हे सारे तुझ्यासाठीच ८
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
हे सारे तुझ्यासाठीच ८ |
पोलिसांनी विवेकला पोलीस कोठडीत बंद करून
वाट पाहत बसले की विवेक पोलीस कोठडीतून बाहेर कसा
जातो ते. जागता पहारा बसला. परंतु त्यांच्या योजने वर पाणी पडले. विवेक आपल्या जाग्यावरुन हललाच नाही.
बसल्या जागीच झोपी गेला. त्याच वेळी राजेश आपल्या घरी भीतभित होऊन झोपला होता खरा. तेवढ्यातच त्याच्या कमरड्यात कोणीतरी घातली . म्हणून दचकून तो उठला. समोर सीमाला पाहताच त्याला कापरे भरले आणि तोंडून आवाज ही फुटत नव्हता. तसा सीमाचा आत्मा म्हणाला," काय झालं रे तुझी बोलती बंद का झाली ? तुझी वाच्या गेली की काय ?"
" तू...तू इथं का आली ?"
" तुला न्यायला आली."
" कुठं ?"
" स्मशानात."
" काय स्मशानात ?"
" माणूस मेल्यानंतर कुठं नेतात स्मशानातच ना ?"
" पण मी अजून मेलो नाहीये."
" मेला नाहीस तर आता मरशीलच त्यात काय ?"
" पण मला मरायचं नाहीये."
" मरायचं कुणालाच नसतं रे, पण मरावं लागतं ना ? जसं
की मला मरायचं नव्हतं. पण तुम्ही लोकांनी ठार मारलीत ना मला , म्हणून मी आता तुम्हां लोकांना ठार मारत आहे, कारण तुमच्या सारख्या नराधमांना मोकळं सोडलं तर तुम्ही माझ्या सारख्या अनेक निष्पाप मुलींना आपल्या वासनेच्या आगीत लोटणार आहात. अर्थात तुला देखील आपल्या मित्रा प्रमाणे मरावेच लागेल."
" नको मारुस मला. मी पाया पडतो तुझ्या !"
" असं मीही त्या दिवशी म्हणत होते. परंतु माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचलाच नाही. होय ना ?"
" मला क्षमा कर."
" केली असती रे क्षमा. परंतु आमच्या डिक्शनरी मध्ये
क्षमा हे शब्दच नाहीत. शिवाय तुमच्या सारख्या नराधमा जिवंत सोडलं तर पुन्हा कुण्या अबलेची अब्रू लुटाल तुम्ही ! जशी सौंदर्यांची अब्रू लुटण्याचा प्रयत्न केला होता. परंतु मी तो प्रयत्न हाणून पाडला. म्हणून तुम्हा लोकांना आता माफी नाही. अधोगती मरण आलं तर त्याची शिक्षा काय भोगावी
लागते हे तुम्हां लोकांना पण कळायला पाहिजे की नको ? चल माझ्या बरोबर आज तुला आमच्या आत्म्यांच्या दुनियेत घेऊन चलते, बघ तरी अपराध करणाऱ्या ना काय शिक्षा मिळते ती. "
" मला नाही यायचंय तुझ्या सोबत ?"
" तुझी मर्जी काय आहे हे तुला विचारली आहे का मी ? नाही ना ? मग गुमाने माझ्या सोबत चालायचं. नाहीतर उचलून नेईन तुला ?"
" तू मला उचलणार ?" तो उपहासाने म्हणाला.
" पाहायचंय तुला मग थांब. बघ तुला कशी मी खांद्यावर घेते ते " असे म्हणून तिने त्याचा हात धरला नि त्याला अलगत उचलुन खांद्यावर घेतले नि निघाली. तसा तो मोठ्या ने ओरडू लागला की , " मला वाचवा." परंतु त्याचा आवाज त्याच्या खोलीच्या बाहेर आलाच नाही. ती जशी दरवाजा जवळ आली तसा दरवाजा आपोआपच उघडला. त्याच्या घराच्या बाहेर उभे असलेले पोलीस त्याला दिसत होते. परंतु तो कुणाला दिसत नव्हता.
सकाळ झाली तरी राजेशच्या खोलीचा काही उघडला
नाही. त्याच्या आईला वाटलं की रात्री फार उशिरा झोपला
असेल म्हणून सकाळ झाली तरी उठला नाही. झोपू दे झोपला तर ! परंतु बराच उशीर झाला तरी तो काही उठला नाही . म्हणून त्या उठवायला गेल्या तर दरवाजा आतून बंद. त्यांनी दरवाजा ठोठावत बाहेरून त्याला हाका मारल्या. पण ओ नाही की हूं नाही म्हणून त्याना चिंता पण वाटू लागली. अजून कसा हा झोपला ? या पूर्वी त्याने असे कधीच केले
नव्हते. म्हणून त्यांनी आपल्या पतीराजा ना सांगितले.त्यांनी
ही मोठमोठ्या ने हाका मारल्या. दरवाजा ही ठोठावला. परंतु
आतून काहीच प्रत्युत्तर आले नाही. शेवटी धक्का मारून दरवाजा तोडला. आंत जाऊन पाहतात तर आंत कोणीच नाही. त्याना प्रश्न पडला की आंत कोणीच नाही तर दरवाजा आतून बंद कसा ? खिडकीतून तर बाहेर गेला नसेल ना म्हणून त्यांनी खिडकी चेक केली तर खिडकी देखील आतून बंद. आता मात्र राजेश च्या आईला चिंतेने ग्रासले. रातोरात आपला मुलगा खोलीतून गायब कसा झाला ? काही कळेना म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनला संपर्क साधला नि फोन वरूनच घडलेल्या घटनेची माहिती दिली. तेव्हा इन्स्पेक्टर विजय कदम समजले नेमके काय झाले असेल ते ? परंतु प्रश्न असा होता की विवेक पोलिसांच्या कोठडीत बंद असताना राजेश आपल्या घरातून गायब झाला कसा ? परंतु ह्या प्रश्नाला कोणतेच उत्तर नव्हते.
इन्स्पेक्टर विजय कदम लगेच एक पोलीस पथक घेऊन
राजेश राहात असलेल्या कॉम्प्लेक्स मध्ये गेले. राजेश तिसऱ्या मजल्यावर राहात होता. पोलिसांनी कसून तपासणी केली. परंतु संशयात्मक असं काहीच सापडले नाही. इन्स्पेक्टर विजय कदम ने काही जुजबी प्रश्न विचारले नि पोलीस स्टेशनला परतले. परंतु त्याना एक प्रश्न त्याच्या
वडिलांना सारखा सतावत होता. तो हा जर विवेक पोलीस स्टेशनच्या कोठडीत बंद आहे तर राजेश ला कोणी गायब केलं ? याचा अर्थ सरळ आहे की गायब करण्याचे काम विवेक चे नसून दुसराच कोणीतरी व्यक्ती करत आहे, परंतु कोण ? हे कसे समजणार ? विचार करता करता त्याना एक उपाय सुचला तो हा की धनराज चा एक मित्र अजून शिल्लक आहे, नक्कीच आजच्या रात्री त्याला गायब करण्याचा प्रयत्न केला जाईल. आपण ह्या वेळेला आपली चाल बदलायची. म्हणजे विवेक ला पोलीस कोठडीत बंद करून न ठेवता प्रकाश ला पोलीस कोठडीत बंद करून ठेवावे. म्हणजे कळेल आपल्याला . प्रकाशला गायब कसा होतो ? म्हणजे विवेक करतो का अन्य कुणी ? ठरल्या प्रमाणे पोलिसांनी सापळा लाविला. प्रकाशच्या घरी त्याच्या आई- वडिलांना सांगितले की तुमच्या मुलाच्या जीवाला धोका आहे, असे सांगून त्याच्या मित्रा सोबत काय घडले त्या बद्दल माहिती दिली. आणि तसे घडायला कारण काय तेही सांगितले. जेव्हा त्याच्या वडिलांना कळले की धनराज च्या नादाला लागून आपल्या मुलाने काय केले. तेव्हा ते त्याच्या वर चिडले. ते म्हणाले ," गेल्या वर्षी तुला एका केस मधून सोडविले होते. तरी तू सुधारला नाहीस. पुन्हा तेच धंदे सुरू केलेस, लाज वाटते मला तुला माझा मुलगा म्हणायची ! कसे रे तुम्हां लोकांना कळत नाही, नको त्या गोष्टी करता. खरे तर माझंच चुकलं गेल्या वर्षी तुला निर्दोष म्हणून सोडवून घ्यायला नाही पाहिजे होतं . केलेल्या अपराधाची शिक्षा झाली असती ना ? म्हणजे पुन्हा हे धाडस झाले नसते. जा ह्याला घेऊन." त्याचे वडील त्रागाने म्हणाले.
" अहो असं काय करताय आपला मुलगा आहे ना तो."
" मुलगा आहे म्हणूनच आतापर्यंत त्याला वाचवत आलो. पण आता नाही , त्याला त्याच्या कर्माची शिक्षा झालीच पाहिजे." तेव्हा इन्स्पेक्टर विजय कदम म्हणाले," आम्ही त्याला तुरुंगात डांबण्यासाठी नेत नाही आहोत तर त्याच्या सुरक्षेसाठी पोलीस स्टेशनला नेत आहोत, सकाळी सोडून देऊ आम्ही त्याला." असे म्हणून प्रकाश ला सोबत घेऊन पोलीस स्टेशनला येतात. तेवढ्यात विजय कदम ना पोलीस कमिश्नर साहेबांचा फोन येतो. फोन वरून इन्स्पेक्टर विजय कदम ची चांगलीच खरडपट्टी काढली. परंतु पोलिसांच्या हाती एक सुध्दा पुरावा नसताना अटक तरी कोणाला अशी करणार ? परंतु वरिष्ठांना हे सांगून थोडेच पटणार आहे. शेवटी केस चा निकाल त्यांनाच लावायचा आहे.
प्रकाश ला पोलीस कोठडीत बंद करून ठेवले नि पोलीस बसले पहारा करत बरोबर बारा वाजून दोन मिनिटे झाली असतील नि अचानक हवा सुटली. दरवाजे खिडक्यांचे दारे आपटू लागली. तेवढ्यातच मोठ्या ने हासण्या आवाज आला. पोलीस इकडे तिकडे पाहू लागले. पोलीस कोठडीत एक काळी आकृती दिसू लागली. इन्स्पेक्टर विजय कदम चा हात आपल्या पिस्तुल कडे सरसावला. हळूहळू काळ्या आकृतीचे रूपांतर सूंदर चेहऱ्यात झाले. चेहरा पाहून त्यांनी लगेच त्याना आठवले गेल्या वर्षी ज्या मुलीच्या मृतदेहाचे पोष्टमार्टम केले ती हीच मुलगी. त्यानी तिच्यावर पिस्तुल ताणले तेव्हा ती म्हणाली ," इन्स्पेक्टर विजय कदम ते तुझं खेळणं मनुष्याला मारण्यासाठी कामी येईल. माझ्या सारख्या आत्म्यावर त्याचा काहीच प्रभाव पडणार नाहीये."
" पण तू का मारते आहेस ह्या सर्वांना. ?"
" इन्स्पेक्टर कसा प्रश्न विचारतो रे तू ? तुला माहीत नाही
काय ह्यांनी काय गुन्हा केला आहे तो ?"
" माहीत आहे मला त्यांनी केलेला गुन्हा ही नि तुझ्यावर
झालेला अन्याय ही !"
" मग शिक्षा नको का द्यायला त्याना ?"
" शिक्षा देणे कोर्टाचे काम आहे, तुझं नाही."
" अन्याय माझ्यावर झालाय कोर्टावर नाही आणि तुम्ही
लोकांनी आपली प्रामाणिक पणे ड्युटी केली असती ना तर पुन्हा तोच गुन्हा करण्यापर्यत ह्यांची मजल गेली नसती."
" मान्य करतो चूक झाली आमची. मंत्र्यांच्या दबावाखाली आम्हाला ते काम करावे लागले."
" माहितेय ते मला म्हणूनच मी तुम्हा लोकांना माफ केले. परंतु ह्याला माफी नाही, कारण ह्याने पुन्हा तोच अपराध
करण्याचा प्रयत्न केला. मी तिथं पोहोचली म्हणून ती वाचली. परंतु प्रकाशला मी घेऊन जाणारच , आणि हां तुमच्यासाठी पण काम आहे, ते तरी तुम्ही प्रामाणिक पणे कराल अशी मी आशा करते."
" काय काम आहे ते ?" इन्स्पेक्टर विजय ने विचारले.
" विवेक आणि त्याची ती प्रेमिका सौंदर्या ह्या दोघांच्या
जीवाला धोका आहे. त्याना वाचवा बस्स ! "
" कोणा पासून त्याना धोका आहे ?"
" ते तुम्ही शोधा. कारण मी ते सांगू शकत नाही.फक्त
इतके सांगू शकते की जिथे दोन वेळा जाऊन आलेत तिथेच
परत जा तिथेच तुम्हांला मार्ग सापडेल."
" माझी एक विनंती आहे तुला ."
" बोल काय विनंती आहे तुझी ?"
" आज मी त्याला माझ्या जबाबदारी वर आणले आहे, तू जर पोलीस स्टेशन मधून त्याला घेऊन गेलीस तर मी अपराधी ठरेन त्याचा आई- वडिलांच्या समोर."
" ते मला काही माहीत नाही. मी खाली हाताने कदापि
परत जाणार नाही. असे म्हणून तिने पुन्हा भयानक रूप
धारण केले, प्रकाश ला उचलून घेऊन गेली. तेव्हा प्रकाश
मोठ्या ने ओरडत होता ,साहेब मला वाचवा! पोलीस कावरा
बावरा होऊन इकडे तिकडे पाहत होते परंतु त्याना ना सीमाचा आत्मा दिसला नाही प्रकाश दिसला. कारण दोघेही
गायब झाले होते.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा