पंखरूपी मानव ६
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
पंखरूपी मानव ६ |
बॉडीलेसला त्याच रुम मध्ये घेऊन जातात. ज्या रुम मध्ये वीस वर्षांपूर्वी डॉ. विश्वनाथ यांना पकडून कैद करून
ठेवले होते. शिपाई जसे बॉडीलेस त्या रुम मध्ये बंद करून
जातात तसे लगेच बॉडीलेस डोळे उघडून समोर पाहतो.
त्याला एक पन्नासच्या आसपास वय असलेला एका मनुष्य दिसतो. त्याची फार दाढी वाढलेली असते. तरी सुध्दा त्याच्या
चेहरा डॉ. विश्वजितच्या चेहऱ्याशी मिळता जुळता असतो.
त्यावरून त्याने अंदाज बांधला की हा मनुष्य दुसरा कोणी नसून डॉ. विश्वजित चे वडीलच असावेत. असा विचार बॉडीलेच्या मनात सुरू होता अगदी तसाच विचार डॉ. विश्वनाथ च्या मनात आला तर त्यात नवल ते काय ?
परंतु मनात शंका निर्माण झाली की आपल्या सारखा दिसणारा पंखरूपी मानव कोण ? त्याच्या वेषभूषा वरून तर हा इथला तर वाटत नाही. पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांसारखे ह्यांचे वेषांतर आहे,परंतु पृथ्वी वर पंखरूपी मानव तर अजिबात नाहीत मग हा कोठून आणि कसा आला ? आणि
ह्या पंखरूपी मानव लोकांच्या तावडीत सापडला ? काही
कळत नाही ? विचारू का ह्याला ? पण कसं विचारू नि काय
विचारू असा विचार त्यांच्या मनात सुरू असतानाच बॉडीलेस ने विचारले," आपले नाव डॉ. विश्वनाथ तर नाही ना ?" त्यावर डॉ. विश्वनाथ म्हणाले ," हो मी विश्वनाथ आहे, परतुआपण मला कसे ओळखलंत ?"
" तुमच्या चेहऱ्यावरुन ."
" माझ्या चेहऱ्यावरुन .....ते कसे ?"
" तुमचा चेहरा सेम डॉ. विश्वजित सारखा आहे."
" हे नाव कोठेतरी ऐकल्या सारखे वाटते."
" फक्त नावच का चेहरा सुध्दा ?"
" फक्त नावच त्याचा चेहरा नाही आठवत."
" ठीक आहे , मी एक फोटो दाखवितो तुम्हाला तो
पहा नि सांगा. तो फोटो कोणाचा आहे ?" असे म्हणून एक
फोटो त्यांच्या समोर धरला. फोटो पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर एक चमक आली. त्यांनी तो फोटो चट्कन त्याच्या
हातातून काढून घेतला. नि बारीक निरीक्षण करून तो म्हणाला," हा फोटो तुला कोठे मिळाला ?"
" ते नंतर सांगतो. परंतु मला अगोदर हे सांगा. हा फोटो
कोणाचा आहे ?"
" हा फोटो माझा नि फँमेलीचा आहे, हा, मी, ही माझी
पत्नी नि हा माझा एकुलता एक मुलगा विश्वजित आहे."
" पण तुम्ही सांगता याला पुरावा काय ? " बॉडीलेस
विचारले. त्यावर डॉ. विश्वनाथ म्हणाले," माझ्या गळ्यात एक
लॉकेट आहे ,त्या पानात अगदी सेम असाच फोटो आहे."
तसे बॉडीलेस ने त्याच्या गळ्यातील लॉकेट काढून पान
उघडून पाहिले असता. अगदी तशीच फोटोची कॉफी त्यात
सापडली. ते पाहून बॉडीलेस खात्री पटली की, हेच डॉ . विश्वजित चे वडील आहेत. तेवढ्यात डॉ. विश्वनाथ ने विचारले की, पण आपण कोण ? आणि आपल्याकडे माझ्या
फँमेलीचा फोटो कोठून आला ?" त्यावर बॉडीलेस बोलला,"
मी एक रोबट आहे. तुमच्या मुलाने अर्थात डॉ. विश्वजित यांनी
मला बनविले." असे म्हणताच डॉ. विश्वनाथ यांचा छाती अभिमानाने फुगली. ते हर्षभराने बोलले ," माझ्या मुलाने
तुझी निर्मिती केली ?"
" ओ येस ! तुमच्या चिरजीवांनीच मला घडविले."
" हे ऐकून माझा आनंद गगनात मावेनासा झाला." डॉ.
विश्वनाथ बोलले.
" हे तर काहीच डॉ. विश्वजित ने केलेले ऐकाल तर
तुमची छाती गर्वाने फुगेल."
" ती तर फुगलीच आहे ; परंतु तू इथं कसा नि का आलास ?"
" इथं येण्याचे मुख्य कारण म्हणजे तुमचा शोध घेण्यासाठी डॉ. विश्वजित यांनी माझी नेमणूक केली.
जशी प्रभू श्रीरामचंद्राणी सीता माईच्या शोधासाठी रामभक्त
हनुमानाची नियुक्ती केली होती. तशीच नियुक्ती तुमच्या शोधासाठी केली होती."
" म्हणजे विश्वजितला माहीत होते की मी जिवंत असणार ?"
" हां ,कारण तुमचे जेट विमान धर्तीवर वापस आले नाही.
किंवा छिन्नविच्छिन्न रुपात त्याचे अवशेष ही कोठे सापडले. याचा अर्थ एकच असू शकतो. की तुमचे कोणीतरी अपहरण केले असावे ,असा त्यांनी तर्क केला. आणि ते खरे का खोटे
याचा शोध घेण्यासाठीच त्यांनी माझी निर्मिती केली. कारण
त्याना विश्वास होता की तुम्ही जिवंत असून कोणाच्या तरी
कैदेत असणार ? अर्थात अंतराळात दुसरी दुनिया असावी असा त्यांचा ठाम विश्वास होता. म्हणूनच त्यांनी माझी अंतराळात पाठवणी केली. आणि शेवटी त्यांचाच विश्वास
जिंकला. " त्यावर डॉ. विश्वनाथ बोलले ," त्याचा विश्वास जिकलाय हे जरी खरे असले तरी तुझी इथून सुटला होणार
नाहीये. तू सुध्दा माझ्या सारखा कैदी बनून इथं बंदिस्त बनून
राहिशील." त्यावर बॉडीलेस हसून म्हणाला ," जसे हनुमंताला
रावण रोखू शकला नाही. तसेच बॉडीलेसला कोणी बंदिस्त
करू ठेवू शकणार नाही . जसा हनुमान स्वतःहून कैदी बनून रावणाच्या द्वारी उपस्थित झाला तसाच हा बॉडीलेस म्हणजे
मी स्वतःहून कैदी बनून इथं आलो आहे. मला कोणी कैद करू शकत नाहीये."
डॉ. विश्वनाथ : परंतु तू इथून जाणार कसा ? इथली सिक्युरिटी फार कडक आहे, यहाँ परिंदा भी अपना पैर नही मार नही सकता. जब तक अनुमति न हो !"
बॉडीलेस : बॉडीलेस को पकड़ना इतना आसान भी नही है, और मुमकिन भी नही है. बॉडीलेस जब चाहे तब यहाँ से निकल भी सकता है . और साथ मे आपको यहाँ से ले भी जा सकता हूं ! . असे म्हणून त्याने गायब होऊन दाखविले.नि रूमच्या बाहेर प्रगट होऊन दाखविले नि पुन्हा त्या रुम च्या आंत मध्ये प्रवेश करून दाखविला. ते पाहून डॉ. विश्वनाथ ची पूर्ण खात्री झाली की बॉडीलेस जे बोलतो आहे ते करून दाखविण्याची क्षमता आहे. तसे ते पुढे म्हणाले की, असे जर आहे, तर फक्त तुलाच इथून जाता येईल ."
बॉडीलेस : तुम्ही कशा साठी थांबताय इथं ?"
डॉ. विश्वनाथ : ह्या रूम च्या बाहेर ऑक्सिजन नाहीये. आणि मी ऑक्सिजन शिवाय जगू शकत नाही. कारण मी रोबट नाहीये ,तर मनुष्य आहे."
बॉडीलेस: ओ आय सी काही हरकत नाही. मी पृथ्वी तलावावर जातो नि तेथून तुमच्यासाठी ऑक्सिजन घेऊन येतो."
डॉ. विश्वनाथ : व्हेरी गुड ! पण तू इथून बाहेर पडणार कसा ?"
बॉडीलेस : त्याची चिंता तुम्ही करू नका. तुम्ही फक्त तुमची
खूण म्हणून एखादी वस्तू द्या. जेणे करून तुमची नि माझी भेट झाली हे सिध्द करू शकतो." असे म्हणताच डॉ. विश्वनाथ यांनी आपल्या गळ्यातील सोन्याची चैन काढून त्याच्या हातावर ठेवत म्हणाला," ह्या लॉकेट मध्ये जे माझे फोटो आहेत ते माझ्या मुलाला दाखव म्हणजे त्याची खात्री
पटेल." असे म्हणून त्यांनी आपल्या गळ्यातील लॉकेट काढून
दिले. ते घेतले नि बॉडीलेस तेथून गायब झाला.
जॉन आणि सलीम या दोघांनी मिळून सेम बॉडीलेस
सारखाच बॉडीलेस बनविला. परंतु तो सामान्य रोबट प्रमाणेचचालू लागला नि त्यात नवीन अँडव्हास तंत्रज्ञान काहीच नाही. त्यामुळे डॉ. डेव्हिड त्या दोघांवर भयंकर चिडला. पण त्यात दोघांचा काय दोष होता . त्या दोघांनी तर पहिल्यांदाच त्याची कल्पना दिली होती. म्हणून डॉ डेव्हिड त्या दोघांना डॉ. विश्वजित कैद असलेल्या ठिकाणी घेऊन गेले.
बॉडीलेस अंतराळातून जेव्हा पृथ्वीवर आला नि नाणार गावात पोहोचला. तर तेथे त्याला प्रयोग शाळेत डॉ. विश्वजित दिसले नाहीत. म्हणून त्याने पोलीस पाटील जवळ चौकशी केली. तेव्हा गावच्या पोलीस पाटलांनी त्याला सविस्तर माहिती दिली. आणि डॉ. विश्वजित ने दिलेला कोड नंबर त्याच्या हाती दिला. तो कोड नंबर डायल केला असता डॉ .विश्वजित कडून त्याला मॅसेज आला की त्याना डॉ. डेव्हिड ने पकडून कोठे आणले आहे. आणि कोठे नि कसे ठेवले आहे याची माहिती दिली. तेव्हा बॉडीलेस ने डॉ. विश्वजित ना एक मॅसेज पाठविला की जरा थांबा. मी येतोयच आहे."
डॉ. विश्वजित समोर त्या दोघांना उभे करून म्हणाले ," ह्या दोघांना तुम्हाला जिवंत पहायचे असेल तर आमचे एक काम करावे लागेल." त्यावर डॉ. विश्वजित म्हणाले ," उनको बेशक मार दो, अब हमे उनकी कोई जरूरत नहीं है।" असे म्हणताच डॉ. डेव्हिड चपापला. नि म्हणाला ," तुम इतने पत्थर दिल इन्सान कैसे हो सकते हो ? मुझे यकीन ही नहीं हो रहा है ."
" जिनका दिल पत्थर का ही हो, उन्हें कोई फर्क नही पड़ता,कोई जिये या मरे " हे उत्तर ऐकून डॉ. ,डेव्हिड एकदम
चपापला. पण लगेच त्या दोघांकडे वळत बोलला," पाहिलंत... तुम्हा लोकांच्या जीवनाची डॉ. विश्वजित च्या नजरेत काहीच किंमत नाहीये. आणि तुम्ही दोघे त्यांच्या साठी
स्वतःच्या जीवाचे बलिदान ही करायला निघालेत ." त्यावर
ते दोघे काहीच बोलले नाहीत. कारण त्याना डॉ. विश्वजित
वर पूर्ण भरवसा होता. की ते आपल्याला नक्कीच वाचवतील. तेवढ्यात डॉ. डेव्हिड चा असिस्टंट पळत डॉ. ,डेव्हिड च्या जवळ आला नि म्हणाला," डॉक्टर,रिपोर्टर
मशीन वर एक मॅसेज येऊ लागलाय." डॉ . डेव्हिड ने विचारले ," कोणता मॅसेज येऊ लागलाय ?"
असिस्टंट : जस्ट वेट आय एम कमिग !"
डॉ . विश्वजित पाहत बोलला ," कोण येतोय ? काय आहे याचा अर्थ ?" डॉ. विश्वजित हसून म्हणाले," माझा शिपाई येतोय. अर्थात बॉडीलेस." तसा डेव्हिड सर्वाना आदेश
दिला की तयार रहा. बॉडीलेसला पकडायचे आहे." त्यावर डॉ. विश्वजित उपहास पूर्ण स्वरात हसून म्हणाले ," हवा को पकड़ना सिर्फ मुश्किल ही नहीं बल्कि ना मुमकिन भी है ."
असे म्हणून जोर जोराने हसू लागतो.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा