बॉडीलेस १२
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
बॉडीलेस १२ |
बॉडीलेसचा राईट हॅन्ड बळीला पकडण्याचा प्लॅन एका बाजूला पोलिसांनी बनविलेले असते तर दुसऱ्या बाजूला तेच प्लॅन पाशा आणि जफर खानच्या माणसानी केलेले असते आणि तिसरीकडे बॉडीलेसने सुध्दा त्या दोघांच्या विरोधात प्लॅन केलेले असते की, पाशा आणि जफर खानच्या माणसांकडून दहशत वाद्याची गोपनिय माहिती मिळवायची होती. त्यासाठी त्यानं आपली माणसं त्यांच्या मागे लावली होती. शेवटी सर्वांची गाठ मयुरबार मध्ये पडली. सर्वजण मद्यपान करण्यासाठी मयुरबार मध्ये शिरले. तेव्हा त्यांनी एकमेकांना पाहीले आणि खुष झाले. प्रत्येकला वाटत असते. की आपण आपल्या वैऱ्यावर मात करू या उद्देशानेच पाशाचा राईट हॅन्ड विक्रम लोहार उर्फ विकीदादा तो नावाप्रमाणे शरीराने मजबूत एखाद्या पहिलवाना सारखा ! पिळदार शरीर हनुवटीवर बारीकशीच पण कोरीव केलीली दाढी , मिशा , मात्र पल्लेदार किचिंत वरती वळलेल्या , राकट डोळे , त्याच्या डोळ्यांत पाहणाऱ्यालाच भिती वाटत असे. डोक्यावर मात्र एकपण केस नाही. अशी एकंदरीत त्याची वेशभूषा असते. तो उठून उभा राहात म्हणाला," या महाशय आम्ही आपलीच वाट पाहत होतो. " तेव्हा आपल्याला काहीच माहित नाही असा अभिर्वाव करत बळी बोलला," अस्स ! का बरं ?" त्यावर तो बोलला," आमच्या बॉसनं आमंत्रण दिलंय तुम्हा सर्वांना ?" त्या सर्वांची थट्टा करत तो पुढे बोलला," मेजवाणीचं !" त्यावर प्रतीटोला म्हणून बळीनं त्याच्याच पद्धतीचे उत्तर देत म्हटले," का ? तुझ्या बॉसच्या बापाचं श्राध्द आहे का ?" असं म्हणता क्षणीच तो भयंकर चिडला नि गर्जला," हरामखोर ! " अंगावर एकदम चाल करून येतो. पण बळीला त्याची कल्पना असतेच त्याने त्याचा वाँर तर चुकविलाच ! शिवाय त्याच्या पोटात एक फाईट ठेवून दिली. पण तो सुतभर सुध्दा वाकला नाही. अथवा हलला नाही. उलट त्याने बळीला अलगत उचललं नि दूर फेकून दिलं. बळी बाकावर पडला. ते बाकच मोडून पडलं आणि बळी जमिनीवर आपटला. तसे बाकीचे साथीदार पण एकमेकांवर तुटून पडले. त्यातून सहीसलामत आणि गुपचूप पणे जयचंद म्हणजेच सस्पेंड पो. इन्स्पेक्टर वीरेंद्र राणे तेथून पसार झाला आणि मयुरबारच्या बाहेर येऊन त्याने आपल्या मोबाईलवरून पो. इन्स्पेक्टर अर्जुन जयकरला फोन केला आणि दोन गैंगमध्ये सुरू असलेल्या मारामारी विषयी माहिती दिली आणि पुन्हा आपल्या गटात सामील होऊन तो जफर खान आणि पाशाच्या माणसांना मारू लागला. मयुरबार मध्ये बसलेले इतर गिऱ्हाईक वाट फुटेल तेथून पळत सुटले. मयुरबारच्या मॅनेजरनेही पोलिसांना फोन केला आणि थोड्याच वेळात तेथे पोलिसांची जीप आली पोलिसांना पाहून काहीजण पळण्यास यशस्वी झाले. पण पो. इन्स्पेक्टर अर्जुनने एकाच्या पायावर गोळी झाडून त्याला जखमी केले. त्यामुळे बाकीच्यानी पळण्याचा प्रयत्न केला नाही. पोलिसांनी सर्वांना अटक केली नि पोलिसांच्या व्हॅन मध्ये बसविले. आणि पोलीस स्टेशनला घेऊन गेले. त्यावेळी पोलीसांच्या जीप मध्ये बसलेला बळी समजून चुकला की, पो. इन्स्पेक्टर अर्जुन जयकर मनात काहीतरी दुसरेच प्लॅन शिजतंय. तेव्हा त्याला आता आपली करामत दाखविणे फार गर्जेचे आहे. असा विचार करून त्याने आपल्या खिशातून टॅब बाहेर काढत पो. इन्स्पेक्टर अर्जुनला विचारले," इन्स्पेक्टर साहेब मला कुठे घेऊन चालले आहेत ?" त्यावर पो. इन्स्पेक्टर अर्जुन हसून म्हणाला," चिंता कशाला करतोयेस ? लवकरच कळेल ते तुला ?"
" बरं, मग मी माझ्या वकीलाला एक फोन करू शकतो का ?"
" अवश्य " असे अगोदर म्हटला खरा ! पण लगेच पो. इन्स्पेक्टर अर्जुनच्या मनात शंका आली की, वकीलाला फोन करायच्या बहाण्याने हा दुसऱ्याच कुणाला फोन करणार नाही ना ? अशी मनात शंका आली. तसा तो पटकन बोलला," थांब. तू नको करूस कुणाला फोन ? म्हणजे मला म्हणायचं आहे की, तू करू नकोस फोन मला सांग. त्या वकीलाचा फोन नंबर सांग. मी करतो त्याला फोन. " त्यावर बळी हसून म्हणाला," ओके ! तुम्ही करा फोन माझी काहीच हरकत नाही. "
असे बोलून त्याच्या हातात मोबाईल दिला. तेव्हा पो. इन्स्पेक्टर अर्जुन जयकर ने तो टॅब ऑन केला नि म्हटले," नंबर बोल " तेव्हा बळी हसून बोलला," त्यात नंबर आहे सर !" तेव्हा पो. इन्स्पेक्टर अर्जुन जयकर ने नंबर चेक करत म्हटले," ह्यात तर एकच नंबर आहे आणि तो सुध्दा कोणत्याही सीमकार्डचा नंबर नाहीये. "
" हां ! परंतु तो एक सीक्रेट नंबर आहे आणि तो काही खास लोकांजवळच असतो. डायल करा. म्हणजे आपोआप माहीत होईल. " पो. इन्स्पेक्टर अर्जुन बळीच्या वक्तव्याचे नवल तर वाटलेच ! पण त्या शिवाय मनात उत्सुकता जाणवली की, असा कोणता सिक्रेट नंबर आहे पाहू तर खरं ! असं मनात बोलून त्याने तो सिक्रेट नंबर डायल केला. तेव्हा स्क्रीनवर एक मॅसेज उमटला. त्याने तो वाचला. त्यात लिहीले होते की मे आय कम इन सर ! आणि लगेच त्या सिक्रेट मॅसेजच्या खाली " येस और नो." असे दोन पर्याय आले होते. पो. इन्स्पेक्टर अर्जुन ने येस वर आपले बोट ठेवून क्लीक केले. बस्स ! सर्व मॅसेज गायब होऊन त्या जागी ओके ! ही अक्षरे उमटली आणि लगेच ती अक्षरे सुध्दा गायब झाली आणि स्क्रीन ब्लॅक आऊट झाली .म्हणून पुन्हा ऑनचे बटण दाबले तर स्क्रीनवर पासवर्ड ही अक्षरे उमटली. तेव्हा पो. इन्स्पेक्टर अर्जुन जयकर बोलला," अरे, ही काय भानगड आहे ?" त्यावर बळी हसून बोलला," भानगड काहीच नाही. इन्स्पेक्टर साहेब तुमचा मॅसेज जिथे पोहोचला पाहीजे होता तेथे तो पोहोचला आहे. " तेव्हा पो. इन्स्पेक्टर अर्जुन जयकरने गोंधळून विचारले ," म्हणजे ? मी नाही समजलो. "
" चिता कशाला करता ? थोड्यावेळाने सर्वकाही समजून येईल. बस्स ! वेट अँन्ड वॉच !" असे बोलून तो खळखळून हसला. त्याच्या हसण्याने पो. इन्स्पेक्टर अर्जुन जयकर मात्र पुर्ण गोंधळून गेला आणि मॅसेज बद्दल विचार
करू लागला. पण त्याला त्या मॅसेज विषयी काही अर्थ बोध होईना. तो विचारांत गुंतलाच होता. इतक्यात एक आवाज कानी पडला- तुमने पुकारा और हम चले आये अपनी जान हथेली मेे लेके आये रे---
तेव्हा पो. इन्स्पेक्टर अर्जुन उद्गारला ," अरे, हा तर आवाज ओळखीचा वाटतोय असे बोलून त्याने आपल्या डाव्या बाजूला आपली मान वळवून पाहीले तर एकदम धक्काच बसला. कारण त्याच्या बाजूला बसलेला बळी अचानक गायब झालेला दिसला. तसा तो स्वतःशीच बोलला," अरे हा कुठं गेला ? " असे बोलून त्याने आपल्या आजूबाजूला वळून पाहीले. परंतु कुणीच दिसला नाही. मात्र बॉडीलेसचा आवाज त्याच्या कानी पडला- " अरे इकडे तिकडे काय पाहतोयेस ? मी इथंच आहे आणि तुझा शोजारीच बसलोय. विश्वास नाही ना बसत तुझा ? बरं मग मी तुझ्या जीपची किल्ली काढून घेतोय. "असे म्हणत असतानाच किल्ली आपोआप गोल फिरली नि जीपचे इंजिन बंद पडले आणि बळीचा आवाज कानी पडला ,
" थॅक्यु इन्स्पेक्टर साहेब बाय बाय सी यू !" असे बोलून आवाज बंद झाला. पो. इन्स्पेक्टर अर्जुन जयकर एकदम हतबल होऊन रागाने दात-ओठ खात जीप मधून खाली उतरला आणि जीपच्या चाकावर लाथ घातली आणि बॉडीलेसने फेकून दिलेली किल्ली त्याने उचलली नि जीप स्टार्ट केली. तेवढ्यात त्याच्या मेबाईलची बेल वाजली. म्हणून त्याने कॉल घेतला. तो कॉल पोलीस स्टेशन मधून आला होता. पलिकडून त्याला सांगण्यात आलेली माहिती एकदम थरारक होती. ती अशी-
काही वेळापुर्वी पकडून आणलेले सर्व कैदी फरार झाले आहेत. अर्थात बॉडीलेसने त्याना पोलीस स्टेशनच्या लॉकप रूम मधून सोडवून घेऊन गेला. पो. इन्स्पेक्टर अर्जुन खाली हाताने पोलीस स्टेशनला परतला.
बॉडीलेस त्या सर्वांना आपल्या अड्यावर घेऊन आला. नि त्याना एका रांगत उभे राहीला सांगितले. मरणाच्या भितीने ते सर्वजण एका रांगेत चुपचाप उभे राहील्यावर बॉडीलेस उद्गारला," आता विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे ताबडतोब द्यायची. जो उत्तर देणार नाही त्याला यमसदनास पाठविण्या सोय केलेली आहे. " असे बोलून त्याने प्रश्न विचारायला सुरूवात केलीे. त्याने दहशतवाद्या विषयी चौकशी केली. पण कुणीच समाधान कारक उत्तर दिलं नाही. म्हणून बॉडीलेस बोलला," बली लगा दे निशान इन कुत्तोंपर !" असे म्हणताच बळीने सर्वांवर पिस्तुल ताणले.तसा बॉडिलेसचा आवाज उमटला ," अब सुनो अगर तुम लोग आसान मौत चाहतो हो तो मेरे एक छोटेसे सवाल का जवाब दो और बली के हाथ आसान मौत मरो ! अगर नही तो मै तुम लोगोको ऐशी मौत मारूंगा की दुबारा जनम ले ने से तुम्हारी रूह भी कांप उठेगी क्या समझे ? नही समझे ? ठीक है, अब जरा नजर उठाकर सामने देखो एक नजारा !" असे म्हणताच समोरच्या भितींवर इन्स्पेक्टर श्रीकांतला मारलेले दृश्य चित्रपटा सारखे दिसू लागले. समोरील दृश्य पाहताना सर्वांना दरदरून घाम फुटला आणि सर्वांत भयानक दृश्य म्हणजे जित्यापणीच त्याला इलेक्ट्रिक शेगडीत टाकले. ते पाहून तर संपुर्ण अंगाचा थरकाप झाला. जसे दृश्य संपले. तसा बॉडीलेसचा आवाज उमटला," बोला कसं मरण हवंय तुम्हांला. "
तसा एकजण बोलला," आम्हाला ठार मारू नका. आम्ही तुम्हांला हवी ती माहिती देवू. "
" व्हेरी गुड ! अब समजदार बच्छो की तरह जो सवाल पुछा जाय उसका सही सही जवाब दे देना वर्ना जो अब देखा उससे भी बुरा हाल कर दुंगा तुम्हारा क्या समझे ?
तसा दुसरा पटकन बोलला," अजी बिलकुल समज गये !"
" तो अब बताओ आंतकवादी कब और कीस रास्ते से आ रहे है ?"
" समुद्र के रास्ते से ?"
" कब आ रहे है ?"
" यही दो चार दीनों में आने की संभवना है."
" पक्का ?"
" हां जी, एकदम पक्का !"
" तुम मे से कौन सही खबर हमे देगा यह बताओ मै उसकी जान बक्ष दुंगा " असे म्हणतातच सर्वजणच मी मी म्हणायला लागले. तसा बॉडीलेस बोलला," सबकी मै जान बक्ष नही सकता इसलिए कोई एक बोलो. "
तसे ते आपसात भांडू लागले. तसा बॉडीलेस मोठ्यानं ओरडला," खामोष ! " तसे सर्वजण शांत होतात. ते शांत होताच बॉडीलेस पुढं म्हणाला," अब मै अपना खेल का रुल्स बदल रहा हूं अब तुम लोगोंपर गोलीयोंगी बरसात होगी उस मे जो बच जायेगा उसे जिदंगी मिलेगी और बाकी लोगो को मौत मिलेगी अब देख ना यह है की गोलीयोंके बौछारोसे कौन अपने आपको बचा पाता है तो चलो, खेल शुरू !"
असे बोलून लगेच बळीला हुकूम सोडला," बली ले बली. " असं म्हणताच बळीने आपले पिस्तुल तानलेच होते. तेवढ्यात मध्येच जयचंद बोलला," बॉस गुस्तागी माफ, लेकिन मै आपसे कुछ कहना चाहता हूं ! " जयचंद बीच में बोलनेवालो को हम सजा क्या देते है यह तुम्हे पता नही है क्या ? "
" पता है बॉस लेकीन ---?
" ह्या लोकांना जिवानिशी ठार मारण्या पेक्षा आपल्या गैंग मध्ये सामील केले तर त्यात दोन फायदे होतील
आपले. "
" कोणते दोन फायदे ?"
" ते त्यांच्या गैंग मध्ये राहतील .पण काम आपल्यासाठी करतील."
" जयचंदच्या मताशी मी सहमत आहे बॉस !" बळी उद्गारला.
" बळी तुझं मत विचारले होते का मी ?"
" सॉरी बॉस !"
" ही दुसरी चुक केलीस तू ! "
" फक्त एकवेळ माफी असावी. "
" ठीक आहे. ही शेवटी संधी देत आहे. पुन्हा अशी चुक करू नको.ओके!"
" येस बॉस !"
" बॉस, आम्हाला जीवदान द्या. आम्ही तुमच्यासाठी काम करू ! " एकजण हिंम्मत करून म्हणाला. त्यावर बॉडीलेस बोलला," ठीक आहे. दिलं जीवदान. पण एक लक्षात ठेवा. अपराध्याला माफी नाही. " त्यावर कुणीच काही बोलला नाही. तेवढ्यात बॉडीलेस म्हणाला," बळी ss "
" येस बॉस! "
" घेऊन जा या साऱ्यांना आणि दहशतवाद्याना पकडूनच माघारी या कळलं. "
त्यानंतर सर्वजण एका मोटार मध्ये बसले. तेवढ्यात कसलाही सुगंध नाकाजवळ दरवळला. तसे सर्व बेशुध्द झाले. त्यानंतर मोटार सुरु झाली आणि जशी मोटार पडकी ईमारती जवळ आली तशी ती थांबली. त्यानंतर प्रत्येकजण आपापल्या मार्गाने निघून गेले.
सस्पेंड पो. इन्स्पेक्टर वीरेंद्र राणे आपल्या घरी पोहोचल्यावर पो. इन्स्पेक्टर अर्जुन जयकरला फोन केला. आणि त्याला आपल्या घरी बोलविले. जसा अर्जुन त्याच्या घरी पोहोचला. तसा त्याच्यावर रागवत सस्पेंड इन्स्पेक्टर वीरेंद्र राणे म्हणाला," किती मुश्किलने बळी हाती आला होता आपल्या आणि तू त्याला सरळ सोडून दिलेस. का केलेस तू असं ?"
" सर, तुम्हाला काय वाटतं मी त्याला सोडून दिलं त्याला ."
" मग सुटला कसा तो ?"
" मी नाही सोडला त्याला. "
असे म्हणून घडलेली सर्व हकीकत सविस्तरपणे कथन केली. ते ऐकून वीरेंद्र राणे बोलला," ओह ! म्हणजे हा सारा खेळ त्या बळीचा आहे तर !" त्यावर पो. इन्स्पेक्टर अर्जुन जयकरे बोलला,
" असं नाही म्हणता येणार सर !"
" का नाही म्हणता येणार ?"
" बॉडीलेसला बोलविण्याचे गुपित तर कळलं. पण बॉडीलेस कोण आहे हे अद्याप नाही, कळालं. "
" ते पण कळेल. "
" कसं ?"
" त्यासाठी तो टॅबच गायब करायला हवा. "
" म्हणजे ?"
" म्हणजे तो टॅब तोडून फोडून टाकायचा. म्हणजे न रहेगा बास न बजेगी बासरी. "
" येस यु आर राईट सर !"
" आता माझी पुढची योजना ऐक. "
असे बोलून दहशतवादी कुठून आणि कसे येणार आहेत त्या बद्दलची माहिती देत म्हटले," दहशतवादी ना पाशाच्या आणि नाही बॉडीलेसच्या हाती लागले पाहीजेत. तेव्हा पो. इन्स्पेक्टर अर्जुन ने विचारले,
" बॉडीलेस काय करणार त्याना स्वतःकडे नेऊन ?"
" काय करणार .....ठार मारेल तो त्याना."
" मग चांगले आहे ना तो आपले काम करतो तर !"
" हे एकदम चुकीचे बोलतो आहेस तू !"
" कसं ?"
" अपराध्याला शिक्षा करणं हे आपल्या देशाच्या न्यायदेवतेचं काम आहे. तेव्हा ते काम त्यानाच करू दे कसं ?"
त्यावर पो. इन्स्पेक्टर अर्जुन जयकर आपली चुक कबूल करून दिलगीरी व्यक्त करत बोलला," आय अँम सो सॉरी प्लीज डोन्ट मिस् अंडर स्टॅण्ड मी ! आणि खरं सांगायचं तर मला असं नव्हते म्हणायचे. "
" इट्स ओके !"
" बरं, मग येऊ मी ?"
" हो ! पण फोन करताच हजर व्हायचं तिथं. "
पो. इन्स्पेक्टर अर्जुन जयकरने आपली मान डोलावली आणि तेथून निघून गेले. तेव्हा त्या दोघांचे संभाषण चोरून ऐकत असणारा जफर खानचा एक साथीदार त्यांच्या मागोमाग बाहेर पडला. दहशतवाद्या बद्दल झालेले दोघांचे वक्तव्य जसंच्या तसं जफरखानच्या कानावर घातले. मग त्याने ही गोष्ट आपल्या धाकट्या भावाला सांगितली.
तेव्हा त्याचा भाऊ पाशा खान एकदम खुष होत बोलला,
" व्हेरी गुड अब आयेगा मजा !"
तेव्हा जफर खान बुचकाळात पडला नि मनात बोलला," मी एवढी चिंताजनक बातमी सांगितली तरी हा माणूस खूष होतोय. याचा अर्थ सरळ आहे की ह्याच्या मनात एक वेगळं प्लॅन आहे नक्कीच ! ह्याच्या डोक्यावर काहीतरी शिजतंय. त्याशिवाय हा इतका खूष होणार नाही. ह्याच्या डोक्यात नेमकं काय शिजतंय ते माहीत करून घ्यायलाच हवंय. आपल्याला असा विचार मनात करुन तो मग स्पष्टपणे म्हणाला , " छोटे तुम्हारे दीमाख मे इस समय क्या चल रहा है तनिक हमको भी समजा दो !"
" जरूर. "
असे बोलून त्याने आपले पुढील प्लॅन सविस्तरपणे
सांगून . पुढे सर्वांना ताकीद देत म्हटले ," काम एकदम योजनेनुसारच झालं पाहिजे . जर की त्यात जरा देखील चूक झाली तर मी एकाला सुद्धा जिवंत सोडणार नाही . हे सर्वांनी लक्षात ठेवा ."
त्यावर सर्वानी आपल्या माना डोलावल्या . तसा पाशा पुढे म्हणाला ," आणि हां बॉडीलेसच्या एकाही माणसाला जिवंत सोडू नका . दिसताक्षणी गोळ्या घाला त्या हरामखोराना . मग बॉडीलेस माझं काय वाकडं करतोय तेच पाहायचंय मला ."
" पण छोटे बॉडीलेसची आपण सामना कसा करणार ? शिवाय त्याच्या जवळ असलेला अदृश्य होण्याचा फॉर्म्युला कसा हस्तगत करणारा आपण ?
" त्यासाठी पण उपाय आहे माझ्याकडे ,"
" कोणता ?"
मग पाशाने त्याच्या कानात काहीतरी सांगितले . तसे जफर खान बोलला, " पण असं केल्याने तो फॉर्म्युला आपल्या हाती कधीच लागणार नाही ."
" भले आपल्या हाती फॉर्म्युला लागणार नाही . पण त्याची शक्ती तर नष्ट होईलच ना ? "
" पण तसं नाही घडलं तर . "
" तसं नाही घडलं तर त्याला समोर यावेच लागेल . "
" ओ ss आयसी . आता समजलं ."
तेवढ्यात पाशाच्या मोबाईलची बेल वाजू लागली. पाशा ने कॉल घेतला. तेव्हा पलिकडून दहशतवादी संघटनांचा प्रमुखाचा फोन आला- पाशाभाय काय ऐकतोय मी हे ?"
" काय ऐकलेस तू ?"
" आम्हाला खबर मिळालीय की,आम्हला पकडायला मुंबई पोलिसांनी साफळा लावलाय म्हणून."
" खरंय !"
" आणि तरी सुद्धा तू आम्हाला हिंदुस्थानात येण्याचे आमंत्रण देतो आहेस मूर्ख माणसा !"
" हो !"
" कशाला ? तुरुंगात सडायला का मरायला ?"
" ना सडायला आणि नाही मरायला ."
" म्हणजे ?"
" म्हणजे तुमच्या केसानाही धक्का लागणार नाही. याचा पूर्ण बंदोबस्त केला आहे आम्ही ! "
" कसा ? "
त्यानंतर पाशाने आपले रचलेले प्लॅन सविस्तर त्याला सांगितले . तसा तो खुश होऊन म्हणाला," व्हेरी गुड ! हमे यही उमीद थी आपसे ! बाकी बक्षिसाचा खरा मानकरी आहेस तू ! "
" थँक्स मि . रशीद खान ."
" पुढच्यावेळी हिंदुस्तानात येईन तेव्हा पैशान अंघोळ घालीन तुला . फक्त या वेळची योजना सफल होऊ दे, बस्स !"
" आप बेफिकीर रहीयेगा योजना तो हम करके ही दम लेंगे ! "
" ओके ! गुड जॉब ! गुड लक ! गुड बाय !" असे बोलून त्याने फोन कट केला . "
कमश:
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा