रोबोट-८
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
रोबोट-८ |
" पण का ऐकू मी तुझं ?
" ऐकायला नाहीस तर तुझं खरं स्वरूप मी लोकां समोर आणीन. मग बैस तुरुंगात खडी फोडत ?"
" माझं काय काय माहित आहे तुला ?"
" सर्वकाही. म्हणजे , तुझं नाव काय , काम काय , कुठून आलास ? आणि कशासाठी आलास ? हे सर्व माहीत आहे मला."
" पण तरी सुद्धा तू माझं काहीच वाकडं करू शकणार नाहीस."
" पाहायचंय ?" असे विचारताच तो समजला की ह्याला
जास्त आपण राग दिला तर कदाचित हा आपले खरे स्वरूप
सर्वां समोर आणेल. छे ,छे ,छे ! असं होता कामा नये. नाहीतर जफर खान आपल्याला जो आता भाव देतोय तो या पुढे देणार नाही. त्या पेक्षा झाकली मूठ सव्वा लाखाची उघडली की फुकाची म्हणतात ते खरंय." असा मनात विचार करून बोलला," मला हे कळत नाहीये. की , तुझा प्रॉब्लेम काय आहे ? का माझ्या मागे लागला आहेस तू ?" एकदम भाषा बदलेली पाहून बॉडीलेस उद्गारला," का मागे लागलोय ते सांगू ?"
" हो, सांग. " त्रागाने बोलला .
" मग ऐक. सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे , बॉडीलेस हे नाव
धारण करून जे लोकांना जे फसवितोस ते प्रथम बंद कर."
" त्याच्याशी तुला काय ....?"
" मला काय म्हणजे ? डॉ. विश्वजितने निर्मित केलेल्या सुंदर कलाकृतीचे नाव खराब करतोयस तू ."
" पण तुझं तर नाव नाही ना खराब होत त्याने ."
" माझंं नाव कसं नाही खराब होणार ? मी पण तर एक बॉडीलेसच आहे ना ?" त्यावर तो नकली बॉडीलेस बोलला,
" कुणी बनविले तुला ?"
" डॉ. विश्वजितच्या दोन असिस्टंटानी बनविले मला ज्यांना तुझा बॉस शोधतोय. बॉस म्हणजे कोण माहितेय ना तुला ? का ते पण खुलासा करू ?" तसा तो पटकन बोलला , " नाही नको. " असे म्हणून किंचित थांबला. पण क्षणभरच. लगेच दुसऱ्या क्षणी आपल्या मनातील शंका दूर करण्याच्या हेतूने म्हणाला ," म्हणजे जॉन आणि सलीम ने का ?"
" ओ येस." बॉडीलेस नं.२ बोलला.
" मग ते कुठं आहेत दोघे ?" बॉडीलेस नं.१ बोलला.
" जिथं असायला हवेत."
" हे माझ्या प्रश्नांचे उत्तर नाही झाले."
" तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर ध्यायला मी बांधील नाहीये."
" मग मी सुध्दा तुझ्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देणार नाहीये."
" मला गरज नाहीये त्याची ! कारण मला त्या सर्व प्रश्नांची
उत्तरे माहीत आहेत." त्यावर बॉडीलेस नं.१ म्हणाला," तुला
काय माहीत आहे नि काय नाही . याची मला अजिबात पर्वा
नाही. मला फक्त तुला इतकेच सांगायचे आहे की , जसा मी तुझ्या मार्गात येत नाही. तसा तू ही माझ्या मार्गात येऊ नकोस. बस्स ! "
" मी येणार तुझ्या वाटेला. कारण जोपर्यंत तू बॉडीलेसचा मुखवटा घालून लोकांना फसविण्याचे काम सोडत नाहीस तोपर्यंत मी तुझा पिच्छा सोडणार नाही."
" हो का ? मग मघाशी मी जेव्हा आतंकवाद्याना आणायला गेलो होतो तेव्हा तू कुठे होतास ? नाही म्हणजे तू माझा पिच्छा सोडणार नाही असं म्हणतोस ना म्हणून विचारलं."
" तेव्हा सुद्धा मी तुझ्या पाठलागावरच होतो. "
" हो , का ? मग का नाही अडविलेस मला ? नाही म्हणजे
देश प्रेमीं असल्याचे भाषण देतोयस ना तू आपल्या गुरूच्या ही गुरू प्रमाणे अर्थात डॉ. विश्वजित प्रमाणे. होय ना ?
" होय. मनात आणलं असतं तर त्याना तिथेच संपविले
असते,जसे की त्याच्या अगोदर आल्यालाना संपविले."
" अच्छा तो वो काण्ड तुमनें किया ।"
" येस ! रही बात इन दोंनों की तो जो अब आये हैं, उन
दोंनों को तो उस वक्त मार देता जब वो भारत की सीमा पार कर रहे थे लेकिन मैंने ऐसा नहीं किया क्यों ? इसकी वजह जानते हो ! खैर तू क्या बता पायेगा मैं ही बता देता हूँ उसकी
वज़ह यह थी कि उन दो को मारकर क्या हासिल होगा हमे ! हमें तो उन आंतकवादियों की जड़ें उखाड़कर फेंकनी है और हम वो एकदिन जरूर कर के दिखलायेंगे बस्स थोडासा इन्तजार करो ।"
" सिर्फ और सिर्फ सपने देखा करो कुछ हासिल तो होगा
नहीं । "
" हासिल तो कब का कर लेते लेकिन तुम जैसे कुछ गद्दार
है इस देश में जो खाते है इंडिया का लेकिन गुलामी करते हैं
पाकिस्तान की । "
" अब डॉयलॉग बाजी बंद करो और सुनो हूं मैं गद्दार जो
उखाड़ना है उखाड़लो ."
" जरूर उखाड़कर फेक दूंगा तुम्हे । मुझें सिर्फ एक बार डॉ. विश्वजित कहाँ हैं पता लगने की देरी हैं । फिर देखो मैं
मैं क्या करता हूँ ?"
" डॉ. विश्वजित का तुम्हें कभी भी पता नहीं चलेगा ।
मैंने उन्हें ऐसी जगह छुपा के रख्खा है कि वहाँ परिंदा भी पर
नहीं मार सकता आय होप युवर अंडरस्टँड "
" ज्या दिवशी मला डॉ. विश्वजित कोठे आहेत, हे कळेल ना , तो दिवस तुझा आणि तुझ्या बॉस चा शेवटचा असेल. यु आर फिनिश्ड !"
" ते काळ ठरवील."
" काळाची पाऊले न सांगता येतात मिस्टर . कारण काळ जिंकितो सर्वांना काळास नाही जिंकिले कुणी।"
" देखेंगे।"
" जरूर देख लेना । लेकिन इस वक्त तुम्हें पहले यह काम करना है की , इस लड़की को जहाँ से उठाकर लाये हो,वापस वही पर पहुंचा दो वो भी जल्दी इसी में तुम्हारी भलाई है ।"
" और ना पहुँचा दु तो ?"
" ना बोलने की कोई गुंजाइश ही नही बची है तुम्हे इस वक्त वही करना है जो हम चाहते है वर्ना इसी लड़की के सामने तुम्हारा सारा भांडा फोड़ दूंगा फिर आगे क्या हो
जायेगा इस का अंदाजा तुम्हें जरूर होगा ।"
" ठीक है . इस वक्त बाजी तुम्हारे हाथ है , इसलिए अकड़ रहे हो । लेकिन हर समय एक जैसा नहीं होता ,यह भी तुम याद रखना ।"
" हमे भुलनेकी कोई बीमारी नहीं है , इसलिए चिंता की कोई बात नहीं । लेकिन हां तुम यह मत भूलना की, तुम्हें क्या करना हैं ? ओके अब हम चलते हैं। " असे म्हणून आवाज बंद झाला. तसा तो तिच्या समोर प्रगट होऊन तो बोलला," तू त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. तो जे बोलत होता त्यातलं काहीच खरं नाहीये." त्यावर रेणू म्हणाली ," काही ही सांगू नका मला. उलट ते जो म्हणत होता तेच खरं आहे. तुम्ही मलाच नाही तर माझ्या सारख्या अनेक तरुणींना फसविले आहे तुम्ही. का केलेत तुम्ही असं ?"
" अगं खरं नाहीये ते माझ्यावर विश्वास ठेव. फक्त तूच
आणि तूच माझी होणारी पत्नी आहेस. बिलिव्ह मी !"
" विश्वास आणि तुमच्यावर...... कदापि नाही. तुम्ही आता एकच करा मला माझ्या घरी नेऊन सोडा. प्लिज !"
" ठीक आहे . नेऊन सोडतो मी तुला पण पुन्हा एकदा
नीट विचार कर की कुणावर किती विश्वास ठेवावा."
" मघाशी तुमची बोलती बंद झाली होती. त्यावरून कळते.
तुम्ही खरे का तो बॉडीलेस खरा."
" तो खरा बॉडीलेस नाहीये. मी खरा बॉडीलेस आहे."
" खरा बॉडीलेस जफर सारख्या माफिया डॉन चा दुश्मन होता आणि तुम्ही त्याचे दोस्त या वरूनच कळतं की खरा
बॉडीलेस कोण आहे ते ?"
" अगं पण मी त्याची का मदत करतोय हे जाणून घे."
" काही गरज नाहीये त्याची आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही मलाच नाही तर माझ्या सारख्या अनेक
तरुणींना फसविलात त्या वरून तुमचे खरं रूप दिसून येते."
" अगं आता कसं समजावू तुला ?"
" काहीही समजविण्याची गरज नाहीये. तुमचा असली चेहरा माझ्या समोर आला . मीच मेली मूर्ख मला तेव्हाच
समजायला हवं होतं की एक रोबट माणसा सारखा सेक्स कसा करू शकेल ? पण नाही. माझी मती मारली गेली होती त्यावेळी. म्हणून मी तुमच्या चालाखीला बळी पडले. पण आता नाही . मी सर्वांना ओरडून सांगेन की तू खोटारडा बॉडीलेस आहे. कुणी विश्वास ठेवू नका ह्याच्यावर."
" अस्सं ! मग तू इथंच रहा. जोपर्यंत तुझा माझ्यावर विश्वास बसत नाही तोपर्यंत मी तुला स्पर्श पण करणार नाही."
" प्लिज मला माझ्या घरी नेऊन सोडा."'
" नाही. जोपर्यंत तुझा माझ्यावर विश्वास बसत नाही तोपर्यंत ? तू इथंच रहायचं कायमच माझी पत्नी बनून. " असे म्हणून बॉडीलेस तेथून गायब झाला. तशी रेणू ह्या खोलीतून बाहेर पडण्यासाठी कुठे दरवाजा आहे का ? हे ती पाहू लागते. पण दरवाजा कुठंच नसतो. तशी मानत विचार करू लागली की, जर हा बॉडीलेस नाहीये तर अदृश्य कसा होतो ? तेव्हा तिला आठवले तिने वर्तमानपत्रात वाचले होते की, बॉडीलेस बळी बनून सर्वांना धोका देत होता आणि सर्वजण त्याला सामान्य माणूसच समजत होते. तशी चूक आपण तर करत नाही ना ? छे , छे ,छे ! मग तो असं का म्हणाला ? की तुझा खरा चेहरा जगा समोर आणीन. " किंचित विचारमग्न झाली. तसे तिच्या ध्यानात आले की , बळी पण तर दुहेरी रुपात वावरायचा तेव्हा. मला वाटतं आपलाच बॉडीलेस खरं बोलतोय. असं जर आहे तर त्या बॉडीलेस समोर गप्प का राहिला सडेतोड उत्तर द्यायला हवं होतं त्याला. कदाचित काहीतरी मजबुरी असावी. त्या मजबुरीचा तो फायदा उचलत असावा. हो हेच खरं असावं.
असा विचार करून स्वतःलाच दोष देऊ लागली की उगाचच
आपण आपल्या होणाऱ्या नवऱ्यावर संशय घेतला. आपल्या
हे कसे ध्यानात आले नाही की अदृश्य फक्त बॉडीलेसला
होता येतं. हे आपण कसे विसरलो.? पण मग तो कोण
होता जो स्वतःला बॉडीलेस म्हणत होता ? तसे त्याचे वक्तव्य
आठवले की तो म्हणाला की, त्याला डॉ. विश्वजित च्या असिस्टंट ने बनविले म्हणून. शक्य आहे. स्वतःचे अस्तित्व
जगा समोर दाखविण्यासाठी माझ्या होणाऱ्या नवऱ्याला तो
खोटा ठरवतोय. कारण एका म्यानात दोन तलवारी राहात नाहीत अर्थात .......आलं लक्षात , बहुधा हेच कारण असावे. नकीच !"
तेवढ्यात बॉडीलेस आवाज कानी पडला आणि लगेच तिच्या समोर प्रगट ही झाला. आणि तिला म्हणाला, " रेणू , अजून नाही ना तुझा विशास बसला माझ्यावर. हरकत नाही. चल मी तुला तुझ्या घरी नेऊन सोडतो."
" नाही हो , बसला तुमच्यावर माझा विश्वास ."
" खर सांगतेस."
" अगदी खरं. पण त्यासाठी तुम्हाला एक काम करावे लागेल."
" कोणतं काम ?"
" तुम्ही आताच्या आता माझ्याशी लग्न करा. म्हणजे माझी खात्री पटेल."
" ठीक आहे , आजच करून टाकू आपण लग्न."
" खरं सांगताय ?"
" अगदी खरं परंतु ?"
" परंतु काय ?"
" तुझ्या घरची माणसे, म्हणजे तुझे आई - बाबा माझ्याशी
म्हणजे एका रोबटशी लग्न लावून द्यायला तयार होतील काय ?" असे म्हणताच रेणू किंचित विचारमग्न झाली. तेव्हा
तिला तिच्या आईचे शब्द आठवले. तिची आई म्हणाली होती
की, चुलीत गेलं तुझं ते प्रेम , मशीनवर कुणी प्रेम करतं का ?"
नंतर आईने समंध भूत वगैरे न जाणो अजून काय काय बोलली होती. हे जसे तिला आठवले तशी तिची खात्री पटली
की आपली आई नक्कीच या लग्नाला राजी होणार नाही. मग
काय करावं ? किंचीत विचार मग्न झाली. तसा तिच्या मनाने
तिला एक उपाय सुचविला. तो उपाय हा होता की,मंदिरात ईश्वरला साक्षी मानून लग्न करणे हा एकमेव उपाय सुचविला होता. तिने तो लगेच अंमलात आणायचा विचार केला. कारण
तिला लग्नाच्या बाबतीत अजिबात रिस्क घ्यायची नव्हतीच !
अर्थात तिला तो दुसरीचा होऊ घ्यायचा नव्हता. परंतु हा
निर्णय किती घातक होता. हे तिला का जाणवत नव्हते ते कुणास ठाऊक ? ज्याची लग्ना पूर्वी इतक्या साऱ्या तरूणी
सोबत अफेर सुरू आहेत. तो कधी एका पत्नीशी निष्टता ठेऊ शकेल का ? त्याचे एकच उत्तर आहे कदापि नाही. मग रेणू का विश्वास ठेवते आहे त्याच्यावर ? कदाचित तिला वाटत असावे की बॉडीलेस नं.२ खोटे बोलत असावा. खोटं बोलण्याची शक्यता आहे. परंतु एक वेळ शहा -निशा तर करायला हवी होती . पण ते ही नाही. आगी शिवाय जाळ नाही आणि निखाऱ्या शिवाय धूर नाही. हे तर ध्यानात यायला हवं होतं पण तेही नाही. काय म्हणावं या आंधळ्या
प्रेमाला आणि कुणीतरी म्हटलेच आहे ना की, प्रेम आंधळे
असते म्हणे , ते कुणावरही होते आणि परिणामाची पर्वा न करता असेल ही ! पण थोडसं प्रॅक्टिकल असायला काय हरकत आहे ? पण नाही. ठेच लागल्या शिवाय डोळे उघडत नाही असं म्हटलं जातं आणि खरंय ते. पाहू तर खरं काय
उत्तर देते ती ." ती काहीच बोलत नाही म्हणून तोच विचारतो
तिला. बॉडीलेस उद्गारला ," अगं बोलत का नाहीयेस ? काय
विचारतोय मी ?" त्यावर ती उत्तरली , " माझी आई आपल्या
लग्नाला संमत्ती देईल असं वाटत नाही. कारण ती तुम्हांला
भूत समजते . काय बरं त्या भूतांचे नाव ते ? " किंचित बोलायचे थांबून आठवल्या सारखे करत बोलली," हां आठवले समंध नावाचे भूत म्हणते ती तुम्हांला !"
" तुला काय मी भूत दिसतोय ?"
" असं मी नाही म्हणत माझी आई बोलते."
" बरं . ते जाऊ दे. तुझा विचार काय तो सांग."
" माझं आपलं असं मत आहे की,आपण दोघांनी सरळ मंदिरात जाऊन देवाच्या साक्षी ने लग्न करावे."
" एकदम फन्ट्यास्टिक विचार आहे तुझा. मला आवडला
तुझा विचार."
" मग चल आजच आपण लग्न करून टाकू."
" हो , चल." असे म्हटलं आणि त्याने आपल्या हातातील बोटातील अंगुटीच्या खड्या च्या ऐवजी झाकण होते ते उघडले नि तिच्या नाका जवळ नेली. तेव्हा कसलातरी सुगंध दरवळला नि ती बेशुध्द झाली. तशी त्याने आपल्या खिशातून एक ड्रिल मशीन बाहेर काढली नि हाताच्या मनगटावर दाबली. तसा तो अदृश्य झाला. त्यानंतर त्याने तिला उचलली तशी सुध्दा अदृश्य झाली.
जेव्हा तिला शुध्द आली तेव्हा ती एका मंदिरात असल्याची
तिला जाणीव झाली. मंदिरात फक्त एक पुजारी होता आणि
आता ही दोघे होते. पुजाऱ्याने दोघांच्या हातात वरमाला घालणार इतक्यात सावधान असा द्वनी उमटला आणि त्याच
बरोबर एक आवाज ही उमटला," एवढं बजावून सुध्दा ऐकली
नाहीस ना तू ? आणि लग्न करायला निघालीस या ढोंगी
माणसा बरोबर."
" हो , करणार मी लग्न ? कोण अडविणार मला ?"
" अगं हा रोबट नाहीये. माणूस आहे माणूस."
" तो रोबट असो वा माणूस मला त्याच्याशीच लग्न
करायचं आहे."
" या ढोंगी माणसा बरोबर लग्न करणार तू ? त्याने तुझ्या सारख्या कित्येक तरुणींना फसविले आहे."
" खोटं साफ खोटं ."
" रेणू तुझा माझ्यावर विश्वास आहे ना ?"
" हो , पक्का विश्वास आहे. " असे बोलून ती बॉडीलेसला
उद्देशून बोलली," आणि तू पण ऐक रे , जो कुणी आहेस तो.
माझा माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे तेव्हा तुला आमच्या लग्नाला साक्षी म्हणून उपस्थित राहायचं असेल तर राहू शकतोस नाहीतर इथून निघायचं बघ. कारण पुराव्या शिवाय तू उगाच काहीपण सांगू नकोस. कळलं."
" पुरावाच पाहिजे ना तुला हा घे पुरावा." असे बोलून तिच्या समोर चार पाच तरुणीचे फोटो आणि सोबत एक छोटीशी डायरी येऊन पडली. त्या डायरीत त्या साऱ्या तरुणींच्या घरचे आड्रेस लिहिले होते. " उचल ते फोटो आणि ती डायरी त्या डायरीत सर्वांच्या घरचे पत्ते आहेत. स्वतः जाऊन भेट त्या तरुणींना. मग खरं काय ते कळेल. "
तसा तो म्हणाला," अगं रेणू काय ऐकते आहेस त्याचं.?
एकदम खोटं बोलतोय तो."
" माहितेय मला तो खोटं बोलतोय ते. पण शहा-निशा करायला काय हरकत आहे ?"
" म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास नाहीये."
" असं नाहीये."
" असंच आहे. नाहीतर काय त्याच्या बोलण्यावर विश्वास
ठेवला असतास का तू ?"
" हे बघ बॉडीलेस , कसं असतं माहितेय जेव्हा कुणी आपल्यावर आरोप करत असेल तेव्हा आरोप खोटा आहे हे
सिध्द करून दाखवायचे असते आणि मला वाटतं आपण ते
करायला हवं. म्हणजे कुणाल आरोप करण्याची हिंम्मत होणार नाही. तेव्हा लग्न आपण लांबणीवर टाकू इतके दिवस थांबलोय तेथे आणखीन काही दिवस थांबू . बरोबर बोलते ना मी ?" नाईलाजाने का होईना त्याला होकारार्थी मान
डोलवावी लागली. त्यानंतर ती तेथून निघून गेली. तोतया बॉडीलेस फक्त तिच्या पाठमोरी आकृती कडे पाहत राहिला
आणि माणसातल्या मनात मात्र बॉडीलेसचा भयंकर राग आला होता. पण करणार काय ? दिसत नाही म्हटल्यावर. तसा बॉडीलेसचा हसण्याचा आवाज येतो. तसा तो आपल्या
खिशातून ड्रिल मशिन काढतो नि आपल्या मनगटावर दाबतो.
नि अदृश्य होतो.त्याच वेळी बॉडीलेसचा आवाज उमटतो.
" क्यों ? क्या हुआ ? नाराज हैं हमसे ? लेकिन क्या करे ,किसीके साथ कोई नाइंसाफी करे , यह हमें कतई मंजूर नहीं हैं इसलिए....
" एक बार सामने तो आओ फिर देखो तुम्हारा मैं क्या
हाल करता हूँ।"
" तुम्हारे सामने तो हूँ मैं उखाड़लो जो उखड़ना हैं ।"
" वैसे नही ।"
" फिर कैसे ?"
" मेरी तरह इंसान के रूप में आओ।"
" आऊँगा लेकिन अभी नहीं ।"
" क्यों ? डरते हो मुझसे ?"
" डरना तो उसे होता हैं जो गलत काम करता हैं और मै
आज तक कोई गलत काम नहीं किया ।"
" ऐसा सभी कहते हैं लेकिन ऐसा कोई भी नही जिसने कोई पाप ना किया हो।"
" पाप तो इंसान करते हैं , क्योंकि उनके अंदर लालच
छुपा होता है , हम जैसे मशिनों को पाप से क्या लेना चूंकि
लालच इन्सान का गहना है , मशिनोंका नहीं ।"
" ठीक है, कभी ना कभी सामने आना ही पड़ेगा तुम्हें तब
मैं तुझे अच्छी तरह सबक सिखा दूँगा ।"
" अगर मैं चाहूं तो तुम्हें अभी सबक सिखा सकता हूँ लेकिन मै ऐसा हरगिज़ नहीं करूंगा ।"
" क्या तुम्हें मै दिखाई दे रहा हूँ ?"
" बेशक दिखाई दे रहे हो ।"
" यह कैसा से संभव हो सकता हैं ?"
" वो इसलिए संभव हुआ है ,चूंकि तुम्हारा पासवर्ड मुझे
मालूम है, लेकिन मेरा पासवर्ड तुझे नहीं पता ।"
" पासवर्ड यह क्या होता हैं ?"
" तुम्हें नहीं पता ।"
" नहीं."
" इसी से जाहिर होता हैं तुम नकली हो और मैं असली हूं चूंकि हर स्वाप्टवेअर को कोई न कोई पासवर्ड जरूर होता हैं , समझे । "
" नहीं नहीं ऐसा नहीं हो सकता हैं, तुम झूठ बोल रहे हो।"
" तो ठीक है ,मैं बताता हुँ अब तुम किस पोजिशन में हो ?
ऐसा कहकर वह आगे बोला," इस वक्त तुम एक पैर पर खड़े हो और बाहे हाथ से अपने नाक को कुजा रहे हो। "
" हां ,लेकिन यह तुम्हें कैसा पता चला ?"
" कहा ना, मै तुम्हें जब चाहू जहाँ चाहू खत्म कर सकता हूँ इसलिए सुधर जाओ इसी में तुम्हारी भलाई है, चलता हूं
फिर मिलेंगे बाय ss असा बोलून आवाज बंद झाला.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा