पंखरूपी मानव ४
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
पंखरूपी मानव ४ |
गावकऱ्यांनी डॉ. विश्वजित आणि त्यांचे असिस्टंट जॉन
आणि सलीम या सर्वांचा सत्कार करायचा ठराव केला. डॉ.
विश्वजित नको म्हणत असताना ही त्यांनी जिल्हा प्रमुख
मुख्य अतिथी म्हणून बोलविण्यात आले. त्यांच्या हस्ते त्या सर्वांचा सत्कार समारंभ झाला. आणि ही वार्ता सर्व वर्तमान पत्रात छापून आल्या होत्या. त्यामुळे डॉ. डेव्हिड नि डॉ. डांबर यांना खबर लागली की डॉ. विश्वजित आणि त्यांचे असिस्टंट सध्या कोठे आहेत. तसे ते नाणार गावाला जायला रवाना झाले.
रिपोर्टर मशीन झाली नि बॉडीलेस चंद्रावर जाऊन
वापस आला. तिकडून मातीचे नमुने आणले नि फोटोज
आणले. शिवाय चंद्रावर गुरुत्वाकर्षण नसल्या मुळे उड्या मारत चालावे लागते, म्हणजे अगोदरच्या वैज्ञानिका जी माहिती आणली होती तीच माहिती बॉडीलेस ने आणली
होती. नवीन काहींचे नव्हते. म्हणून डॉ. विश्वजित म्हणाले ,"
बस्स ! आता मंगळ, बुध, गुरू,शनी, या ग्रहावर जायची
गरज नाही. कारण या ग्रहांची माहिती, या पूर्वीच आणली
आहे वैज्ञानिकानी तेव्हा आता अजून खूप इंच अंतराळात
जावे नि नवीन ग्रहांचा नि तारेंचा शोध घ्यावयाचा आहे, कारण माझा असा आत्मविश्वास आहे की, पृथ्वी सारखा
जीवमात्रा असलेला ग्रह जरूर असावा. कारण माझ्या
वडिलांनी बनविलेले जेट विमान अद्याप धर्तीवर आलेले नाही. नाही त्याचे अवशेष कुठे सापडले याचा अर्थ ते अंतराळात कोठल्या तरी ग्रहावर उतरले असावे, अथवा
दुसऱ्या दुनियेतील लोकांनी त्याना गुप्तहेर समजून कैद
केले असावे." त्यावर जॉन म्हणाला ," असे वाटायचे कारण ?"
" माझा आत्मविश्वास मला सांगतोय की ,माझे वडील
जिवंत आहेत, नि त्यांच्या कैदेत आहेत."
" पण मी का म्हणतो."
" काय म्हणतोस बोल."
" तुम्ही म्हणता त्या प्रमाणे खरोखरच दुसरी दुनिया
असेल तर तेथे आपण पोहोचणार कसे ?" सलींम बोलला.
" त्यासाठी च तर ह्या बॉडीलेसची निर्मिती केली आहे मी."
" म्हणजे ? हा काय करणार तेथे ?"
" काय करणार म्हणजे ? जे आपण करू शकत नाही ते हा बॉडीलेस करून दाखवेल." डॉ. विशेजित बोलला.
" ते मान्य आहे ,परंतु त्याने सुध्दा सुरक्षा कवच तयार केले
असेल ना ? त्यांच्या दुनियेत कोणी प्रवेश करू नये म्हणून."
" शक्य आहे. आणि म्हणूनच मी हा बॉडीलेसच त्यांचे सुरक्षा कवच भेदून त्यांच्या दुनियेत प्रवेश करू शकतो."
" कसा ?"जॉन बोलला.
" पहिली गोष्ट बॉडीलेस शक्तिशाली आहे, शिवाय त्याला
ऑक्सिजन किंवा अन्नाची गरज नाहीये. त्याला फक्त सूर्य ऊर्जेची गरज आहे, आणि अंतराळात सूर्य उर्जेला काही थोटा
नाही. कारण तेथे रात्र ही होत नाही आणि दिवस ही होत नाही." डॉ. विश्वजित उद्गारला.
" पण दुसऱ्या दुनियेत तर पृथ्वी प्रमाणे दिवस आणि रात्र
होत असेल तर ? " जॉन ने विचारले.
" तरी देखील आमच्या बॉडीलेस प्रॉब्लेम नाही. त्याची बॅटरी एकदा चार्ज झाल्यानंतर २४ तास निरंतर चालू शकते."
" वा ! एकदम भारी सिस्टम बनविली आहे तुम्ही !" जॉन
बोलला.
" पण मी काय म्हणतो ? " असे म्हणून सलीम किंचित
थांबला नि मग पुढे म्हणाला ," चला मानलं की बॉडीलेस
शक्तिशाली आहे,नि त्याला कोणत्याही इंदन ची गरज नाहीये.
परतु त्यांच्या दुनियेत प्रवेश केल्यानंतर बॉडीलेसला त्या जगातील लोक कैद नाही का करणार ?" त्यावर डॉ. विश्वजित बोलले ," कसे करणार ? त्याना बॉडीलेस दिसला
तर कैद करतील ना ?" त्यावर सलीम खजील होत म्हणाला,
" हां यार हे माझ्या द्यानातच राहिले नाही." तेव्हा प्रथमच
बॉडीलेस ने आपले मत व्यक्त करत म्हटले ," सर, आता मी
काय सांगतो ते ऐका." डॉ . विश्वजित म्हणाले ," बोल."
" तुमच्या वडिलांचा शोध घेण्यासाठी जर मला त्या दुनियेत प्रवेश करायचा असेल तर मला अदृश्य रुपात तेथे जाऊन चालणार नाही. "
" का ?"
" कारण त्याना कोठे बंधीस्थ करून ठेवले आहे , ते कसं
कळणार ? त्यासाठी मला त्यांच्या समोर जावे लागणार ?
तरच ते मला ही पृथ्वी वरील जासूद समजून कैद करतील
नि त्यांच्या कारागृहात बंद करतील. तेव्हाच मी तुमच्या वडिलांचा शोध घेऊ शकेन."
डॉ. विश्वजित त्याची प्रशंसा करत बोलले ," ओ येस एकदम बरोबर बोललास तू ? परंतु त्यांच्या दुनियेत प्रवेश
करताना तुला अदृश्य होऊनच प्रवेश करावा लागेल. आणि
एकदा त्यांच्या भूमीवर पाऊल ठेवलेस ना ? की मग आपल्या असली रुपात ये , म्हणजे तुला पृथ्वीवरील जासूद
समजून तुला पण त्याच कैद खाण्यात बंधीस्थ करतील, ज्या
कैद खाण्यात त्यांनी बाबांना कैद करून ठेवले असेल."
" यु आर राईट सर ! परंतु मी त्याना ओळखणार कसा ?"
तेव्हा डॉ. विश्वजित बोलले ," माझ्याकडे त्यांचा एक जुन्या
काळचा म्हणजे मी लहान होतो तेव्हाचा एक फोटो आहे.
तो मी तुला देतो. ,त्यात मी आणि आई सुध्दा आहे. आणि त्याना सुध्दा तुझी ओळख पटावी त्यासाठी त्या फोटोची
गरज आहे." असे म्हणून तो फोटो शोधू लागले. पण फोटो
आता कसा सापडणार ? कारण त्यांच्या विमानाला अपघात
झाला होता. तेव्हा तो फोटो कोठतरी पडला असावा. मग त्याना आठवले की अगदी तशाच फोटो त्यांनी त्याच्या मामाच्या घरी पाहिला होता. मग डॉ. विश्वजित आपल्या
मामाच्या घरी जाऊन तो फोटो मागून घेतात नि बॉडीलेस
ला आपल्या आई -बाबांचा नि स्वतःचा फोटो दाखवत म्हणाले," हो फोटो तू माझ्या वडिलांना दाखव. ते साधारणता माझ्या .....सॉरी ते माझ्या सारखे दिसत नाहीत
तर मी त्यांच्या सारखा दिसतो. " त्यानंतर बॉडीलेस कॉमेरा
पुन्हा अंतराळात भ्रमण करायला निघाला. त्याने आपले
पंख फडफडविले नि आकाशाच्या दिशेने झेप घेतली. आणि
हा हा म्हणता दिसेनासा झाला. आणि डॉ . विश्वजित रिपोर्ट
मशीन मध्ये किती दूर वरचा नेटवर्क त्या मशीन मध्ये दाखवितो हे त्या मशीन मध्ये चेक करत असतो. इतक्यात
अचानक रेड सिग्नल येऊ लागला. ते पाहून डॉ. विश्वजित
समजून चुकले की आपल्यावर हल्ला होणार आहे. परंतु
पळून पळणार कोठे ? शिवाय बॉडीलेस अजून अंतराळ वरून आला नव्हता. अशा परिस्थिती मध्ये स्वत: ला कसे वाचवावे असा प्रश्न डॉ. विश्वजित ला पडला होता. विचार
करता-करता त्याना एक युक्ती सुचली. आता लपण्यासाठी
एकच सुरक्षित जागा आहे , ज्या जागेची त्या लोकांनी झडती त्या जागेची झडती पुन्हा कदापि घेणार नाहीत अर्थात आपल्याला आता एकच जागा सुरक्षित वाटते आणि ती जागा म्हणजे मुंबईतील पडकी इमारत. हो तेथेच जाऊन
लपायला हवे. असा विचार करून ते मुबंई ला जाण्याची
तयारी सुरू करतात. सर्व प्रयोग शाळेतील सामान गोळा
करायला सुरुवात करतात. भाड्याने एक टेंपो पण ठरवितात.
त्यात सर्व सामान लोड करीत असताना गावचे पोलीस पाटील येऊन विचारतात की काय झालं ? कोठे निघाला
तुम्ही ?" त्यावर डॉ.विश्वजित बोलले ," यासाठी मी तुम्हाला
म्हणालो होती की आमचा सत्कार करू नका म्हणून."
" पण आम्ही आमच्या गावातील मुलाचा सत्कार केला
तर त्यात त्याचे काय नुकसान झाले ?"
" नुकसान त्यांचे नाही तर आपले होणार आहे.'
" ते कसं ?"
" ते आम्हांला पैशांचे लालच दाखवून आपल्या देशात
घेऊन जाण्याचा प्रयत्न करतील."
" ते आपल्या देशात घेऊन जातात तर चांगले आहे ना,
खूप पैसा मिळेल तुला." पाटील म्हणाले.
" फक्त पैसेच देणार नाहीत तर त्यांचे काम होताच ते आम्हां लोकांना जिवानिशी ठार सुध्दा मारतील."
" ठार का मारतील ?" पाटलानी ना समजून विचारले.
" आपल्या कडे कसे गरज सरो नि वैध मरो म्हणतात.
अगदी त्यातलाच प्रकार आहे हा ,परत असा कोणाला मी बॉडीलेस बनवून देऊ नये म्हणून."
" अरे, बाप रे! भंयकर प्रकार आहे हा." पाटील बोलले.
" हो ; भयंकर तर आहेच ,पण त्या पेक्षा धोकेबाजी ही
त्यांच्या रक्ताचा गुण आहे."
" म्हणजे आम्ही तुझा सत्कार करून फार मोठी चूक
केली. असे मला आता वाटू लागले आहे. पोरा माफ कर
आम्हांला ." पाटील एकदम अपराधी स्वरात बोलले.
" पाटील काका ,तुम्ही अजिबात वाईट वाटून घेऊ नका.
जे झालं त्याचा आता पर्याय नाहीये. आणि तुम्ही मुद्दाम
म्हणून नाही केलं. त्यामुळे वाईट वाटून घेऊ नका."
" वाईट कसं नाही वाटणार पोरा. इतक्या वर्षानी तू आपल्या गावात आलास नि तुझ्या सोबत हे असं घडतंय."
" काही हरकत नाही काका, मला फार दिवस कोणी एका
खोलीत बंधीस्थ राहणार नाहीये. तुम्ही फक्त एकच काम
करायचं ते हे की बॉडीलेस अंतराळ तून येईपर्यंत. ते मला
कैद करून ठेऊ शकतात. त्यानंतर मी त्याना कारागृहात
दिसणार नाही.एवढे संभाषण होईपर्यंत डॉ. विश्वजित च्या
सभोवती डॉ. डेव्हिड आणि डॉ. डाबर च्या सभोवती त्या
लोकांच्या गाडीने गराडा घातला.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा