कुलांगार -६
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
कुलांगार -६ |
रोहन त्या दोघांच्या पाठमोरी आकृतीकडे पाहून स्वतःशीच हसला. नि मान वळवून पाठीमागे फिरला.
तेवढ्यात त्याच्या समोरून एक सूंदर शी मुलगी येत होती.
तिच्याकडे पाहताच तो स्वतःचे भान हरपून गेला. जणू काही तिला पाहताच बाला कलिजा खल्लास झाला ! आणि त्याच्या तोंडून आपोआपच शब्द बाहेर पडले . वाव ! काय
माल आहे, असा माल आपण प्रथमच पाहत आहोत. एकदा तरी हिला आपल्या अंगाखाली घ्यायल हवं. पण कशी मिळणार ? असा विचार मनात सुरू असतानाच ती त्याच्या
जवळ आली. तिने त्याला दुरूनच ओळखलं होतं की हा मुलगा आपल्याला न्याहाळत आहे, पाहिलं तिला वाटलं की
खरंच आपण फार सुंदर आहोत की आपल्याकडे मुले आकर्षली जातात. पण क्षणभरच. लगेच दुसऱ्या क्षणी तिला
जाणवलं की ह्याची नजर चांगली नाहीये. हे द्यानात येताच क्षणापूर्वी तिच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद कुठच्या कुठे
गायब झाला नि त्याची जागा आता क्रोधाने घेतली. ती त्याच्या जवळ पोहोचताच ती बोलली," काय पाहतोयस रे मेल्या ? कधी मुलगी पाहिली नाहीस का ?"
" पाहिल्या ना.... खूप ! पण तुझ्या सारखी एक पण नाही. फार आवडलीस तू मला."
" ए तोंड सांभाळून बोल रे भडव्या !"
" नाहीतर काय करशील ?"
" थोबाड लाल करीन."
" मग कर ना ? तुझ्या कोमल गुलाबी हाताने फार बरं
वाटेल मला." असे म्हणून तिच्या पुढे आपला गाल करतो तशी ती त्याच्या कानशिलावर एक थप्पड ठेवुन देते. नि
म्हणते ," हलकट मेला. लाज नाही मेलेल्य." तसा तो निर्लज्जपणे बोलला ," लाज मी केव्हाच कुवाळून प्यालोय
आता फक्त तुझ्या गुलाबी ओठांचा रसपान करायचं बाकी आहे. " असे म्हणताच ती भयंकर चिडली नि पायातील चप्पल काढली नि हातात घेतली. तेवढ्यात च समोरून काही
माणसं येताना दिसली. तसा तो समजला की इथून आता पळ
नाही काढला तर आपली धुलाई निश्चितच होणार असा विचार करून तो मागे वळला नि पळत सुटला. तशी ती स्वतःशीच हसली. नि आपल्या हातातील चप्पल खाली टाकली नि चालू लागली. तशी ती गावातील माणसं तिला
विचारू लागली काय म्हणत होता तो पुजाऱ्यांचा पोरगा ?
" आं sss हा पुजाऱ्यांचा पोरगा इतका उद्धट ! बाकीचे भाऊ किती सज्जन आहे ." तिने विचारले.
" तो इथं नव्हता ना ,म्हणून त्याला चांगलं वळण नाही."
" इथं नव्हता मग कुठं होता ?"
" तू कशी मुंबईला होतीस तसाच तो पण आपल्या आजोळी राहात होता. "
" तेव्हाच बिघडलेला आहे."
" तुला काही बोलला का ?"
" हा ना ?"
" काय म्हणाला तो ?"
" दुसरं काय म्हणणार छेडत होता तो."
" हो का ? तू एक काम कर, पुजाऱ्यां कडे जाऊन त्याची
कप्लेट दे, त्या शिवाय तो सुधारणार नाही."
" त्याची आता गरज नाही. खर्चा पुरते आज दिलंय मी
त्याला."
" हा ना, मग हरकत नाही."
" पण सावध रहा त्याच्यापासून. पार कामातून गेलेली केस आहे ती."
" ठीक आहे,येऊ मी !" ती बोलली.
" जा. सांभाळून." ती व्यक्ती बोलली. तशी चालू पडली.
आणि मनातल्या मनात विचार करू लागली. पुजाऱ्याचा मुलगा इतका वात्रट कसा काय ? जाऊ दे आपल्याला काय त्याचे." असे म्हणून ती आपल्या मार्गाने निघून गेली. तिला
वाटलं आज आपण त्याचा गाल सुजवला आहे ,या पुढे तो
आपल्या नादाला लागणार नाही. परंतु इथंच तिचं चुकलं.
तो दुखावलेल्या नागासारखा चवताळला होता. कधी एकदा
तिचा सूड घेईन असे त्याला झाले होते. तो तिच्या पाठलागावर राहिला . योग्य संधीची वाट पाहू लागला. नि ती
योग्य संधी मिळाली. संध्याकाळची वेळ होती. तिला दुकानात
जाऊन काहीतरी आणावयाचे होते. दुकान जरा गावापासून
दूर होते. म्हणजे दुसऱ्या वाडीत होते. आणि त्या दोन वाड्यांच्या मध्ये निर्जन वस्तीचा भाग होता. त्याचाच फायदा उचलून रोहन ने तिला मागून मिठी मारली नि ओरडू नये म्हणून तिचे तोंड धरले. आणि एका काळोख्या भागात घेऊन
गेला तेव्हा तिने त्याला खूप विनविले. परंतु त्याचा अंगी सैतान संचारले होते. तिचे काहीही न ऐकता त्याने तिच्यावर
बळजबरी केली. नि तिला तेथच टाकून तो पळून गेला.
ती कशीतरी आपले कपडे सावरत उठली नि घरी पोहोचली.
केस विस्कलेले, कपडे फाटलेले, नि धूळ लागलेली ते पाहताच तिच्या आईच्या काळजाचा एकदम ठोका चुकला.
तिने आपल्या मुलीला मिठी मारत तिला विचारले ," माली
काय झालं ग ? कोण होता तो राक्षस ?"
आगोदर ती काही सांगायलाच तयार नाही.फक्त मुसमुसत रडू लागली. थोड्यावेळ तिला रडू दिलं नि तिला वात्सल्याने गोजारून विचारले ," काय झालं लेकीं मला सांग.ना ?" तेव्हा तिने रडत रडत सविस्तर हकीकत आपल्या
आईला सांगितली. तेव्हा तिची आई चवताळून बोलली," त्या
हरामखोराणे तुझी अब्रू लुटली होय. उद्या पुजाऱ्यांच्या कानावरच घालते ही गोष्ट! " असे बोलून तिने आपल्या मायेच्या पदराखाली घेतले.
दुसऱ्या दिवशी माली च्या वडिलांनी अगोदर रोहनच्या
आजी-आजोबांकडे तक्रार केली. मग पुजाऱ्यांच्या कानावर
सुद्धा ही गोष्ट घातली. तेव्हा पुजारी म्हणाले की, पंचायतकडे
त्याची फिर्याद कर." तशी त्यांची धाकटी पत्नी मालीच्या वडिलांकडे पाहून किंचित हसल्या सारखे करून म्हणाली,
" अहो, जरा इकडे या पाहू ! " असे म्हणून त्याना एका बाजूला घेऊन जात म्हणाली ," अहो, काय बोलताय हे तुम्हाला कळतंय का काही ?"
" का ? काय झालं ?"
" आपल्या रोहन बद्दल कम्प्लेट द्यायला आले आहेत ते."
" हो बरोबर आहे."
" मग लफडं मिठवायचे सोडून पंचायत मध्ये जाण्याचा कसला सल्ला देताय तुम्ही ? "
" तुझ्या मुलाने अपराध केलाय त्या अपराधाची शिक्षा
झालीच पाहिजे त्याला."
" तुम्हीच बोलताय ना हे ?"
" हो मीच बोलतोय."
" हो बरोबर आहे,तुमच्या पोटचा पोरगा नाही आहे ना तो
तुम्ही कसे त्याला वाचवाल ?"
" माझा जरी असता तरी त्याला हीच शिक्षा मिळाली असती. " असे बोलून ते बाहेर येत मालीच्या वडिलांना म्हणाले," तुम्ही हा न्याय पंचायकडे मागा. कारण गावातील
सर्व तंटे पंचायतच सोडवते." असे म्हणताच माली चे वडील
दयानंद ला हात जोडतात नि तेथून निघून जातात.
दुसऱ्या दिवशी पंचायत भरते. त्या पंचायत मध्ये हा विषय मांडला जातो. आरोपीला बोलविले जाते नि गन्हेगाराही ! पंचायत दोन्ही पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेते
नि शेवटी निवडा करते की रोहन ने माली शी लग्न करावे.
रोहन ला ते मान्य होते. परंतु माली त्या गोष्टीस नकार देते.
ती बोलली ," ज्या नराधमाने माझी इज्जत धुळीला मिळविली
त्याच्याशी मी लग्न करू ? कदापि नाही."
" पोरी पंचयतचा हाच निर्णय आहे."
" मला मान्य नाही तो."
" मग तुझं काय म्हणणे आहे ?"
" त्याला शिक्षा व्हावी !"
" कोणती ?"
" तुरुंगवासाची !"
" तुरुंगवासाची शिक्षा व्हायला हे काही शहर नाहीये. हे गाव आहे. आजपर्यंत कोणताही निवडा कोर्टात गेला नाही."
" नसेल गेला पण माझा जाईल."
" पोरी कोर्टात किती बेअब्रू होईल तुझी याची कल्पना आहे का तुला ?"
" एकदा गेलेली अब्रू पुन्हा भरून येणार आहे का ? नाही
ना ? मग जिथं एवढी अब्रू गेली आहे तिथे आणखीन थोडी जाईल त्यात काय , पण अपराध्याला शिक्षा तर मिळेल ."
" तुझ्या सारख्या शहरात वाढलेल्या मुलींचा हाच तर
गैरसमज आहे. की कोर्टात गेल्यावर न्याय मिळतो म्हणून.
कित्येक जणांची अब्रू चव्हाट्यावर मांडली जाते याची तुला कल्पना नाहीये. "सरपंच बोलले.
" मला कोर्टात च जायचे आहे." माली उद्गारली.
" कोर्टात जायचं होतं तर पंचायत कशाला भरविली ?"
सरपंच तावातावाने बोलले. नि सर्वांना उद्देशून बोलले.चला हो मंडळी." तसे माली चे वडील म्हणाले ," थांबा सरपंच."
" अगोदर आपल्या मुलीला शिकवा, वडीलधाऱ्या माणसा
बरोबर कसं बोलायचे ते. " असे बोलून सरपंच निघून गेले.
तसे त्यांच्या पाठोपाठ पंचायत पण उठून निघून गेली. तसे
मालीचे वडील मालीवर रागवत म्हणाले ," पोरी काय केलेस हे ? "त्यावर माली म्हणाली , " बाबा, मी शहरात वाढलेली मुलगी आहे,मला हे गावातले पंचायचे निवाडे मान्य नाहीत."
" अगं पोरी ! गावात पंचायतच निवाडा करते."
" करत असतील पण मला मान्य नाही."
" ठीक आहे, आपण कोर्टात केस लढू. परंतु कोर्टात एकदा केस गेली ना , अब्रूची लक्तरे वेशीला टांगली जातील.
तुला माहीत नाहीये वकील कोर्टात काय काय अश्लील प्रश्न
विचारतात ते."
" माहितेय मला. मी पाहिलंय चित्रपटात ."
" अगं पोरी चित्रपटातील जीवन आणि वास्तविक जीवन
मध्ये फार फरक असतो."
" असू दे बाबा. मला न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे."
" ठीक आहे पोरी !" तिच्या वडिलांचा अगदीच नाईलाज
झाला. त्याना आता असं वाटू लागलं की उगीच आपण गावाला आलो. इतकी वर्षे मुंबईला काढली तेच बरं होतं.
त्यानंतर लवकरच कोर्टात खटला दाखल करण्यात आला.
आणि कोर्टात केस उभी राहिली. दोन्ही पक्ष्रकारांच्या वकिलांनी आपापला युक्तिवाद मांडला. मालीला त्या
वकिलाने एकदम अश्लील प्रश्न विचारले. परंतु माली ने एकदम निर्भयपणे सर्व प्रश्नांची उत्तरे सडेतोड दिली.
शेवटी रोहनला दोषी करार देऊन सात वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा कोर्टाने ठोठावली.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा