हे सारे तुझ्यासाठीच ९
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
हे सारे तुझ्यासाठीच ९ |
दुसऱ्या दिवशी सौंदर्या आपल्या घरातून गायब झाली
नि विवेक आपल्या घरातून गायब झाला. विवेकच्या आई-
वडिलांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली. पोलीस स्टेशनला
रीतसर तक्रार नोंदविली. तेवढ्यात सौंदर्या चे आई-वडील
सुद्धा आपली मुलगी गायब झाल्याची तक्रार करायला आले. तेव्हा इन्स्पेक्टर विजय कदम च्या द्यानात आले की कालच्या रात्री सीमाचा आत्मा पोलिसांना सांगून गेला होता की सौंदर्याला नि विवेक ला धोका आहे. परंतु कोणापासून ते मात्र सांगण्यास तिचा आत्मा तयार नाहीये. परंतु त्या आत्म्याचे कथन सत्य ठरलं. परंतु त्यांच्या घराच्या बाहेर पाहारा करायला ठेवलेल्या पोलिसांना कशी खबर लागली नाही की रात्री त्यांच्या फ्लॅट मध्ये काय घडलं ते. त्यांनी फोन करून त्या दोघांना ही पोलिसांना पोलीस स्टेशनला यायला सांगितले नि फोन कट केला. त्यानंतर त्या दोघांच्याही आई -वडिलांकडूनत्या दोघांच्या मोबाईल चे फोन नंबर घेतले नि नंबर डायल केले असता दोघांचेही मोबाईल स्वीच ऑफ असल्याचा मेसेज येत होता. म्हणून लास्ट लोकेशन चेक केले असता. त्या दोघांच्या घरातले निघाले. रात्री १२ वाजता याचा अर्थ रात्री बारा वाजेपर्यंत ते दोघेही घरीच होते. त्यानंतर गायब झाले असावे असा पोलिसांचा तर्क होता. सौंदर्याच्या आईचे म्हणणे होते की ह्यांच्या मुलाला एका समंध ने झपाटले आहे. तोच माझ्या मुलीला घेऊन गेला असावा. ह्या दोघानाच त्याचा
ठावठिकाणा माहीत असेल ?" त्यावर विवेक ची आई चिडून म्हणाली," काहीतरीच काय आरोप करताय माझ्या मुलावर ? माझा मुलगा कशाला नेईल तुमच्या मुलीला ?"
" कारण तो भूत आहे."
" तोंड सांभाळून बोला , सौंदर्याच्या आई , भूत कोणाला म्हणताय ?" विवेक आई ची उद्गारली.
" तुमच्या मुलाला." सौंदर्या ची आई उद्गारली.
" बघा हो इन्स्पेक्टर साहेब , ह्या कश्या माझ्यावर आरोप
करताहेत त्या ?"
" थांबा. तुम्ही दोघी पण भांडू नका. तुमच्या मुलांना काही होणार नाही. याची शाश्वती मी देतो. तुम्ही जा आता आपल्या घरी." त्या दोघी जश्या उठून गेल्या. विजय कदम कॉन्स्टेबल हरीश ला म्हणाले ," चल आपल्याला निघायला हवं."
" कुठं सर ?"
" तांत्रिक महाकालच्या अड्ड्यावर ."
" म्हणजे गुहेत ना ?"
" होय."
" पण तिथं जाऊन काय मिळणार ?"
" मिळालं तर तिथंच भेटेल."
" म्हणजे मी नाही समजलो."
" चल रस्त्यामध्ये सांगतो सर्व." पोलीस पथक
निघाले. तेव्हा विजय कदम म्हणाले," तुला आठवतं त्या
दिवशी सीमाचा आत्मा काय म्हणाला ते ." कॉन्स्टेबल हरीश
ने आठवल्या सारखे करत म्हणाला ," सौंदर्याला नि विवेकच्या जीवाला धोका आहे म्हणून. "
" ते नव्हे रे, त्यानंतर जे म्हणाला ते." विजय
" दोन वेळा जिथं जाऊन आला तिथंच तुम्हाला मार्ग
सापडेल म्हणून."
" एकदम करेक्ट !"
" पण साहेब ,दोन वेळा तर आपण मंत्र्याच्या फार्म
हाऊस वर पण गेलो होतो."
" हां परंतु फार्म हाऊस वर काही देखील सापडणार नाही."
" एवढं तुम्ही खात्री ने कसं सांगू शकता ?"
" त्याला कारण आहे."
" काय कारण आहे ?"
" पाहिले कारण म्हणजे सीमाच्या आत्म्याला बदला
घ्यायचा असता तर तेव्हाच घेतला असता ना इतक्या दिवस
वाट का बघितली असती ."
" तुमच्या बोलण्यात दम आहे साहेब , परंतु.....?
" परंतु काय ?"
" तो सीमाचा आत्मा नव्हता तर दुसऱ्या कोणाचा आत्मा होता तो ?"
" आत्म्या सीमाचाच आहे, परंतु तो आपल्या मर्जीने
हे सर्व करत नाहीये."
" म्हणजे नेमके काय म्हणायचंय तुम्हांला ?"
" हे तांत्रिक लोक आत्म्याला वश करतात नि त्यांच्या कडून हवी ती कामे करून घेतात. असं मी ऐकले होते
कोणाकडून तरी !"
" म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की सीमाच्या आत्म्याला त्या तांत्रिका ने वश केलंय."
" केलंय की नाही ते माहीत नाही , परंतु माझा असा अंदाज आहे बाकी खरे की खोटे काही माहीत नाही. नाहीतर बघ ना, सीमाच्या आत्म्याने असं का सांगितले असते की सौंदर्याच्या नि विवेकच्या जीवाला धोका आहे म्हणून."
" हूं तुमच्या म्हणण्यात काहीतरी तत्य आहे म्हणा. परंतु
तुम्ही म्हणता त्या प्रमाणे जर तसे असेल तर विवेक आणि
सौंदर्या या दोघांना गायब करण्या मागे तांत्रिकाचा तर हात
नसेल ना ?"
" एक्सझँक्टली ! अगदी तसेच आहे."
" परंतु असं करण्यामागे त्याचा हेतू काय असावा ?"
" ते तिथं गेल्यावरच कळेल ना "
पोलिसांची व्हॅन गुहे जवळ पोहोचली. तेव्हा साध्या वेशात तेथे उभे असलेल्या पोलिसांना इन्स्पेक्टर विजय कदम ने विचारले ," सावंत गुहेत काय हालचाल ?"
" काही माणसे आली होती पण ते सर्वजण गेले. परंतु
सौंदर्याच्या आईला गुहेत जाताना पाहिले." तेव्हा इन्स्पेक्टर
विजय ने मोठ्या आश्चर्य व्यक्त करत विचारले ," त्या इथं
कशाला आल्यात ?" सावंत म्हणाला ," ते माहीत नाही साहेब."
" त्याना आज प्रथमच पाहिलेस का या पूर्वी पण त्या
इथं येत होत्या ?"
" मी इथं पाहाऱ्याला आल्यापासून आज प्रथमच पाहतोय त्याना. त्या पूर्वी आल्या असतील तर माहीत नाही."
" बरं कळेल आज काय खरं आहे ते." असे म्हणून
इन्स्पेक्टर विजय कदम ने पोलिसांना संपूर्ण गुहेला गराडा घालायला सांगितला नि स्वतः हरीश सोबत गुहेच्या आंत
मध्ये शिरले . तेव्हा त्याना काय दिसले तर सौंदर्या चे आई-वडील अन्य कुणी नव्हता गुहे मध्ये. इन्स्पेक्टर विजय कदम ला पाहून ते दोघेही चपापले. त्याना नक्कीच प्रश्न पडला असावा की पोलीस इथं कसे ? तेवढ्यात इन्स्पेक्टर विजय कदम नेच त्याना प्रश्न केला की आपण दोघेही इथं कशासाठी आलात ? त्यावर सौंदर्याची आई म्हणाली,
" आम्ही इथं महाराजा पाशी आलो होतो."
" कशासाठी ?"
" आमच्या मुलीला कुणी गायब केलं हे जाणून घेण्यासाठी !"
" ते महाराज कसे सांगू शकतील ?"
" महाराज च अचूक सांगतात. मागच्या वेळी सुध्दा महाराजांनीच सांगितलं होतं की तुमची मुलगी आपोआप
घरी येईल नि त्या प्रमाणे ती आली."
" म्हणजे त्रिकाल ज्ञानी आहेत तर !"
" हो खरंय. महाराजाना आपोआप कळतं सारं."
" बरं ते महाराज आहेत कुठं ?"
" आतापर्यंत इथंच होते. पण थोड्या वेळा पूर्वी एका जरुरी कामासाठी गेलेत."
" कुठं गेलेत ?"
" बाहेर कुठं गेले नाहीत. त्या खोलीत पूजा सुरू आहे त्यांची !" इन्स्पेक्टर विजय स्वतःशीच बोलला की पूजा
आणि ती पण बंद खोली मध्ये ! काहीतरी गडबड आहे, असा विचार करून मग ते स्पष्ट शब्दात बोलले ," कुठं आहे ती खोली ?" त्यावर सौंदर्याची आई म्हणाली ," ती काय समोर." इन्स्पेक्टर विजय कदम त्यांनी बोट केलेल्या दिशेला पाहिलं. पण दरवाजा कुठं आहे , तो काही कळेना. समोर भिंत उभी दिसत होती. कदाचित इथं गुप्त मार्ग असावा. आणि गुप्त मार्ग उघडण्यासाठी इथं कुठंतरी गुप्तकळी असावी. असा मनात विचार करून त्यांनी भिंतीला चाचपायला सुरुवात केली. नकळत त्यांचा हात गुप्त कळीवर गेला नि दरवाजा उघडला. आंत प्रवेश करताच त्याना फक्त पलंग दिसला. त्यावर बिछाना नि पांघरून दिसलं. याचा अर्थ तांत्रिक महाकाल इथं झोपत असावा. असा अंदाज करून खोलीचे नीट निरीक्षण केले. परंतु संशयात्मक काहीच आढळले नाही. तेव्हा इन्स्पेक्टर विजय कदम ला प्रश्न पडला की इथं तर कोणीच नाही मग तांत्रिक महाकाल गेला कुठं ? बाहेर तर गेला नाही. कारण बाहेर जर गेला असता तर तो सावंत ला नक्कीच दिसला असता. बाहेर गेला नाही. इथंही नाही, याचा अर्थ एकच होऊ शकते की ह्या खोली प्रमाणेच अजून गुप्त खोल्या
असाव्यात आणि त्याचा गुप्त दरवाजा इथंच कुठंतरी असेल.
असा विचार करून गुप्त दरवाजा शोधण्याचा प्रयत्न केला.
परंतु गुप्त दरवाजा काही सापडला नाही. तेवढ्यात त्यांच्या मनात काय आलं कुणास ठाऊक त्यांनी सहज म्हणून पलंगावरील बिछाना बाजूला केला. त्याच बरोबर एक गुप्त मार्ग दिसला. इन्स्पेक्टर विजय कदम सिडीच्या मदतीने खाली उतरला . पाहतो तर काय तांत्रिक ने एक अग्निकुंड पेटविले आहे नि त्यात मंत्र म्हणून आहुती देत त्याच्या समोर कालिका देवीची मूर्ती आहे. इन्स्पेक्टर विजय कदम ने आपली चौफेर नजर फिरविली असता त्याला काय दिसले तर आतापर्यंत गायब झालेले सर्वजण म्हणजे , धनराज , विलास, प्रकाश, विनय, राजेश, प्रताप, विवेक आणि सौंदर्या तिथेच सर्वाना साखळ दंडाने बांधून घातले होते. त्या सर्वांना पाहून इन्स्पेक्टर विजय कदम समजून गेला की ह्यांचे मृतदेह का सापडत नव्हते पोलिसांना. परंतु ह्या सर्वांना इथं आणून बंदी बनवुन ठेवण्याचे मागचे कारण काय ? असो. इतकं तर समजलं की हे सर्व कारस्थान महाकाल चे आहे, असा विचार सुरू असतानाच महाकाल ने सीमाच्या आत्म्याला आदेश दिला की जा मुलीच्या आई-वडिलांना इथं घेऊन ये." असे म्हणताच सीमाचा आत्म्या अदृश्य झाला. तसा विजय कदम हळूच सिडीच्या दिशेने सरकत असतो. तेवढ्यात महाकाल चा आवाज त्यांच्या कानावर पडला. इन्स्पेक्टर विजय कदम आपले स्वागत आहे, आता आलात तर लग्न सोहळा पार पडल्यानंतरच जा. तुम्हांला काय वाटलं माझ्या गुहेत शिराल आणि गुपचूप बाहेर जाल. कदापि शक्य नाहीये ते. जायबंदी करा रे ह्याला.
असे म्हणताच एक आत्मा समोर प्रगटला नि त्याने
इन्स्पेक्टर विजय कदम ह्यांना देखील साखळी दंडाने बांधून
घातले. पण तरी देखील निर्भयपणे इन्स्पेक्टर विजय कदम
ने विचारले, " महाकाल बाहेर पोलिसांनी तुझ्या गुहेला
गराडा घातला आहे, तू पोलिसांच्या तावडीतून सुटणार नाहीस." असे म्हणून विजय कदम ने आपला मोबाईल
बाहेर काढला. पण त्याला रेंज नव्हती. महाकाल चा मोबाईल वर लक्ष पडताच त्याच्या हातातून मोबाईल
काढून घेतला नि एका बाजूला फेकला, तेथे अनेक मोबाईल पडलेले इन्स्पेक्टर विजय कदम ना दिसले. तेव्हा त्यांच्या द्यानात आले की हे सर्व मोबाईल ह्या सर्व मुलांचे आहेत.
ह्या सर्वांना तू का आणलास इथं ?"
" का आणलं म्हणजे ? या सर्वांचा मी बळी देणार आहे."
" पण कशासाठी ?"
" मला तारुण्य प्राप्त होण्यासाठी !"
" तारुण्य प्राप्त करून काय करणार ?"
" ह्या सौंदर्याशी मी लग्न करणार आहे. ?"
" लग्न आणि तुमच्याशी काय बोलता महाराज " हा आवाज सौंदर्याच्या आईचा होता. सीमाच्या आत्म्याने त्या
दोघांना पण आणले होते. तेव्हा महाकाल हसून बोलला,
" खरे तेच बोलतोय आई साहेब. ह्याच साठी तर मी तिची रक्षा करत आलोय. तुम्हांला आठवतंय ११ वर्षाची होती तेव्हा तिला माझ्या कडे आले होते. समंध भुता पासून तिची रक्षा करायला. "
" हो चांगले आठवते की !"
" तेव्हा मी तिला प्रथम पाहिली नि मला ती फार आवडली. तेव्हाच मी निश्चय केला की मी लग्न करेन तर हिच्याशीच ! म्हणून मी तुम्हांला खोटेच सांगितले की हिला
समंध ने झपाटले आहे आणि हिच्यावर पाळत ठेवण्यासाठी
एका मुलाची नेमणूक केली. हा बघा तो मुलगा." असे
एका मुलांकडे बोट केले. तो मुलगा दुसरा कोणी नसून सौंदर्याला जो नेहमी न्याहाळत असे तोच होता तो मुलगा. त्याला पाहून साऱ्यांना आश्चर्य वाटले. तसा महाकाल पुढे म्हणाला,
" तुमच्या मुलीशी लग्न करण्याची माझी इच्छा आहे, आणि ती मी पूर्ण करणारच."
" अहो, पण तुमचं वय काय नि तिचं वय काय ? थोडा
तरी विचार करा ना ?"
" त्याच साठी तर हा डाव रचला सारा."
" म्हणजे ?"
" तुम्हांला जावई तिच्या वयाला शोभेल असा हवा ना ?"
" हां ! "
" बस्स तर मग थोड्या वेळ वाट पहा. मी ह्या सर्वांना
बळी दिल्या नंतर मला तारुण्य प्राप्त होईल. मग मी तुमच्या मुलीशी लग्न करेन. चला पूजेला बसा तुम्ही पण ! " ते दोघेही पूजेला बसत नाहीत हे पाहून तो म्हणाला ," हे बघा मला बळजबरी करायला लावू नका." असे म्हणून मंत्र पठण सुरू झाले. लवकरच पूजा आटोपली. बळी साठी धनराज ला आणले गेले. धनराजच्या मानेवर तलवार मारून त्याची मान धडा वेगळी करण्यात आली. त्यानंतर त्याचे मित्र एक एक करून बळी दिलं जात होतं. तसं तसा महाकाल च्या रुपात ही बदल होऊ लागला. पांढरे झालेले केस काळे झाले. चेहऱ्यावर तेज येऊ लागले. शेवटचा बळी विवेक ला बळी देण्यासाठी आणले गेले. आणि त्याच्या मानेवर तलवार मारणार त्या अगोदर महाकालच्या मानेवर त्याच्या पाठीमागून तलवार घातली नि महाकाल चे मस्तक धडा वेगळे झाले. तेव्हा सर्वांची नजर त्या मुलावर गेली जो सदैव सौंदर्या वर नजर ठेवून असे. त्यानेच महाकाळ चा बळी घेतला. तेवढ्यातच कॉन्स्टेबल हरीश पूर्ण पोलीस पथक सह जिना उतरून खाली आला. अर्थात त्याना या कामी मदत सीमाच्या आत्म्याने केली. त्याना तो गुप्त मार्ग दाखवला. तेव्हा इन्स्पेक्टर विजय कदम ने तिचे आभार मानले नि विचारले की तू ह्या महाकाल च्या तावडीत कशी सापडलीस ?" तेव्हा सीमाचा आत्मा म्हणाला ," धनराज आणि त्याचा मित्रांना मला ठार मारायचे होते. त्या साठी मी तांत्रिक महाकाल ची मदत मागायला आले. परंतु मदत करण्याच्या बहानाने त्याने मलाच वश केले नि माझा वापर आपल्या मर्जी नुसार करू लागला. परंतु माझ्या शक्ती पेक्षा त्याची तांत्रिक शक्ती जास्त असल्याने मी काहीच करू शकत नव्हती. परंतु ज्या दिवशी मी ह्याला सौंदर्या ला न्याहाळताना पाहिले होते. त्याच वेळी मी निश्चय केला की ह्या तांत्रिक ला धडा शिकविण्यासाठी या मुलाचा वापर करून घेता येईल. असा विचार करून मी एका सूंदर मुलीचे रूप घेतले नि त्याला भेटली. तो माझ्या कडे बघतच राहिला. म्हणजे त्याला स्वतःवर विश्वास बसत नव्हता. की एक सूंदर मुलगी स्वतःहून त्याच्याशी मैत्री करायला येईल. आमची दोघाची मैत्री झाली तेव्हा मी त्याला विचारले की तू आपल्या मैत्रिणी साठी काय करू शकतोस ?" त्यावर तो म्हणाला ," तू सांगशील ते करेन." तेव्हा मी माझी असलीयत त्याला सांगितली नि त्याला म्हटले की तू ज्या मुलीला न्याहाळत असतोस तिचा प्राण संकटात आहे, तू तिची मदत करशील का ? त्यावर त्याने हां म्हटलं. मग मीच महाकाल ला सांगितले एक मुलगा आहे, तो तुमचे काम करू शकतो. त्याचं सौंदर्यावर प्रेम आहे, परंतु ते तो व्यक्त करू शकत नाही. तुम्ही त्याला खोटे आश्वासन द्या की तुम्ही त्याचे लग्न सौंदर्याशी करून द्याल. परंतु त्यासाठी तुला एक काम करावं लागेल की तिच्यावर सतत पाळत ठेवावी लागेल. त्यावर अजय तयार झाला. आणि ज्या दिवशी धनराज ने आपल्या फार्म हाऊस वर सौंदर्या चे अपहरण करून नेले होते. त्या रात्री अजय सुध्दा तेथे उपस्थित होता. विवेक च्या डोक्यावर फटका मारून त्याला बेशुध्द करणारा दुसरा कोणी नसून हा अजय होता. परंतु अजय कोणीही तेथे पाहिले नाही. त्यानंतर तो सौंदर्या च्या आसपासच असायचा. परंतु आज त्याने महाकाल च्या तोंडून ऐकले की तो स्वतः सौंदर्याशी लग्न करणार आहे, तर तो स्वतःवर काबू ठेवू शकला नाही आणि महाकाल चा गळा कापून त्याने महाकाल ची हत्या केली. त्यावर इन्स्पेक्टर विजय म्हणाले ," परंतु मला एक कळत नाही की त्याला मारायचेच होते तर एवढा उशीर का लावला ? म्हणजे मला म्हणायचंय की जरा अगोदर मारले असते तर धनराज आणि त्याच्या साऱ्या मित्रांचा प्राण वाचला असता ना " त्यावर अजय म्हणाला," त्याना या साठी वाचविले नाही की त्यांनी माझ्या ह्या (सीमा) मैत्रिणीवर बलात्कार केला नि तिला जीवानिशी ठार ही मारले. ते सारे गुन्हेगार होते. त्याना जगण्याचा काही अधिकार नव्हता. म्हणून त्याना मी वाचविले नाही." पोलीस सर्वजण आंत आले नि त्या सर्व मृतदेहाचे पोलीस पंचनामे केले नि सर्वांचे मृतदेह पोष्टमार्टम साठी सिव्हिल इस्पितळात पाठविण्यात आले. सौंदर्याला आणि विवेक ला मुक्त करण्यात आले. त्यानंतर सर्वजण पोलीस स्टेशनला आले. विवेक आणि सौंदर्या ने अजयचे आभार मानले.
समाप्त
ही कथा इथं संपली नाही.ह्या कथेचा दुसरा भाग आहे
महाकाल वाचा नि आपला अभिप्राय द्या.धन्यवाद
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा