कुलांगार - ८
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
कुलांगार - ८ |
जेव्हा ही गोष्ट माली ला समजली तेव्हा माली ने एकदम
आकांत केला. मुलाचे अपहरण कुणी केले ते काही कळेना
दयानंद ने पोलीस कम्प्लेट केली. पोलिसांनी त्याना आश्वासन
दिले की लवकरच आम्ही तुमच्या नातत्वांचा शोध घेऊ. पण
त्या अगोदर अपहरण कर्त्या चा तुम्हाला फोन येईल तेव्हा
आम्हाला सूचित करायला विसरू नका. दयानंद ने होकारार्थी
मान डोलावली. नि तेथून घरी परतले. माली सारा दोष राहुल
ला देवू लागली. तुम्हांला स्वतःच मूल हवं होतं ना ? म्हणून
माझं बाळ माझ्या पासून हिरावले गेले. राहुल ने तिला खूप
समजवण्याचा प्रयत्न केला परंतु ती कुणाचेच ऐकायला तयार नव्हती. अपहरण कर्त्याच्या फोनची वाट पाहण्या खेरीज दुसरा कोणताही उपाय नव्हता.
दोन दिवस झाले तरी राहुल च्या मुलाचा काही थांगपत्ता
लागला नाही. पोलीस सुध्दा हैराण होती. की अजून कसा
अपहरण कर्त्याचा फोन आला नाही. तेवढ्यात अपहरण कर्त्याचा फोन आला. दयानंद ने रिसिव्हर उचलून कानाला लावत " हॅलो " म्हटले तेव्हा पलीकडून रोहन ने आवाज बदलून म्हटले की, फोन मुलाच्या आईला द्या. त्यावर दयानंद म्हणाले ," तुला मुलाची आई कशाला पाहिजे ? माझ्याशी बोल ना ?"
" तुम्ही बऱ्या बोलाणं मुलाच्या आई कडे फोन देताय का
नातवाचा शेवटचा आवाज ऐकवू.....नको ना , मग मुकाट्याने
तिच्याकडे फोन द्या. " तेव्हा नाईलाजाने दयानंद ने रिसिव्हर
माली कडे रिसिव्हर देत म्हणाले ," अपहरण कर्त्याचा फोन
आहे तुझ्यासाठी !" तिने लगेच रिसिव्हर हातात पकडत बोलली ," हॅलो कोण बोलतेय ?" आवाज बदलून बोलला,
" तेरा आशिक बोल रहा हूं।"
" तोंड सांभाळून बोल रे भडव्या !" ती त्याचा आवाज न
ओळखल्याने बोलली.
" तुला पोरगं हवा का नको ते सांग."
" तू आहेस कोण ते अगोदर सांग."
" माझ्या पोराला काही करू नकोस तुला काय पाहिजे ते
सांग."
" आता कशी आलीस ताळ्यावर ,आता ऐक मी काय सांगतो ते."
" हां बोल."
" तू एकटी पायल हॉटेलमध्ये एकटीच ये. आणि हां पोलिसांना ह्यात सामील करू नकोस. अर्थात तुला तुझा पोरगा जिवंत हवा असेल तर..... .
" मी एकटीच येते , पण माझ्या मुलाला काही करू नकोस."
" काही नाही करणार, परंतु .....
" परंतु काय ?"
" तू आपल्या वक्तव्यावर कायम राहीस तर !"
" हां मी एकटी च येते नि पोलिसांना ही सामील करत नाही
ह्यात."
" ठीक आहे,लवकरात लवकर निघून ये. माझा इरादा बदलण्या अगोदर."
" हो हो आलेच मी !" असे म्हणतात पलीकडून फोन कट
झाला. तशी घरातील सर्व माणसं तिला विचारू लागली.की, सुनबाई, कुणाचा ग फोन ? " ती त्यांना सांगणारच होती एवढ्यात तिला त्याने दिलेली धमकी आठवली. तशी ती म्हणाली," कोण आहे ते माहीत नाही.परंतु त्याने मला एकटीला च बोलविले आहे,तेव्हा तुम्ही कुणीही पोलिसांना
ह्यांची खबर देऊ का ?"
" पण का ?" तिच्या सासूबाई ने तिला विचारले.
" तशी त्याने धमकी दिली आहे."
" अगं सुनबाई ! पोलिसांनी काय सांगितले होते ते आठवतंय का तुला ?"
" हो ; परंतु अपहरण कर्त्याची तशी ताकीद आहे, आणि
सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आपलं बाळ हवंय."
" ते ठीक आहे,परंतु पैसे न मागता तुला त्याने कशाला बोलविले आहे ?"
" तेच तर माहीत करायचे आहे ना ?"
" पण तिथं दगा फटका झाला तर !"
" तशी शक्यता कमी आहे."
" का ?" दयानंद ने विचारले.
" नाहीतर त्याने मलाच कशाला बोलविले असते ?"
" ते ठीक आहे,पण जरा सावध रहा." राहुल बोलला.
" ते तर राहणारच मी. आणि तसंच काही असलं तर मी
तुम्हाला फोन करेन." असे म्हणून ती एकटीच त्याने बोलविलेल्या ठिकाणी निघाली. तिच्या पाठलागावर राहुल निघाला. मात्र दोघां मध्ये बरेच अंतर ठेवून. त्याने बोलविल्या
जाग्यावर जशी माली पोहोचली. तसा तिच्या समोर रोहन
आला . रोहन पाहताच तिच्या तळ पायाची आग मस्तकाला
भिडली. ती संतापाने बोलली ," तू आहेस होय."
" तेरे जिंदगी में मेरे शिवाय दुसरा हो भी नहीं शकता."
" क्या चाहते हो ?"
" बस्स तुमसे शादी !"
" लग्न आणि तुझ्या सारख्या नराधमाशी ! कदापि नाही."
" मला वाटतं तुझं तुझ्या मुलावर प्रेम नाही."
" माझं माझ्या मुलावर किती प्रेम आहे, हे तुझ्या सारख्या
नराधमाने सांगायची गरज नाहीये."
" तुझं तुझ्या मुलावर किती प्रेम आहे तेच पाहायचंय मला."
" अच्छा कसं पाहणार ?"
" सिम्पल ! तू माझ्याशी लग्न कर."
" नो नेव्हर !"
" अजून विचार कर."
" विचार कसला ? तुझ्या भावाची पत्नी आहे मी तुला बोलायला शरम वाटायला पाहिजे होती अगोदर."
" नुसतं लग्न करून नि त्याच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घालून पत्नी होत नाही कुणी ! त्यासाठी पत्नी धर्म निभावा लागतो."
" मी माझा पत्नी धर्म निभावण्यात कुठंही चूक केलेली
नाहीये."
" असे असेल तर तुम्हां दोघांचे मूल कुठं आहे ?"
" ज्याचे तू अपहरण केले आहेस तेआम्हां दोघांचेच मूल
आहे."
" साफ खोटं , ते मूल तुम्हां दोघांचे नसून आम्हां दोघां चे आहे."
" नाही नाही तुझा त्या मुलाशी काही संबंध नाहीये."
" मग हा रिपोर्ट पण खोटा आहे का ?"
" कोणता रिपोर्ट ?"
" डी एन ए टेस्ट चा रिपोर्ट !" असे म्हणून तो रिपोर्ट तिच्या
समोर धरला. रिपोर्ट पाहून मालीच्या पाया खालील जमीन
सरकली. पण लगेच स्वतःला सावरून म्हणाली," हा खोटा रिपोर्ट आहे." त्यावर तो म्हणाला ," तो फक्त तुझ्यासाठी !
माझ्यासाठी तो माझा मुलगाच आहे, तेव्हा मुकाट्याने माझ्याशी लग्न करण्यास तयार हो. कारण तू माझ्या शिवाय
दुसऱ्या कुणाची पत्नी होऊ शकणार नाहीस."
" अरे पण मी तुझ्या भावाचीच पत्नी आहे."
" तो माझा भाऊ नाही."
" पण त्यांची आई ती तुझी पण आईच आहे ना ?"
" नाही. तिने दुसरे लग्न केले तेव्हा तिचं नि माझं नातं संपलं."
" रक्ताची नाती अशी तुटत नसतात."
" हो ना , मग तू का आम्हां बाप-लेकाचे नाते तोडू पाहते
आहेस ?"
" कारण तो माझा मुलगा आहे."
" पण त्याचा जन्मदाता बाप मी आहे."
" असलास म्हणून काय झालं ? पण त्यावर माझा अधिकार जास्त आहे."
" होता. पण आता नाही."
" म्हणजे ?"
" आईचा मुलावर फक्त पाच वर्षे अधिकार असतो. नंतर
बापाचा अधिकार लागतो."
" असं कोण म्हणतं ?"
" कोर्ट म्हणतं ."
" मला ते मान्य नाही."
" तुझ्या मान्य न मान्य ला विचारतोय कोण ?"
" तू बऱ्या बोलाणं माझा मुलगा परत कर."
" मिळणार नाही."
" मी पोलिसांकडे जाईन."
" खुशाल जा. तुला मुलगा तर मिळणारच नाही. कारण
तो इथं नाहीये."
" मग कुठं आहे ?"
" अनाथालयात ."
" अरे चांडाळा ! बाप आहेस का खविस ! " त्याला मारायला आपला हात उगारते तो तिचा हात वरचे वर पकडत बोलला ," अशी चूक पुन्हा करू
नकोस. नाहीतर ....
" नाहीतर काय ?"
" तुझा हात सांध्यातून उपटून काढून फेकून देईन. समजतेस स्वतःला !"
" पण का छळतोयेस तू मला ?"
" तुला छळणं हा माझा जन्म सिध्द अधिकार आहे ?"
" माय फूट ! कुणी दिला तुला हा अधिकार ?"
" तू !"
" मी ?"
" हो !"
" तो कसा ?"
" माझ्या मुलाला जन्म देवून. "
" मी तुझा जीव घेईन."
" घेऊन तर बघ. मी तयार आहे.तुझ्या संग मरायला."
" अरे देवा काय करू या नीच माणसाचे ?"
" फक्त लग्न कर माझ्याशी ! मी तुला सुखात ठेवीन."
" कदापि नाही."
" ठीक आहे, जाऊ शकतेस तू . तुझा निर्णय बदलला तर पुन्हा याच ठिकाणी भेट मला." असे म्हणून तो तेथून जाऊ
लागतो. तसा राहूल समोर येतो. त्याला पाहून तो कुत्सित पणे बोलला ," ओह ! मजनू को भी साथ लाया है । कोई बात नहीं।"
" दादा तू असा जाऊ शकत नाही.माझा मुलगा कुठं आहे तो सांग."
" तो मुलगा तुझा नाहीये. माझा आहे. आणि हे मी कायदेशीर सिध्द करेन."
" हो . मी कबूल करतो की तो तुझाच मुलगा आहे."
" मग हे पण मान्य कर ही माझी पत्नी आहे, तिने तुझा स्वीकार केलेला नाहीये."
" नाही. हे खोटं आहे, आम्ही दोघे पूर्ण इमानदारीने आपले नाते निभावतो आहे."
" मग तुम्हां दोघांना अद्याप मूल का झालं नाही ?"
" आम्हीच ते होऊ दिलं नाही."
" का ?"
" आम्हाला दुसरे मूल नको हवं होतं."
" का ?"
" आमची इच्छा !"
" ही तुम्हां दोघांची इच्छा नाही. फक्त माली ची इच्छा !"
" हो खरंय!"
" याचाच अर्थ तिने तुला पूर्णपणे स्वीकारलेले नाहीये. ती
अद्याप माझ्याशीच एकनिष्ठ आहे, फ़क्त हे तिला मान्य करायला जड जातंय . इतकंच."
" नाही हो हे खरं नाहीये. विश्वास करा माझ्यावर." माली
एकदम विनंती स्वरात बोलली.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा