कुलांगार ९
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
कुलांगार ९ |
" तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे.हेच दादा ला समजवण्याचा प्रयत्न करतोय, पण तो समजूनच घेत नाही."
" तू काय मला समजवणार मीच तुला समजवतोय की तू
माझ्या नि माली च्या मध्ये येऊ नकोस. आणि ते तुझ्या हिताचे देखील नाहीये."
" दादा असं नको रे, वागूस तुझ्या अश्या वागण्याने आईला किती त्रास होतोय याची कल्पना आहे का तुला ?"
" ए कुणाची आई ? माझी कुणी आई बीई नाही. आणि तू
जबरदस्तीने नाते जोडू नकोस माझ्याशी !"
" जबरदस्ती कशी रे, एकाच आई ची मुलं आहोत ना आपण रक्ताचे नाते तुटते का कधी ?" त्यावर तो कुत्सित पण हसला नि मगपुढे बोलला ," रक्ताची नाती म्हणे तुटत नसतात. मग माझी आई माझ्या बापाला सोडून तुझ्या बापाकडे का गेली ? का तिला लग्ना शिवाय राहता येत नव्हतं का ? कित्येक स्त्रिया एकाच मुलावर पूर्ण आयुष्य काढतात. मग माझ्या आईला का नाही जमलं हे ?"
" हे बघ त्यात आईची काही चूक नाही. तुझ्या आजी-आजोबांनी जर तिला सहारा दिला नाही तर कुठं जाईल
ती ? सांग बरं."
" खोटं साफ खोटं. माझे आजी-आजोबा तिला रहा म्हटले
पण तीच राहिली नाही. शारीरिक सुख हवं होतं तिला कशी
राहील ती ?"
" दादा, स्वतःच्या आई बद्दल बोलतोयस तू , लाज वाटायला पाहिजे होती तुला असं बोलताना ."
" अरे हट्ट म्हणे लाज वाटायला पाहिजे ? तिला नाही
वाटली दुसरे लग्न करताना मग मला का वाटेल लाज ?"
" दादा, तोंड सांभाळून बोल."
" तू मला सांगतोयस तोंड सांभाळायला ? अगोदर तू स्वतःच तोंड सांभाळ."
" जाऊ दे मला तुझ्याशी वाद घालायचा नाही."
" नाही घालायचा मग निघ इथून."
" मी माली ला घेतल्या शिवाय जाणार नाही."
" माली फक्त माझी आहे, कारण तिने माझ्या मुलाला
जन्म दिला आहे."
" मग उपकार मान ना तिचे."
" उपकार कशाचे ? तिला आई बनायचं होतं नि मला
बाप बनायचं होतं. बनलो आम्ही आई-बाप पण तू मध्ये आलास तुझ्या बापा सारखा पण इतिहासाची पुनरावृत्ती मी होऊ देणार नाही. नाहीतर तो देखील माझ्या प्रमाणेच दुसरा कुलांगार बनेल. आणि ते मला होऊ द्यायचे नाहीये."
" म्हणजे काय करणार आहेस तू ?"
" माली ला माझी पत्नी बनवीच लागेल नाहीतर विधवा आणि पुत्रहीन व्हावे लागेल तिला काय मंजूर आहे ते तिने
ठरवावे ."
" म्हणजे तू मला मारणार !"
" हां. कारण एका म्यानात दोन तलवारी राहात नाही ना, त्यामुळे एकीला तुटावेच लागेल."
" ठीक आहे,मार तू मला."
" अहो काय बोलताय तुम्ही हे ?" माली बोलली.
" माली, मला मरण माझ्या भावाच्या हातून येत असेल
तर चांगलेच आहे ना, त्याच्या मनाची तरी शांती होईल."
" आणि माझ्या मनाचं काय ? ह्याचा विचार कधी केला
आहे का तुम्ही ?"
" आता विचार करायची वेळ संपली आहे,आता फक्त
फैसला करायची वेळ आहे ही."
" असा विचार करून मला ह्या गुंड मवाली नि ह्या बदमाश माणसा पाशी सोडून जाऊ नका."
" मी बदमाश काय ? पण आता तुला ह्या गुंड मवाली
मानासा सोबतच संसार करायचा आहे,हे द्यानात ठेव."
" कदापि करणार नाही मी तुझ्या बरोबर संसार. त्या पेक्षा
मी मरेन पत्करेन."
" हो ; पण मी मरू देईन तेव्हा ना ? कारण त्या अगोदर
ह्या दोघांना मरावे लागेल."
" दोघांना म्हणजे कुणा कुणाला ? "
" एक तुझा नवरा आणि दुसरा तुझा मुलगा ."
" म्हणजे तू आपल्या मुलाला सुध्दा मारणार ?"
" येस."
" तू माणूस आहेस का शैेतान !"
" दोन्ही !"
" खरंच तुझ्या सारख्या शैतानाला जन्माला घालून देवा ने
फार मोठा गुन्हा केला."
" देवाने नव्हे माझ्या आई ने गुन्हा केला , त्या गुन्ह्याची
शिक्षा तर देत आहे,मी तुम्हां सर्वांना."
" पण असं का वागतोयस तू ?"
" असं वागायला तू भाग पाडलेस मला."
" मी !"
" हो !"
" ती कशी ?"
" तू जर माझ्याशी लग्न केले असतेस तर मी हे सर्व केलं
नसतं."
" समज मी तुझ्याशी लग्न केलेस तर तू ह्या सर्वांना सोडशील ?"
" आफकोर्स ! माझी त्यांच्याशी काही वैयक्तिक दुश्मनी
नाहीये."
" ठीक आहे, मी तुझ्याशी लग्न करण्यास तयार आहे."
" मग चल. "
" कुठं ?"
" त्या खोपीत.
" तिथं कशाला ?"
" लग्ना आधी मधुचंद्र साजरा करू ."
" शी ! असा उघड्यावर ......"
" मग त्यात काय झालं ? आपल्या तिघां व्यतिरिक्त इथं
चौथा कुणी नाही. आणि राहुल शी तू शाररिक सबंध केले आहेस त्यामुळे त्याच्या समोर लाजायचं काही कारण नाहीये."
" तू एवढा नीच असशील याची कल्पना सुद्धा केली नव्हती मी कधी !"
" आता कळलं ना , मी किती नीच आहे ते, मग आता
वेळ नको लावुस. मला स्वतःच्या नावाचा शिक्का उमटवायचा
आहे,तुझ्या माथी ."
" अगदीच कसा निर्लल्ज तू ?"
" पुन्हा पुन्हा तीच गिसीपीटी रेकार्ड ऐकवू नकोस मला तू." माली विचारमग्न झाली . काय करावे ते तिला सुचेना.
की ह्या नराधमाच्या तावडीतून स्वतःची नि आपल्या नवऱ्याची सुटका कशी करून घ्यावी. असा विचार मनात सुरू
असतानाच तो खेखसलाच तो म्हणाला," आता वाट कुणाची पाहतेस ? कुणी येणार आहे का तुला वाचवायला ?"
" नाही. मला अगोदर माझा मुलगा कुठं आहे तो
दाखव. कारण माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाहीये."
" अविश्वास तो सुध्दा होणाऱ्या नवऱ्यावर.?"
" हां !"
" ठीक आहे,तुला त्याचा आवाज ऐकवितो." असे म्हणून त्याने तिच्या समोर आपला मोबाईल धरला. व्हिडीओ रेकर्डिंग दाखवत म्हटले," हा बघ तुझा नि माझा मुलगा तू इथं नाही म्हटलेस की तिथं दोर सोडलाच असे समज. मुलगा सरळ विहिरीत कोसळणार नि त्याला जल समाधी मिळणार . व्हिडीओ मध्ये स्पष्टपणे दिसत होते की त्याला एका विहिरीच्या टोकावर दोरीने बांधले आहे, नि त्याची दोर एका माणसाच्या हातात आहे, अर्थात तो माणूस कोण आहे , हे मात्र कळू शकले नाही. आता काय करावे माली ला काहीच सुचेना. व्हिडीओ पाहून होताच तो बोलला, " चल कपडे उतार लवकर."
" असं रे काय करतोयस ? माझ्याशी लग्न करणार आहेस ना तू ?
" हो !"
" मग असं होणाऱ्या बायकोला असं बेइज्जत करतं का कोणी ?"
" माहितेय मला नाही करत. पण नाईलाज आहे, तू अशी ऐकणार नाहीस. म्हणून हे करावे लागते मला. चल आटप लवकर." नाईलाजाने ती त्या खोपीत जाते नि साडी सोडून बाजूला ठेवून ती बोलली," बस्स ना आता !"
" नाही. ते ब्लाऊज काढून बाजूला फेक. " नाईलाजाने
ती ब्लाऊज पण काढून बाजूला फेकले. तशी तिला लाज
वाटू लागली. तेवढ्यात तो पुन्हा खेखसला की, ते ब्रा सुध्दा काढ." तशी ती त्याला गयावया करत म्हणाली ," नको रे मला अशी बेइज्ज करू ? मी पाया पडते तुझ्या ! " तिने त्याचे पाय धरले. पण त्याच्या वर काहीच परिणाम झाला नाही. तो तिला म्हणाला ," माझ्या पाया पडून काही होणार नाही. कारण मला पाझर फुटायला मी काही देव नाही. मी राक्षस आहे, आणि राक्षसाला दया माया काही माहीत नसतं. तेव्हा मुकाट्याने मी जे सांगतोय ते करत जा. कारण दुसरा पर्याय नाही तुझ्यापुढे." माली ब्रा काढण्यासाठी हात हुका कडे नेते. तेवढ्यात आपल्याकडे त्याचे लक्ष नाहीये असे पाहून त्याच्या वर झडप घालतो. रोहन बेसावध असल्याने त्याच्या हातातील पिस्तुल दूर फेकले जाते. दोंघांची झटापट सुरू होते. ते पाहून माली पटकन आपले कपडे उचलते नि अंगात घालू लागते. राहुल पुऱ्या ताकदीने त्याला स्वतः पासून दूर लोटतो. तो बाजूला पडतो. परंतु त्याची नजर पिस्तूलावर पडते. तसा तो ते पिस्तुल हस्तगत करतो नि त्याच्या वर फायर करणार तेवढ्यात मोबाईलच्या लोकेशनच्या मदतीने तेथे पोलीस पोहोचतात. आणि रोहन वर आपली बंदूक ताणून हवालदार गर्जला ," रोहन पिस्तुल खाली टाक. तुझा खेळ संपलेला आहे. कारण तुझ्या आजी- आजोबांना तुझ्या मुला सहित आम्ही अटक केली आहे,आता तुझी बारी आहे, मुकाट्याने साधीन हो आमच्या." त्यावर रोहन बोलला ," मुलगा तुमच्या हाती लागला तर काय झालं
राणी अद्याप माझ्या पाशी आहे, मी अजूनही बाजी
हरलेलो नाहीये." असे बोलून तो त्याने झटकन माली च्या अगदी जवळ गेला नि तिच्या कांनशिलावर पिस्तुल टेकवून म्हणाला ," मुकाट्याने मला इथून बाहेर जाण्याचा रस्ता द्या. तेवढ्यात तेथे कांचन आणि तिचा पूर्ण परिवार तेथे आलेला असतो. कांचन ने पाहिले की आपल्या एका मुलाने दुसऱ्या मुलांच्या अंगावर पिस्तुल ताणले आहे, आणि रोहन निर्दयी आहे हेही त्यांना चांगले ठाऊक असते. म्हणून त्या इकडे तिकडे पाहतात. तेवढ्यात त्यांची नजर इन्स्पेक्टर च्या कमरेला लटकत असलेल्या पिस्तूलावर गेली तशी त्यांनी त्यावर झडप घातलीे पिस्तुल हस्तगत केले नि रोहन ते तिला सोड नाहीतर मी तुला गोळ्या घालीन. त्यावर तो हसून म्हणाला ," तू माझी आई आहेस नि आई कधीही आपल्या मुलाला गोळ्या घालू शकणार नाही."
" आई एक स्त्री सुध्दा एका स्त्री ची अब्रू वाचविण्यासाठी ती आपल्या मुलाचा जीव सुध्दा घेईल."
" हो ,मग घाल गोळ्या पाहू ! मला सुध्दा पाहू दे, तुझे हात मला गोळ्या घालायला राजी आहेत की नाही."
" रोहन , तुला अजून सांगतोय तिला सोड माझा अंत पाहू नकोस ."
" मग घाल ना गोळ्या ,थांबलीच का ? नाही घालू शकत माहीत आहे ते मला." असे बोलून तो तिला खेचत घेऊन जाऊ लागतो. शेवटी अगदीच नाईलाजाने त्यांनी पिस्तूलचा चाप ओढला. पिस्तूलातून निघालेली गोळी सरळ रोहनच्या छातीत घुसली. तेव्हा रोहनच्या मुखातून एक जोरदार किंकाळी बाहेर पडली. त्याच्या हातातील पक्कड सैल झाली तशी माली जोराचा हिसका देते नि स्वतःला सोडवून घेत पळतच राहुलला जाऊन बिलगली. रोहन जमिनीवर कोसळतो नि थोड्याच वेळात त्याचा प्राण त्याचे शरीर सोडून अनंतात विलीन होतो. त्या वेळी मात्र कांचनबाई एकदम शून्य नजरेत पाहतच राहिल्या. आपल्या मनात सुध्दा त्यांनी असा विचार केला नव्हता की ज्याला आपण नऊ महिने आपल्या पोटात सांभाळले त्याला आता शेवटची मूठमाती देणे आपल्या नशिबी येईल."
समाप्त
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा