हे सारे तुझ्यासाठीच ६
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
हे सारे तुझ्यासाठीच ६ |
विलास चे आई-वडील पोलीस स्टेशनला पोहोचले नि
त्यांनी आपला मुलगा अचानक बेपत्ता असल्याची तक्रार
पोलीस स्टेशनला नोंदविली. इन्स्पेक्टर विजय ने त्याना
विचारले की तुमचा मुलगा कुणा सोबत गेलास हे तुम्हाला आठवते का काही ?" तेव्हा त्याची आई म्हणाली,
" हां काल त्याच्या एका मित्राचा फोन आला होता तो
त्याच्या सोबत गेला."
" त्याच्या त्या मित्राचे तुम्हांला नाव वगैरे माहीत आहे का ?"
" हो आहे ना !"
" काय नाव त्या मुलाचे ?"
" राजेश त्या मुलाचे नाव." तसे लगेच विजय कदम ने
कॉन्स्टेबल हरीश ला इशारा केला की राजेश ला फोन लाव
नि ताबडतोब पोलीस स्टेशनला हजर व्हायला सांग."
कॉन्स्टेबल हरीश ने राजेश ला फोन लावून त्याला ताबडतोब पोलीस स्टेशनला यायला सांगितले. आणि थोड्याच वेळात राजेश पोलीस स्टेशनला हजर झाला. तेव्हा इन्स्पेक्टर विजय ने त्याला विचारले की, काल कुठं गेला होता तुम्ही दोघे ?" राजेशच्या आई-वडिलांना पाहून तो समजला. त्याने घडलेली सविस्तर हकीकत पोलिसांना सांगितली. ते ऐकून सर्वांच्या अंगावर भीतीने काटा उभा राहिला. तेव्हा इन्स्पेक्टर विजय म्हणाले," म्हणजे तुम्ही
सर्वजण त्या मंत्री महोदयच्या फार्म हाऊस वर होता तर !"
" हां साहेब , त्यांनी आम्हां सर्वांना फोन करून बोलविले
होते."
" म्हणजे काल तुमच्या सोबत सौंदर्या पण होती तर !"
" हां सर !"
" आणि तुझ्या म्हणण्यानुसार विलास आणि सौंदर्या
अचानक गायब झाली."
" हां सर ! असंच घडलंय."
" कुणाला मूर्ख बनवितोस आहेस हां ?"
" नाही साहेब , मी खरं तेच बोलतोय."
" तू म्हणतोस ते जर खरे आहे तर सौंदर्या आपल्या घरी कशी पोहोचली."
" घरी पोहोचली...... हे कसं शक्य आहे ?"
" हेच तर सत्य आहे. कारण काल रात्री तिच्या आईचा फोन मला आला होता. ती सुखरूप घरी पोहोचल्या बद्दल."
" माझं म्हणणं खोटे वाटत असेल तर धनराज च्या
वडिलांना फोन लावून विचारा म्हणजे सत्य काय आहे तर
कळेल." लगेच विजय कदम ने मंत्री महोदयना फोन केला
नि काल घडलेल्या प्रसंगाची चौकशी केली असता राजेश
सत्य बोलत असल्याचे सिध्द झाले. परंतु सौंदर्या घरी कशी
पोहोचली हे जाणून घेण्यासाठी त्यांनी सौदर्या च्या आईला
फोन करून सौंदर्याला घेऊन पोलीस स्टेशनला यायला सांगितले. तेव्हा सौंदर्याच्या आईने विचारले ," काय झालं
साहेब ? का बोलवताय आम्हाला ?"
" तुम्ही अगोदर सौदर्या ला घेऊन पोलीस स्टेशनला या
मग सांगतो."
" ठीक आहे,येते मी !" असे म्हणून तिने फोन कट केला.
आणि थोड्याच वेळात दोघी मायलेकी पोलीस स्टेशनला
हजर झाल्या. तेव्हा विजय कदम सौदर्याच्या आईला म्हणाले,
" तुम्ही जरा बाहेर बसता का ? मला सौदर्या ला काही
प्रश्न विचारायचे आहेत त्यासाठी एकांत हवाय." तशी सौदर्याची आई उठून बाहेर गेली. त्यानंतर इन्स्पेक्टर विजयने सौदर्याला मंत्र्यांच्या फार्म हाऊस वर काय घडलं याची चौकशी केली. तेव्हा सौदर्या ने तिथे घडलेली हकीगत सांगितली. ते ऐकून इन्स्पेक्टर विजय कदम म्हणाले ," तुझ्या म्हणण्या प्रमाणे तुला धनराजचा आत्मा दिसला. तेव्हा तू किंचाळलीस आणि बेशुध्द झाली. त्यानंतर तू जेव्हा डोळे उघडलेस तेव्हा तुला जाणवले की तू घरी आहेस."
" हां सर !"
" तिथं तू कशी पोहोचलीस हे तुला ठाऊक नाही , असेच
ना !"
" हां सर !"
" तुला काय आम्ही मूर्ख वाटलोय की काय ? तू काहीही
सांगशील नि आम्ही त्यावर विश्वास करू !"
" पण सत्य हेच आहे सर !"
" नाही. सत्य हे नाहीये तू काहीतरी पोलिसापासून लपवीत आहेस."
" नाही सर मी काहीही लपवीत नाहीये. मी सांगते ते
अगदी खरे आहे, राजेश , प्रताप , विनय, प्रकाश या सर्वांना पण विचारून पहा." तेव्हा इन्स्पेक्टर विजय ने विलास ला विचारले की , सौदर्या म्हणते की तिला धनराज चा आत्मा
दिसला ही गोष्ट खरी आहे का ?" त्यावर विलास म्हणाला,
" तिला दिसला की नाही ते मला माहित नाही. परंतु आम्हाला धनराज चा आत्मा दिसला. म्हणजे विवेकाच्या
जाग्यावर आम्हाला धनराज दिसला."
" म्हणजे विवेक गायब झाला का ?"
" हां !"
" आणि परत कधी दिसू लागला विवेक ?"
" थोड्या वेळानंतर." इन्स्पेक्टर विजय कदम सहित सर्वजण आश्चर्यचकित झाले आणि त्याना स्वतःला प्रश्न पडला की धनराजचा मृतदेह तर सापडला नाही. जर धनराज ला भुताने ठार मारले तर त्याची डेडबॉडी तर
भेटायला पाहिजे. काय गौडबंगाल आहे खरंच काही कळत नाही. विलास ची पण डेडबॉडी तर सापडली नाही. मग काय त्याला मृत घोषित करायचे ! छे छे छे ! असं कसं शक्य आहे ? डेडबॉडी जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत त्याला मृत घोषित केले जाणार नाही. हातात काहीच पुरावा नाही आणि शोध घ्यावा तरी कसा ? शेवटी सर्वांना सोडून दिले नि विलास च्या आई-वडिलांना आश्वासन दिले की आम्ही लवकरच या गोष्टीचा छडा लावू !" विलास चे आई-वडील निघून गेल्या नंतर कॉन्स्टेबल हरीश ने विचारले ," पुरावा तर काहीच हाती लागत नाहीत नि शोध घ्यायचा तरी कसा ?"
" गुन्हेगार फार चालाख आहे, परंतु प्रत्येक गुन्हेगार
काही ना काही चूक करतोच." असे म्हणून चूप होतात.
थोड्याच वेळात त्याना काहीतरी आठवते तसे ते म्हणाले,
कॉन्स्टेबल हरीश विलासच्या मोबाईल चे लास्ट चे लोकेशन्स कुठलं आहे हे पाहिलेस का ?" कॉन्स्टेबल हरिश उत्तरला,
" फार्म हाऊस पर्यंत चा आहे, पुढे मोबाईल स्वीच ऑफ
दाखवत आहे." तेव्हा इन्स्पेक्टर विजय कदम म्हणाले," हरीश तुला काय वाटतं काय प्रकार आहे हा ?"
" माझं तर डोकंच चालत नाहीये."
" आपण एक काम करू या ."
" कोणतं सर ?"
" महाकाल तांत्रिकाच्या हातात बेड्या ठोकून पोलीस स्टेशनला आणू आता तोच आपल्या साऱ्या प्रश्नांची उत्तरे देईल."
" परंतु त्याने आपला प्राण काढून दुसऱ्या कोणाच्या
शरीरात टाकला तर हो !"
" तुला वाटतं असं तो खरंच करू शकेल ?"
" मघाशी ऐकलंत नाही का धनराज चा मित्र काय म्हणाला ते."
" अरे त्याला तसा भास झाला असेल. तू पण काय त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो आहेस ? चल माझ्या सोबत काहीही होत नाहीये." कॉन्स्टेबल हरीश मनातून घाबरलेला असतो. त्याची मुळीच जाण्याची इच्छा नव्हती. परंतु इन्स्पेक्टर विजय कदम चा आदेश डावलु पण शकत नाही. शेवटी नाईलाजाने जायला तयार झाला. इन्स्पेक्टर विजय कदम सोबत एक पोलीस पथक घेऊनच निघाले. आणि थोड्याच वेळात पोलिसांचा गराडा गुहेच्या सभोवती पडला. इन्स्पेक्टर विजय कदम बाहेरून तांत्रिक महाकाल ला हांक मारतात.आणि थोड्याच वेळात महाकाल स्वतःहून बाहेर येत म्हणाला ," बोला इन्स्पेक्टर साहेब आज
काय काम काढलंत आमच्याकडे ?"
" आम्हाला तुमच्या पूर्ण गुहेची झडती घ्यायची आहे."
" अवश्य घ्या. परंतु मला एक सांगा आमचा अपराध तरी काय ?"
" आम्हाला असं कळलं की तुम्ही जादूटोणा करता नि
लोकांचे प्राण एका शरीरातून काढून दुसऱ्या शरीरात टाकता."
" कुणी सांगितलं हे तुम्हांला ?"
" आम्हांला पक्की खबर लागली आहे."
" खबर खोटी आहे, असे जर मला शरीर बदलता आले
असते तर स्वतःचा प्राण काढून तरुण असलेल्या मुलाच्या
शरीरात टाकला नसता का ? तुम्हीच विचार करा. अहो कुणी काही सांगतं, त्याच्या सांगण्यावर विश्वास किती ठेवायचा याचा विचार आपणच करायचा असतो नाही का ?" इन्स्पेक्टर विजय कदम किंचित विचारमग्न झाला. काय करावं ह्याच्या बोलण्यावर किती विश्वास ठेवावा ? पण तो चुकीचे बोलतो आहे, असं ही नाहीये. मग काय ह्याला अटक करू का नको ? पण क्षणभरच. लगेच दुसरे मन म्हणाले," अटक करायला काही पुरावा तर सापडायला पाहिजे. एक मनाची खात्री करून घेऊ म्हणजे गुहेची झडती घेऊ .....जर का संशयात्मक काही सापडलं तर ह्याला अटक करणे पण सोपे जाईल असा विचार करून ते म्हणाले," महाकाल मला एक वेळ तुमच्या गुहेची झडती घेऊन पहायची आहे."
" माझी काहीच हरकत नाहीये. खुशाल घ्या. निदान तुमच्या मनातील संशय तरी दूर होईल. "असे म्हणून त्याना आत जायला वाट मोकळी करून दिली. इन्स्पेक्टर विजय कदम ने कॉन्स्टेबल हरीश ला इशारा केला तसा कॉन्स्टेबल हरीश सह इतर पोलीस आंत शिरले. इन्स्पेक्टर विजय कदम देखील आंत शिरला तर गुहे मध्ये एक अग्निकुंड पेटत असलेले दिसले नि त्याच्या सभोवती काही माणसे बसलेली दिसली, बाकी संपूर्ण गुहेत ठिकठिकाणी मशाली पेटलेल्या दिसत होत्या नि जिथं तिथं फक्त मानवी कवटी ,आणि मानवी देहाचे कंकाल लटकलेले दिसते होते. दुसरे काहीच नव्हते. पोलिसांनी संपूर्ण गुहा धुंडाळली. परंतु संशय घेण्या सारखे तेथे काहीच आढळले नाही. कॉन्स्टेबल हरीश इन्स्पेक्टर विजय कदम कडे येत म्हणाला," सर, सर्वत्र शोधले. पण काहीच सापडले नाही . तेव्हा महाकाल म्हणाला,
" मी म्हणालो होतो ना साहेब , इथं माझ्या भक्ता व्यतिरिक्त काहीही सापडणार नाहीये."
" ठीक आहे ." असे विजय कदम बोलला. तेवढ्यात
पोलीस स्टेशन मधून फोन आला की विनय नावाचा मुलगा
कॉलेजमध्ये गेला होता तो घरी परतलाच नाही, कुठं गेला ?
त्याचं काय झालं हे कुणालाच माहीत नाहीये. तेव्हा विजय
कदम ला प्रश्न पडला की हे महाकाल ने केलं म्हणावं तर
तो तर आपल्या समोरच उभा आहे,मग कुणाचे काम असेल बरं हे ? त्या विवेक चे तर नाही ? नक्कीच त्याचं च काम असेल हे ." असा विचार करून ते म्हणाले," ठीक आहे, थोड्या वेळात पोहोचतोच मी तिथं. " असे म्हणून फोन कट केला नि कॉन्स्टेबल हरीश ला म्हणाला ," चल आपल्याला लवकर निघायला हवं. " तेव्हा महाकाल म्हणाले," आता तरी तुमच्या मनाची खात्री झाली असेल ना ? की ह्या सर्व प्रकरणात मी नाहीये. तशीच काय गरज असल्यास मला बोलवत जावा, मी येत जाईन पोलीस स्टेशनला.....?"
" बरं बरं गरज लागली तर बोलवू आम्ही तुम्हांला." असे
म्हणून इन्स्पेक्टर विजय कदम पोलीस पथकाला पोलीस
व्हॅन मध्ये बसायला सांगितले.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा