कुलांगार - ४
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
कुलांगार - ४ |
रोहनच्या आजी ने अर्थात सखुबाई ने रोहनला घेऊन आपल्या माहेरी घेऊन आली. आणि भावाच्या घरी राहू लागली. सखाराम मेहुण्याच्या शेतात मजुरांचे काम करू लागले. त्यामुळे त्याना दोन वेळचे जेवण मिळू लागले. सखुबाई च्या भावजय ला मात्र आपली नणंद आपल्या घरी राहायला आली हे अजिबात आवडलेले नाही. परंतु कायदेशीर त्या त्या दोघांना घरातून हाकलून देऊ शकत नव्हती. कारण सखुबाई ह्या घरची मुलगी होती. अर्थात ह्या घरावर तिचा सुध्दा तेवढाच अधिकार होता. म्हणून गप्प बसण्याव्यतिरिक्त ती काहीच करू शकत नव्हती. मात्र ती आपल्या नणंदवर तोंड सुख घ्यायची. म्हणायची ," सुनेला भिऊन कुणी आपले घर सोडतं का ? वन्स तुम्हाला आपल्या असं पळून यायला नको होतं."
" वहिनी , ती हडळ पासून माझ्या नातवाला दूर ठेवायचे होते. ती सारखी त्याला भेटायला यायची."
" आई आहे ती त्याची ! येणार नाही का ती आपल्या मुलाला भेटायला ?"
" म्हणूनच मला तिच्या पासून दूर काययचं होतं.'
" अशी आई-मुलाची ताटातूट करू नये माणसाने ताई !"
" आणि तिने माझी नि माझ्या मुलाची ताटातूट केली त्याचं काहीच नाही का ? "
" जीवन मरण कुणाच्या हातात आहे का ?"
" नसेल म्हणून काय झालं ? तिला पण तर कळायला
हवं . आई- मुलाची ताटातूट केल्यानंतर कसं वाटतं ते."
" मग इथं किती दिवस राहण्याचा विचार आहे तुमचा ?"
" किती दिवस म्हणजे ? हे माझ्या बापाचे घर आहे, मला
कुणीही इथून जा म्हणू शकत नाही."
" तुम्हांला जितक्या दिवस राहायच्या तेवढे दिवस रहा
इथं. माझं काहीच म्हणणं नाही. परंतु इथं बसून खायला
भेटणार नाहीये. घरची कामे पण करायला लागणार आहेत."
" ती करू आम्ही ! आम्ही काय फुकट बसून खायला आलो नाही."
" मग ठीक आहे, आजपासून घरातील सर्व कामे तुम्ही
करायची. नि भाऊजीनी ह्यांच्या सोबत शेतात जाऊन राबायचं. काय म्हणते मी."
" हो . चालेल आम्हाला. तसं पण आता आम्हाला आसराच राहायलाय कुणाचा ? एक मुलगा होता त्याला
त्या हडलीने खाल्ले. "
" बरं बरं , कामाला सुरुवात करा. आतापासूनच. मोरीत
करकटी भांडी पडली आहेत ती तेवढी घासून द्या पटकन."
सखुबाई निमूटपणे उठल्या नि किचनमध्ये गेल्या.
भांडी घासून पुसून दिली. त्या दिवसा पासून घरातील
सर्व कामे त्या करू लागल्या. आणि भावाची बायको
कोचावर बसून फक्त आदेश देण्याचे काम करू लागल्या.
सखुबाई रोहन कडे पाहून निमूटपणे सर्व कामे करत होती. मात्र रोहनला फार जपत असे ती. अति लाड केल्यामुळे रोहन हट्टी बनला होता. आणि बिघडत ही चालला
होता. त्याला वाईट मुलांची संगत पण लागली होती.
*****
रोहनला पळवून नेल्यामुळे कांचन फार दुःखी कष्टी झाली
होती. पण इलाज नव्हता. रोहन चा काहीच पत्ता लागत नव्हता. त्यामुळे तिला दुसऱ्या मुलाची आस लागली. म्हणून
शेवटी तिने दयानंद ला पती म्हणून स्वीकार केला. झाले असे
की तिचे सांत्वन करण्या हेतू दयानंद तिच्या खोलीत गेला.
त्याला पाहताच ती पलंगावरून खाली उतरली नि त्याला
बिलगली. दयानंद ला एकदम आश्चर्य वाटले. प्रथम तो
निमूटपणे उभा राहिला. तशी ती मुसमुसत बोलली ," मला
माफ करा. मी तुमच्याशी वाईट वागले. राहुल ला दिलेले वचन मी पाळले नाही. म्हणूनच की काय देवाने मला ही
शिक्षा केली. " त्यावर दयानंद म्हणाले," चिंता करू नकोस.
रोहन चा लवकरच तपास लागेल."
" खरं सांगता?"
" अगदी खरं !"
" त्याला तुम्ही तुमच्या प्रॉपर्टी मधील हिस्सा द्याल ?
" अर्थात. मी त्याला माझा मुलगाच समजतो."
असे म्हणताच ती त्याला अधिकच बिलगली. तसा त्याच्या
हाताचाही विळखा तिच्या कमरे भोवती पडला. नि सगळा
विरोध मावळला. आणि खऱ्या अर्थाने ते आज एकरूप
झाले. आणि लवकरच गोड बातमी समजली. तिला दिवस
गेले होते. घरातील सर्वांनी तिची नीट काळजी घेतली.
तिला सुध्दा पुत्र रत्न झाले. मुलाचे नाव राहुल ठेवण्यात आले. राहुल सर्वात धाकटा असल्याने त्याचे सर्वच लाड करत होते. सर्व भावंडा मध्ये तो सर्वात लाडका झाला होता.
बाकीचे भाऊ शाळेत जायला लागले होते. जेव्हा राहुल पाच
वर्षाचा झाला तेव्हा तो मोठ्या भावंडांच्या मागे लागू लागला. आपल्या मुलीने शेवटी आपल्या जावई बापूंचा
स्वीकार केला म्हणून त्यांचे आई-वडील ही खुश होते. फक्त
खंत एकाच गोष्टीची होती. ती गोष्ट म्हणजे रोहन चा अजून
काहीच सुगाव लागला नव्हता.
रोहन ला घरातून जाऊन पाच वर्षे झाली होती. अर्थात
रोहन आता दहा वर्षांचा झाला असावा.
******
रोहन आजीच्या अतिलाडामुळे फार बिघडला होता.
शाळेत जातो म्हणून सांगून उनाड मुला सोबत कुठंतरी रस्त्यावर किंवा गल्ली मध्ये गोट्या खेळत बसे. महिन्या नंतर
शाळेतून मुख्यधापकांचे घरी पत्र आले , ते कुठं आजीला कळले की आपला नातू शाळेत जात नाही. तर उनाडक्या मुला सोबत भटकत असतो. वगैरे - वगैरे
सखुबाई ने आपल्या नातवाला खूप समजविण्याचा प्रयत्न
केला परंतु रोहन आता समजविण्याच्याही पलीकडे गेला होता. जस जसा तो मोठा होत गेला तश्या त्याच्या तक्रारी सुध्दा वाढत गेल्या. आता तर त्याची मजल इथंपर्यंत गेली
होती की शाळेतील मुलींची छेड काढण्यापर्यंत गेली होती.
गैरवर्तणुक म्हणून शाळेतून त्याला रस्टिकेट केले गेले होते.
रोहन आता अठरा वर्षाचा झाला होता.
शेवटी सखुबाईना तिच्या भावजय ने सांगितले की तुम्ही
तुमच्या नातवाला घेऊन आपल्या गावाला निघून जा. तेथे जाऊनच तो आता सुधारला तर ! सखुबाई ने सुध्दा विचार
केला की आता आपण आपल्या गावाला गेलो तर ! काही
बिघडणार नाही. एक तर रोहन आपल्या आईला विसरला.
शिवाय आपण त्याला तिच्या आई विरुद्ध भडकवून दयानंद
पुजारी कडून प्रॉपर्टी सुध्दा सहज मिळविता येईल. असा विचार मनात करून ती रोहन ला घेऊन आपल्या गावाला परतली. परंतु गावाला येऊन पाहते तर काय तिच्या दिराने तिचे घर स्वतःच्या नावाने करून घेतलेच शिवाय त्यांच्या हिस्साची जमीन सुध्दा आपल्या नावावर करून घेतली. ती दोघेही हयात नाहीत अशी नोंद करून टाकली त्याने. अर्थात त्यात गावच्या तलाठी चा पण हात त्यात होता म्हणा.
त्यानंतर तिने मामलेदार कचेरीत तक्रार सुद्धा केली म्हणा. परंतु तेथे त्याना विचारण्यात आले की तुम्ही इतकी वर्षे होता कुठं ? आणि आज अचानक कशी आठवण झाली गावाची ? काय उत्तर देणार होती म्हणा. वरून त्याने असे सुद्धा विचारले की तुम्हीच सखुबाई आहात हे अगोदर सिध्द करा. शिवाय इतकी वर्षे तुम्ही होता कुठे हे देखील पुराव्यानिशी सिध्द करावे लागेल. असे सांगण्यात आले. आता सखुबाई पुढे प्रश्न उभा राहिला की आता काय करावे ? जर जास्तच चौकशी झाली तर आपणच आपल्या नातवा चे अपहरण केले होते हे देखील सिध्द होईल. त्या पेक्षा दयानंद कडून प्रॉपर्टी हस्तगत करता येईल. असा विचार करून त्यांनी आपल्या गावातच भाड्याने एक खोली घेऊन त्यात ते तिघेजण राहू लागले. आपल्याच गावात भाड्याने राहण्याची त्यांच्या वर पाळी आली. परंतु आता सखुबाईंचा डोळा दयानंद च्या प्रॉपर्टी वर होता. अर्थात आपल्या सुने विरुद्ध आपल्या नातवाला हत्यार म्हणून वापरणे सहज शक्य होईल.
हेही त्यांच्या द्यानात आले. शिवाय त्याची आईच आपण त्याची आई असल्याची सिध्द करण्यासाठी स्वतःहून तिच्या
घरी आली. म्हणजे झाले असे की ,
आपली सासूबाई आपल्या मुलाला घेऊन आल्याची
खबर जशी मिळाली तशी ती आपल्या मुलाला भेटायला गेली ; परंतु प्रथम तिला रोहनला भेटू दिले नाही. परंतु नंतर
त्यांच्या द्यानात आले की हीच संधी आहे , मुलाला आपल्या
आई विरुध्द भडकविणे. आणि त्यांनी तसेच केले. जेव्हा
रोहन ने विचारले की, आजी ह्या बाई कोण ? मघापासून
त्या मला मी तुझी जन्मदाती आई आहे ,असे सांगतात."
त्यावर सखुबाई म्हणाल्या ," हो . ती आईच आहे तुझी .
परंतु तुझ्या बापाची खुनी सुध्दा आहे." तेव्हा कांचन चिडून
बोलली ," सासूबाई का खोटं सांगताय माझ्या मुलाला ?"
" काय खोटं सांगतेय गं मी ? तुला दुसरं लग्न करता यावे
म्हणून तू ह्याचा त्याग नव्हता का केलास ?"
" साफ खोटे ! उलट तुम्ही त्याला इथून पळवून नेलात."
" आजी काय ऐकतोय मी हे ? तू मला पळवून नेलेस ?"
" हो . तुला पळवून नेले मी ; परंतु का पळवून नेले ते
ऐकणार नाहीस का तू ?"
" जरूर ऐकेन , सांग बरं . का पळवून नेलेस तू मला ?"
" कारण मला तुझा जीव वाचवायचा होता. आणि हिने
तुला जीवानिशी ठार मारण्याची योजना जी बनविली होती. परंतु मला अगोदरच हिची योजना कळली. म्हणून मी तुझा प्राण वाचविण्यासाठी तुला घेऊन इथून पळाले. °
" साफ खोटे आहे हे. मी असं काहीच केलेलं नाहीये. उलट ह्यांचा आमच्या लग्नाला विरोध होता. म्हणून राहुल ने ह्यांच्या मर्जी विरुद्ध जाऊन माझ्याशी लग्न केलं."
" मग हिला विचार हिचे जर राहुल वर खरे प्रेम होते तर हिने दयानंद शी लग्न का केले ?"
" ती सुद्धा राहुलचीच इच्छा होती. मी फक्त माझ्या राहुलची इच्छा पूर्ण केली."
" बघ रे बाबा तुला पटतंय काय हे ? कुणी आपल्या बायकोला दुसऱ्या पुरुषाशी लग्न करायला सांगेल का ?"
" कदापि नाही. आजी तुझंच म्हणणे बरोबर आहे. हिनेच अरे, आपल्या प्रियकरा बरोबर लग्न करता यावे म्हणून माझ्या बापाचा पद्धतशीर काटा काढला. हेच सत्य आहे. "
" नाही रे, हे सत्य नाहीये."
" चूप ! एक अक्षर पुढे बोलू नकोस. माझ्या बापाचा
खून केलास ना तू , आता बघच तू मी कसा माझ्या बापाच्या
खुनाचा बदला कसा घेतो ते." असे बोलून त्याने आपल्या जन्मदात्या आईला धक्के मारून घरातून बाहेर हाकलून दिले. नि वरून ताकीद दिली की पुन्हा इथं यायचे नाही. मी तुझा कुणी लागत नाही. आणि तू माझी कुणी लागत नाही. असे म्हणून त्याने दरवाजा धाडकन बंद करून घेतला.
त्यानंतर सखुबाई ने त्याला आपली योजना ऐकविली.
संपुर्ण योजना ऐकल्यानंतर रोहन म्हणाला," असं होतं तर मला तिचा अपमान करायला का लावलास ?"
" अरे, सरळ जाऊन तिच्या पायावर लोटांगण घे. नि तिची
माफी मांग. आणि तिच्या समोर तू मला दोष दे. म्हणजे फसेल ती आपल्या जाळ्यात. आता मात्र रोहनला तिचे म्हणणे पटले.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा