Vamana Hari Watmare | Love story | Mahendranath prabhu

इमेज
  Vamana Hari Watmare         This is a very long year ago, there is a Konkan village, the village of the village is Tamhankar Wadi, the scenic village, and the Bils in the mountains, and the bay originated from the mountain, and the cake came from the village of Kharipatan and the end of Kharipaton. The end was going to the Arabian Sea than the ends. Tamhankar Wadi is situated in Kashi on the basis of Sahyadri Mountains, because the village's gate was in the gate of the village, this village has been a different importance. Fresh fish in the creek, the villagers get eaten every day. Coconut trees are also in the horticulture, according to the horticultural horticultural horticulture, even though the main business of the villagers are the major business of these villages, though the member of the villagers, the mangoes, the mangoes, which are in large custody, are the door of the mangoes.. Be. Tamhankar Wadi was living in the village of merciful and Damanti. Bec...

इनाम-३

इनाम-३
इनाम-३



     " आता नाही वाटत ना ? पण एक जरूर मान्य करशील. आणि तो दिवस फार दूर नाहीये."  विक्रांत खात्रीपूर्वक बोलला. त्यावर एकजण त्याची थट्टा करत बोलला," कशावरून सांगतोयस तू हे ? स्वप्न वगैरे पडलेय का तुला ?"
     " तिला पाहिल्या पासून  ती रोजच पडताहेत."
     " काय सांगतोयस ! खरंच का ?"
     " मग काय खोटं वाटतंय का तुम्हाला ?"
     "  खोटं नाही . पण  तुझी आणि तिची भेट आजच झाली
ना ? " दुसऱ्या ने विचारले.
      " वेडा आहेस. कित्येक दिवसापासून मी तिच्यावर पाळत ठेऊन आहे . फक्त हात पकडण्याची हिंम्मत मी आज केली."
      " आणि त्याचे  प्रतीस्वरूप  चिन्ह उमटले तुझ्या गालावर .नाही का ?" तिसरा उपहास पूर्ण स्वरात बोलला. तसा विक्रांत रागाने बोलला," साल्या ,थट्टा करतोयस होय रे माझी !"
      " सॉरी विकीदादा  ! पण खरं आहे ना हे ?"
      " आज  तिच्या हाताच्या चापटाचे निशाण  माझ्या
गालावर उमटले असले तरी उद्या ह्याच गालावर तिच्या ओठांच्या लिप्टिकचे लाल निशाण ही उमटलेले दिसेल तुम्हांला."
      त्यावर कुणीच काही बोलले नाही. कारण अधिक काही
बोललो तर विकीदादा आपल्या सर्वांचे थोबाड लाल करील हे
सर्वांना माहीत होते. म्हणून अधिक न बोलले बरं. जणू असाच त्या सर्वांनी विचार केला असावा. विक्रांत च्या
बाबतीत बोलावयाचे झाले तर तो एकतर्फी उषावर प्रेम
करू लागला होता. म्हणूनच की काय त्याने नरमाईचे धोरण
स्वीकारले होते. गोड बोलून तिला हस्तगत करण्याचा हेतू होता त्याचा. तेवढ्यातच त्याला विश्वासरावांचा फोन
आला की कुठं आहेस म्हणून त्याला विचारण्यात आले. तेव्हा तो म्हणाला," दुसरीकडे असणार ?  दारूच्या  अड्यावर आहे. पण तुम्ही का फोन केला ." त्यावर ते म्हणाले," एक काम आहे महत्वाचे." तेव्हा विक्रांत बोलला," मग नेहमीच्या ठिकाणी या मी तिथं तुमची वाट पाहतोय."
      त्या प्रमाणे विश्वासराव  त्याला नेहमीच्या ठिकाणी
भेटायला आले. तसे विक्रांत बोलला," हं आता बोला काय काम काढलंत नवीन आता ?  " त्यावर विश्वासराव बोलला,
    "  हे जर तू काम केलेस ना तर मी तुला मालामाल करेन."
     " मुद्याचं बोला."
     " एकाला टपकावायचं आहे."
     " कुणाला ?"
     " तो कुणी का असेना तुला काय आपल्या पैशाशी मतलब आहे ना ?"
      " तुम्हांला माहीत आहे, की मी कुणा गरीब माणसाला मारण्याची सुपारी घेत नाही."
      " ते ठाऊक आहे मला म्हणूनच आज एका श्रीमंत माणसाला ह्या जगातून सिद्धा देवाकडे पाठवायचंय."
       " समजा टपकला . नाव सांगा त्याचं."
      " दादासाहेब."
      " काय ?  दादासाहेबाना ?"
      " त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे ?"
      " नाही म्हटलं ते तुमचं थोरले बंधू ना ?"
      " राजकारणात नात्याला काही किंमत नसते. हे ठाऊक
आहे ना तुला ?"
      " स्वार्थी आणि संधी साधू माणसं आपल्या स्वार्थासाठी
आपल्या पत्नीला आणि बहिणीला सुध्दा धंद्याला लावतील." असे म्हटल्याने विश्वासराव भयंकर चिडला नि बोलला," तोंड सांभाळून बोल विकीदादा नाहीतर........?  " तसा विक्रांत उठून उभा राहात बोलला," ए ss शेठ जादा टाय टाय मत कर,वर्ना इधरच तुझे ठोक दूंगा. और वो भी फ्री चार्ज में समझे।"
      त्याच्या भड़कलेला चेहरा पाहून लगेच नरमाईचे धोरण
स्विकारत तो बोलला," अच्छा बाबा गलती हो गई माफ कर."
        " विकी आजपर्यंत कुणा समोर वाकला नाही. शिवाय माँ के।"
        " झालं तुझं बोलून , आता मी काय सांगतो ते नीट ऐक.
उद्या दादासाहेबांची पुण्याला प्रचार सभा आहे. तेव्हा त्याचं प्रचार सभेतच राम नाम सत्य व्हायला हवं. कळलं."
         " काम होईल. परंतु......"
         " हो .तुझी फी ना आणलीय सोबत मी !" असे म्हणून हातातील ब्रिफकेश समोर टेबलावर ठेवून बोलला," आता पांच लाख  आणलेत,बाकीच पांच लाख काम झाल्यानंतर मिळतील."
      " ए शेठ तुम्ही काय मला भिकारी समजताय की काय ?"
      " म्हणजे ?"
      " फक्त दहा लाखात काम कटवायला बघताय काय  ? आणि स्वतः करोडो मध्ये खेळणार. मूर्ख समजता काय मला ?
      " मग किती पाहिजे ?"
      " पांच खोका !"
      " हे फार होताहेत असं नाही वाटत तुला ?"
      " दस करोड."
      " अरे....?"
      " बिस करोड." त्याची शब्दा शब्दाला वाढत जाणारी किंमत पाहून विश्वासराव चटकन बोलले," ठीक आहे बाबा वीस करोड घे. पण काम फत्ये झाले पाहिजे."
       " होईल. कामाची फुल ग्यारन्टी असते आपली हे ठाऊक नाही का तुम्हांला ?"
       " ओके ओके चिडू नकोस." असे बोलून तो तेथून निघून
गेला. तसा त्याच्या पाठमोरी आकृतीकडे पाहत एकजण बोलला," आपल्याच भावाला मारण्याची हिंम्मत कशी होते
या  लोकांची ! सारं नवलच आहे, नाही का ?" लाल्या बोलला.
     " नवल काय त्यात  ? इतिहास साक्षी आहे,युगाने युगे होत आलेय हे आणि पुढेही युगाने युगे असेच होत राहणार. फक्त पात्र आणि क्षेत्र वेगळं असणार बस्स! " विक्रांत बोलला.
      " पण मी काय म्हणतो, दादासाहेबांना टपकावल्यावर
पोलिस सोडणार आहे का आपल्याला ? " पऱ्याने पश्न केला.
      " मग मंत्री कशासाठी ? त्याला काय उगाच पाळलंय का
आपण  ?" विक्रांत बोलला.
       " पण तो तर मागेच बोलला होता ना,की कुणाचा खून
वगैरे करू नका म्हणून ."
       " अरे,तो ढीग सांगेल स्वतःचं मंत्रीपद वाचविण्यासाठी !
पण आम्ही काय त्याचे गुलाम नाही त्याचा हुकूम पाळायला."
       " मग कधी लावायची फिल्डिंग ?" लाल्या बोलला.
       " त्यासाठी फिल्डिंग कशाला लावायला पाहिजे ? तो
काय सराईत गुन्हेगार आहे ? मच्छर आहे तो ,कुणीपण
एकाने जा आणि गोळी घाला सरळ ह्रदयात. ह्रदय खल्लास !
माणसाचा खेळ खल्लास ! काय म्हणतोय मी  ? जमेल ना तुला हे ?" परेशकडे पाहत विक्रांत बोलला.
      " कोण मी ?" परेश एकदम घाबरून बोलला.
      " मग कोण तुझा आजा ?" असे म्हणताच सर्वजण खो
खो करून हसू लागतात. तसा परेश बोलला ," पण मी अध्याप कुणाचा खून नाही केला ."
      " म्हणूनच आता तू तो करच !"
      " पण मीच का ?"
      " ह्या धंद्यात यायचं असेल तर रक्तात हात रंगलेच पाहिजे प्रत्येकाचे !" विक्रांत
      " म्हणजे ह्या सर्वांनी......?"
      " खून केलेत. फक्त तू तेवढा बाकी आहेस." त्याचे अपूर्ण वक्तव्य पूर्ण करत विक्रांत पुढे बोलला ," म्हणून दादासाहेबांचा खून तू करावास !" न करण्याचा उद्देशाने परेश
बोलला," पण दादा मला पिस्तुल सुध्दा पकडता येत नाही.
मग नेम कसा लावणार मी कुणाला ?"
     " शाब्बास ! म्हणे मला पिस्तुल पकडता येत नाही. लहानपणी दिवाळीत फटाके वाजवलेस की नाही ?"
     " वाजवले ना ?"
     " कशाने ? "
     " म्हणजे ?"
     " म्हणजे पिस्तूलाने की दगडाने , का आणखीन कशाने ?"
     " काय दादा थट्टा करतोस माझी ! फटाके वाजवायला
कौशल्य लागते का कुणाला ?"
     " अरे,असं कसं ? प्रत्येक गोष्टीला कौशल्य हे लागतच !"
सर्वांकडे नजर फिरवून बोलला," हो की नाही रे ?"
      " हो ना !" सर्वजण एकदम उद्गारले.
      " बघ. सर्वजण हो म्हणताहेत आता तू ठरव. तुला काय
करायचे आहे ते." विक्रांत
       " दादा , मला खून करायला सांगू नकोस कुणाचा ? बाकी काहीही सांग."
      " अरे,चूप ! म्हणे काहीही सांग. एक काम सांगितले ते पण करायला जमत नाहीये. चल चालता हो इथून . आणि पुन्हा
आपलं हे थोबाड दाखवू नकोस मला कधी ! डरपोक साला !" परेश आपल्या जाग्यावरून उठला नि चुपचाप
तेथून जाऊ लागला तसा विक्रांत बोलला," आणि ऐक,
इथं जे काय ऐकलेस ना,ते इथंच विसरून जायचं. नाहीतर काय होईल माहितेय ना .....?
  " दादा मी कुणाचं काही सांगणार नाही."
   " गुड ! जा आतां." परेश तेथून निघून गेला तसा एकजण
बोलला," दादा तुला खरंच वाटत की हा कुठे बोलणार नाही
कुणा जवळ."
     " नाही बोलणार. का ते माहितेय ? " सर्वजण नकारात्मक
मान डोलावतात. तसा विक्रांत बोलला," भय. एकदा का  माणसांच्या मनात भय शिरले की मग हे भयच त्याची वाच्या बंद करते. म्हणून आपल्याला सर्वांच्या मनात भय उत्पन्न
करावयाचे आहे. आता बोला  कोण तयार आहे दादासाहेबांना मारायला ?" पण कुणीच पुढं येतं नाही. सर्वांनी आपल्या माना खाली घातल्या. ते पाहून विक्रांत रागाने बोलला," तुमच्यापैकी कुणीच मर्द नाही का रे ? पण तरी देखील कुणीच हात वरती करत नाही. ते पाहून तो बोलला," सर्वच्या सर्व हिजडे साले ! आता सर्वांनी हातात बांगड्या
भरा नि बसा सर्वांनी  चूल फुकीत घरात."
     त्यावर कुणीच काही बोलले नाही. त्यामुळे विक्रांत अजूनच चिडला. नि म्हणाला," ए sss काय म्हणतोय मी
ते ऐकायला येतंय ना तुम्हांला ?"
      " हो !" लाल्या बोलला.
     " मग बोलायला काय झालं ? तुमचं तोंड शिवलं का कुणी ?"
      " विकीदादा , भर सभेत जाऊन मारायचं म्हणजे ?......बोलता-बोलता तो मध्येच थांबला. तसा दुसरा त्याचीच री ओढत पुढे म्हणाला," म्हणजे विकीदादा त्याला असं म्हणायचंय की, दादासाहेबांना भर सभेत ठार मारले तर दादासाहेबांचे ......." तो पण बोलता -बोलता मध्येच थांबला. तेव्हा त्याचे अपूर्ण वक्तव्य पूर्ण करत विक्रांत बोलला,"  दादासाहेबांचे समर्थक तुम्हां लोकांना जिता सोडणार नाही. असेच ना ?" तेव्हा सर्वजण एकदम बोलले," होय विकीदादा !" तसा विक्रांत बोलला ," भ्याड ! डरपोक साले !
एका मध्ये पण हिंम्मत नाही  नि मी फुकटच पाळलंय सर्वांना !" किंचित थांबून उसासा सोडत तो पुढे म्हणाला," पण असं नाही चालणार. माझ्या सोबत राहायचं असेल तर
मी सांगेन ती कामगिरी पार पाडली पाहिजे. आणि तुम्हांला
कुणी सांगितले रे,की दादासाहेबांना भर सभेतच मारायचंय म्हणून. येता जाता कधी पण मारू शकता ना ? म्हणजे गाडीतून उतरता क्षणी किंवा गाडीत बसता क्षणी आपल्याला काय फक्त शुठ करायचं त्याना. शिवाय पिस्तुलाला सायलेन्सर लावलेले असणार. कुणाला कळणार देखील नाही. गोळी कुठून आली ती. आणि ज्यांना हे पण जमत नसेल तर त्यांनी आपला रस्ता बदला. मला गरज नाही असल्या माणसांची ! आता बोला कोण तयार आहे?" तेव्हा एकेक करून सर्वांनीच हात वरती केला. ते पाहून विक्रांत हर्षभराने बोलला," आता कसे मर्द शोभूत दिसता !" तसे सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. ते पाहून विक्रांत बोलला,"
आता बोला," दादासाहेबांच्या हृदयाची टिक टिक कोण बंद
करणार ?" तसे सर्वजण एकदम आम्ही तयार आहोत."
     " सर्वजण नको. फक्त दोघेजणच पुढे या."
    तसे लाल्या नि सत्या दोघेजण पुढे येतात. तेव्हा  विक्रांत बोलला," सत्या तू दादासाहेबांना गोळी मारावयाची आहेस."
सत्या ने होकारार्थी मान डोलावली. तसा विक्रांत लाल्याकडे
पाहत बोलला," आणि तू .....जर ह्याने दादासाहेबांना शुठ
नाही केलं तर तू ह्या दोघांना शुठ कर. कारण ज्यांना पोहता
येत नाही त्यांनी पाण्यात उतरायचं नसतं. नाहीतर जलसमाधी मिळते. ही अशी ! " असे बोलून त्याने स्विमिंगफुलावरून  उडत जाणाऱ्या पक्षावर गोळी झाडली. तो पक्षी जखमी होऊन पाण्यात पडला नि पाण्यात पोहता येत नसल्याने बुडाला. तशी सर्वांच्या चेहऱ्यावर भीतीयुक्त
चिन्ह उमटली. तेव्हा सर्वांच्या चेहऱ्याचे निरीक्षण करत विक्रांत बोलला," जिंदा रहने के लिए डरना बहुत जरूरी है,वर्ना  मौत कब और कैसे आयेगी  यह किसीको नही पता  ओके !" तसा विक्रांत बोलला ," अब चलो अपने अड्डेपर बहुत प्यास भी लगी है , उसे भुजा ही लेते है "  असे म्हणून निघाला दारूच्या गुत्यावर . सर्वजण निघाले त्याच्या पाटोपाठ. दारूच्या गुत्यावर पोहोचताच विक्रांत वेटरला ऑर्डर दिली. थोड्याच वेळात टेबलावर ग्लास आणि दारूच्या बाटल्या आल्या. सर्वांनी झटपट पेग बनविले नि चिअ्स केले. सर्वजण मनसोक्त दारू प्याले. त्यानंतर विक्रांत ने लाल्याकडे एक सिगारेट मागितली. तेव्हा लाल्या बोलला," विकीदादा विल्स आहे." त्यावर विक्रांत चिडून बोलला," अरे ,मग विल्स दे ना मी काय तुझ्याकडे फाय फाय मागत नाहीये."
     मग लाल्याने एक सिगरेट काढून त्याच्या हातात दिली.
आणि त्याने ती घेतली आपल्या ओठात पकडली. तेव्हा आपल्या खिशात लाईटर शोधू लागला. तसा विक्रांत गर्जला,"  अरे ही पेटविणार कोण ? तुझा बाप ....?"
     लाल्या उत्तरला," त्यासाठी लाईटर शोधतोय ना , पण ती मिळत नाहीये . घरीच विसरलोय बहुतेक !"
     " लाईटर घरी विसरण्याची वस्तू आहे का रे ?"
     " सॉरी दादा !" लाल्या उत्तरला.
     " माचीस आहे का रे कुणाकडे ?"
     " हो आहे." सत्य उत्तरला.
     " मग भडव्या मघाच पासून काय कीर्तन चाललंय का इथं ? दे माचीस पटकन."
      सत्या ने आपल्या खिशातून माचीस काढलं. पण त्याला
काही सिगारेट पेटविता येईना, त्याला नशा फार झाल्याने
त्याचा हात इकडे तिकडे जाऊ लागला. शेवटी विक्रांत ने
त्याच्या हातून माचीस खेचून घेत म्हटले," साल्या झेपत नाही
तर एवढी पितो कशाला ?' " तेव्हा कुणीतरी बोलला , 
       " फुकटची आहे ना !"
       " फुकटची आहे, म्हणून कितीपण प्यायची !"
       " विकीदादा एक विचारू ?" दारूच्या नशेत असल्याने
उदयला थोडी हिंम्मत आली , म्हणून त्याने विचारले. सिगरेटचा दीर्घ कश मारत विक्रांत बोलला," हम्म विचार."
       " आतापर्यंत तू कधी आमच्याशी असा वागला नाहीस
मग आताच का ?"
      " कशा संबंधी विचारतो आहेस  तू ?"
      " मघाशी नाही का म्हणालास की ज्याला पिस्तुल
चालविता येत नाही त्याने हा धंदा सोडा म्हणून."
      " हां मग बरोबर आहे ना , तुम्ही त्याचा नाही गेम केला तर तो तुमचा गेम करून टाकेल. ह्या धंद्यात असेच असतं मारा अथवा स्वतः मरा. कळलं."
     " हो." सर्वांनी माना डोलावल्या.
     " चला आता दादासाहेबांच्या घरी जाऊ." विक्रांत
     " ते कशाला ?" लाल्या ने विचारले.
     " जेवायला....... " पुढे रागाने गर्जला," भडव्या पुण्यात
त्यांची सभा कोठे होणार आहे ती नको का विचारायला ?"
      " अरे विकीदादा ,ज्यांचा आपल्याला खून करायचा आहे
त्यालाच त्याचा पत्ता विचारायचा का ? ते आपल्याला
पोलिसांच्या ताब्यात नाही देणार का ?"
     " हां ,यार हे ध्यानात नाही राहिलं. मला फार चढली का ?"
     " ते आता मी कसं सांगणार ? दुसऱ्या कुण्या माणसाला
विचारायला हवं."
      " मला वाटतं आपण आता सरळ घरी जावं. नशा फार
झालीय आता." उदय बोलला.
      " बरोबर बोललास तू . काय आहे , दारू पिल्यानंतर
आपली बुद्धीच चालत नाही कशी ती ! तेव्हा आपलं
घरीच गेलेलं बरं. नाही का ?" सत्या बोलला.
     " बरं तर उद्याच या विषयावर बोलू." विक्रांत बोलला.
सर्वजण एकमेकांना  हात हलवून बाय म्हणत आपापल्या
घरी निघून जातात.

        दुसऱ्या दिवशी भूषण आपल्या मित्रा सोबत कोठेतरी
त्याच्याच मित्राच्या बाईक वरून जात असताना एका ट्रक ने
त्यांच्या बाईक ला धडक दिली. दोघेही बाईक वरून दूर फेकले गेले. दोघांनाही जबरदस्त मार लागला. भूषणच्या
डाव्या पायाचे हाड मोडले आणि त्याच्या मित्राचे तर दोन्ही
पाय पँक्चर  झाले होते  आणि डोक्याला ही फार मार लागला होता . तेव्हा दोघांनाही जवळच्या सिटी इस्पितळात
ऍडमिट केले होते.
    
     उषाला भूषणच्या अपघाताची खबर लागली. तशी ती सिटी इस्पितळात  पोहोचली. तिथल्या डॉक्टरांनी सांगितले की, ताबडतोब पायाचे ऑपरेशन करावे लागेल." तेव्हा उषाने
विचारले," डॉक्टर अंदाजे किती खर्च येईल ऑपरेशनला ?"
      तेव्हा डॉक्टर म्हणाला," एक लाख रुपये."
    " आँsss " रख्खम ऐकून छातीत एकदम धडकीच भरली.
कारण रख्खम फार मोठीच होती.  आणि एवढी मोठी रख्खम
जमा करणे उषाला अजिबात शक्यच नव्हते. काय करावे ते तिला सुचेना. सरकारी रुग्णालयात न्यायचे म्हटले तरी ही
ऑपरेशनला पैसे हे लागणारच शिवाय दिरंगाई होईल ती
वेगळीच !  आणि उशीर करून अजिबात चालणार नव्हते.
कारण वार्षिक परीक्षा जवळ आली होती. शिवाय हे बारावीचे
चे वर्ष होते. एच. एच. सी. ची परीक्षा देणे फार जरुरीचे होते.
कारण पुढे डिग्री कॉलेज ला ऍडमिशन मिळवायचे ,पण त्यासाठी अगोदर एच. एच. सी. परीक्षा उत्तीर्ण होणे जरुरीचे
होते. पण पायाचे ऑपरेशन होऊन तो पूर्ण बरा  होणे
अत्यावश्यक होते. परंतु हे ऑपरेशन शिवाय होणार कसे ?
कारण ऑपरेशनसाठी एक लाख रुपयांची गरज होती.
आणि एवढ्या मोठ्या रख्खमेची तरतूद ती कदापि करू
शकत नव्हती. काय करावे तेच तिला कळत नव्हते. आणि
सुचत ही नव्हते. ती एकदम बेचैन अवस्थेत असतानाच तिच्या कानावर एक ओळखीचा आवाज पडला. तिने मागे वळून विक्रांत कडे पाहिले. विक्रांतला पाहताच तिच्या कपाळावर एक तिरस्कार युक्त छटा उमटली. आणि ती
त्याच्याकडे पाहून बोलली," तू का आला आहेस इथं ?"
    " खरं तर मी इथं येणार नव्हतो. परंतु तुझ्या भवाचे अँक्सिडंट झाल्याचे ऐकले नि रहावले नाही म्हणून न तुझ्या
मदतीला धावून आलो."
      " मला तुझ्या मदतीची गरज नाहीये."
      " पण तुझ्या भावाला तर आहे."
      " माझ्या भावाच्या इलाजाची पर्वा तुला नको. त्यासाठी
मी स्वतः समर्थ आहे."
      " नक्की गरज नाहीये तुला ?"
      " आता काय मी इंग्लिश मध्ये बोलतेय का ?'"
      " ठीक आहे , मी जातो. पण गरज पडली तर कधी पण
हांक मार मला . हा विक्रांत तुझ्या सेवेला हजर आहे." असे
म्हणून तिच्या उत्तराची प्रतिक्षा न पाहता तो थेट तेथून निघून
गेला. म्हणून कुणीतरी म्हटले आहे की, दैव देते नि नशीब नेते. ते काही खोटे नाही. आता हेच बघा ना, विक्रांत स्वतः मदत करायला आला असताना तिने त्याची मदत घ्यायला
नाकारली . परंतु आता ती स्वतःलाच प्रश्न करू लागली की,
खरंच आपण भूषणच्या ऑपरेशनसाठी पैसे उभे करण्यास
समर्थ आहोत का ? कदापि नाही. मग काय करू ? भूषणच्या
ऑपरेशन साठी मी विक्रांतची मदत घेऊ का ? लगेच अंतर्मनाने उत्तर दिले की, काय हरकत आहे ? पण तिचे  दुसरे मन मात्र  ह्या गोष्टीस तयार नव्हते. कारण विक्रांतला तिचे फक्त शरीर हवे आहे, काम वासना पूर्ण करण्यासाठी ! आणि ते तिला कदापि मान्य नव्हते. पण लगेच अंतर्मन बोलले, आईला दिलेले वचन असेच पूर्ण करणार का तू ? लगेच दुुसरे मन म्हणाले , मग काय तू तुझं शील त्या गुंडाच्या स्वाधीन करणार आहेस का ? तसे तिचे  अंतर्मन म्हणाले, काय हरकत आहे ! भावासाठी एवढं दिव्य पण करू शकणार
नाहीस का तू ? त्यावर दुसरे मन बोलले की , भावासाठी
काय पण करायची तयारी आहे माझी , पण हे......?"
  "बस्स कळलं तुझं तुझ्या भावावरचे प्रेम ! नुसती बढाई
मारून चालत नाही. त्यासाठी कोणतेही दिव्य करण्याची
पूर्ण तयारी पाहिजे ; पण तुझे विचार ऐकून तर असे वाटत नाही की, तुझे भावावर खरे खुरे प्रेम आहे म्हणून. असे म्हणताच ती चिडून बोलली," म्हणजे काय म्हणायचे आहे तुला ? माझे माझ्या भावावर प्रेम नाही ? पाहिले मन म्हणाले की, आहे तर सिध्द करून दाखव की ! " तेव्हा दुसरे मन बोलले की, ठीक आहे, तुला सिध्द करूनच दाखवायचे आहे ना , मग बघच तू आता मी काय करते ते." असा विचार करून ती उठली. नि सरळ विक्रांतच्या घरी न जाता ज्या घरी
ती धुण्या भांड्याचे काम करीत होती त्याच्याकडे गेली. परंतु
मोठी रख्खम घरात काम करणाऱ्या  मोलकरीनीला कसे कोण देईल बरं ? सगळीकडून तिला नकार मिळतो. एक
एकजण तिला एक लाख रुपये  द्यायला तयार झाला होता. परंतु त्या बदल्यात त्याला देखील तिचं शरीर हवं होतं.तेव्हा ती त्याला म्हणाली," मी वेश्या नाहीये." त्यावर तो म्हणाला," एवढी मोठी रक्कम फक्त हा एकमेव मार्ग देऊ शकतो तुला . त्यासाठी तुझी तयारी असेल तर आता देतो तुला एक लाख रुपयांचा चेक ! पण त्या बदल्यात मी बोलवेन त्यावेळी आणि बोलवेन तेथे यावे लागेल तुला. मंजूर असेल तर बोल." त्यावर ती म्हणाली," शेठजी मी तुमच्या मुली सारखी आहे. बोलताना थोडासा तरी विचार करायला हवा होता."
     " मुलगी सारखी आहेस पण मुलगी तर नाहीयेस ना ?
और कुछ पाने के कुछ खो ना भी पड़ता है और मुक्त मे
कुछ नहीं मिलता  शिवाय दुःख के देर मत कर  जल्दी चल.
मेरी बीवी मंदिर गई है, वो आ जाने से पहले यह काम हो जाना चाहिए . मंजूर है बोलो वर्ना रास्ता पकड़ो ।"
उषाला भयंकर राग आला होता त्या शेठचा. पण करणार काय ? मुखाट्याने ती तेथून निघाली. पण का कुणास ठाऊक
तिची पाऊले विक्रांतच्या घरच्या दिशेने वळली. विक्रांत बाहेरच उभा होता तिला पाहताच तो हर्षभराने बोलला," मला माहीत होते की, तू जरूर येणार माझ्याकडे."
     " आज मी नाही तर माझी लाचारी घेऊन आली आहे मला तुझ्याकडे. तुझी इच्छा पूर्ण करायला मी तयार आहे , पण एका अटीवर." तेव्हा त्याने विचारले , " कोणत्या अटीवर ?"
   " प्रथम तू मला पैसे द्यावेत भावाच्या ऑपरेशन साठी !
मग मी तू म्हणशील तेथे येईन."
     " ठीक आहे .हा घे चेक." असे म्हणून त्याने एक चेकवर
रख्खम भरून त्यावर हस्ताक्षर करून तिच्या हातात चेक दिला. ती तो चेक घेऊन इस्पितळात गेली नि डॉक्टरांच्या हातात चेक सुपूर्द केला. त्यानंतर भूषणच्या पायाचे ऑपरेशन करणयात आले. त्याच्या पायात सळ्या टाकण्यात आल्या. आपला भाऊ आता लवकरच आपल्या पायावर उभा राहिल, म्हणून उषा खुश होती. परंतु त्यासाठी आपल्याला फार मोठी किंमत मोजावी लागणार आहे, म्हणून तिला जरा खंत ही वाटत होता. परंतु भावाच्या उज्जवल भवितव्यासाठी ही किंमत फार क्षुल्लक आहे असे ही तिचे मन म्हणत होते. पण लगेच दुसरे मन  म्हणे की, हाच भाऊ तुझ्या उपकाराची उद्या जाणीव ठवणार आहे का ? कदापि नाही. कारण या जगात कोणी कुणाचे नसते. फक्त सारी व्यवहाराची नाती. व्यवहार संपला की सर्वकाही संपलं. हे तू कशी विसरलीस ? त्यावर तिचे पहिले मन म्हणाले, " सर्वांना सर्व काही माहीत असते , परंतु तरी सुध्दा प्रत्येक माणूस आपले कर्तव्य म्हणून करतोच ना ? तसे मी ही केले. आता फक्त विक्रांतला दिलेला  शब्द पार पाडायचा आहे. असा विचार करून  ती निशाला भूषण जवळ बसवून ती स्वतः वायद्या प्रमाणे विक्रांत च्या अड्यावर निघाली.

क्रमशः



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाभारत १३४ | Mahabharat part 134 | Author : Mahendranath prabhu.

महाभारत १३३ | Mahabharat part 133 | Author : Mahendranath prabhu.

महाभारत १३५ | Mahabharat part 135 | Author : Mahendranath prabhu.