या
सोबत तिच्या खोलीत गेल्या. आणि तिच्या उशी जवळ
बसल्या नि तिच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवत होत्या. आईच्या वात्सल्य स्पर्शाने तिला चटकन झोप लागली. सौंदर्या झोपली हे सुशीला बाईंना जाणवताच त्या उठल्या. तिच्या अंगावर पांघरून घातल नि कपाळावर किस केले नि त्या तिच्या खोलीतून बाहेर पडल्या आणि आपल्या बेडरूम मध्ये गेल्या. त्या येइपर्यंत मोहनराव गाढ झोपी गेले होते. सुशीला बाई आपल्या पावलांचा आवाज न करता त्यांच्या शेजारी झोपल्या.
मध्यान्ह रात्रीचा सुमार असावा. सौंदर्याला अचानक जाग आली. इतक्यात तिच्या पायांना कुणाच्या तरी
हाताचा स्पर्श होताना जाणवला. हळूहळू तो स्पर्श वर वर सरकू लागला. पायावरून नितंबावर आणि नितंबावरून वर सरकत पोटावर आला आणि पोटावरून वर सरकत तो स्पर्श तिच्या उरोज पर्यंत येऊन थांबला. तशी ती दचकून उठून बसली. तिने आपल्या आजूबाजूला वळून पाहिले कोणी आहे का ? पण कोणीच नव्हतं. तिला
वाटले नेहमी प्रमाणे भास असावा तो. इतक्यात तिची
नजर समोर गेली तेव्हा समोर एक काळी आकृती उभी
असलेली तिला दिसली. ती ओरडू इच्छित होती.पण
तोंडातून आवाजच फुटत नव्हता. ती त्या काळी आकृती ला पाहून फारच घाबरली. भितिने तिचे सर्वांग कापू लागले. इतक्यात तिच्या कानी आवाज पडला की ,
" डरो मत मेरी रानी मैं तुम्हारा आशिक हूँ ।"
तेव्हा तिने भीत भीतच विचारले, " कौन आशिक ?"
" भूल गई, हम पहली बार कहाँ मिले थे ?.याद करो .....नहीं याद आ रहा हैं, ग्यारा साल पहले हम गांव
में मिले थे , कुछ याद आया ?" तिने आठवण्याचा प्रयत्न
केला. पण तिला काही आठवत नव्हतं. तसा तो म्हणाला,
" नहीं याद आ रहा है ? तो कोई बात नहीं, हम तुम्हें सबकुछ याद दिलायेगे ,लेकिन उसके पहले तुम्हें एक वादा करना होगा ।"
" कैसा वादा ?"
" यही की तुम किसीं भी सुरत में विवेक से शादी नहीं करोगी ।"
" क्यों नहीं करूंगी ? जरूर करूँगी ।"
" तो फिर उसे भी औऱों के बाती मरना पड़ेगा ।"
" पण तू आहेस कोण ?"
" मी कोण ? मला अजून ओळखले नाहीस तू ? मी आहे
समंध तुझा प्रेमी ! अकरा वर्षांपूर्वी गावच्या वेशीवर आपली भेट झाली होती. पण त्यानंतर त्या हरामखोर
महाकाल ने मला बंदीस्त करून ठेवले होते. परंतु आता
महाकाल मेला नि माझी सुटका झाली त्याच्या कैदेतून.
म्हणून इतक्या दुरून मी आलोय फक्त तुला भेटण्यासाठीच ! म्हणून माझ्या मिठीत ये राणी ! खूप
दिवस वाट पाहिली मी तुझी ! पण तू आली नाहीस मला
भेटायला म्हणून मी आलो तुला भेटायला.चल आपण
दोघे प्रेमाचे गीत गाऊ ! ये राणी ये लवकरी माझ्या मिठीत
गं नको तडवू मला. " असे म्हणून ती आकृती पुढे सरकू लागली. तशी भीतीने तिने दरवाजा दिशेने पाहिले नि दरवाजा दिशेने धाव घेतली मात्र लक्ष तिचे त्या काळ्या आकृती कडे असल्याने दरवाजावर जाऊन आदळली. दरवाजा वर डोके आपटले त्यामुळे कळा एकदम मस्तकात गेल्या. परंतु डोक्याला लागल्याची पर्वा न करता कशीतरी दरवाजाची आतून लावलेली कडी काढुन तिने बाहेर धूम ठोकली. सुशीला बाई ज्या खोलीत झोपल्या होत्या त्या खोलीचा दरवाजा मोठ्या ने ठोठावला नि मोठ्या ने मम्मी दरवाजा उघड. थोड्या वेळाने दरवाजा उघडला गेला. तशी ती आपल्या आईला बिलगली नि म्हणाली," मम्मी मला वाचव तो बघ आला." तेव्हा तिच्या आईने न समजून विचारले, " कोण आला ?"
" समंध ssss असे म्हणून ती बेशुध्द झाली. सुशीला बाईंनी तिला सावरले. म्हणून बरे झाले नाहीतर खाली
कोसळली असती.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा