Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

कुलांगार -३

कुलांगार  -३
कुलांगार  -३

 

                                 ३

       कांचन ने पळून जाऊन राहुशी कोर्ट मॅरेज केला. कारण
राहुलच्या आई-वडिलांचा ही त्या दोघांच्या लग्नाला विरोध होता. अर्थात कोर्ट मॅरेज करण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय नव्हता दोघां जवळ. लग्न घरी आले तर राहुल च्या वडिलांनी  त्या दोघांना घरात प्रवेश न देता बाहेरच्या बाहेर हाकलून दिले. राहुलची आई त्या दोघांना घरात घेण्यास राजी होती; परंतु तिचे राहुलच्या वडिलांच्या पुढे काही चाललं नाही. तिचे म्हणणे होते की, आता मुलांनी लग्न केलेच आहे तर त्या दोघांना घ्या आता घरात." तसे राहुल चे वडील उद्गारले ,
    " अजिबात नाही. तुला ही त्यांच्या सोबत जायचं असेल
तर जाऊ शकतेस तू ." असे म्हटल्यानंतर त्या बिच्चाऱ्या
काय बोलणार म्हणा. त्या निरुत्तर झाल्या. त्यानंतर राहुल
आपल्या पत्नीला घेऊन तेथेच गावात भाड्याने एक खोली
घेतली नि त्यात ते दोघेजण  राहू लागले. राहुल गावातल्या शाळे मध्ये प्युन ची नोकरी करत होता. दोघांनी मधुचंद्र सुध्दा साजरा केला. त्या दोघांचे जीवन एकदम सुखात सुरू होते.
      लवकरच कांचन ला दिवस गेले. आणि तिच्या वर आकाश कोसळले. झाले असे की दयानंद आपली मोटार
घेऊन सरकारी कामा निमित्त तालुक्याला गेले होते. आणि
तिथले काम उरकून घरी येत असता अचानक त्यांच्यात
मोटारीचा ब्रेक फेल झाला. नि मोटार बेकाबू झाली. ते पाहून
मोठ्या ने ओरडून नि हॉर्न वाजवून रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांना  सूचना देत होते की रस्ता सोडून दूर उभे रहा. कारण मोटारीचा ब्रेक फेल झाला आहे. परंतु त्यांच्या आवाज राहुलच्या कानापर्यंत पोहोचलाच नाही. की काय कोण जाणे
तो बाजूला झालाच नाही. आणि जेव्हा त्याच्या लक्षात आले तेव्हा फार उशीर झाला होता. पण तरी देखील मोटार चालवत असलेल्या   ड्रायव्हर ने राहुल ला वाचविण्याचा प्रयत्न केला. अर्थात मोटारीचा स्टेरिंग झटकन  फिरविली ; परंतु तरी सुद्धा राहुल ला मोटारीची धडक बसलीच नि राहुल दूर फेकला गेला. मोटार गर्रकन फिरून रस्त्याच्या कडेला
उभ्या असलेल्या झाडावर जाऊन आदळली. आणि राहुल दूर फेकल्या गेल्यामुळे त्याचे डोके एका शिळावर आपटले.
नि डोके फुटले. ड्रायव्हरचेही डोके पुढे आपटवून  तो बेशुध्द
झाला. दयानंद मागच्या सीटवर  बसल्या असल्याने ते वाचले.
थोडासा मार लागला बस्स ! ते मोटारी मधून खाली
उतरले नि पळतच राहुलपाशी पोहोचले.  ते त्याला म्हणाले ," राहुल तू ! चल मी तुला इस्पितळात घेऊन जातो. "
लगेच राहुल त्याना ओळखले की हा आपला साडू आहे नि ह्याच्या सोबतच आपल्या कांचन चे लग्न होणार होते. परंतु ते आपल्यामुळे झाले नाही. पण आता आपण तर मरणारच आहोत आणि आपले आई- वडील तर आपल्या पत्नीचा
म्हणजेच कांचन चा सून म्हणून  स्वीकार  तर करणार नाहीच ! अर्थात  ती आपल्या शिवाय एकटी कशी जगेल
या जगात. असा विचार करून तो  म्हणाला ," आता मी वाचणार नाही. तेव्हा तुम्ही माझ्यासाठी एकच काम करा आणि ते म्हणजे माझ्या पत्नीशी लग्न करा."
     " काहीतरीच काय बोलतोयस ? तुला काहीही होणार
नाहीये."
     " ऐका माझं .....माझ्या पत्नीला माझ्याशिवाय दुसरं कुणी
नाहीये या जगात .म्हणून तुम्ही तिच्याशी लग्न करा नि माझ्या होणाऱ्या  बाळाला स्वतःचे नाव द्या. एवढं करू शकता ना माझ्यासाठी ?" त्यावर ते विचारात पडले. तसा तो म्हणाला,
     " मला वचन द्या. की तुम्ही माझ्या पत्नीला असं वाऱ्यावर
सोडणार नाही."
     " परंतु तुझी पत्नी माझा कदापि स्वीकार करणार नाही. कारण तिचं कुंकू माझ्यामुळे फुसले गेलंय."
     " मी बाजूला  झालो नाही आणि तुमच्या मोटारीचा ब्रेक फेल झाला होता तर त्यात तुम्ही काय करणार म्हणा."
     "  पण तरी सुध्दा...."
     " तुम्ही अजिबात चिंता करू नका. मी समजावेन  तिला.
पण तुम्ही मला अगोदर वचन द्या." दयानंद ने त्याला वचन
दिले. ती राजीखुषीने माझ्याशी लग्न करण्यास तयार असेल
तर मी तिच्याशी लग्न जरूर करेन. "  असे आश्वासन मिळताच त्याची मान एका बजूला कलली. नि त्याच्या शरीरातून प्राण पखेरू उडून गगनात गेला नि हवेत विरून
गेला. पण त्याच वेळी दरवाजा वर थाप पडली नि कांचन
ने दरवाजा उघडला समोर राहुलला पाहून ती हर्षभराने
म्हणाली ," आलेत तुम्ही मी चहा ठेवते. " तसा राहुल म्हणाला ," आता चहा नको. पण मी काय सांगतो ते नीट द्यान
देऊन ऐक." त्यावर ती म्हणाली ," मग ऐकते ना , पूर्ण रात्र पडली आहे आपल्याकडे." राहुलचा आत्मा बोलला," एवढा
वेळ माझ्याकडे नाहीये. मला जायला हवं."
    " कुठं जायचंय तुम्हाला ?"
    " खूप दूर. तेथून मी पुन्हा कधी येणार नाही."
    " म्हणजे ?"  कांचन ने न समजून विचारले.
    " माझे अँक्सिडेंट झालंय. मी आता या जगात नाहीये."
    " काय अभ्रद्र बोलताय तुम्ही !'
    " अभ्रद्र नाही, सत्य आहे ते. तू फक्त एकच कर. माझं
प्रेत घेऊन येणाऱ्याशी लग्न कर."
     " नाही. कदापि नाही."
     " ही माझी शेवटची इच्छा आहे असे तू समज." तिला वाटलं की राहुल नेहमी प्रमाणे तो आपली मस्करी करतोय.
म्हणून ती चिडून म्हणाली," राहुल किती वेळ सांगितले आहे मी तुला की अशी जीव घेनी मस्करी करत जाऊ नकोस म्हणून. मला नाही आवडत ती."
     " अगं आज मस्करी करत नाही मी !  खरं. तेच सांगतोय
की मी आता या जगात नाहीये." तेवढ्यात च दरवाजावर थाप पडली नि राहुल चा आत्मा अदृश्य झाला. तशी तिला
जाणीव झाली की हा भास होता. राहुल आताशा घरी आलाय. तिने पळतच जाऊन उघडला. नि समोर पाहते ते
काय राहुलचा मृतदेह घेऊन तिचे दयानंद भाऊजी येत आहेत. त्याना पाहून तिच्या तळ पायाची आग मस्तकाला
भिडली. नि सर्व मामला तिच्या द्यानात आला. की आपल्याशी लग्न करण्यासाठी भाऊजीनीच राहुल चे अँक्सिडेंट केले असावे. असा विचार करून त्यांच्या अंगावर
चालून जात म्हणाली," अच्छा तर हे सारे तुमचे कारस्थान आहे तर , मी तुमच्याशी लग्न केले नाही म्हणून तुम्ही माझ्या
नवऱ्याचे अँक्सिडेंट करविले . होय ना ?
     " कांचन हे खरं नाहीये."
     " चूप बसा. मला सर्व माहीत आहे." असे म्हणून ती
आँक्सिबोक्सी रडू लागली. त्यानंतर राहुलच्या आई-वडिलांना कळविण्यात आले. तसे त्याचे आई-वडील तेथे आले.  आणि तिला खरी खोटी सुनावली. राहुलची आई म्हणाली ," तू माझ्या मुलाच्या जीवनात आलीस नि माझ्या मुलालाच खाऊन बसलीस. पांढऱ्या पायाची मेली !"
   अशी अनेक दुषणे दिली त्यांनी. कांचन ने निमूटपणे सारे
ऐकून घेतले. त्यानंतर राहुलच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार
करण्यात आले. उत्तरक्रियेच्या वेळी कांचन ला राहुलच्या
घरी गेली होती परंतु कांचन ला घरात प्रवेश मिळाला नाही.
उलट अपमानित करून घरातून हाकलून दिले. मोठ्या निराश
मनाने कांचन माघारी घरी परतली.
       त्यानंतर कांचन चे आई-वडील कांचन ला आपल्या घरी घेऊन गेले. काही दिवसानंतर तिच्या आई-वडिलांनी तिची समजूत काढली. एक तर तुझं समाज्या समोर लग्न
झाले नाही शिवाय तुझे सासू-सासरे तुझा स्वीकार करायला
तयार नाहीत. अर्थात तुझ्या समोर फक्त एकच पर्याय उरतो
आणि तो म्हणजे तू आपल्या मोठ्या बहिणी प्रमाणे दयानंदरावांशी लग्न कर." असे म्हणताच तिला भयंकर राग
आला. परंतु तो राग त्यांच्या समोर जाहीर करत नाही. आपल्या मोठ्या मेहुण्या मुळेच आपला राहुल या जगात नाहीये. अर्थात त्याचा सूड तर घ्यायला पाहिजेच. असा विचार करून ती दयानंद शी लग्न करण्यास तयार झाली. आणि लवकरच थाटामाटात लग्न पार पडले. परंतु पहिल्याच रात्री तिने त्याना सांगून टाकले की मी केवळ माझ्या राहुलची अंतिम इच्छा म्हणून तुमच्याशी लग्न केले आहे. बाकी मी तुम्हाला माझा नवरा म्हणून कदापि स्वीकार करणार नाही . आणि तुम्ही माझ्या जवळ कधी यायचं सुध्दा नाहीये. तसे दयानंद ने तिला वचन दिले की, तुझ्या परवानगी शिवाय मी तुला स्पर्श सुद्धा करणार नाही. आणि त्या दिवसानंतर ते कधीही तिच्या खोलीत फिरकले सुध्दा नाहीत. तिच्या दोन्ही बहिणी नी तिला खूप समजाविले ; परंतु तिने कुणाचेच ऐकले नाही. जणू काही तिच्या बहिणी सुध्दा तिच्या वैरी झाल्या होत्या.
    आणि  काही दिवसातच खुशखबर ऐकायला मिळाली की  तिच्या मोठ्या दोन्ही बहिणींना दिवस गेलेत म्हणून. अर्थात ज्योतिषाची भविष्यवाणी खरी ठरली. परंतु कांचन
मात्र मनातून तिरस्कार करत होती. फक्त ती कुणाला जाणवू
देत नव्हती.

      नवं महिने पूर्ण होताच कांचन ने एका मुलास जन्म
दिला. मुलाचे नाव रोहन ठेवण्यात आले. परंतु ही गोष्ट
जशी गोष्ट राहुलच्या आई-वडिलांना समजली तसे ते राहुलची शेवटची निशाणी घ्यायला ते दयानंद च्या घरी आले.
तेव्हा दयानंद म्हणाले ," जर तुम्ही आपल्या नातू सोबत आपल्या सुनेचाही स्वीकार करत असाल तर माझी काहीच
हरकत नाहीये." परंतु त्याना फक्त राहुल चा मुलगा हवा होता. तेव्हा दयानंद ने कांचन ला विचारले की तुझी इच्छा काय आहे ? " खरे सांगायचे तर तिला आपल्या सासू-सासऱ्याना आपला मुलगा द्यायचा नव्हता. केवळ दयानंद वर सूड उगविण्याच्या हेतूने   तिने त्याना सांगितले की , मुलगा लहान आहे, तोपर्यंत माझ्याकडेच राहील. पाच वर्षांचा झाल्यानंतर तुम्ही त्याला स्वतःकडे  नेऊ शकता. मग दयानंद तिच्या सासू-सासऱ्यांची समजूत काढली. की मुलगा लहान आहे तेव्हा त्याला तिच्या आईकडेच राहू दे. मोठा झाल्यावर तुम्ही त्याला नेऊ शकता.
       त्यांनंतर कल्याणी नि सुमती या दोघीनाही मुलं झाली.
अर्थात सुमती ला दोन जुळे मुलं  झाली एक मुलगी नि एक मुलगा आणि कल्याणीला मात्र एक मुलगा झाला. सर्व मुलांची नावे ठेवण्यात आली. कल्याणी च्या मुलाचे नाव राघव ठेवण्यात आले तर सुमती च्या मुलांचे नाव सुरेखा आणि सुरेश ठेवण्यात आले. रोहन पाच वर्षाचा झाला तसा त्याची कस्टडी मागण्यासाठी राहुलचे आई-वडील दयानंद च्या घरी आले. परंतु कांचन आता आपलं मूल द्यायला तयार होईना.
    शेवटी त्यानी कोर्टात जाण्याची धमकी दिली. तरी सुध्दा
तिने त्याना दाद दिली नाही. म्हणून त्यांनी तिला राहुलची
शपथ घातली. तेव्हा नाईलाजाने तिने रोहनला त्यांच्या स्वाधीन केले. परंतु तिने एक अट ठेवली  की, मला रोहनला भेटण्याची इच्छा जेव्हा होईल तेव्हा मला त्याला भेटू द्यावे. तरच मी रोहन तुमच्या स्वाधीन करिन." नाईलाजाने का होईना शेवटीत्याना परवानगी द्यावी लागलीच. मग काय रोजच रोहनला भेटायला त्या घरी जाऊ लागली. ते पाहून राहुलच्या आई-वडिलांनी एक निर्णय घेतला. की हे गाव सोडून कुठंतरी निघून जावे जेणेकरून त्याची आई त्याला भेटायला येऊ नये. असा विचार पक्का होताच एके दिवशी गुपचूप ते दांपत्य आपले गाव सोडून रोहन घेऊन कुठंतरी निघून गेले. हे जेव्हा कांचन ला कळले तेव्हा तिला फार वाईट वाटले नि स्वतःचा राग आला. की का आपण आपल्या मुलाला त्यांच्या स्वाधीन केले ? आता कुठं शोधवयाचे त्याला ? पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविली. परंतु पोलीस तरी काय करणार  त्या मुलाचे आजी-आजोबा नातवाला सोबत घेऊन गेले तर ! फक्त एक होऊ शकते की एवढ्या लहान वयात त्या मुलाला आईची गरज आहे,  परंतु पळून जाणाऱ्यांची वाट जरी एक असली तरी त्याला शोधणाऱ्यांच्या वाटा हजार असतात. अर्थात ते कोणत्या  दिशेला गेलेत हे कसे कळणार ना ?  त्यामुळे पोलीस तपास सुरू आहे. एवढेच उत्तर मिळू शकते. पोलिसांकडून. बस्स !

क्रमशः

  

     

टिप्पण्या

Popular posts

रामायण -१ | Ramayana episode 1 | Author :- mahendranath prabhu

Janmashtami 2022: 18 या 19 अगस्त कब मनाई जाएगी जन्माष्टमी?

शादी से पहले अपनी बेटी सोनाक्षी सिन्हा से अनबन पर शत्रुघ्न सिन्हा की प्रतिक्रिया..