इनाम-२
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
इनाम-२ |
" मी काय समजते स्वतःला ते तुम्हांला तेव्हा दाखवून देईन , जेव्हा तुम्ही दुसरी बायको आणाल ."
" मला चॅलेंज करतेस ! थांब. तुला दाखवितोच मी माझा इंगा. " असे बोलून तो उठला नि तिला म्हणाला," पण आधी पैसे दे मला दारू प्यायला."
" मी का म्हणून देऊ ? जा तिच्याकडेच मागा .जिच्या सोबत लग्न करणार आहात ना, तिच्याकडे जा मागायला."
" तिच्या कडे पण मागेंन. पण ती इथं येईल तेव्हा."
" तिची काय हिंम्मत इथं यायची !"
" मी घेऊन येईन तिला."
" पण मी या घरात येऊ देईन तेव्हा ना ? नाही तिच्या झिंजा पकडून गांवभर तिची धिंड काढीन तर नावाची मी सिंधू नाही."
" पण मी तुलाच घरातून बाहेर काढली तर ! काय करशील ?"
" प्रयत्न तर करून बघा. नाही तुम्हांला पण तिच्या सोबत
घरातून बाहेर काढीन तर नाव बदलून ठेवा माझं ."
" अस्सं ! आता बघतोच मी तू काय करतेस ते.मी तिला उद्या घेऊनच येतो इथं."
" आणा तर खरं ! मग पाहू या कोण हरतेय ते."
" एवढी मिजास ?"
" अजून तुम्ही माझी मिजास पाहिलीच कुठं आहात ?
जेव्हा पाहाल ना, तेव्हा तुमची बोलतीच बंद होईल."
" हो का ? मग उद्या पाहू बरं पण आता तुझ्या गळ्यातले मंगळसूत्र तेवढं काढून दे मला."
" मंगळसूत्र काढून देऊ ? काही लाज शर्म आहे की नाही का ? पण दारू सोबत चाकणं समजून खाल्लीत !"
" तोंड आवर तुझें काय बोलतेस ते कळतंय का तुला ?"
" न कळायला काय झाले मी काय तुमच्या सारखी दारू नाही प्याली आहे."
" फार बोललीस हां आता मुखाट्याने ते मंगळसूत्र काढून दे तू मला."
" मिळणार नाही."
" का नाही मिळणार ?"
" माझं सौभाग्याचे लेणं आहे ते."
" तुझे सौभाग्याचे लेणं ते काळे मणी नाहीत. मी आहे तुझं सौभाग्य ! चल, उतार ते मंगळसूत्र ."
" नाही देणार. माझं आहे ते मंगळसूत्र."
" हो .पण ते मी घातलंय."
" काही मेहरबानी नाही केली. ते प्रत्येक नवऱ्याने आपल्या बायकोच्या गळ्यात घालायचंच असतं."
" तू अशी ऐकणार नाहीस तर !" असे म्हणून तो तिच्याशी
झोबा-झोबी करू लागला. दोघांच्या ओडातांनीत मंगळसूत्र
तुटून पडले. रमेशच्या मुठीत मात्र एक डवली नि दोन मणी
सोन्याचे लागले. ते तो घेऊन पळाला. बाकीचे काळे मणी
जमिनीवर विखुरले गेले. तिने ते जवळ केले . परंतु त्याचा उपयोग. शेवटी ती आपल्या नशिबाला दोष देत रडत बसली.
रात्री फार उशिरा रमेश दारू पिऊन घरी परतला. घरी
येताच तो आपल्या बायकोवर डाफरला. म्हणाला की, ए ss
इथं रडत काय बसली आहेस ? तुझा बाप मेलाय की काय ?"
" काही वाट्टेल ते बोलू नका."
" बोलणार, काय करशील तू ?"
" मी काय करणार ? देवानं मला बाईच्या जातीला जन्माला घातलं ना, आता आयुष्यभर जोडे खायचेच तुमच्या सारख्या बेवड्याचे."
" मला बेवडा म्हणतेस ?"
" मग दुसरं काय म्हणू ?"
" अगोदर मला जेवायला वाढ."
" आता घोड्याचे मुत पिऊन आला आहेसना ? मग जेवण कशाला हवंय तुला ?"
" आता तुझं जास्त तोंड चालू लागली हां, वेळीच आवर
घाल त्याला. नाहीतर......."
" नाहीतर काय करशील रे बेवड्या ?"
" जीव घेईन मी तुझा "
" हात तर लावून बघ माझ्या अंगाला. नाही तुला पोलीस
चौकीत नेऊन बंद करीन आणि पोलिसांना कुत्र्यागत बडवायला सांगेन." सिंधू नकळत पटकन बोलून गेली. तिला
वाटले की पोलिसांच्या धमकीने तरी आपला नवरा थोडासा घाबरेल. ह्या हेतूने ती असं बोलली होती. पण घडले मात्र उलटेच ! पोलिसांच्या धमकीने तो अजूनच चिडला. त्याने मागचा पुढचा विचार न करता सरळ स्वयंपाक घरात शिरला. रॉकेल ने भरलेले कँन उचलले आणि त्याचे झाकण
उघडले आणि पाच लिटरचे रॉकेल ने भरलेले संपुर्ण कँन तिच्या अंगावर ओतले.
नवऱ्याचा हा अवतार पाहून सिंधू खूप घाबरली. तिला
तिचे मरण तिच्या डोळ्या समोर दिसू लागले. तशी ती त्याला गयावया करू लागली. मात्र त्याच्या डोळ्यात तिरस्काराची आणि बदला घेण्याची भावना निर्माण झाली होती. त्याला सिंधू आता नकोशी वाटत होती. अगदी जीववरच तिच्या तो उठला होता. रोज कटकट करणाऱ्या
बायकोला कायमची संपवून टाकण्याचा त्याने एकदम निर्धारच त्याने केला होता जणू !
तिच्या अंगावर रॉकेल ओतून होताच त्याने आगपेटी
घेतली नि कांडी पेटवून सिंधू ला पेटवून दिले. काही क्षणातच
सिंधूच्या अंगावरील साडीने पेट घेतला. त्यामुळे सिंधू जीव
वाचविण्यासाठी आरडा-ओरडा व मोठ्याने आंकात करू
लागली. तिच्या ओरडण्यमुळे तिच्या मुली उषा व निशा यांनी
तिच्याकडे धाव घेतली. परंतु काय करावे ते क्षणभर त्या दोघींना सुचेना. पण नंतर लगेच उषाच्या ध्यानात आले की,आग विजविण्यासाठी आपल्याला शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागेल. असा विचार करून ती पळतच घराच्या बाहेर येऊन मोठ्याने ओरडली ," धावा धावा नि माझ्या आईला वाचवा !" असे म्हणताच आजूबाजूचे शेजारी पळत आले.
आणि त्यांनी बरदान आणि पाणी टाकून आग विझविली.
परंतु तोपर्यंत सिंधू गंभीररित्या भाजली गेली होती. तिच्या छातीवर,मानेवर,दोन्ही होताना , पाठीवर व मांड्या भाजून
ती पूर्ण पोळून निघाली होती.
आता मात्र रमेश कावरा-बावरा झाला . त्याची नशा पार उतरली. आपल्या हातून काय विपरित घडले. याची त्याला
जाणीव झाली. तसा तो विलाप करू लागला . अखेर भाजून
जखमी झालेल्या आपल्या बायकोला त्याने लोकांच्या मदतीने वाहनात टाकून सरकारी रुग्णालयात नेले . परंतु
तिथल्या डॉक्टरानी आत्महत्येची केस म्हणून दाखल
करून घेतले नाही. या घटनेची खबर स्थानिक पोलीस
स्टेशनला मिळताच स्थानिक पोलीस ठाण्याचे पोलीस
उपनिरीक्षक किरण पडेलकर जमादार अशोक राणे कॉन्स्टेबल मारुती पोसम आदींनी रुग्णालयात धाव घेतली.
आणि भाजून जखमी झालेल्या सिंधुकडे विचारणा केली
असता तिने सारी हकीगत त्याना सांगितली की,
" आपल्या नवऱ्याला दारू पिण्याचे व्यसन आहे. त्यासाठी त्याने घरातील वस्तू विकून टाकल्या. स्वतःच्या कमाईचा एक पैसा ही घरात देत नाही ! सगळ्या पैशांची दारू पितो आणि तेवढे ही करून थांबत नाही. घरातील एकेक वस्तू विकून अजून दारू पिऊन घरी येतो. आज तर त्याने माझे मंगळसूत्र विकून टाकले आणि त्या पैशाची दारू पिऊन आला नि मला शिवीगाळ करू लागला. तू मला आवडत नाहीस. मी आता दुसरी बायको करतो. असे तो मला म्हणाला . म्हणूंन मी मुद्दामच म्हणाले की, मी आता पोलीस स्टेशनला कम्प्लेट देते म्हणून. त्यावर चिडून त्याने मला पेटवून दिले."
तिने दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी तिचा नवरा रमेश
यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली. पोलिसांनी घटनास्थळ आणि भाजलेली सिंधूच्या शरीराचा पंचनामा केला. सिंधू र
गंभीर रित्या भाजली होती. तिच्यावर उपचार होत असताना दुसऱ्या दिवशी तिचा मृत्यू झाला. त्यामुळे या गुन्ह्याला पत्नीला जाळून तिचा खून केल्याचे कलम ३०२ लावण्यात आले. पोलीस निरीक्षक विलक्षण गायतोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण पडेलकर व कॉन्स्टेबल मारुती पोसम या गुन्ह्याचा तपास हाती घेतला. सिंधूच्या मुला-मुलीसह अनेक साक्षीदारांचे कबुली जबाब घेऊन पुरावे गोळा केले. दारूच्या व्यसणापायी रमेशने आपल्या पत्नीची जाळून क्रूरपणे हत्या केली. मुलांचे मातूछत्र हिरावून घेतले.
कोर्टाने रमेशला १४ वर्षाची उमरकैदची शिक्षा सुनावली.
आता एक मुलगा आणि दोन मुली, यांच्यावर आभाळच कोसळले होते जणू ! कोणाचाही सहारा नव्हता त्याना. आईला छोट्या मुलाच्या हातून अग्नी दिला. तेव्हा तिथे पोलिसांच्या उपस्थितीत रमेश हातात बेड्या ठोकून आणलं
गेलं होतं , रमेश चा चेहरा उदास दिसत होता. कदाचित केलेल्या कृत्याचा पस्तावा होत असवा. पण आता त्याचा
उपयोग नव्हता.
तीन भावंडामध्ये उषाच मोठी होती. आता घरची सारी जबाबदारी तिच्या छोट्याशा खाद्यावर येऊन पडली होती.
उषा इयत्ता सातवी मध्ये शिकत होती. पण घरची सारी जबाबदारी तिच्यावर येऊन पडल्यामुळे तिला अर्ध्यावरच
शाळा सोडावी लागली. वय लहान असल्याने तिला कुणी नोकरी पण देई ना, शेवटी तिने धुनी-भांड्याचे काम सुरू केले. निशा पाचवी इयत्तेत शिकत होती तर धाकटा भाऊ
भूषण तिसरी इयत्तेत शिकत होता.
निशा नि भूषण एकेक इयत्ता पार करत s.s.c.ला
६० % टक्क्यांनी पास झाली होती. तर भूषण इयत्ता आठवी उत्तीर्ण होऊन नववी मध्ये गेला होता. निशाला पुढील शिक्षण
घेण्याची फार इच्छा होती. तिनं ही इच्छा उषाताई जवळ
बोलून दाखविली. त्याबर उषा बोलली," तुला कॉलेजात जायचंय ? तर खुशाल जा कॉलेजमध्ये." त्यावर निशा बोलली," पण ताई त्यासाठी लागणारे पैसे .....?"
" त्याची तू कशाला चिंता करतेस ? मी आहे ना, करू काहीतरी तडजोड." असे म्हणून तिने त्यावेळी वेळ निभावून
नेली खरी ! पण खरं सांगायचं तर पुढील शिक्षण घ्यायचे तर
सर्वात मोठी अडचण होती ती पैशाची. उषाला मिळत असलेल्या पगारातून जेमतेम घरखर्च भागत होता. आणि खोलीचे भाडे ही कसे बसे देत होती ती , पण आता हा निशा चा हा कॉलेज चा खर्च कोठून आणि कसा करणार ? यावर ती विचार करत होती. आपल्या भावंडानी खूप शिकावे अशी
उषाची इच्छा होती. त्यासाठी आणखीन तीन चार घरची धुनी-भाड्यांचे काम मिळते का याची ती चौकशी करू लागली. तिच्या प्रयत्नांना यश आले. तिला आणखीन दोन
दोन घरची धुनी-भांड्यांचे काम मिळाले."
निशा मॉडेल कॉलेजात जाऊ लागली. तिने आर्ट मध्ये
अँडमिशन घेतले . पण आता कामाचा जास्त भार उषावर पडू लागला. घरची सर्व कामे उरकता-उरकता तिला दिवस ही कमी पडू लागला होता. फार थकून जायची बिचारी . पण हिंम्मत मात्र हरली नव्हती. मोठ्या जिद्दीने सर्व जबाबदाऱ्या पार पाडत होती ती.
काळ झपाट्याने पुढे सरकत होता. उषा आता एकवीस वर्षाची झाली होती. आता तिचे वय लग्नाचे झाले होते. खरं तर तिने आता लग्न करायला हवे होते. आणि आता तिच्या मनात ही लग्नाचे विचार येऊ लागले होतें की आता आपण ही लग्न करावे आणि सूंदर संसार थाटावा. आपल्या वर अतूट प्रेम करणारा नवरा असावा .पण लगेच निशा आणि भूषणचा चेहरा डोळ्यासमोर येताच ती आपल्या मनात आलेले आपल्या लग्नाचे विचार लगेच झटकून टाकी नि स्वतःशीच म्हणे ," नाही. माझ्या सुखाचा संसार करून चालणार नाही. आईला मृत्यू समयी दिलेल्या वचनाची आठवण होई. सिंधू मरते वेळी उषाला जवळ घेऊन बोलली,
" उषा तू मला वचन दे की,तू माझ्या मागे या दोघांची आई
होऊन या दोघांचा सांभाळ करशील म्हणून."
" हां आई मी तुला वचन देते की , मी या दोघांचा चांगला
सांभाळ करेन. यांच्यावर दुःखाची छाया कधीच पडू देणार नाही." आपण हे वचन दिल्यानंतरच आपल्या आईने समाधानाने आपले प्राण सोडले होते. हे तिला आठवले की मग ती आपल्या लग्नाचा विचार झटकून टाकत असे.
एकविसाव्या वर्षांत पदार्पण केलेल्या उषाचे रूप फार
खुलून दिसत होते. तसा तिचा वर्ण सावळाच होता . पण रूपाने ती फार देखणी होती. आकर्षक चेहरा, आणि मध्यम
बांध्याची होती ती. त्यामुळे तरुण मुलांच्या नजरा तिच्यावर
वळल्या तर नवल नाही. पण ती सावध होती. कोणाशीही ती फारशी बोलत नसे आणि बोलावयाचे झालेच तर ते कामापुतेच , असा तिचा स्वभाव होता.
पण तिच्यावर एक तरुण वाईट नजर ठेवून होता. येता जाता तो नेहमी तिला इशारा करायचा .पण ती त्याच्याकडे
ढुंकूनही पाहत नसे. त्या गोष्टीची त्या तरुणाला चीड होती.
त्या तरुणाचे नाव होते विक्रांत असे होते . परंतु लोक
त्याला विकीदादा म्हणायचे. कारण तो वाया गेलेला तरुणांपैकी होता. मवाली गुंड अशी त्याची ओळख होती.
रस्त्यावर धंदा करणाऱ्या भाजी विक्रेता कडून जबरदस्तीने हफ्ता वसूल करायचा. त्याचे स्वत:चे गावठी दारूचे दुकान होते. दारूची भट्टी पण लावत असे. पोलिसांना पण हफ्ता जात असे. त्यामुळे त्याच्या नादाला कुणी जात नसे. पण का
कुणास ठाऊक तो उषाशी नरमाईने वागत असे. कदाचित तो
तिच्यावर प्रेम करत असावा.
एकदा तर त्याने तिचा हात धरला. त्यावेळी उषाने
त्याच्या कानशिलात थप्पड मारली होती .पण तिला त्याने काहीच केले नाही. तिला तेथून त्याने जाऊ दिले. ते त्याच्या
साथीदाराना आवडले नाही. तेव्हा त्यातील एकजण
बोलला," काय दादा हातात आलेली मासोळी जाऊ दिलीस तू ? हा तुझा घोर अपमान आहे." त्यावर विक्रांत बोलला,"
गुलाबाचे फुल काढावयाचे म्हटले तर आधी काटे टोचनारच ना ?" लगेच दुसऱ्या ने विचारले," म्हणजे ?"
" तिला माझी ह्रदयाची राणी बनवायची आहे . पण प्रेमाने जोर जबरदस्तीने नव्हे ! आता कळलं ?
" पण तिने तर तुझ्या कानपटात मारली. हा तुझा अपमान
नाही का झाला ? " तिसऱ्यांने विचारले. तेव्हा विक्रांत हसून
बोलला," ज्या हाताने तिने माझ्या कानपटात मारली आहे,ना उद्या त्याच हाताने ती मला वरमाला सुध्दा घालेल."
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा