रोबोट-१०
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
रोबोट-१० |
शेवटी मार खाणारा म्हणाला , " मला माफ कर मी चुकलो." तसा दुसरा म्हणाला," असं नेहमी म्हणायचं पण सुधरायचं मात्र नाव नाही. मी अनेक वेळा बजावून सांगितले होते ना तुला की, तुझा भांडा फोड करायला मला फार वेळ लागणार नाही. तू कोण आहेस आणि कोणाच्या सांगण्यावरून हे तू करतोयस हे देखील मला माहितेय.
परंतु माहीत असूनही मी गप्प बसलोय का माहितेय . त्याला
कारण एकच आहे आणि ते कारण म्हणजे तुझ्या बॉस च्या ताब्यात असलेल्या डॉ. विश्वजित चा पत्ता जोपर्यंत मला लागत नाही. तोपर्यंतच मजा कर जेवढी करायची असेल तेवढी . बाद में रो ना ही है मरते दम तक ! चलो छोड दिया जाओ भागो यहां से और जाकर कहो अपने बुझदिल बाप से कि यह चूहा बिल्ली का खेल अब बंद करो और जल्द से जल्द अपने बिल से बाहर आओ और हमसे मुकाबला करो और जितना हो सके उतना आतंकवादियोंसे दूर रहो चूँकि वो तो न घर के होते है न घाट के उन हरामजादो को यह भी नही पता हैं कि मरने के बाद मनुष्य को जन्नत नशीब होती हैं जहन्नुम यह किसे पता है चूँकि मरने वाले कभी भी वापस नहीं आते है यह बताने कि मैं कहा हूँ ? और क्या कर रहा हूँ ,इसलिए मनुष्य को कुछ अच्छा कर्म करना है कि मरने के बाद भी लोग उसे याद करे ! जैसे कि बाबासाहेब आंबेडकर , छत्रपति शिवाजी महाराज , छत्रपति संभाजी महाराज के जैसे चूँकि वो लोगो के दिलो में बसे हुए हैं वास्तव में यही स्वर्ग है उनके लिए और वो उसके हकदार भी हैं और रही भगवान की बात तो वो सबके भीतर सबके दिलों में बसे हुए हैं, लेकिन लोग उन्हें ढूढंते है मंदिर में, मजीद में और न जाने कहाँ कहाँ ? " मॅनेजर सांगता सांगता मध्येच थांबला आणि म्हणाला, " अचानक आवाज बंद झाला. तसे आम्ही सर्व भानावर आलो आणि खरं सांगायचं तर आमचा बँक कर्मचारी वर्ग एवढा मंत्रमुग्ध झाला की बस्स ! आम्ही हे देखील विसरून गेलो की , आम्ही थिएटर मध्ये नाही तर बँकेत काम करायला आलोय. आम्ही त्या बॉडीलेसचे आभार सुध्दा मानायला ही विसरलो." मॅनेजर सांगता सांगता एकदम भावनावस झाला. त्यानंतर इन्स्पेक्टर विरेंद्र राणे ने घटनास्थळाचा पोलीस पंचनामा केला नि पोलीस माघारी परतले.
दुसरीकडे जफर खानला ही गोस्ट कळली की, बॉडीलेस
मुळे आपले प्लॅन फसले तसे तो भयंकर चिडला नि म्हणाला की, हा कोण दुसरा बॉडीलेस आहे ? आणि कोणी बनविला ?" तेव्हा बब्बर म्हणाला ," हा बॉडीलेस डॉ. विश्वजितच्या असिस्टंट ने बनविला असावा." तेव्हा जफर खान बोलला," कुठं आहेत ते डॉ. विश्वजित चे असिस्टंट ?
पकडून हजर कर त्या दोघांना." त्यावर बब्बर बोलला," ते दोघेही भूमिगत आहेत. त्याना कुठे नि कसे शोधणार ?"
" तू सांगतोस ते खरं आहे का आमच्याशी डबल गेम करतोयस ?"
" पण असं का करेन मी ?"
" कारण आता ज्या घटना घडताहेत त्यावरून तर असंच
वाटतंय की तू आमच्याशी खोटं बोलतोयस. एकीकडे म्हणतोस की बॉडीलेस माझा गुलाम आहे म्हणून. तर दूसरीकडे म्हणतोस दुसरा बॉडीलेस बनविलाय तो सुद्धा
डॉ. विश्वजित च्या असिस्टंटानी तू काय मला मूर्ख समजतोस
की काय ?" त्यावर बब्बर म्हणाला," नाही. जफर भाय मी खरं तेच सांगतोय."
" माझा आता अजिबात विश्वास नाही तुझ्या बोलण्यावर."
" मग मी काय करू म्हणजे तुझा विश्वास बसेल माझ्यावर ?"
" आता तू एकच गोष्ट कर."
" कोणती ?"
" बॉडीलेसला आताच्या आता इथं बोलव."
" मी इथं असेपर्यंत तो इथं येऊ शकणार नाही."
" का नाही येऊ शकणार ?"
" तशी माझी त्याला वार्निंग आहे."
" मग आता आदेश दे इथं येण्याचा. हा घे मोबाईल आणि माझ्या समक्ष त्याला फोन कर."
" नाही करू शकत मी असं ."
" का नाही करू शकत त्याचे कारण कळेल ?"
" कारण माझा तुझ्यावर विश्वास नाही."
" विश्वास नसायला मी काय धोका केलाय तुझ्याशी ? सांग
ना ?" बब्बर निरुत्तर झाला. त्याला काय बोलावे ते सुचेना.
तसा जफर खान पुढे बोलला," आजचे वर्तमानपत्र वाचलेस
का ? तुझ्या बॉडीलेस ची बेइज्जत झाली. म्हणे मोठ्याने
ओरडत होता. आणि दुसरा बॉडीलेस हसत होता. याचा काय
अर्थ काढायचा आम्ही ? हां ! बोल ना ? आता दातखिळी का बसली ? " पण तरी सुद्धा बब्बर गप्पच बसला. मी सांगू तुझी
काय खेळी होती ती ? " बब्बर एकदम गोंधळून जफर खान
कडे त्याने सप्नातही असा विचार केला नसेल की, जफर खान
आपल्यावर असा आळ घेईल. पण वक्तव्य बब्बरला सहन झाले नाही तो लगेच बोलला," म्हणजे काय म्हणावयाचे काय
आहे तुला ?" त्यावर जफर खान बोलला," माझ्याच तोंडून
ऐकायचंय तुला मग ऐक. तुझा हा मार खाऊन सुजलेला चेहरा सांगतोय की तोतया बॉडीलेस आहेस , जो आतापर्यंत
आम्हाला मूर्ख बनवीत होतास आणि दुसरा जो बॉडीलेस आहे की ज्याने तुला चांगलेच बडवून काढले. तोच होता खरा बॉडीलेस आहे, कारण तो पार इमानदार आहे हे मागच्यावेळीच समजले होते आम्हांला. तू फक्त अदृश्य होऊ शकतोस ते पण कशाच्या जोरावर तर बॉडीलेसच्या ज्या चीफ नि ड्रिल मशीन म्युजियम मध्ये प्रदर्शन साठी ठेवलेल्या होत्या ना त्याच तू लंपास केल्यास. हो की नाही ? खरं बोल. नाहीतर आजच तुझा शेवटचा दिवस ठरेल ." असे बोलून त्याने बब्बर वर पिस्तुल ताणले. तसा बब्बर घाबरला नि सारे सत्य ओकून टाकले. कसे त्याने कबूल केले की म्युजियम मधून बॉडीलेस ची चिप आणि ड्रिल मशीन त्यानेच चोरी केली. शिवाय बॉडीलेस बनून त्याने आतंकवाद्याना आणि जफर खान, पाशा खान या सर्वांना त्यानेच तुरूंगातून मुक्त केले. परंतु बॉडीलेस बद्दल नि डॉ.विश्वजित बद्दल एक चकार शब्द देखील काढला नाही त्याने. परंतु जफर खान ची माफी मागून स्वतःचा प्राण वाचविला. तेंव्हा जफर खान ने त्याच्याकडे ती चिप आणि ड्रिल मशीन देण्यास फर्मावले. तेव्हा बब्बर बोलला," ते मी सोबत आणलेले नाहीत. एका सुरक्षित ठिकाणी ठेवलेले आहेत." पण जफर खान ला त्याच्या वक्तव्यावर अजिबात विश्वास बसला नाही. त्याने आपल्या माणसांना त्याची झडती घ्यायला सांगितली. तसा बब्बर किंचित घाबरला. पण क्षणभरच. लगेच त्याच्या घ्यानात आले की आपण त्या दोन्ही गोष्टी अश्या ठिकाणी लपविल्या आहेतकी जेथे कुणाची नजर पण जाणार नाही. तशी त्याच्या चेहऱ्यावर ची भीती क्षणात नाहीशी झाली. बब्बरची त्या लोकांनी झडती तर घेतली. परंतु त्या लोकांना त्या दोन्ही गोष्टी सापडल्या नाहीत. शेवटी जफर खान बोलला की, ठीक आहे, माझी माणसं तुझ्या सोबत येतील तुझ्या अड्यावर. त्यांच्या स्वाधीन करायच्या आहेत त्या दोन्ही गोष्टी. काय ? जमेल ना ?" मरता क्या नहीं करता ? या म्हणी प्रमाणे नाईलाजाने का होईना ,पण बब्बर चिप आणि ड्रिल मशीन त्यांच्या स्वाधीन करायला तयार होतो. तेव्हा जफर खान आपल्या माणसांना आदेश देतो की, बब्बर सोबत जाऊन चिप आणि ड्रिल मशीन घेऊन या आणि खाली हाताने परत येऊ नका. नाहीतर एकेकाची चाबडी सोलुन काढून." तसे ते दोघेजण बब्बर सोबत निघाले. जसा तो पडक्या इमारतीच्या दिशेने निघाला. तशी जफर खान ची दोन्ही माणसे एकदम सावध झाली. कारण मागच्या वेळीचा तो प्रसंग आठवला. कसे बब्बरने त्या दोघांना चकविले होते.
म्हणून या वेळी त्यातील एकजण बब्बरच्या अगोदर पडक्या
इमारतीच्या सिक्युरिटी केबिन जवळ पोहोचला आणि त्याने
त्या सिक्युरिटी केबिन चा ताबा घेतला. ते पाहून बब्बरला मोठा प्रश्न पडला की आता काय करावे ? काही करून आणि
कसे ही करून ह्या दोघांच्या हातून निस्टायचे होते पण कसे
निसटून जायचे हाच प्रश्न पडला होता त्याला. एक पुढे एक मागे काय करावे ते सुचत नव्हते. शेवटी नाईलाजाने गब्बरच्या बंगल्याच्या दिशेने धाव घेतो. मुख्य फाटक जवळ येताच तो सिक्युरिटीला म्हणाला," लवकर फाटक उघड नि मला आंत घे आणि लगेच फाटक बंद कर आणि आंत कुणाला पण येऊ देऊ नकोस." त्या प्रमाणे सिक्युरिटी ने फाटक झटकन उघडले नि बब्बरला आंत घेतले आणि फाटक बंद केले. पण तेवढ्यात ते दोघेही तेथे पोहोचले. ते सिक्युरिटीला दमदाटी करू लागले आणि लवकर गेट उघडण्याचा ते फर्मान सोडू लागले. पण सिक्युरिटी काही गेट खोलेना शेवटी एकाने त्याच्यावर बंदुक रोखली तसा तो बिच्चारा सिक्युरिटी घाबरला आणि मुकाट्याने त्याने गेट उघडला.
तसे ते दोघेही आंत शिरले आणि संपुर्ण बंगल्याची
झडती घेतली. परंतु त्या बंगल्यात घरच्या नोकरा शिवाय कुणीच सापडले नाही. तेवढ्यात मोठ्या ने हसण्याचा आवाज आला. अर्थात तो आवाज बॉडीलेसचा होता आणि
त्याच बरोबर पुढील स्वर कानावर पडले," किसे ढूंढ रहे हो , बब्बर को ? उसे अब तुम लोग कभी नहीं ढूंढ पाएंगे. जाओ और कह दो अपने बॉस को की बब्बर का पीछा करना छोड़
दो वो तुम्हारे हाथ कभी भी नहीं आयेगा ।" नाईलाजाने ते
तेथून चालते झाले. त्यानंतर बब्बर आपल्या गुप्त स्थानावर
पोहोचला आणि घडलेली हकीगत डॉ.विश्वजित च्या कानावर घातली आणि शेवटी म्हणाला ," डॉ. अजून किती अवधी लागणार आहे तुम्हांला ?"
" ते मी सांगू शकत नाही. "
" मला वाटतं आता जगावर हुकूमत करायचे स्वप्न
अपुरेच राहणार असे दिसतंय."
" जर माझ्या असिस्टंटना तू शोधून आणलास तर मात्र नक्की काहीतरी मार्ग सापडेल. हे खात्रीने सांगतो," त्यावर बब्बर बोलला," ते दोघे सापडणे आता मुश्किल आहे, कारण ते आता भूमिगत आहेत. त्याना कुठे आणि कसे शोधणार ?"
" मग तुझ्या पुढे फक्त दोनच पर्याय उरलेत. १) सरळ इथला बोरा- बिस्तरा गुंडाळून पुन्हा सिंगापूरला पलायन
करायचं ."
" आणि दुसरा पर्याय ?"
" दुसरा पर्याय इथंच राहून जफरच्या माणसांना सळो की पळो करून सोडायचं."
" ते कसं ?"
" हे बघ, तुझ्याकडे जरी बॉडीलेस नसला तरी अदृश्य
होण्याचा फार्म्युला तर आहे ना ? त्या फर्म्युलाच्या मदतीने तुला जे हवे ते काम करता येईल."
" हो ; पण खऱ्या बॉडीलेस ला कसं रोखणार ?"
" अगदी सोपे ."
" कसे ?"
" माफीचा साक्षीदार म्हणून पोलिसांची मदत कर. मग
बॉडीलेस तुझ्या केसांना पण धक्का लावणार नाही. बघ तुला
काय पटतंय ते आणि हे बघ आतापर्यंत जे केलेस ते पुढे करू नकोस. म्हणजे तरुणींना फसविणे वगैरे .....? ही सर्व कामे बंद कर ." त्यावर तो बोलला ," ते तर कधीच बंद केलंय."
" वा , छान ! मला काय वाटतं माहितेय तो जफर खानच
तुला वापस बोलविल. कारण त्याची छोटी मोठी काम तुलाच
करावे लागणार आहेत. म्हणून जरा धीर धर. आणखीन एक
महत्वाचे त्याच्या समोर जाताना आता बब्बर बनून जायचं नाही."
" मग कसं जायचं ?"
" बॉडीलेस बनून."
" वा डॉक्टर अगदी छानच उपाय सुचविला तुम्ही !"
" हो. परंतु पोलिसांना सुध्दा आता तुझ्यावर संशय आलाय. म्हणून पोलिसांनी तुझ्या बंगल्याच्या बाहेर दोन
पोलीस साध्या वेषात पहारा देताहेत."
" अरे , बाप रे ! " पण लगेच त्याच्या लक्षात आले की डॉ.
विश्वजित हे कसे समजले कारण ते तर इथं बंदिस्त आहेत.
हे ध्यानात येताच त्याने विचारले," पण डॉक्टर हे तुम्हांला
कसं कळलं ?" त्यावर डॉ. ,विश्वजित बोलले," आमचा रिपोर्टर आहे ना इथं ?"
" कोण रिपोर्टर ?"
" सांबा आहे ना, हाच आम्हाला बाहेर काय चालले आहे
याची माहिती देतो." तस बब्बर साबाजीकडे पाहत बोलला,
" काय ? तुला इथं कशासाठी ठेवले आहे मी ?"
" पण दादा ,डॉक्टर आता कुठे जायचे नाहीत. ते आपल्या कामात एवढे मग्न असतात की त्याना कुणी इथं
आल्या गेल्याचे ही कळलं नाही."
" हूं s s ठीक आहे." असे म्हणून तेथून निघाला.
बंगल्याच्या बाहेर साध्या वेशात पहारा करत असलेल्या
पोलिसांनी फोन वरून इन्स्पेक्टर वीरेंद्र राणे ना खबर दिली.
ते ऐकून पो. इन्सपेक्टर विरेंद्र राणे बोलले की, अखेर माझा
संशय खरा ठरला की !"
" कसला संशय साहेब ?" हेड कॉन्स्टेबल जयदेव ने विचारले.
" हाच की गब्बर आपल्या डोळ्यात धूळ फेकतोय. "
" म्हणजे सर ?"
" मागे जेव्हा तो पोलीस स्टेशनला आला होता तेव्हा
त्याने आपल्याला काय सांगितले होते की बब्बर नि सांबा यांच्याशी माझी अजून भेट झाली नाही. मग आज बब्बर
कसा शिरला आंत ? म्हणजे त्याच्या बंगल्यात आणि मुख्य
गोष्ट म्हणजे जफर खानची माणसं त्याच्या पाठलाग करत होती. पण का ते नाही कळलं ?"
" मला काय वाटतं माहिती आहे साहेब, बब्बरची नि जफर खान ची तर पहिल्या पासूनची दुश्मनी आहे. तेव्हा त्या दोघांच कशावरून तरी भांडण झालं असेल. ?"
" भांडण झाले असेल दोघांचे ही गोष्ट खरी आहे .परंतु दोघां मध्ये अजूनही वैर आहे हे म्हणणे चुकीचे ठरेल. कारण
काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये मैत्रीचे नाते निर्माण झाले होते
म्हणून तर बब्बर जफर खानच्या गैंग मध्ये सामील झाला होता." किंचित थांबून विचारमग्न होऊन विचार केल्यानंतर
त्यांच्या ध्यानात आले की, हूं ह्याला एकच कारण असू शकतं
आणि ते म्हणजे बँकेत घातलेला दरोडा फसला.म्हणून दोघांमध्ये नक्कीच काहीतरी वाद झाला असावा. किंवा बब्बर
स्वतःच चिप चा वापर करून आपणच बॉडीलेस असल्याचे
जफर खान ला भासवत असेल. आणि ती गोष्ट उघडकीस
आली. खरा बॉडीलेस तेथे योग्य वेळी पोहोचल्यामुळे त्यांचा
डाव फसला. त्यामुळेच दोघांत वाद झाला असावा.
" तुम्ही म्हणता तसं असेल ही ! पण मग आपण काय करायचं "
" काही नाही. गब्बरच्या बंगल्यावरचा पहारा जरा कडक करायला हवा. गब्बरला दिवसभर कोण , कोण ?
भेटायला येतात त्यावर बारीक नजर ठेवायला हवी आणि जफर खांनची माणसं पुन्हा जर गब्बरच्या बंगल्यावर दिसली तर त्याना अटक करा. मग त्याच्या कडून सर्व माहिती काढता
येईल.
" पण सर , आपण गब्बरलाच अटक केली तर ?"
" अटक करून सिध्द काय करणार जोपर्यंत त्याच्या
विरोधात एक पण पुरावा सापडत नाही , तोपर्यंत त्याला अटक करून काहीही उपयोग होणार नाहीये . पहिल्याच पेशीत तो निर्दोष सुटेल."
आतंकवाद्यांचा फोन आला की त्यांना भातात यासाठी यायचे आहे की ते जे पाच जण विमान अपघातात मेले त्यांचा सुड घ्यायचा आहे म्हणे ! आणि त्या साठी जफर खान ने त्यांची मदत करावी असा त्यांचा हुकूम आहे.आता जफर खान ला प्रश्न पडला की मदत करणार कशी ? म्हणजे बब्बर जरी रागवून गेला असला तरी त्याची समजूत काढता येईल. परंतु बॉडीलेस हे मोठं संकट आहे. तो काय आपला डाव सफल होऊ देणार नाही. मग त्याला दुसरीकुठं तरी गुंतवून ठेवणे जरूरी आहे, म्हणजे एकाच वेळी दोन ठिकाणी बॉडीलेस पोहोचू शकणार नाही. मग त्यासाठी काय उपाय करावा लागेल बरं ? खूप विचार केल्यानंतर एक उपाय सुचला. मग त्याने लगेच बब्बरला फोन केला. पण बब्बर काही त्याचा फोन उचलत नव्हता. सारखा कट करत होता.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा