कुलांगार - ७
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
कुलांगार - ७ |
रोहन तुरुंगात गेला म्हणून ती झाली खरी परंतु तिच्या
पुढे आता एक नवीनच संकट उभे राहिले. तिला रोहन पासून
दिवस गेले होते. तिला जेव्हा त्या गोष्टीची जाणीव झाली तेव्हा सुरुवातिला आनंद झाला खरा की आपण आई होणार
परंतु वातव्याची जाणीव होताच तिच्या पाया खालची जमीन सरकल्याचा भास तिला झाला. कारण लग्न करताच आई झालेला मुलीला समाजात मान्यता तर नाहीच मिळणार शिवाय बदनामी तर इतकी होईल की तिला घराच्या बाहेर पडणे देखील मुश्किल होईल. म्हणून तिच्या आई ने तिला
गर्भपात करायला सांगितले. परंतु माली गर्भपात करायला
तयार नव्हती. तिचं म्हणणे होते की असे पण माझ्याशी कोणताही तरुण लग्न करण्यास तयार होणार नाहीये. अश्या
परिस्थिती मध्ये अनायसे मला मातूत्व लाभले आहे , ते मी का स्वीकार करू नये.? " त्यावर तिची आई तिला म्हणाली,
" अगं हे बाळ नाहीये कलंक आहे, तुझ्या माथी मारलेला."
" आई, त्यात त्या बाळा चा काय दोष बरं ? त्याला कोणत्या अपराधाची शिक्षा देऊ मी ? म्हणून मी त्याला जन्म
देणार."
" वेडी झालीस का ? लोक शेण घालतील तोंडात."
" आई लोकांच्या भीतीने मी माझा निर्णय बदलणार नाही. लोकं काय चांगलं झालं तरी हसतात नि वाईट झालं
तरी पण हसतात. त्यांना नसतो दुसरा काही उद्योग .त्याना
काय घाबरायचे ? माझं जीवन आहे, मी माझ्या मर्जी नुसार
जगणार." माली च्या आई ने तिला अनेक प्रकारे समजावून
पाहिले, परंतु ती आपल्या निर्णया पासून अजिबात ढळली
नाही. शेवटी कंटाळून तिच्या आई ने दयानंद पुजारींची भेट
घेतली नि त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली नि त्याना विनंती
केली की तुमच्या वंशाच्या तो दीपक आहे तुम्ही त्याला आपल्या पदरात घ्या. तेव्हा दयानंद ताबडतोब तर निर्णय
दिला नाही परंतु आश्वासन दिले की मी एकदा माझ्या तिन्ही
पत्नी सोबत सल्लामसलत करतो नि तुम्हाला माझा निर्णय
कळवितो. त्यांनी आपल्या तिन्ही पत्नीशी चर्चा केली ,तेव्हा
तिन्ही बहिणी एकच उत्तर दिलं की सून म्हणून आम्ही तिचा
स्वीकार करायला तयार आहोत परंतु ती रोहन शी लग्न करण्यास तयार आहे का ?" ही गोष्ट जेव्हा त्यांनी माली ला सांगितली तेव्हा माली ची आई म्हणाली ," माली रोहन शी तर
लग्न करायला तयार नाहीये. परंतु तुमच्या दुसऱ्या कोणत्याही मुलाशी लग्न करण्यास तयार आहे, परंतु माझ्यावर तरस खाऊन नाही. स्वखुशीने माझा नि माझ्या होणाऱ्या मुलाचा स्वीकार करत असेल तर ! शिवाय मला
कधीही माझ्या मुलावरून किंवा माझ्या शिला वरून टोमणा मरावयाचा नाहीये. हे जर तुमच्या मुलाला मान्य असेल तर मी
लग्न करण्यास तयार आहे." ही अट जेव्हा तिच्या आईने रोहन च्या आई-वडिलांना सांगितली. तेव्हा तिन्ही बहिणींनी त्या गोष्टीस नकार दिला. परंतु रोहन चा धाकटा भाऊ राहुल ने आपल्याला तिची अट मान्य असल्याचे सांगितले. परंतु मोठी तीन भावंड असताना सर्वांत लहानाचे लग्न कसं करणार ? म्हणून थोडे दिवस वाट पहायला सांगितले. माली ने त्याला आपली संमत्ती दर्शविली. त्यानंतर सर्वांत अगोदर राघव चे लग्न करण्यात आले, त्यानंतर सुरेश, त्याची ती बहीण सुरेखा त्या दोघांचे एकदम संगतच लग्न लावून दिले. आता राहिला रोहित चा नंबर रोहत आणि माली या दोघांचे लग्न लावून देण्यात आले. आणि लवकरच माली बाळंत झाली नि तिला पुत्र झाला. त्यानंतर तिने राहुल ला आपला निर्णय सांगितला की मला दुसरे मूल नकोय तेव्हा मला ऑपरेशन करायचे आहे." ते ऐकून रोहन एकदम धक्काच बसला. तो तिला म्हणाला ," काय बोलतेस तू हे ?"
" जे ऐकलेस तेच."
" अगं पण एक मूल होऊ दे ना ?"
" एक पुरा नाही का झाला ? जास्त मुलं काय करायची आहेत ? तुम्ही कशी एकेकजण आहात ."
" अगं पण माझं मूल पाहिजे ना एकतरी !"
" अच्छा म्हणजे हे तुझं मूल नाहीये. शेवटी आलास ना
अस्सलीतवर मला माहित होतं हे असं होणार म्हणूनच मी
अट घातली होती."
" हो पण दुसरं मुल होऊ देणार नाही अशी अट नव्हती त्यात."
" मान्य आहे. पण आता आहे ना अट ."
" पण दुसरे मूल तुला का नकोय ?"
" कारण माझ्या मुलाला सावत्र पणा झालेला मला चालणार नाही."
" पण कोण करतोय सावत्र पणा त्याच्याशी ?"
" तुम्ही !"
" हो , म्हणजे तुम्हांला स्वतःचे मूल झाले की तुम्ही माझ्या
बाळाचा तिरस्कार करणार."
" असं कोण म्हणतेय."
" असं इतिहास सांगतोय. मग तो पुरुष असो वा स्त्री
स्वतःला मूल झालं की सावत्र मुलाचा तिरस्कार सुरू होतो.
आणि मला तेच नकोय."
" ठीक आहे, नकोय मला स्वतःच मूल परंतु तू एक गोष्ट
माझी मान्य कर."
" कोणती ?"
" तू कुटूंब नियोजन करू नकोस म्हणजेच ऑपरेशन
करू नकोस."
" ते का ?"
" ते या साठी की कधी कधी मूल अल्पवयीन मरते."
तशी ती भयंकर चिडली नि म्हणाली ," म्हणजे तुमची
अशी इच्छा आहे की माझ्या मुलाने मारावे नि तुम्हांला दुसरं
मूल जन्मला घालायची संधी मिळावी."
" तसं नाही गं ."
" तसं नाही कसं तसंच आहे."
" तू प्रत्येक गोष्टीचा वेगळा अर्थ का काढतेस ?"
" वेगळा नाही मी योग्य तोच अर्थ काढला त्या मधून."
" ठीक आहे, तू तुझ्या इच्छेनुसार कर." असे म्हणून
राहुल आपल्या खोलीतून बाहेर निघून गेला. तशी ती त्याच्या
पाठमोरी आकृतीकडे पाहत बोलली ," मी पुरुष जातीला
चांगल्या पैकी ओळखते. त्याना फक्त स्वतः पासून झालेले
मूल हवं असतं. पण मी माझ्या मुलावर अन्याय होऊ देणार
नाही. त्यानंतर तिने मागचा पुढचा विचार न करता तिने स्वतःचे ऑपरेशन करून घेतले. ही गोष्ट जेव्हा घरात कळली
तेव्हा सर्वजण तिच्यावर भयंकर चिडले. तेव्हा ती त्याना म्हणाली की , माझ्यावर कशाला चिडता मी माझ्या नवऱ्याच्या संमत्ती ने ऑपरेशन केलं. तेव्हा कांचन ने आपल्या मुलाला विचारले की हे सर्व तुझ्या इच्छेने घडलंय.
त्यावर तो बोच्चारा काय बोलणार ? तो गप्पच बसला. तो गप्प बसलेला पाहून त्याची आई समजली की ह्या बयेने
त्याला मजबुर केलं असणार . कांचन ने ही गोष्ट आपल्या
नवऱ्याला म्हणजेच दयानंद ला सांगितली. त्यावर दयानंद
म्हणाले ," अगं आपल्या मुलाच्या काळजी पोटी केले तिने
कृत्य . जाऊ दे , एक आहे ना ? आणि जास्त तरी मूल काय
कामाची. एक असेल तर त्याची नीट काळजी घेतली जाईल."
" तुम्ही पण तिची साईट घ्या."
" साईट नाही गं खरं तेच सांगितलं."
" पण मला नाही पटलं हे तीचं वागणं."
" जाऊ दे झाल्या गोष्टीला आता पर्याय आहे का ?"
" म्हणून काय तिला अशी आपली मनमानी करायला द्यायची."
" आता काही केलेस तरी त्यात बदल होणार आहे का ?
नाही ना ? मग जाऊ दे."
" तुम्ही हे असे नि तुमचा पोरगा तो तसा माझं मेलीचं एकटीचं मरण झालंय . दुसरं काय ?" असे म्हणून ती त्यांच्या
खोलीतून निघून गेली. मालीचा फारच रुबाब वाढला होता.
घरात सर्वांशी भांडत राहायची. परंतु कुणीही तिच्या तोंडाला
तोंड देत होते. कल्याणी ची सून मात्र फार स्वजनशील होती.
ती सर्वांशी चांगली वागत असे.सुरेश ची पत्नी तिची जाउबाई तिचीच धाकटी बहीण असल्यामुळे त्या दोघींचे चांगले जमत
होते. आणि त्यांच्या सासूबाई पण सख्ख्या बहिणी असल्यामुळे त्यांच्या मध्ये कधीच भांडण होत नसे. माली जरी घरात नीट वागत नसली तरी आपल्या धाकट्या बहिणीची सून असल्यामुळे त्या तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष
करत असत.
हा हा म्हणता पाच वर्षे उमटली.तुरुंगा मध्ये रोहन ची चांगली वागणूक असल्यामुळे त्याची बाकीची शिक्षा माफ
झाली नि तुरुंगातून त्याची सुटका झाली. बाहेर आल्यानंतर
त्याला त्याच्या आजी कडून समजले की माली ने दुसरे लग्न
केले नि तिला झालेला मुलगा तुझा आहे ,असे सांगितले.
मग काय एक दिवस संधी पाहून माली च्या मुलाला शाळेतून
अपहरण केले.
To be continue
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा