वंशवेल -२
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
वंशवेल -२ |
वंशवेल २
दुसऱ्या पत्नीला वाटलं की आता सर्वस्व आपलाच
नवरा ,परंतु तसे मात्र घडले नाही. पुरुषोत्तम संध्याकाळी
कामावरून सुटला की सरळ पहिल्या पत्नीच्या घरी जाई.
त्यामुळे त्याचे चहा-पाणी सारे काही तिथेच होई कधी कधी
रात्रीचा डिनर सुध्दा पत्नीकडे होई. झोपायला मात्र दुसरीकडे
जाई . तेव्हा त्याला विचारी की आज उशीर का घरी यायला
तर काहीतरी थातुरमातुर कारण सांगून वेळ मारून नेई.
असे करता करता कधी कधी रात्रीचा मुक्काम सुध्दा पहिल्या
पत्नीच्या घरी होई. त्यामुळे तिला आता आपल्या नवऱ्याचा
दाट संशय येऊ लागला. मग ते खरे आहे का खोटे हे पाहण्यासाठी मुद्दाम तिने पाळत ठेवली. म्हणजे घरी यायला
उशीर झाला तसा ती आपल्या घरून निघाली मोठीच्या
घरी यायला. पाहते तर काय खरंच आपला नवरा आपल्या सवती कडे आहे ,हे पाहून तिच्या तळ पायाची आग मस्तकाला भिडली. ती तशीच घरात शिरली. नि म्हणाली,
" हे तुमच्या मित्राचे घर आहे ना ?"
" माझं जरा ऐकून तर घे."
" काही ऐकायचं नाही मला तुमचं. माझ्याशी खोटे बोलून
माझ्या सवतीकडे येता तुम्ही !"
" हो ; येतो त्यात काय बायको आहे ती माझी !"
" मग मी कोण ?"
" तू पण बायकोच पण बायको सारखे राहावे."
" वा ! तुम्ही इथं मजा मारा आणि मी बसते इकडे वाट पाहत आता येतील - आता येतील म्हणून."
" पण शेवटी येतोच ना ?"
" मी कशासाठी नेलं तुम्हाला इथून. परत येण्यासाठी ...?"
तसे मिराबाई ने मध्ये तोंड घातलं. परत येण्यासाठी म्हणजे
काय गं ? फक्त तुझ्याच अधिकार आहे का त्यांच्यावर ?
माझा नाहीये ?"
" माझ्याशी लग्न करण्या अगोदर होता,आता नाहीये तुझा आता त्यांच्यावर अधिकार ? आता फक्त माझा अधिकार आहे त्यांच्या वर."
" कसा नाहीये मी काय घटस्फोट दिलाय का त्याना ?
अधिकार नसायला ? खरं माझाच अधिकार आहे अजूनही
त्यांच्यावर. उलट तुझे लग्न अवैध मानले जाईल. आली मोठी
मला शिकवायला." तशी ती आपल्या नवऱ्या कडे रागाने
पाहत म्हणाली ," काय हो काय बोलते ही ?"
" खरं तेच."
" म्हणजे तुम्ही माझी फसवणूक केलीत."
" फसवणूक कसली त्यात ? सर्वकाही तर तुझ्या मनासारखे केलंय. वेगळं घर पाहिजे तर वेगळं घर घेऊन
दिलंय अजून काय हवंय तुला ?"
" तुम्ही इथं यायचं नाही ?"
" का नाही यायचं ? मी सुध्दा बायको आहे त्यांची. आणि ती सुध्दा पहिली बायको. अर्थात पहिल्या बायकोलाच खरा
मान असतो."
" मी आताच माहेरी निघून जाते."
" खुशाल जा." मिराबाई उद्गारली.
" अगं तू तरी समजून घे." पुरुषोत्तम उद्गारला.
" आतापर्यंत समजून तर घेतलं नाहीतर तुम्हाला इथून
तिला नेऊ दिलं असतं ?" कांताबाई पाय आपटत तेथून
निघून गेली. तसे पुरुषोत्तम ही तिच्या पाठोपाठ निघून गेले.
ती आपली घरी आली नि रडत बसली. पुरुषोत्तम ने तिला
समजविण्याचा प्रयत्न केला, परंतु ती ऐकली नाही.रागाने रुसून बसली.सकाळ होताच आपल्या बॅगेत कपडे घेतले
नि माहेरी निघून गेली. दोन दिवस तिची वाट पाहिली. राग
थंड झाल्यावर येईल म्हणून पण ती नाही आली. म्हणून
तिसऱ्या दिवशी पुरुषोत्तम तिला आणायला तिच्या घरी
गेला. तर तिची आई म्हणाली ," जावई बापू तिचं म्हणणं आहे
की तुम्ही तिच्या सवती कडे अजिबात जायचं नाही. हे जर
मान्य असेल तरच ती तुमच्या सोबत येईल. अन्यता....?
" अन्यता काय ?"
" ते तुम्ही समजा काय समजायचं ते."
" ठीक आहे, मग तिला सांगा इथंच वाट पाहत बैस
आयुष्यभर !" तशी सासूबाई म्हणाली ," जावई बापू असं कसं म्हणता तुम्ही ?"
" मग आणखीन काय म्हणू ते तुम्हीच सांगा."
" अहो, असं कुणी वागतं का आपल्या पत्नी सोबत ?"
" मग पत्नी सुध्दा अशी वागत आपल्या नवऱ्या सोबत."
असे म्हणताच मघापासून बाहेर न आलेली बाहेर येत
बोलली ," काय चुकीची वागले मी ?"
" असं घर सोडून येतं का कुणी ?"
" काय घरात ठेवलंय त्या ?"
" म्हणजे ?"
" तुम्ही जाऊन बसता पहिल्या बायकोच्या घरी ! मी बसते
एकटीच रात्रभर मच्छर मारत."
" काय ऐकतेय मी हे जावई बापू !"
" रोज नाही पण कधी कधी पहील्या बसयकोकडे सुध्दा
झोपायलाच पाहिजे ना ? तिचा पण तर अधिकार आहे माझ्यावर."
" इतकी वर्षे झोपली तरी भागले नाही का अजून तिचे ?"
सासूबाई उद्गारली," अजून जवळ नवरा हवाय का तिला ?"
" सासूबाई , तोंड सांभाळून बोला. तुमच्या वयाच्या
माणसाला शोभत नाही हे बोलायला."
" मग तुम्हाला तरी शोभते का दुसऱ्या बायकोला सोडून
पहिल्या बायको कडे झोपायला ?"
" सासूबाई , चांगले ठाऊक आहे की खरा मान पहिल्या
बायकोचाच असतो."
" मग लग्नच कशाला करायचं होतं ,बसायचं होतं ना, पहिल्याच बायकोला कवटाळून !" कांता राग सहन झाल्याने
बोलली. त्यावर पुरुषोत्तम उद्गारला ," तुला यायचं आहे किंवा
नाही तेवढं फक्त सांग."
" जोपर्यंत तुम्ही मोठीला घटस्फोट देत नाही तोपर्यंत मी
तिकडे येणार नाही."
" हे मोठी माझी पत्नी आहे नि शेवट पर्यंत पत्नीच
राहणार. तुला यायचं नसेल तर येऊ नकोस. इथंच रहा
कायम. " असे म्हणून पुरुषोत्तम तेथून निघाले.
थोड्या वेळ पाहिली ती येईल म्हणून पण ती नाही
आली म्हणून ते सरळ आपल्या पहील्या पत्नी कडे निघून
आले. तेव्हा कांताबाईची आई म्हणाली ," कांते तुझा नवरा
तुझ्या मुठीत राहील असं वाटत नाही, तेव्हा मूल होईपर्यंत
तुला तेथेच जाऊन रहावे लागेल. एकदा का मूल झालं की
मग बघ तुझ्या पुढे मागे शेपूट कडे हलवितो ते. तेव्हा आता
तू माघार घे. जा सासरी योग्य वेळ येताच त्याचा वचपा काढू .
" तुझं काय म्हणणे मी आपले नाक मुठीत घेऊन सासरी
जाऊ ?"
" काय हरकत आहे, नवऱ्याच्याच घरी तर जायचं आहे."
" अगं म्हणून काय झालं ? माझी इज्जत काय राहील?"
" तुझ्या इज्जतीला काही होत जा मुकाट्याने. मी सांगते तसे कर. सर्वकाही ठीक होईल."
" ठीक आहे, मला जरा विचार करू दे."
पुरुषोत्तम सरळ आपल्या घरी निघून आले. थोड्या वेळ पाहिली ती येईल म्हणून पण ती नाही आली म्हणून ते सरळ आपल्या पहील्या पत्नी कडे निघून आले. तेव्हा मिराबाई ने त्याना विचारले ," काय झालं ? नाही आली ?"
" नको येऊ दे, चल जास्त भाव द्यायचा नाही कुणाला !"
" असं कसं म्हणता ? कशी असली तरी ती आता तुमची
बायको आहे ."
" मग काय तिचे चरण धरू नि म्हणू बाई गं तुझ्या साऱ्या
अटी मान्य आहेत मला. आता राग सोड नि चल घरी !"
" अटी ! कसल्या अटी घातल्या तिने ?"
" एक नाही अनेक ."
" म्हणजे ?"
" तुझ्याशी संबंध ठेवायचा नाही म्हणते."
" बरं अजून."
" तुझ्यापासून घटस्फोट घ्यायला सांगते."
" मग घ्या ना ?"
" काय ? तू बोलतेस हे ?"
" हो ; मीच बोलते."
" विचार केला का ?
" हो !"
" काय हो , तुझ्या जवळ मला येऊ पण येणार नाही ती."
" मग नका येऊ ना ?"
" तू राहशील माझ्या शिवाय ?"
" ते सांगणे कठीण आहे, परंतु प्रयत्न करेन."
" पण मला हे मान्य नसेल तर ?"
" तुम्हाला मुलगा हवाय ना ?"
" अगं मुलगा हवाय म्हणून काय वाट्टेल ते ऐकून घेणार नाही मी !"
" थोडे दिवस ऐकून घ्या. एकदा मूल झालं की बरोबर
वठणीवर येईल."
" आणि नाही आली तर !"
" ते नंतरच नंतर पाहू !"
" पण ती घटस्फोट पण घ्यायला सांगते."
" मग घ्या ना घटस्फोट !"
" काय बोलते तू हे ?"
" अहो, घटस्फोट घेतला म्हणजे तुमचं माझं नातं संपणार
आहे का ? ते फक्त माध्यम बनविले. एकमेकांपासून दूर
होण्यासाठी ! फक्त मनाची समजूत आहे ती. नाहीतर मला
सांगा. लग्नाच्या वेळी अग्नी सभोवती मारलेले फेरे परत उलट मारले जातात का ? नाही ना ? मग लग्न बंधन तुटले
कसे ? फक्त कोर्टाच्या एका कागदाने ? कसं शक्य आहे ."
" तू म्हणतेस ते पटतंय मला. पण असं केलं तर ती
फार शेफारूनजाईल असं नाही वाटत तुला."
" शेफारु दे ना, थोडे दिवस मग तर आपलंच राज आहे."
" ठीक आहे, मी विचार करतो यावर."
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा