बॉडीलेस १६
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
बॉडीलेस १६ |
बॉडीलेसच्या नुसत्या आवाजाने तो घाबरला होता आणि तो समजून चुकला की,जर आपण बॉडीलेसचाआदेश मानला नाही तर तो आपला जीवच घेईल. म्हणून मुकाट्याने मोटार चालवत होता. तुरूंगातून दोन कैदी पळाले. ही खबर वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. खास करून विश्वजीत अचानक गायब झाला. ही खबर सर्वांना विस्मय चकीत करून सोडणारी होती. सोबत जफर खानच्या साथीदाराला नेले. त्यामुळे पो. इन्स्पेक्टर राणे समजून चुकले की बॉडीलेस नक्कीच जफर खानच्या अड्डयावर गेला असावा. हे जसे ध्यानात आले तसे स्वतःच एक पोलीस पथक घेऊन जफर खानच्या अड्डयावर निघाला.
जफर खान सेंट्रल जेल मधून जो पळाला तो थेट आपल्या अड्डयावर पोहोचला. जेव्हा त्याने सर्वांना सुरक्षित पाहीलं. तेव्हा त्याचा जीव भाड्यात पडला. त्याचा चेहरा भीतीने काळवटला होता. अजूनही त्याच्या चेहऱ्यावर भीती जाणवत होती. त्याची ही अवस्था पाहून त्याच्या लहान भावाने त्याला विचारले," क्या हूआ भाईजान आप इतने डरे हुए से क्यों लगते है ?" तब जफर खान बोलला," कुछ नही छोटे जरासा डर गया था ?" न समजल्याने पाशा खानने विचारले," डर गये थे ?.......मगर किससे ?" त्यावर घडलेला प्रसंग सविस्तरपणे त्याने आपल्या छोट्या भावाला ऐकविला.
तेव्हा पाशा खान खो खो हसत म्हणाला," आप भी ना कमाल करतो हो भाईजान ? मरे हुए इन्सान फिरसे जिंदा होते है क्या? और वैसे भी आप गये थे वहॉ उनको डराने लेकीन नतीजा क्या हूआ ? खूद डरकर भाग आ गये यहां."
आपला छोटा भाऊ आपली टींगल करतोय हे पाहून जफर खान भयंकर चिडला आणि म्हणाला," छोटे तू मेरा मजाक उडा रहा है ?" त्यावर दिलगीरी व्यक्त करत बोलला ,
" सॉरी भाईजान मेरा ऐसा कोई इरादा नही था " लगेच जफर खान हसून म्हणाला," डर गया ना ऐसा डर होना बहूतही जरूरी है."
" इसलिए उस समय मै भी डर गया था. "
" कोई बात नही ऐसा होता है कभी-कभी ।" इब्राहीम खान बोलला.
" बरं मी काय मी म्हणतो पुढची योजना तयार करायला आता काहीच हरकत नाही. कारण आता बॉडीलेस नावाची ब्याद आता कायमची हठली. "
" चला, त्या खूशी निमित्त पार्टी ऑर्गनाईज करा. "
पार्टीची तयारी सुरु झालीच होती.
मोटार जशी जफर खानच्या गुप्त स्थानावर पोहोचली. तशी त्याने एक विशीष्ट खूण केली. त्या खूणेचा अर्थ गेटवर पहाऱ्याला बसलेली माणसं समजली. कारण ती भाषा कोड भाषा होती. गेटवरच्या माणसानी फाटक उघडले. तशी ती मोटार आंतमध्ये शिरली. तसे फाटक पुन्हा बंद झाले. त्यामुळे पोलिसांची गाडी बाहेरच अडकली. मग पोलीस आणि जफर खानच्या गैंगच्या लोकांसोबत चकमक सुरु झाली.
जफर खान आणि आतंकवादी पार्टीच्या तयारीत होते. इतक्यात त्यांची नजर तुरूंगातून पळून आलेल्या सत्या वर पडली. त्याला पाहून त्याना किचिंत आश्चर्य वाटलं आणि शंका देखील आली ," अरे , हा एकटाच कसा तुरूंगातून पळाला. जफर खान त्याला विचारणारच होता. एवढ्यात त्याची नजर हवेत तरंगत असलेल्या पिस्तुलावर पडली. तसा तो घाबरलाच त्याला विश्वजीतने तुरूंगात बोलले शब्दच आठवले. तसेे त्याच्या तोंडून उद्गार निघाले - अरे बाप रे ! खरंच बॉडीलेस आला की काय ह्याच्या सोबत ?" अशी शंका मनात येताच त्याचे संपुर्ण अंग भीतीने थरथरले. पण तेवढ्यात पिस्तुल गायब झाले. तसे त्याला वाटले की, आपल्याला तसा भास होतोय. प्रत्येक्षात कुणी नाही इथं.
असा विचार मनात येताच लगेच स्वतःला सावरत आपल्या साथीदाराला विचारले," काय रे सत्या तू एकटाच कसा आलास ? पोलिसांनी तुला एकट्यालाच सोडले का पळून आलास पोलिसांची नजर चुकवून ? पण सत्या काहीच बोलायला तयार नाही. तसा बॉडीलेसचा आवाज कानी पडला ," अरे जफर खाना त्याला काय विचारतोयेस ? तुला जे काय विचारायचे आहे ते मला विचार ना ? मी देईन तुझ्या साऱ्या प्रश्नांची उत्तरे मला विचार ना ? " बॉडीलेसचा आवाज ऐकताक्षणी सर्वांची पाचरधानी बसली. प्रत्येकजण विचार करू लागले की, इथून पळून कसं जाता येईल ? तेवढ्यात जफर खान हिंम्मत करून बोलला की, तुम
तो मतलब तुम उस बॉम्ब स्फोट मे मर नही गये थे ?"
" मरते तो वो है जो पैदा होते है।"
" अच्छा तुम पैदा नही हुहे हो ? तो क्या आसमानसे टपक गयेे हो ?" इब्राहीम खान बोलला.
" बेवखूफ आसमान से कोई नही टपकता है इसे धरती परही सब पैदा हो जाते है लेकीन मै पैदा नही हुआ हूं ! बल्की मुझे बनाया गया है और मेरा नाम है बॉडीलेस !"
" तुम बॉडीलेस हो, तो सामने क्यों नही आते हो ? छुपके क्यो वॉर करते हो ?"
" आज तुम्हारी हर तमन्हा पुरी हो जायेगी !" असे बोलून तो वास्तविक रूपात आला. पण बॉडीलेसच्या ऐवजी विश्वजितला पाहून उद्गारला," विश्वजीत तू s s तुरूंगातून कसा बाहेर आलास ?
" भुल गये जेल मे मैने क्या कहा था की, हवा को कमरे में कोई नही बंद कर सकता है जफर खान ! और सुनो दुनिया की किसी जेल की दीवारे इतनी भी पक्की नही जो बॉडीलेस को बंद कर सके ! और सुनो मैने जेल में क्या कहा था उसे जरा याद करो. " असे म्हणताच विश्वजीतने तुरूंगात म्हटलेले वक्तव्य आठवले. विश्वजीत बोलला होता की,जेल मे आना तो सिर्फ बहाणा था. तुम तक पहूँचनेका और तू आपल्या बिळातून बाहेर यावे हाच त्या मागचा हेतू होता आणि त्या प्रमाणे तू बाहेर आलास ही ! बस्स माझं काम सोपं झालं."
त्यावर जफर खान बोला ," तू यहाँ आया तो जरूर है लेकीन यहाँ से वापस नही जा पायेगा ।"
" कौन रोकेगा मुझे ?"
" मै और मेरे आदमी "
" तुम्हारे आदमी कौन ये ....
जरा उनकी शक्कल तो देखी होती तुमने ?"
" क्या हो गया है उनके शक्कल को ?"
" अगर देखते तो यह बात करने का साहस नही कर पाते?"
जफर खानने आपली नजर चौफेर फिरविली. तेव्हा त्याच्या ध्यानात आलं सर्वांचया चेहऱ्यावर भीतीयुक्त चिन्हे उमटली आहेत. परंतु आतंकवादीच्या चेहऱ्यावर मात्र आश्चर्य उमटलेले दिसले. तसा जफर खान बोलला," काय झालं ? तुम्हां लोकांचे असे चेहरे का पडले ?"
तेव्हा एकजण हिंम्मत करून बोलला," बॉस आप जानते है ना बॉडीलेस कीतना खतरनाक है ?"
" अरे , ह्याच्या बोलण्यावर विश्वास करू नका हा बॉडीलेस नाहीये. हा फक्त विश्वजीत आहे."
" बिलकुल गलत ना मै बली हूं ना विश्वजीत. हूं मै सिर्फ और सिर्फ बॉडीलेस हूं !"
असे म्हणताच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. हा दिसतोय तर विश्वजीत सारखा मग स्वतःला विश्वजीत म्हणवून घ्यायला तयार का नाही. जणू हाच प्रश्न सर्वांना पडला असावा. पण तेवढ्यात जफर खान म्हणाला," तू काय आम्हांला मुर्ख समजतोयेस ? आम्ही काय तुला ओळखत नाही की काय ? प्रत्येक वेळी तू स्वतःचे नाव बद्दललेस. त्यामुळे कुणीही तुझ्या बोलण्यार विश्वास ठेवणार नाही. "
" नका ठेवू तो तुमचा प्रॉब्लेम आहे. आय डोन्ट केअर !" तेवढ्यात मध्येच इब्राहीम बोलला ," ठीक आहे मी ठेवतो तूझ्या बोलण्यावर विश्वास . पण त्यासाठी तुला माझं एक काम करावं लागेल. "
" कोणते काम ?"
" तुला माझ्या सोबत माझ्या देशात यावे लागेल. "
त्यावर बॉडीलेस हसून म्हणाला," तुझ्या देशात ! जो कभी खुद का तो था नहीं भीक में मिला था भारत से . फीर भी मन नहीं भरा तुम लोगोंका . इसलिए बार बार आते हो मेरे देश में आतंक फैलाने . मगर हर बार मुँह के बल गिर जाते हो. फीर भी बेशर्म की तरह वापस चले आते हो मेरे देश में .लेकिन मुझे ऐसे लोगों के साथ ना मिलना पसंद है और नाही रहना पसंद है। " तसा इब्राहीम खान ओरडला - खामोष ! बहुत बोललिया है तुमने और अब एक भी शब्द मुहँ से गलतिसे भी निकाल दिया तो जुबान खिच लूगां "
" क्यों ? सच्ची बात कडवी लगी तो सोचो मुझे अपने देशसे गद्दारी करने को बोलते हो तो मुझे कैसा लगा होगा "
" तुम तो केवल मशीन हो रोबट को क्या अच्छा और क्या बुरा ? रोबट को क्या फरक पडता है ? "
" गलत... बिलकुल गलत क्योंकी ये रोबट भारत के मिठ्ठी से बना है और भारत की मिठ्ठी अपने दुश्मन को पनाह तो जरूर देती है .लेकीन गलत इरादे रखने पर उसे वह जमिन के अंदर दफना भी देती है इसलिए भारत मे तुम्हारे जैसे न जाने कितने लोग आये और कितने चले गये . लेकीन वो भारत का कुछ नही बिगाड पाये. और तुम भी कुछ भी बिगाड पायेगे .चाहे तो अजमाकर देखो ." तसा इब्राहीम खान भयंकर चिडला म्हणाला," अरे ए रोबट नही विश्वजीतही है भुन डालो साले को ''
असे म्हणताच चारी बाजूनी गोळंयाचा वर्षाव सुरू झाला. परंतु बॉडीलेसला एक सुध्दा गोळी आघात करू शकली नाही. परंतु त्यानी मारलेल्या गोळ्या त्यांच्यावरच जेव्हा बॉडीलेस परतवू लागला. तेव्हा मात्र आतंकवादी घाबरले आणि पळून जाण्याच्या प्रयत्न करीत होते. परंतु बॉडीलेस ने त्याना पळू दिले नाही. एकेकाला उचलून चंडू प्रमाणे फेकू लागला. त्यामुळे ते अर्ध मेले झाले. त्याना उठण्याची पण ताकद राहीली नाही. ते पाहून इब्राहीम खान,पाशा खान आणि जफर खान घाबरले आणि पळण्याच्या प्रयत्नात होते. पण बॉडीलेसच्या ध्यानात आले. तसा त्याने त्याना अडवत म्हटले," क्यो भाग रहो हो, जंग का मैदान छोडकर वैसे तो मैदान छोडकर भाग जाना तो तुम्हारी पुरानी आदत है. लेकीन मै तुम्हे भागने का कोई मौका नही दुंगा. बल्की यहीपर दफन कर दूंगा. " तसे दोन्ही हात जोडून म्हणाले," बॉडीलेस हमे माफ कर दो " तेव्हा बॉडीलेस उद्गारला," बॉडीलेस के अदालत मे गुन्हेगार को माफी नही, सजा दी जाती है, वह भी मौत की सजा क्योंकी बॉडीलेस के अदालत मे ना कोई तारीख होती है, ना कोई वकील होता है ,और ना कोई जज है, न कोई सुनवाई ! सिधी सजा दी जाती है वो भी फांशी ! शुकर मनाओ की यह तुम्हारी जगह है, अगर मेरा अड्डा होता तो.....
" प्लीज हमे माफ करो हम कभी भी भारत के तरफ देखेगे भी नहीं !'
" हर बार यही कहते हो और भुल जाते हो, मगर इस वक्त मै कोई भी मौका नही दुंगा "
असे बोलून पाशा खान आणि जफर खान यांच्या शर्टाची कॉलर पकडून वर उचलले नि दोघांना एकमेकांवर आपटविले आणि वर उचलून भींतीवर आदळले. ते भींतीला आपटून जमिनीवर कोसळले. ते पाहून इब्राहीम खान पळण्याचा प्रयत्न करतो पण बॉडीलेसने त्यालाही पकडले. आणि उचलून वर फिरत्या पंख्यावर फेकून दिले. इब्राहीमची मान पंख्यावर कापली गेलीे. तेव्हा त्याच्या मुखातून एक जोरदार किंकाळी बाहेर पडलीे आणि जमिनीवर कोसळला. पुन्हा उठून उभे राहण्याचीही त्यांच्यात ताकद राहिली नाही. पण तेवढ्यात तेथे पोलीस पोहोचतात आणि समोरील दृश्य पाहून थक्क होतात. पण क्षणभरच ! पण लगेच दुसऱ्या क्षणी पोलीस इन्स्पेक्टर वीरेंद्र राणेला आपल्या कर्तव्याची जाणीव होते. तो उद्गारला,'' आता बस कर बळी ! पण लगेच लक्षात येते की आपल्या तोंडी चुकून बळी हे नाव आले हे ध्यानात येतात, तो आपली चुक सुधारत बोलला," सॉरी विश्वजीत."
" तुम्ही सुध्दा तीच चुक करताय इन्स्पेक्टर साहेब. "
" म्हणजे?"
" मी विश्वजीत नाही मी फक्त नि फक्त बॉडीलेस आहे. "
" ठीक आहे बॉडीलेस तर बॉडीलेस .....पण तू त्याना मारू नकोस तर आमच्या हवाली कर."
" नाही. ह्या हरामखोराना मी तुमच्या हवाली करू शकत नाही."
" कायदा हातात घेऊ नकोस विश्वजीत. "
" ते नियम फक्त माणसासाठी असतात आणि मी माणूस नाहीये."
" पण देशप्रेमी तर आहेस ना. "
" म्हणूनच तर त्याना त्यांच्या अपराधाची शिक्षा देवू इच्छितोय."
" ते ह्या देशाच्या न्यायदेवतेचे काम आहे आणि त्यांचं काम त्यानाच करू द्या . आय एम शोअर तू ह्या देशाचा अपमान करणार नाहीस.प्लीज लिसीन टू मी ! "
" इट्स ऑल राईट ! घेऊन जा ह्या हरामखोराना !" असे बोलून तो तेथून जाऊ लागला. तसा पो. इन्स्पेक्टर बोलला," आता तू कुठं निघालास ?"
" आता दुसऱ्या शहरात तिथला क्राईम संपवायला. "
" पण हे काम तू आमच्या सोबत राहून करू शकतोस. "
" नाही. कारण जंगलात वाघ एकटाच राहतो. त्याला सोबत लागत नाही कुणाची आणि तुमच्या कामात पुर्ण स्वातंत्र्य नसते आणि मला बंधनात राहायला आवडत नाही. येऊ मी !"
"थांब. आधी मला सांग तू नक्की कोण आहेस ?"
" ते पोलीस स्टेशनला सांगेन चालेल ?"
" हो, चालेल. "
त्यानंतर पोलिसांनी सर्व अपराध्याना अटक केली आणि पोलीस स्टेशनला जायला निघाले.
पोलीस स्टेशनला आल्यानंतर सर्वाना पोलीस कोठडीत बंद केले आणि जे जास्त जखमी होते. त्याना पोलिसांच्या देखरेखेखाली इस्पितळात दाखल केले. त्यानंतर बळीला विचारण्यात आले की तू जर विश्वजीत नाहीस तर आहेस तरी कोण ? ते सांग. आणि विश्वजीतचे काय झाले तेही सांग."
तेव्हा बॉडीलेसने सांगितले की डॉ विश्वजीतना तिथल्या. आणि इथल्या काही सायंटिस्ट लोकांनीच ठार मारले असेल. किंवा जिवंत पण असण्याची शक्यता आहे .परंतु
ते आता कोठे असतील हे सांगणे कठीण . परंतु मला असं वाटतं, की बहुधा डॉ विश्वजित जिवंत नसावेत. कारण मी आणि डॉ. विश्वजित सिंगापूरहून भारतात येत असताना त्या लोकांनी आमच्या विमानाचा पाठलाग केला. डॉ विश्वजीत ना कळून चुकलं की, आपण भारतात पोंहोचू शकत नाही. तेव्हा त्यानी माझ्याकडे दोन चीप दिल्या होत्या नि मला म्हटले," जेव्हा तू हिरव्या रंगाची चीप तुझ्या मनगटात टाकशील तेव्हा तू अदृश्य होशील आणि जेव्हा लाल रंगाची चीप तुझ्या मनगटात टाकशील. तेव्हा हिरव्या चीपचा वायरस नष्ट होईल आणि तू सर्वाना दिसू लागशील तेव्हा तू भारतात जा आणि माझं अपुरं राहीलेल स्वप्न पूर्ण कर. कारण मी आता काय जीवंत राहात नाही आणि यदाकदाचित यातून वाचलो तरी ते लोक माझा पिच्छा सोडणार नाहीत. म्हणून तू विमानातून खाली उडी मार तू अदृश्य असल्यामुळे तुला कुणी पाहणार नाही त्यामुळे सगळ्यांना हेच वाटेल की मी विमानासहीत आगीत जाळून खाक झालो. मात्र तू सुरक्षित ठिकाणी पोहोचल्यावर चीप बाहेर काढ. नाहीतर तुझी कुणी मदतच करणार नाही. बस्स ! मी तेच केले. फलाटावर चीप काढून टाकली. त्याच वेळी जहाजातून जाणाऱ्या बब्बर बॉसनं मला पाहीलं आणि मनुष्य समजून त्यानी आपल्या जहाजात घेऊन किणाऱ्याला आणलं. तेव्हा माझी बॅटरी डाऊन होती. त्याना वाटलं समुद्राच्या लांटाचा मार खाऊन मी बेशुध्द झालोय. असं समजून त्यानी मला आपल्या अड्डयावर आणले आणि मला शुध्दीवर आणण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या ध्यानात आलं की,माझा श्वासोच्छवास बंद आहे म्हणून मग ते मला मृत समजले आणि मग मला त्यानी इलेक्ट्रीक शेगडीत टाकून दिले. पण जशी मला इलेक्ट्रीक सप्लाय मिळाली तशी माझी बॅटरी चार्ज झाली. बस्स मी मोठ्याने ओरडलो. कारण त्याना समजून द्यायचं नव्हतं की मनुष्य नाहीये. माझा आवाज ऐकून बब्बर बॉसने इलेक्ट्रीक शेगडीचं स्विच ऑफ केला. मग काय मी बाहेर आलो. पण बब्बर बॉसला संशय आला की माझं शरीर शेगडीत होरपळले कसे नाही म्हणून त्यानी मला विचारले देखील की हे कसं शक्य झाले ? त्यावर मी म्हणालो ," मुझे भगवानने बचाया मग त्यावर त्यांचाही विश्वास बसला. मग त्यानी मला माझं नाव गाव विचारले. तेव्हा मी विचार केला. की ही कोण माणसं आहेत कोण जाणे ? तेव्हा आपले अस्तित्व लपवून ठेवणेच योग्य आहे असा विचार करून मी त्याना सांगितले. की मला काहीच आठवत नाही. तेव्हा त्यानी मला बळी हे नवीन नाव दिले आणि त्यानी मला आपल्या मुला सारखे वागविले. म्हणून मी त्याना माझं खरं नाव सांगणार होतो. पण त्या अगोदरच तुमच्या त्याच श्रीकांत जाधव जफर खानच्या सांगण्यावरून ठार मारले. म्हणून मी इन्स्पेक्टर श्रीकांतला त्याच दिवशी ठार मारले. पण त्या अगोदर बब्बर बॉसचा मृतदेह इस्पितळातून गायब केला. कारण सगळ्याना वाटायला हवे की, बब्बर बॉस ने त्याला ठार मारले म्हणूनच बब्बर बॉसची बॉडी गुपचूप पणे इलेक्ट्रीक शेगडीत आणून ठेवली. त्यानंतर इन्स्पेक्टर श्रीकांत जाधवला पकडूून आणले आणि त्याला जिवंतपणीच शेगडीत टाकून दिले. त्यामुळे सर्वाना वाटलं कीे, बब्बर बॉसनेच भुत बनून इन्स्पेक्टर श्रीकांत जाधवला मारले असे लोक म्हणू लागले .बस त्याचाच फायदा मी उचलत गेलो बाकीचे तुम्हांला माहीत आहेच !
" ते ठीक आहे पण मला पण मला एक सांगा की,जर तुम्ही डॉ.विश्वजित नसून एक रोबट आहात तर बब्बरच्या अड्यावर तुम्ही ज्या रोबटचा विनाश केलात तो कुठला रोबट ? डॉ.विश्वजितने दोन रोबट बनविले होते का ? "
" नाही. डॉ विश्वजितने एकच रोबट तयार केला होता. परंतु माझ्यात अशी क्षमता त्यानी बनविली आहे की मी माझ्या सारखे अनेक रोबट बनहूं शकतो आणि त्या प्रमाणे मी एक रोबट बनविला. त्याचे काम फक्त इतकेच होते की मी जेव्हा अड्यावर बळीच्या जागी बसलेला असतो त्यावेळी तेव्हा तो मला आदेश द्यायचा. त्यामुळे सर्वाना असेच वाटायचं की बॉडीलेस कुणी दुसरा आहे." त्यावर इन्स्पेक्टर राणे विचारले ," तुमच्यात तुमच्या सारखे दूसरे रोबट बनविन्याची क्षमता जर तुमच्यात आहे तर तुम्ही बब्बरच्या साथीदारांचा वापर का केला ? त्यांच्या जागी दुसरे रोबट पण बनवू शकला असताना."
" अवश्य बनवू शकलो असतो. पण ज्याने मला पुनर्जीवन दिले. त्याच्या साथीदारांना मी जर मारून टाकले तर ती कृतन्यता ठरली असती. शिवाय माझं वास्तविक रूप जगा समोर मला आणावयाचे नव्हते. नाहीतर मला साथीदारांची काही आवश्यता नाही मी सर्वकाही एकटा करू शकत होतो. ?" पो. इन्स्पेक्टर राणे म्हणाले," तू जर रोबट आहेस तर मग जेवला नाहीस त्या बद्दल टॅबलेट खाल्लीस ती काय भानगड आहे म्हणजे तू रोबट आहेस त्या अर्थी तुला जेवायची गरज नाही हे मला पटतंय . पण मग रोबट म्हणजे तू टॅबलेट कसा खाऊ शकतोस.? त्यावर बॉडीलेस म्हणाला," मी टॅबलेट तोंडात टाकली हे तू पाहिलेस. परंतु त्या सोबत पाणी प्यालो का ? नाही ना ? आता राहिला प्रश्न टॅबलेटचा तर ती टॅबलेट पॉवरची होती. जशी माणसाला औषध म्हणून टॅबलेट खाल्यावर ताकत येते. तशी विद्युत टॅबलेट खाल्यावर आम्हाला ही ताकत येते. आणि त्यावेळी मी तसे केले नसते तर जयचंद उर्फ पो. इन्स्पेक्टर राणे ना अर्थात तुम्हाला माझा संशय नक्कीच आला असता. हो की नाही ?"
तेव्हा इन्स्पेक्टर राणे बोलले," अगदी बरोबर. आता फक्त शेवटचा प्रश्न विचारतो तो हा की, चल मानलं की तुझ्या मध्ये माणसा प्रमाणे फिलिंग्स आहेत. म्हणून बब्बरच्या साथीदाताना ठार नाही मारलेस. हे देखील मी मान्य करतो की,अड्यावर बोलणारा दुसरा रोबट होता. कारण मी ते पाहिले आहे की तू आपल्या जाग्यावर बसून टॅब मध्ये काहीतरी मॅसेज टाईप कारायचास. अर्थात त्या रोबटला काय बोलावयाचे आहे हे तू टॅब मार्फ़त सांगत होतास. हे सुध्या मानलं. परंतु मला अजून हे कळलं नाही की,गायब होण्याचा फार्म्युला म्हणजे चीप ड्रिल मशीन वगैरे सर्व आमच्याकडे होत्या आणि आम्ही तुझी झडती घेतली. तेव्हा तुमच्याकडे दुसरं काहीच नव्हतं . मग तुम्ही कारावासातून गायब कसे झाले ? हे अगोदर मला सांगा. "
" दुसरा फार्म्युला म्हणजे चीप त्या मी इथं सुरक्षित लपवून ठेवल्या आहेत."
असे बोलून त्याने आपला डावा पाय उचलला. शुजच्या खाली एक कप्पा आहे. त्यात एक छोटीशी डबी होती. ती काढून दाखविली. त्याच डबीत दोन चीप होत्या आणि दुसऱ्या कप्प्यात एक छोटीशी ड्रील मशीन होती ती दाखविली. पण ह्या व्यतिरिक्त अजून एक सिस्टम आहे. जेव्हा ही सिस्टम काम करणार नाही. तेव्हा दुसरी सिस्टम माझ्या बॉडीमध्येच आहेत आणि त्या सर्वांचा रिमोट माझ्या या हाताच्या पंजात आहेत." असे बोलून त्याने आपल्या पोटावर हाताचा पंजा ठेवला. तसा एका शेंकदात बॉडीलेस गायब झाला." तेव्हा पो. इन्स्पेक्टर वीरेंद्र राणे बोलला," रहस्य कळलं आम्हाला. आता प्रगट हो बॉडीलेस," असे म्हणताक्षणी बॉडीलेस प्रगट झाला. "
" इतके सारे सिस्टम आहेत. त्यात तर स्वतःची ओळख जगा पासून लपवून ठेवण्यामागचे काय कारण ?"
" माय फादर म्हणजे डॉ. विश्वजीतची तशी इच्छा होती. कारण ह्या शक्तीचा मनुष्य गैर वापर करू शकतो. म्हणून खरं तर अदृश्य होण्याची शक्ती फक्त देवा जवळच शोभून दिसते. कारण देवच या शक्तीचा योग्य वापर करू शकतो. मानव कदापी नाही. म्हणून ती शक्ती देवाने मानवाला दिलेली नाही. आणि शेवटचं काय सांगतो ते ऐका. " असे बोलून किचिंत थांबला आणि मग पुढे बोलला," आता माझं इथंलं कार्य संपले आहे. तेव्हा डॉ विश्वजीतची शेवटची इच्छा पुर्ण करायची आता वेळ आलेली आहे. तेव्हा आता निघायला हवं. येऊ मी ! " तेव्हा पो. इन्स्पेक्टर वीरेंद्र राणेने विचारले ," काय शेवटची इच्छा होती डॉक्टरांची ?"
" माझं रहस्य उघकीस आल्यावर मी स्वतःच अस्तित्व स्वतःच संपवून टाकावयाचे म्हणजे डिस्ट्रॉय करून टाकायला सांगितले."
" पण का ?"
" अश्या शक्तीची सध्या माणवाला तरी गरज नाहीये. म्हणून ....एवढं बोलून त्याने कुठंतरी बटन ऑन केलं. बस्स ! एका क्षणात बॉडीलेस तुकडे-तुकडे झाले सर्वजण चकित होऊन फक्त पाहतच राहीले.
समाप्त
ही कथा इथंच संपली नाहीये.कारण डॉ.विश्वजितचे पुढे काय झाले ? म्हणजे तो जिवंत आहे किंवा नाही? जिवंत असेल तर तो कोठे आहे? हे रोबोट हा बॉडीलेस २ रा भागात सांगण्यात आले आहे.अर्थात बॉडीलेस न.२ प्रकाशित झाला. आणि बॉडीलेस न.३ पंखरूपी मानव ( दुसरी दुनिया ) प्रकाशित झाला आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा