कुलांगार - ५
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
कुलांगार - ५ |
रोहन आपल्या आईला भेटायला तिच्या घरी गेला. त्याचा अंदाज होता की, आपल्या आईला भेटायला कुणी
देणार नाही. परंतु तेथे तसे काहीच घडले नाही. उलट त्याला
पाहून त्याचे स्वागतच करत ते सर्व सावत्र भाऊ म्हणाले," दादा , तू आलास हे पाहून मला फार बरं वाटलं." राघव म्हणाला. तसा रोहन चिडून बोलला , " खबरदार,कुणी मला
दादा म्हटलात तर ! मी कुणाचा दादा नाही की भाऊ नाही.
मी फक्त माझ्या जन्मदात्री ला भेटायला आलोय."
" ठीक आहे,भेटून घे." राहुल बोलला.
" मी भेटणारच आहे, ते तू सांगायला नकोय मला."
राहुल ला त्याचा भयंकर राग आला. तो त्याला सडेतोड
उत्तर देणारच होता. परंतु त्याला तसे न करण्याची खुण
राघव ने केली. म्हणून राहुल गप्प बसला. तेवढ्यात स्वयंपाक घरातून कांचन बाहेर येत म्हणाली, " का रे का
आलास माझ्या घरी ?"
" माझा हिस्सा मागायला."
" कशाचा रे हिस्सा ?"
" ह्या प्रॉपर्टी मधला." असे म्हणताच सर्वांच्या चेहऱ्यावर
मोठे आश्चर्य उमटले. परंतु कुणीच काही बोलले नाही. परंतु
कांचन चूप न बसता ती बोलली ," ह्या घरच्या प्रॉपर्टी शी तुझा
संबंध काय ? तू तर ह्या घरचा सुपुत्र नाहीयेस."
" पण तुझा मुलगा तर आहे ना ?"
" हो तू माझा मुलगा आहेस. परंतु इथल्या प्रॉपर्टी शी तुझा काही संबंध नाही असे ती म्हणणार होती. परंतु तिचे हे वक्तव्य तोंडातच विरले. कारण त्याच वेळी दयानंद आपल्या खोलीतून बाहेर आले होते नि त्यानी त्या मायलेकरा चे
संभाषण ही ऐकले होते. म्हणून ती काही बोलण्या अगोदरच
ते म्हणाले ," हो . तुझा ही ह्या प्रॉपर्टी वर तेवढाच अधिकार
आहे जेवढा अधिकार ह्या घरातील मुलांचा आहे, कारण मी
तुला माझा मुलगाच मानतो."
" काय बोलताय तुम्ही हे ?" कांचन एकदम भावनावश
होऊन बोलली.
" खरं तेच. मी तुझाच नाही तर तुझ्या मुला सहित तुझा स्वीकार केला आहे, अर्थात मी त्याचा बापच ठरतो .तो मला
आपला बाप मानो अथवा न मानो .मी बापच आहे त्याचा. जन्मदाता नसलो तरीही !"
ती एकदम भारावून पाहत होती त्याच्याकडे. आणि तीच
अवस्था रोहन ची सुध्दा झाली. त्याने स्वप्नात ही असा विचार केला नव्हता की आपला सावत्र बाप आपल्याला पुत्र मानेल म्हणून. नि आपण त्याला आपला शत्रू मानतो. आपला सावत्र बाप आपल्या अपेक्षा पेक्षाही चांगला निघाला. मग आजी सांगत होती ते काय खोटं होतं की काय ? छे , छे, छे ! खोटं कसं असेल ? कदाचित आपला सावत्र बाप आपल्या समोर दिखावा करत असावा . पण दिखावा करत असेल तर आपल्या प्रॉपर्टी मधला हिस्सा मला
द्यायला तयार का बरं झाला ? नक्कीच ह्या मध्ये त्यांचा काहीतरी कावा असणार . हो कावाच आहे तो. मी आपल्या बापाच्या खुनाचा सूड घेऊ नये म्हणून हा केविलवाणा प्रयत्न केला असावा त्यांनी . परंतु मी असा गप्प बसणार नाही. माझ्या बाबांचे अँक्सिडेंट करून माझ्या आईला हस्तगत केलात ना तुम्ही ? त्याचा सूड घेतल्या शिवाय राहणार नाही. असे मनात बोलून तो उघडपणे म्हाणाला," हे बघा. तुम्ही जरी मला आपला मुलगा मानत असलात तरीही मी तुम्हाला आपला बाप मानत नाहीये आणि मानणार ही नाही."
" मी तुझ्यावर जबरदस्ती कदापि करणार नाही. तू मला
बाप मान अथवा मानू नकोस. परंतु मी तुला माझा पुत्रच मानणार. कारण मी तुझ्या बापाला तसं वचन दिलंय."
" खोटं बोलताय तुम्ही ! "
" नाही रे, ते अगदी खरं बोलताहेत." कांचन मध्येच बोलली. तसा तो तिच्यावर चिडून बोलला ," तू तर बोलूसच
नको. तुझ्या मुळे आज माझा बाप जिवंत नाहीये."
" माझ्या मुळे ते कसे काय ?"
" तुझे नि ह्यांचे प्रेम होते. म्हणून तुम्ही दोघांनी माझ्या
बापाचा काटा काढला."
" काय बोलतोयेस तू हे ?"
" खरं तेच बोलतोय."
" तुला काय माहीत खरं काय आहे ते. ते मला विचार
मी सांगेन."
" काही गरज नाही त्याची! माझ्या आजीने सर्व काही सांगितले आहे मला."
" तुझ्या आजीने तुला सर्वकाही खोटे सांगितले. ह्यांनी
त्यावेळी मला सावरले नसते तर मीच काय तू सुध्दा या जगात जन्मालाही आला नसतास."
" ते चाललं असतं मला."
" ते आता तू म्हणणार च रे,परंतु तुझ्या बापाला नि मला
तुझ्या आजी ने घरातून बाहेर काढले ते नाही सांगितले तुला.
आणि तू माझ्याकडे जबाब मागायला आलास होय. आता ऐक. मी काय सांगते ते. तुझा बाप अखेरची घटका मोजत
होता ना , तेव्हा त्यांनी ह्यांच्या कडून वचन घेतले. आणि ह्यांनी ते पाळले. ह्यांच्या मनात तुझ्या बद्दल थोडासा जरी
तिटकारा असता ना , तर तुला जन्माला येऊच दिले नसते.
माझा गर्बपात करविला असता. कारण तू माझ्या उदरात येऊन दोनच महिने झाले होते. परंतु ह्या देवमांणसाने तुला
आपल्या मुलावणी जपले. त्यांचे उपकार मानायचे सोडून
उलट त्यांच्यावर असे घाणेरडे आरोप करतोयस."
" असं जर होतं तर त्यांनी माझा त्याग का केला ?
का फेकून दिले त्यांनी मला उकिरड्यावर.?"
" बाळा त्यांनी फेकले तुला. तुझी आजी जबरदस्तीने घेऊन गेली तिला. आणि मी तुला रोज भेटायला यायची म्हणून तुला घेऊन त्या दोघांनी पलायन केले. आणि हे जर
तुला खोटे वाटत असेल तर असाच ज तुझ्या आजीकडे नि
विचार तिला काय खरं आहे ते." कांचनबाईंचा राग अनावर
झाला होता. तेव्हा तिला समाजवत म्हणाले ," तू कशाला स्वतःला त्रास करून घेतेस ?"
" तो बोलतोयस बघा ना कसा ?"
" त्यात त्याचा काय दोष बरं ? त्याच्या वर जसे संस्कार झाले आहेत तो तेच बोलणार ना ? " असे म्हणून दयानंद त्याच्याकडे वळत म्हणाले," तुला माझ्या प्रॉपर्टी मधून तुझ्या
वाट्याचा हिस्सा जरूर मिळेल. परंतु त्यासाठी तुला ह्या घरात
इतर सदस्या सारखे राहावे लागेल. ही एकच अट आहे."
" नाही. मी ह्या घरात राहणार नाही." रोहन उत्तरला.
" मग तुला तुझा हिस्सा मी मिळणार नाही." कांचन बोलली.
" मला माझा हिस्सा पाहिजे नि मी माझ्या आजीकडे
राहीन." रोहन ठामपणे बोलला.
" ठीक आहे, जशी तुझी मर्जी !" दयानंद उद्गारले.
" अहो,काय बोलताय तुम्ही हे ? तो काही ही सांगेल त्याच्या नादाला कुठं लागतंय ?"
" जाऊ दे गं , त्याच्या आजीला पण तर त्याची गरज आहे."
" तुम्ही ना मुलांना मनमानी करायला देताय म्हणून मग मुलं ही अशी फार शेफारतात." कांचन बोलली.
" प्रॉपर्टी चे कागदपत्रे तयार करतो नि मग तुला निरोप
पाठवितो. " असे म्हणून कल्याणीला म्हणाले," ह्याला काहीतरी खायला प्यायला दे."
" मला इथलं काही नको."
" अहो,कशाला त्याला मस्का लावताय. जाऊ दे ना त्याला." कांचन बोलली.
" तू नक्की माझीच आई आहेस ना ?"
" नाही. मी तुझी आई नाही. फक्त मी राहुलचीच आई आहे." त्या संतापाने म्हणाल्या.
" तरी वाटलंच मला. माझ्यावर जर तुझं खरं प्रेम असतं तर माझा असा त्याग केला नसतास तू ?"
" मी त्याग नाही केला तुझा. तुझी आजीनेच मला दूर केले तुझ्यापासून. तेव्हा तू आपल्या आजीलाच जाऊन विचार."
" ते मी विचारीन च आणि परत येईन मी इथं."
" आता नको येऊस. कागपत्र तयार झाले की मीच बोलवितो तुला." दयानंद उद्गारले.
त्यानंतर रोहन तेथून चालता झाला. परंतु मनात अनेक
विचार घेउनच. घरी पोहोचलो तेव्हा त्याने अनेक प्रश्न आपल्या आजीला विचारले. सखुबाई ने सुध्दा जमतील तशी
उत्तरे दिली. शेवटी त्याने आजीला विचारले ," आजी , आई म्हणते तू दूर केलेस मला तिच्याकडून. " तेव्हा सखुबाई
मनात विचार करू लागल्या की आता जर ह्याला खरे सांगितले नाहीतर हा रागाने आपल्या आई कडे सुद्धा निघून
जाईल. आणि असं झालं तर आपल्या मनात दयानंदच्या प्रॉपर्टी मधील थोडी जमीन मिळविण्याचे जे स्वप्न आहे ते स्वप्नच राहील. तेव्हा...." असा विचार करून ती पुढे म्हणाली,
" हां मीच तुला दूर केले तिच्यापासून."
" का केलेस आजी तू असं ?"
" का केलं म्हणजे ? मी तसं जर त्यावेळी केलं नसतं तर
तू आज माझ्या राहुल चा मुलगा नाही तर दयांनद चा मुलगा
म्हणून गणला असतास."
" मग होऊ द्यायचं होतेस ना मला . मी एवढ्या मोठ्या
प्रॉपर्टी चा मालक बनलो असतो."
" मग आता कुठं बिघडलं आहे ? तो तुला आपला मुलगा
मानतो म्हटल्यावर तुला ते सर्व अधिकार प्राप्त होतील ते
त्यांच्या इतर मुलांना प्राप्त आहेत. आणि समजा तो द्यायला
तयार नाही झाला तर तेथे तुझी जन्मदात्री आई आहेच की
तिच्या समोर थोडा हट्ट करायचा. बस्स ! मग तीच मिळवून देईल तुला तुझे सारे अधिकार."
" काय सांगतेस आजी ....खरंच का ?"
" हां माझ्या सोन्या हां ! तू आता बघाच ह्या पुजाऱ्याला
कशी मी नाचवते ती." तसा रोहन एकदम खुश होऊन आपल्या आजीला बिलगला.
ठरल्या प्रमाणे दयानंद ने आपल्या वकील ला बोलवून
प्रॉपर्टी मधील काही हिस्सा रोहन च्या नावावर करून त्या जमिनीचे कागदपत्रे रोहनच्या स्वाधीन करत म्हटलं ," ही घे
तुझ्या हिस्साची जमीन." रोहन ने जमिनीचे कागपत्र नीट वाचून पाहिले नि घरी निघाला . घरी येऊन आपल्या आजीला
मिठी मारून एकदम खुश होत म्हणाला ," आता आपण स्वतःचे घर ह्या जमिनीत बांधू शकतो. असा विचार करून
त्याने त्यातली थोडीशी जमीन गावच्या सावकारा जवळ गहाण ठेवली नि त्या जमिनीवर घर कर्ज काढले नि स्वतःचे
घर बांधायला सुरू केले. परंतु व्यवहार ज्ञान नसल्यामुळे सर्व
कंत्राटदारांनी त्याला फसविले. घर तर बांधून झालेच नाही.
पण पैसे मात्र संपून गेले. म्हणून त्याने आणखीन जमीन
सावकाराजवळ गहाण ठेवली नि पुन्हा कर्ज काढले. परंतु
परिणाम तोच. असे करता - करता त्याची सारी जमीन सावकाराकडे गहाण पडली परंतु घर का पूर्ण बांधून झाले नाही. शेवटी दयानंद ने स्वतः त्या प्रकरणात जातीने लक्ष घातले नि ते घर बांधून पूर्ण झाले. आणि त्या घराचा ग्रह प्रवेश ही झाला. असो.
एके दिवशी सुरेखाला एक मुलगा छेडत होता. परंतु
रोहन ते पाहून ही न पाहिल्या सारखे केले. पण तेवढ्यातच
समोरून राहूल आला त्याने ते पाहिले. नि लगेच त्या मुलाच्या अंगावर धावून गेला. नि त्याची गचंडी पकडली.
पण तेवढ्यात त्याचे मित्र धावून आले नि त्याला मारू लागले. ते रोहन ने पाहताच रोहन धावून गेला त्याचा मदतीला नि मग त्या दोघांनी मिळून त्या चौघांची धुलाई केली.
तेव्हा त्यातील एकजण बोलला की तू कशाला आमच्या मध्ये
पडतोयेस ? " तेव्हा रोहन म्हणाला ," का पडतो ? हा राहुल माझा भाऊ आहे." तेव्हा राहुल म्हणाला ," ही आमची बहीण आहे." तेव्हा चट्कन रोहन बोलला ," माझी नाही फक्त तुझी
म्हण." त्यावर सुरेखा त्याच्यावर नाराज होत म्हणाली," असं
का रे दादा बोलतोयस तू ? मी तुझी कुणीच नाही का ?"
" नाही. तू माझी कुणी नाही."
" दादा ,हे बोलणं तुला शोभत नाही."
" एss तू काय मला शिकवतो रे ? लहान आहेस तर लहानच बनून रहा."
" मी एवढा पण लहान नाही की मला काही कळत नाही."
" ठीक आहे ठीक आहे, जा आपल्या बहिणीला घेऊन."
" दादा असा का वागतोयस तू ?"
" का वागतोय ते आपल्या आईला जाऊन विचार."
" अरे,आईच काही चुकलं नाही. तुला तुझी आजी घेऊन
इथून पळून गेली होती. गावात कोणालाही माणसाला विचार तो खरे काय ते सांगेल."
" काही गरज नाही त्याची ! आणि माझ्या आजी विषयी
तू काही बोलायचे नाही. सांगून ठेवतो. " असे बोलून तो तेथून
चालता झाला. तेव्हा राहुल त्याच्या पाठमोऱ्या आकृती कडे
पाहत बोलला ," तू नाही बोललास तरी मी समजलो की
तू मला नि माझ्या ह्या ताईला आपली बहीण माणतोयस
हे आजच्या तुझ्या ह्या वर्तनावरून द्यानात आलेच माझ्या."
असे म्हणून तो आपल्या बहिणी सोबत तेथून चालता झाला.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा