पंखरूपी मानव २
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
पंखरूपी मानव २ |
पाटील : वा ! छान , बरं वाटलं तुझ्यातला नम्रपणा आणि मनात वडीलधाऱ्या माणसा विषयी नि आपल्या गुरुजना विषयी आदर भाव पाहून. खूप मोठा होईल पोरा खूप मोठा होशील. तुझं नाव साऱ्या जगात तुझं नाव होईल."
डॉ. विश्वजित : बस्स असाच आशिर्वाद तुमचा असू दे माझ्या
पाठीशी !"
पाटील : तो तर राहणारच. आमच्या गावाचे नाव मोठे केलेस."
डॉ. विश्वजित : पाटील काका , अजून एक मदत हवी आहे
मला तुमच्या कडून."
पाटील: मदत ना, अवश्य मिळेल. सांग काय मदत हवीय तुला."
डॉ. विश्वजित : थांबा. अगोदर माझ्या ह्या दोघांची आणि तुमची ओळख करून देतो. हा सलींम, आणि हा जॉन
हे दोघे माझे असिस्टंट आहेत." आणि त्या दोघांकडे पाहून तो
पुढे म्हणाला," जॉन आणि सलीम , हे काका आमच्या गावाचे पोलीस पाटील. " त्या दोघांनी पाटीलना नमस्कार केला. पाटील काका नि त्याना पण आशिर्वाद दिला," दिर्घआयुष व्हा पोरानो. त्यानंतर डॉ. विश्वजित बोलला," मला ना , प्रयोगशाळा बांधायसाठी थोडीशी जमीन पाहिजे ? मिळेल का ?"
पाटील : बस्स इतकेच ना , चल दिली तुला जमीन. शाळा कुठे बांधणार आहेस,तेवढं फक्त सांग."
डॉ. विश्वजित : तुम्ही द्याल त्या जागेत बांधेन मी प्रयोगशाळा."
पाटील : माझ्या म्हणण्याचा उद्देश तो नाही."
डॉ. विश्वजित : मग ?"
पाटील : माळरानावर पाहिजे का गावात चालेल ?"
डॉ. विश्वजित : माळरानावरच द्या. म्हणजे आपल्या पासून
कोणाला त्रास नको."
पाटील : तेच म्हणतो मी."
डॉ. विश्वजित : बरं, मी गोडबोले सरांना भेटून येऊ ?"
पाटील : पण जेवायला इथंच या सर्वजण."
डॉ. विश्वजित : हो हो इथंच येतो." असे म्हणून तेथून उठला
नि गोडबोले सरांच्या घरी गेला. गोडबोले सर आता निवृत्त
झाले होते. आणि त्यांनी ह्या गावातच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता. जेव्हा डॉ, विश्वजित आपल्या असिस्टंट
सोबत त्यांच्या घरी पोहोचला. तेव्हा बाहेरच सोप्यावर बसले
होते. वयानुसार आता त्यांची नजर कमजोर झाली होती
म्हणून जवळचे नि दूरचे बरोबर दिसत नव्हते. म्हणून त्यांनी
डॉ. विश्वजितला ओळखलेच नाही. ते त्याच्याकडे पाहतच
राहिले. तसा डॉ. विश्वजित ने त्यांचे चरणस्पर्श केले. तसे
त्यांनी विचारले ," कोण आपण ? मी ओळखले नाही आपल्याला."
डॉ. विश्वजित : अहो, सर ! तुम्ही मला ओळखले नाही ?"
तेव्हा त्यांनी नकारात्मक मान डोलविली. तसा डॉ. विश्वजित
बोलला ," अहो,मी विश्वजित विचित्र प्रश्न विचारणारा तुमचा
विद्यार्थी ."
गोडबोले : आठवल्या सारखे करून म्हणाले , हो आठवलं
आठवलं आता आठवलं. विश्वजित नाही का तू ?"
डॉ. विश्वजित : होय सर."
गोडबोले : तू आता मोठा सांयटिस्ट झालास. नाही का ?'"
डॉ. विश्वजित: होय सर, आणि ते केवळ तुमच्या आशिर्वाद मुळे शक्य झाले."
गोडबोले : अरे आमचा कसला आशिर्वाद आलाय ? ते
सारं तुझ्या मेहनतीचे फळ आहे ते बाबा. शिक्षक सर्वाना सारखेच शिक्षण देतात, पण त्यातील काहीच मुलं परीक्षेत
उत्तीर्ण होतात."
डॉ. विश्वजित : ते जरी बरोबर असले तरी गुरू शिवाय ज्ञान नाही. आणि आई शिवाय माया नाही. तुमचाच विश्वास माझ्या
कामी आला नि मी सायंस्टिट बनलो.
गोडबोले : तुझ्यातील नम्रता नि आपल्या गुरुजना विषयी तुझ्या मनात असलेला आदर पाहून खूप आनंद झाला. परंतु
ह्या दोघांची ओळख करून दिली नाहीस ?"
डॉ. विश्वजित : हे दोघे माझे असिस्टंट आहेत, हा सलीम,नि हा जॉन " त्या दोघांनी पण गोडबोले सरांना हात जोडून नमस्कार केला. आणि गोडबोले सरांनी सुध्दा त्याना आशिर्वाद दिला. त्यानंतर इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या.
पुढील संशोधना विषयी चर्चा झाली. तेव्हा डॉ. विश्वजित ने
त्यांना पुढील संशोधन विषयी माहिती दिली. तेव्हा ते एकदम
खुश झाले आणि त्याला यशस्वी होण्याचा आशिर्वाद पण
देऊन टाकला. त्यानंतर त्याला जेवणाचा आग्रह केला तेव्हा
डॉ. विश्वजित म्हणाला," आज पाटील काका कडे जेवणाचे
आमंत्रण आहे, तेव्हा तुमच्याकडे परत केव्हातरी येऊ."
असे म्हणे स्तोवर मास्तरीन बाई चहा नि नाश्ता घेऊन आल्या.
चहा-नाश्ता होताच त्यांनी निघण्याची अनुमती मागितली.
गोडबोले सर म्हणाले ," असा येत जा रे अधून मधून "
तो निघालाच होता. तेवढ्यात सारे गाव लोटले त्याला पाहण्यासाठी. त्याच्या बरोबर शिकत असलेली त्यावेळची मुलं आणि आता गावातील सदस्य सर्व हजर झाले. त्याची
विचार पूस केली. म्हाताऱ्या माणसांनी त्याला तोंड भरूनआशिर्वाद दिले. आणि त्याची त्यावेळी टिंगल करणाऱ्या मुलांनी त्याची माफी मागितली. आणि सर्व
गावकऱ्यांनी त्याचं जंगी स्वागत समारंभ करण्याचे ठरविले.
नको नको म्हणत असतानाही. स्वागत करायचे ठरलेच.
त्यानंतर स्वागत समारंभ पार पडला. आणि सर्व गावकऱ्यांनी मिळून त्याला प्रयोगशाळा बांधण्यासाठी जागाही दिली. आणि जशी बांधून पाहिजे तशी बांधून हमी ही दिली. आणि घर बांधण्यासाठी ही जागा दिली. शिवाय
घर बांधून होई पर्यंत पोलीस पाटलांच्या घरी राहण्याची व्यवस्था पण झाली. आणि प्रयोगशाळेचे नि घराचे बांधकाम
सुरू पण झाले.
पण त्याच वेळी सिंगापूर हून आणि अमेरिकेतून काही
माणसं मुंबईला आली होती. त्यांनी अगोदर भारताच्या राष्ट्पतीची भेट घेतली. आणि त्यानंतर पंतप्रधानाची भेट घेतली. आणि त्यांच्या जवळ डॉ. विश्वजित शी भेट घेण्याविषयी आपली इच्छा दर्शविली. तेव्हा त्यांना विचारण्यात आले की कोणत्या संदर्भात भेटायचे आहे तुम्हांला ?" तेव्हा डॉ. डेव्हिड म्हणाले ," आम्हाला त्यांनी बनविलेला फार्म्युला तर पहायचाच आहे ,शिवाय आम्हाला देखील अगदी तसाच फार्म्युला त्याच्यांकडून बनवून पाहिजे. तुम्ही मागाल तेवढी किंमत आम्ही डॉलरच्या रुपात द्यायला तयार आहोत." तेव्हा राष्ट्रपती म्हणाले ," परंतु डॉ. विश्वजित सध्या कोठे आहेत ,या बद्दल कोणालाच माहीत नाहीत . हां पण त्यांच्या बद्दल खरी माहिती इन्स्पेक्टर विरेंद्र
राणे देऊ शकतील. " त्यानंतर इन्स्पेक्टर कोणत्या पोलीस स्टेशनला भेटतील या बद्दल सविस्तर माहिती दिली. तेव्हा शेवटी इन्स्पेक्टर वीरेंद्र जवळ चौकशी केली असता इन्स्पेक्टर वीरेंद्र बोलला," मला ही माहीत ते सध्या कोठे आहेत ? परंतु ते दोन ठिकाणी असण्याची शक्यता आहे. " तेव्हा त्या लोकांनी विचारले ,कोठे ?" इन्सपेक्टर वीरेंद्र बोलला ," पडकी इमारत किंवा गब्बरचे घर. म्हणजे तळघर. तिथे त्यांची प्रयोगशाळा होती. "
" परंतु बॉम्ब स्फोट मध्ये ती उद्ध्वस्त झाली होती ना ?"
हेड कॉन्स्टेबल जय मध्येच बोलला.
" हो; डॉ. विश्वजित बद्दल काही सांगता येत नाही. त्यांनी
बनविलेला बॉडीलेस एवढा पॉवरपुल आहे,की तो काही
करू शकतो." त्यावर जय गप्पच बसला. तेव्हा सिंगापूर हून
आलेली माणसे म्हणाली," चला आम्हाला दाखवा त्या दोन्ही
जागा. " इन्सपेक्टर वीरेंद्र राणे त्याना त्या पडक्या इमारती जवळ घेऊन गेला. तेथे कसून शोध घेतला. परंतु तेथे काहीच
सापडले नाही. त्यानंतर तेथून ते गब्बरच्या बंगल्यावर गेले. परंतु तेथे ही विशेष असे काही सापडले. बॉम्ब स्फोट ने उद्ध्वस्त झालेल्या बांगला अद्याप तसाच अवस्थेत पडलेला होता. त्यामुळे त्यांची फार मोठी निराशा झाली. त्यानंतर डॉ.डेव्हिड ने विचारले की अजून कुठं मिळण्याची शक्यता आहे का ?" त्यावर इन्स्पेक्टर वीरेंद्र राणे म्हणाले ," नाही सर ."
डॉ. डेव्हिड : बरं त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे ?"
इन्स्पेक्टर राणे : ते आपला नंबर कोणालाच देत नाही."
डॉ. डेव्हिड : का ?"
इन्स्पेक्टर राणे : का ते आता त्यांनाच ठाऊक ?"
डॉ. डेव्हिड : ठीक आहे,त्यांची काही खबर लागली तर
आम्हाला लगेच कळवा."
इन्स्पेक्टर राणे : अवश्य.'
डॉ. डेव्हिड आपल्या असिस्टंट सोबत तेथून निघून गेले.
त्यानंतर सिंगापूर चे डॉ. डाबर आले त्यांनी सुध्दा तेच प्रश्न केले . त्याना ही इन्स्पेक्टर वीरेंद्र राणे यांनी तेच सांगितले.
त्याना ही तसेच सेम आश्वासन दिले. ते गेल्यानंतर थोड्या
वेळाने तेथे डॉ. विश्वजित इन्स्पेक्टर वीरेंद्र राणे ना भेटायला येतात. त्याना पाहून बरे झाले डॉक्टर तुम्हीच आले ते. तुम्हाला भेटायला सिंगापूर हून आणि अमेरिकेतून माणसे आली आहेत."
" हो कळलं ते मला."
" तुम्हांला कसं कळलं ?"
" वृत्तपत्रात अश्या गोष्टी लपून राहात नाही इन्स्पेक्टर
साहेब."
" त्यांनी मला स्वतःचा संपर्क नंबर दिला आहे. देऊ तुम्हांला. ते लोक आताच गेलेत. अजून पोहोचले सुध्दा
नसतील विमानतळ वर ."
" मला बोलू द्याल जरा."
" बोला ना, "
" मग एक गोष्ट द्यानात ठेवा. मी कोठे आहे ते कोणालाच
सांगू नका."
" असं का म्हणता ? तुमच्यासाठी ते मोठी ऑपर घेऊन
आलेत आणि तुम्ही नाही म्हणता ?"
" त्याला कारण आहे ?"
" काय कारण आहे ?"
" इन्स्पेक्टर राणे ,तुम्हाला कळत नाहीये.ते फक्त आपला
वापर करून घेतली. आणि आपण बनविलेल्या बॉडीलेसचा ते दूर उपयोग करतील. शिवाय मागच्या सारखा प्रसंग माझ्यावर ओढवणार नाही. कशावरून ?"
" बरोबर आहे तुमचं म्हणणे ; परंतु तुम्ही सध्या आहेत कुठे ?"
" इन्स्पेक्टर राणे भिंतीला पण कान असतात. म्हणून मी
कोठे आहे ,हे तुम्हांला सुध्दा सांगणार नाही ; परंतु तुमच्या
जवळपास ही असेन हे द्यानात ठेवा. बरं मी येऊ."
" हो या,आता नवीन काहीतरी बनवा. म्हणजे आम्हाला पण गर्वाने सांगता येईल की आमचा भारत कोणत्याही बाबतीत मागे नाही."
" अवश्य.'" असे म्हणून तेथून निघून गेले.
खरे तर डॉ.विश्वजित बॉडीलेस तयार करण्यासाठी लागणारे
सामान खरेदी करायला आहे होते. तेव्हा त्यांनी वर्तमानपत्रात
बातमी वाचली. म्हणून त्यांनी इंस्पेक्टर राणेची भेट घेतली.
कारण इंस्पेक्टर राणे मागच्या वेळी गावाला गेले होतें. पोलीस पाटलांच्या कडून कळले. म्हणून ते तातडीने मुंबईला
आले. जेणे करून इंस्पेक्टर राणे कडून त्यांच्या गावचा पत्ता
त्या लोकाना कळू नये. ते सर्व लोक गावाला येऊ नये. हा
त्या मागचा हेतू होता.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा