पंखरूपी मानव ५
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
पंखरूपी मानव ५ |
डॉ. विश्वजित आणि त्यांचे दोन असिस्टंट जॉन आणि सलीम या सर्वाना गराडा घातला. त्यामुळे त्याना पळता आले
नाही. परंतु डॉ. डेव्हिड यांनी त्यांच्या समोर मोठी ऑफर ठेविली की आम्हांला पण तुम्ही बनविला तसा बॉडीलेस
बनवून द्या. नाही पेक्षा तुम्ही आमच्या सोबत अमेरिकेत चला." तेव्हा डॉ. विश्वजित ने दोन्ही गोष्टी नाकारल्या.
तसे डॉ. डेव्हिड च्या ध्यानात आले की ,डॉ. विश्वजित चा जीव या गावच्या लोकां मध्ये अडकलेला आहे, जर ह्या गाववाल्याना पकडून डॉ. विश्वजित समोर आले तर हा
नकीच आपले काम करील. असा करून त्याने पूर्ण गावाला
वेठीस धरले. आणि डॉ. विश्वजित ला धमकावले की, तू जर
आमचे ऐकलं नाहीस तर सारा गाव स्मशानवटी बनेल. तेव्हा
तुला काय मंजूर आहे बोल ?" तेव्हा डॉ. विश्वजित म्हणाले ," मी तुमच्या सोबत यायला तयार आहे,परंतु माझ्या गावाला नाहक त्रास देऊ नका."
" ठीक आहे,सोडा रे त्याना ?' " तसे त्यांने गाववाल्या ना
सोडण्याचा आदेश दिला. त्यांनी गाववाल्याना मुक्त केले.
आणि डॉ. विश्वजित ला घेऊन अमेरिकेत गेले. सोबत
डॉ. विश्वजित ने बनविलेली रिपोर्टर मशीन पण घेऊन गेले.
डॉ. विश्वजित आणि त्यांचे असिस्टंट या दोघाना वेगवेगळ्या
ठिकाणी ठेवले. डॉ. विश्वजित एका खोलीत बंदीस्त करून
ठेवले. नि त्याना आदेश दिला की, तुम्ही आमच्या सायंस्टिट
लोकांना ट्रेनिग द्या." त्यावर डॉ. विश्वजित म्हणाले," बॉडीलेस
एकच आहे नि एकच राहिल."
" याचा अर्थ तू दुसरा बॉडीलेस बनविणार नाहीस तर ?"
" हां !"
" ठीक आहे, जोपर्यंत तुम्ही आपली जिद्द सोडत नाही
तोपर्यंत इथंच काळ कोठरीत रहा." असे म्हणताच डॉ. विश्वजित उपहास पूर्ण हसले नि मग उद्गारले ," मला ss
या काळ कोठरीत बंद करून ठेवणार तुम्ही ?"
" का ? शंका आहे.?"
" शंका नाही खात्री आहे,तुम्ही फार दिवस या काळ
कोठरीत बंद करून ठेवू शकणार नाही."
" अस्सं ! कोण सोडवायला येईल तुला इथं ?"
" बॉडीलेस."
" काय ? बॉडीलेस येईल इथं ?"
" हां !"
" आला तर तो परत जाणार नाही."
" कोण रोकेल त्याला ?"
" मी आणि माझी माणसं."
" हवा है वो,हवा को किसी को किसिने रोखा है आज तक ? जो आप उसे रोख पायोगे ?"
" वही तो हमे देखना है,की वो हमारे गिरफ्तसे तुम्हें कैसे छुड़ाकर ले जाता है ."
" अवश्य देख लेना ."
" ठीक आहे,आम्हांला पण तर तेच पहायचय की बॉडीलेस किती शक्तिशाली आहे ?"
" दिसेल तेव्हा पहाल ना ?"
" दिसेल. त्यासाठी तू स्वतःच आम्हाला रिपोर्टर मशीन
दिली आहेस. त्या मशीन मधून आम्हाला नक्कीच संकेत मिळतील की बॉडीलेस कुठंवर आला आहे ?"
" तो आल्याची संकेत जरूर मिळतील. परंतु दिसणार
मात्र नाही."
" जरूर दिसेल. कारण ह्या रुम मध्ये अशी कॅमेरा बसविली आहेत. त्या कॅमेरा त हवेत तरंगणारे धुळीचेे सूक्ष्म कण सुध्दा दिसतात. जे सामान्य डोळ्यांना दिसत नाहीत."
" ठीक आहे,देखते रहो कि मै कैसे फुर्रर्र हो जाता हूं !"
डॉ. डेव्हिड बोलले ," ह्यांच्या वर बारीक नजर ठेवा. जरा सुध्दा ह्यांना आपल्या नजरेआड करू नका." असे म्हणून ते
तेथून निघून गेले. ते सरळ जॉन आणि सलीम ज्या अंधार
कोठरीत ठेवले होते तेथे आले नि त्या दोघांना उद्देशून म्हणाले," तुम्ही दोघे डॉ. विश्वजित चे असिस्टंट आहेत ना ?"
" हां."
" डॉ. विश्वजित ने बॉडीलेस कसा बनविला हे तर तुम्हांला
माहीत असेलच."
" हो."
" तुम्ही तसा सेम बॉडीलेस बनवू शकता ?"
" हो ; पण .....त्याना पुढे बोलू न देता डॉ. डेव्हिड म्हणाले,
" व्हेरी गुड ! " असे म्हणून त्याने लगेच आपल्या शिपाई ना आदेश दिला की ह्या दोघांना मोकळं करा." शिपाईनी लगेच त्यांच्या आदेशाचे पालन केले. लगेच त्या दोघांना मुक्त करण्यात आले. आणि त्या दोघांना प्रयोग शाळेत घेऊन गेले.
त्याना बॉडीलेस बनविण्याचे साहित्य आणून देण्यात आले.
जॉन आणि सलीम कामाला लागले. डॉ . डेव्हिड एवढा आनंदीत झाला की त्याला असे झले की डॉ. विश्वजित च्या
कानावर कधी ही आपली खुशी जाहीर करतो. तो लगेच
डॉ. विश्वजित ना जेथे बंधीस्थ करून ठेवले होते तेथे तो गेला
नि डॉ. विश्वजित समोर आपली बढाई मारू लागला. डॉ.
विश्वजित तुम्ही आम्हांला बॉडीलेस बनवून द्यायला तयार
नाही ना ? आता बघाच तुम्ही ,तुमच्या देखत तुमच्याच माणसा कडून बॉडीलेस बनवून घेतो की नाही ते बघा."
त्यावर कुत्सितपणे हसून डॉ. विश्वजित बोलले, मट्टी का पुतला तो हर कोई बना सकता है,लेकिन उसने जान केवल
ऊपरवाला ही डाल सकता है , ठीक उसी तरह बॉडीलेस
तो हर कोई बना लेगा , लेकिन उसमें जान सिर्फ डॉ. विश्वजीत ही डाल सकता है . समझे ." असे म्हणता क्षणी
डॉ. डेव्हिड चा चेहरा काळा ठिक्कर पडला. त्याला वाटलं की आपला सातव्या माळ्या वरून कोणीतरी कडेलोट केला.
चेहऱ्यावर वरील हास्य क्षणात नष्ट झाले. ते लगेच जॉन आणि सलीम जवळ गेले नि त्याना विचारले की तुम्ही खरंच
डॉ. विश्वजित ने बॉडीलेस बनविलेला बॉडीलेस सारखाच म्हणजे त्यात सर्व सिस्टम असायला पाहिजेत.
त्यावर जॉन म्हणाला ," हम सिर्फ उनके जैसा बॉडीलेस
ही बना सकते है बाकी उसमे सब सिस्टम डॉ. विश्वजीत ही
डाल सकते है ! चूंकि उसके लिए स्वाफ्टवेअर बनाना पड़ता है,और वो काम सिर्फ डॉ. विश्वजीत करते है ।"
" का ? तुम्हाला स्वाफ्टवेअर बनवायला येत नाही का ?"
" नाही. कारण त्यांच्या केबिन मध्ये दुसऱ्या कोणाला ही
प्रवेश नाही." डॉ. डेव्हिड त्याचा भयंकर राग आला. तो त्यांच्या कडे रागाने पाहत बोलला ," हे तुम्हाला अगोदर सांगता आलं नाही का ?"
" आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला ; परंतु तुम्ही आमचं
संपुर्ण म्हणणे ऐकून घेतले नाही." तेव्हा डॉ. डेव्हिड च्या ध्यानात आले की आपण त्या दोघांना पूर्ण बोलू न देता मध्येच बोललो. तेथे चूक झाली आपली. त्याने रागाने जॉन
आणि सलीम ने बनवत असलेले बॉडीलेस तोडुन टाकले.
नि त्यांच्या द्यानात आले की बॉडीलेसचा सांगाडा तर हे दोघे
बनवितात. फक्त त्यात सिस्टम टाकायचे काम डॉ. विश्वजित
करतात. मग आपण ह्या दोघां कडून बॉडीलेसचा सांगाडा का
बनवून घेऊ नये. म्हणजे स्वाफ्टवेअर बनवायचे काम डॉ.
विश्वजित कडून घेऊ. स्वत:हून तयार झाला नाही तर ह्या
दोघांच्या डोक्यावर बंदूक रोखून करून घेऊच शकतो. हा
विचार मनात येताच त्या दोघांना बॉडीलेसची प्रतिमा बनवायला सांगितली. आणि काही माणसं त्या रिपोर्टर
माशीनपाशी ठेवली. जेणे करून बॉडीलेस आल्याची माहिती
मिळावी.
बॉडीलेस खूप उंचावर गेल्यावर त्याला पृथ्वी सारखी जीवसुष्टी दुसऱ्या ग्रहावर आहे, असे जाणवले ,म्हणून अदृश्य
होऊन तो त्या ग्रहावर पोहोचला. तेथे पंखरूपी मानव पाहून
अचंबीत झाला. आता त्याचे मुख्य काम होते की आपल्या असली रुपात येणे. त्या प्रमाणे तो आपल्या वास्तविक रुपात
आला. नि बेशुद्ध पणाचे नाटक केले. तसे सर्वजण त्याच्या जवळ पळत आले. नि म्हणाले ," अरे ,हा कोण आहे ?"
तसा लगेच दुसरा म्हणाला ," ह्याला सुध्दा आपल्या सारखे पंख आहेत ; परंतु हा मानव आपल्या जगातील नाही. असाच
एक मानव वीस वर्षा पूर्वी आपल्या इथे आला होता. आपण
त्याला अंधार कोठरीत बंदिस्त करून ठेवले आहे."
तसा लगेच तिसरा म्हणाला," पण त्याला ह्यांच्या सारखे पंख
नव्हते आणि तो पृथ्वीवरचा मनुष्य होता. आणि हा.....
" हा पण पृथ्वीवरचाच असेल म्हणून बघ ना हा बेशुध्द पडलाय. कारण पृथ्वीवरील मानवाला जिवंत राहण्यासाठी
ऑक्सिजन ची गरज आहे. अर्थात ह्याला सुध्दा ऑक्सिजन
ची गरज आहे. चला ह्याला अगोदर त्या ऑक्सिजन च्या रूम
मध्ये ठेवू. नंतरच आपले महाराज त्याला योग्य ती शिक्षा देतील. असे म्हणून त्याला उचलून घेऊन जातात.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा