पंखरूपी मानव -३
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
पंखरूपी मानव -३ |
डॉक्टर विश्वजित गावाला पोहोचले नि आपल्या असिस्टंट ना बोलले ," आपल्याला लवकरात लवकर बॉडीलेस तयार करून अंतराळात पाठवायला हवे. नाहीतर
आपले शत्रू आपल्या पर्यंत पोहोचतील. असे म्हणून घडलेली
घटना सविस्तर पणे ऐकविली. ते ऐकून जॉन म्हणाला ," पण
बॉस त्याना इथला पत्ता कोण देईल ? कारण कोणालाच माहीत की हे तुमचे गाव आहे."
डॉ. विश्वजित : इन्स्पेक्टर राणे ना ठाऊक आहे. तसे मी त्याना रिक्वेस्ट केली आहे,की कोणाला माझा पत्ता सांगू नकोस म्हणून. परंतु पण कोणाचा काय भरवसा द्यावा.
थोड्याशा पैशासाठी इमान विकणारे लोक या भारत देशात
फार पूर्वी पासून आहेत. आणि इतिहासात त्याचा दाखला सुध्दा आहे. आपला भारत देश फितुरी मुळे आज मागे आहे, नाहीतर साऱ्या जगावर भारी पडेल असे भारताकडे ज्ञान आहे,पण त्याचा फायदा इतर देश घेताहेत. आणि फितुरी ची कीड भारताला पहिल्या पासून लागलेली आहे, म्हणून अनेक युध्दे भारतातील राजे त्यामुळे च हरले. शिवाय त्या गब्बर ला पण तर ठाऊक असण्याची शक्यता आहे."
सलीम : पण बॉस तो तर जेल मध्ये आहे ना ?"
डॉ. विश्वजित : पण ते लोक तर त्याला जाऊन भेटू शकतात."
जॉन : खरंय."
डॉ. विश्वजित : म्हणून आपण बेसावध अजिबात राहायचे
नाही. म्हणून ते लोक इथं पोहोचण्या अगोदर आपला
बॉडीलेस तयार व्हायला हवा." तेव्हा जॉन बोलला,
" डॉक्टर आम्ही दोघे बॉडीलेस तयार करतो. तोपर्यंत तुम्ही त्याचा स्वाफ्टवेअर तयार करा. मग लागले तिघेही कामाला गावकऱ्यांनी अर्धेअधिक प्रयोगशाळे चे काम सोपविले होते. फक्त छप्पर तेवढे घालावयाचे बाकी होते.
तसाच ह्या लोकांनी आपले काम सुरू केले.
पोलीस स्टेशनला इन्सपेक्टर राणे ने सर्वाना वार्निग देऊन
ठेवली होती की डॉ. विश्वजित पोलीस स्टेशनला येऊन गेले याची बातमी बाहेर फुटता कामा नये." पण तरी देखील पैशाच्या आशेने एका कॉन्स्टेबल ने ही बातमी लिक केली.
तसे कोण पुन्हा पोलीस स्टेशनला आले , आणि त्यांनी इन्स्पेक्टर राणे ना विचारले ," डॉ. विश्वजित इथं पोलीस स्टेशन ला आले होते तर आम्हला का नाही सांगितले ?"
इन्सपेक्टर राणे : डॉ . विश्वजित नि मनाई केली होती."
डेव्हिड :बरं, त्यांनी आपला ठिकाण्याचा पत्ता सांगितला का ?"
इन्स्पेक्टर राणे : नाही सांगितला "
डेव्हिड : का नाही सांगितला ?"
इन्सपेक्टर : ती त्यांची मर्जी !"
डेव्हिड : तुम्ही विचारू शकत होता ना ?"
इन्सपेक्टर राणे : आणि गुन्हेगारांचे पत्ते विचारतो. निर्दोष
माणसाचे नाही."
डेव्हिड: बरं असा कोणी आहे,की त्यांच्या बद्दल काही माहिती असेल ?"
इन्सपेक्टर : नाही."
हेड कॉन्स्टेबल जयदेव म्हणला ," गब्बर नावाचा एक कैदी आहे, सेंट्रल जेल मध्ये आहे. कदाचित त्याला डॉ. विश्वजित
विषयी माहिती असावी."
डेव्हिड : ठीक आहे,मी भेट घेतो त्याची." असे म्हणून तो सेंट्रल कारागृहात गेला आणि गब्बर ला जाऊन भेटला तेव्हा
गब्बर बोलला ," मला फक्त डॉ. विश्वजित चे असिस्टंट आहेत
त्यांचे गाव माहीत आहेत. डॉ. विश्वजित चा गाव माहीत नाही.
परंतु ते दोघेजण सापडले तर त्यांच्या कडून डॉ. विश्वजित चा
पत्ता सापडेल."
डॉ. डेव्हिड म्हणाले ," ठीक त्यांच्या गावाची नावे सांग."
सलीम नावाचा जो असिस्टंट आहे, त्याच्या गाव कोकणात
आहे, राजापूर तालुका गाव सांगावे आणि जॉनच्या गावाचे
नाव गोवा आहे."
डेव्हिड : थँक्स यु एवढी माहिती आमच्यासाठी खूप झाली."
त्याचे आभार मानले नि निघाले राजापुरला जायला." कोकण
कन्या एक्स्प्रेस पकडून सकाळी राजापूर रोड ला उतरले.
तेथून एस टी राजापूर बस डेपोत उतरले. डेव्हिड सोबत आलेला दुभाषिक डेव्हिड जे बोलत असे तो मराठीत
भाषांतर करून समोरच्या व्यक्तीला सांगतअसे.
तेथे चौकशी खिडकी वर सांगावे गावात कोणती बस जाते याची चौकशी केली. तेव्हा त्यांनी सांगितले की शिरसे सागवे गाडी पकडा नि सागवे गावात जाऊन चौकशी करा. त्या प्रमाणे ते शिरसे सागवे गाडीत बसले. नि सागवे चे तिकीट काढले.
सागवे गावात पोहोचल्यानंतर सलीम शेख कुठं राहतात
याची चौकशी केली असता एका माणसाने सलीम चे घर नेऊन दाखविले. सलीम चे वडील घरी होते. त्यांच्या जवळ
सलीम विषयी चौकशी केली असता ते म्हणाले," सलीम
सध्या कुठे आहे ते आम्हांला माहीत नाही. परंतु एक महिन्या
पूर्वी मुंबईहून त्याची मनी ऑर्डर आली होती. तसे डेव्हिड
लगेच विचारले ," त्यावर पत्ता असेल ना त्याचा ?"
" प्रत्येक वेळी वेगळा पत्ता असे. म्हणजे कधी दादर ,तर
कधी कुर्ला तर कधी CSMT असं असे."
" तुम्ही विचारले नाही ,तू कोठे राहतोस म्हणून."
" विचारायला फोन कुठे करतो तो ?"
" मग त्याची क्षेम कुशलता कशी मिळते तुम्हाला."
" मनी ऑर्डर फार्म वरच लिहिले असते की मी खुशाल आहे. बस्स ! एवढेच लिहिले असते त्या फार्मवर." ते ऐकून
डेव्हिड मनात बोलला ," डॉ.विश्वजित फार हुशार माणूस
आहे, त्याच्या पर्यंत कोणी पोहोचू नये, म्हणून त्याने ही
घेतलेली खबरदारी आहे , पण हरकत नाही. किती दिवस
असा लपून राहणार. एक ना एक दिवस जगासमोर यावेच लागेल तुला. असे म्हणून ते परतीच्या रस्त्याला लागले.
राजपुरला आल्यावर त्यांनी पुन्हा गोव्याला जाणारी एक्स्प्रेस
पकडून गोव्याला उतरले. विचारत विचारत ते जॉनच्या घरी
पोहोचले.पण तेथे ही सेम तीच उत्तरे मिळाली.जि उत्तरे
सलीम च्या घरी मिळाली. शेवटी निराश मनाने ते लोक
मुबंईला परतले. तेव्हा त्याच्या असिस्टंट म्हणाला ,"सर,मला काय वाटतं ते मुंबईलाच आहेत. कारण मुबंई सोडून ते लोक
गावात कशाला येतील ?"
" हो ; बरोबर आहे, तुझं ; परंतु एवढ्या मोठ्या मुंबईत
त्याना शोधवयाचे कोठे ?"
" हो ; ते ही बरोबर च आहे.पण मला काय वाटतं माहितेय ."
" काय वाटतं सांग."
" मला वाटतं मागच्या प्रमाणे ते केव्हा ना केव्हा इंस्पेक्टर
राणे ना भेटायला नक्की येतील. तेव्हा आपण त्याना पकडू
शकतो." तसा तो खुश होत बोलला ," व्हेरी गुड ,चांगली
आयडिया दिलीस तू . असेच करावे लागेल." असे म्हणून
त्याने दोन माणसे पोलीस स्टेशनच्या उभी केली नि पोलीस
स्टेशनला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर नजर ठेवण्यात आली.
डॉ. विश्वजित चे असिस्टंट सलीम आणि जॉन यांनी मिळून बॉडीलेस तयार केला. हा बॉडीलेस पहिल्या पेक्षा जरा वेगळा होता. म्हणजे हा बॉडीलेस अदृश्य तर होत होताच शिवाय पक्षा सारखा आकाशात उडू पण शकत होता. शिवाय विद्युत पॉवर नसेल तेव्हा सूर्या च्या ऊर्जेवर चालणारा होता. म्हणजे दोन्ही सिस्टम बनविले होते. हा डॉ. विश्वजित चा नवीन प्रयोग होता. यान मार्फत अंतराळात उड्डाण न मारता
पंखाच्या साह्याने अंतराळात उड्डाण मारणे. हा प्रयोग
यशव्ही होतोय की नाही याची चाचणी घ्यायची ठरविली.
तेव्हा सर्व गाव जमा झाला. गावातील सारे लोक म्हातारी
माणसे देखील कुतुहलाने ते पाहण्यासाठी माळरानावर
जमली होती. डॉ .विश्वजित ने बॉडीलेस ला सर्वकाही
सूचना दिल्या. आणि सर्वात अगोदर चंद्रावर जाऊन तेथील
माती आणावयाचा सांगितली. जेणेकरून सर्वांचो खात्री
होईल की तू खरोखरच चंद्रावर जाऊन आला. सोबत एक
कॉमेरा सुध्दा दिला. आणि सांगितले की चंद्रावरील पुष्ट भागाचे फोटो घेऊन ये." बॉडीलेस बोलला ," येस बॉस !
आपण निश्चिंत रहा. मैं यू गया और यू आया ." असे म्हणून
त्याने आपले दोन्ही पंख फडफडविले नि झेप घेतली.
सर्वजण मान वर करून बॉडीलेस बिंदू एवढा दिसे पर्यंत मान
खाली केली नाही. जेव्हा अजिबात दिसेनासा झाला तेव्हा
सर्वजण खाली पाहू लागले.
गाववाल्यांनी तर डॉ. विश्वजित ची तोंड भरून
स्तुती केली. तेव्हा पाटील म्हणाले ," शाब्बास पोरा,बाकी
नाव काढलेस आपल्या गावचे. आमच्या गावचे नाव साऱ्या
जगात चमकणार. म्हणून माझी अशी इच्छा आहे की, साऱ्या
गाववाल्यांनी मिळून डॉ.विश्वजित चा सत्कार करावा."
सर्व गावकऱ्यांनी लगेच होकार दिला.
डॉ. विश्वजित : पाटील काका ह्या श्रेय्यात या दोघांचा पण तेवढाच वाटा आहे. तेव्हा सत्कार तुम्हांला करायचाच असेल
तर ह्या दोघांचा पण करा."
पाटील : काही हरकत नाही पोरा. आम्ही त्यांचा सुध्दा सत्कार आनंदाने करू."
डॉ. विश्वजित : पण अगोदर थांबा."
पाटील : का बरं ?"
डॉ. विश्वजित : आपण केलेला प्रयोग यशव्ही झाला की
नाही ते बॉडीलेस परत आल्यानंतर च कळेल."
पोलीस पाटील : ठीक आहे,जशी तुझी इच्छा !"
त्यानंतर सर्व गावकरी आपापल्या घरी गेले. डॉ . विश्वजित पुन्हा आपल्या प्रयोगशाळेत आले नि लगेच दुसऱ्या कामाला सुरुवात केली. तेव्हा सलीम ने विचारले,
आता काय तयार करायचा विचार आहे. तेव्हा डॉ. विश्वजित
म्हणाले ," मागच्या वेळी मुंबईत अपूर्ण राहिलेली रिपोर्टर
मशीन पुन्हा तयार करण्याचा विचार आहे."
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा