Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

हे सारे तुझ्यासाठीच ७

हे सारे तुझ्यासाठीच ७
हे सारे तुझ्यासाठीच ७


       इन्स्पेक्टर विजय कदम पोलीस स्टेशनला आले. परंतु
त्यांच्या डोक्यात तांत्रिक महाकाल ने म्हटलेलं शेवटचे वक्तव्य अजून ही त्यांच्या मनात घोळत होतं की तांत्रिक असं का म्हणाला असेल की आता तरी तुमची खात्री झाली ना ? ह्या प्रकरणात मी नाहीये. याचा अर्थ काय ? नाही म्हणजे  आम्ही त्याच्याकडे कोणत्या कारणासाठी  गेलो होतो हे त्याला कसे कळले ? नक्कीच काहीतरी इथं गोम आहे , पण कळणार कशी ? " किंचित विचारमग्न झाल्यानंतर एक उपाय सुचला. तो उपाय हा होता की तांत्रिक महाकाल वर नजर ठेवणे. तो रोज कुठे जातो नि  कोणाला भेटतो ? किंवा त्याला कुणी भेटायला येतात का ? आले तरी ती कोण माणसं असतात. ह्याची बारीक चौकशी करावी लागेल. असा विचार मनात येताच  त्यानी लगेच हा उपाय अमलात आणला. एका कॉन्स्टेबल ला साध्या वेषा मध्ये महाकाल च्या गुहेच्या बाहेर पहारा देण्यासाठी ठेवले आणि विनयच्या आई-वडिलांना फक्त दिलासा देऊन घरी पाठविले. परंतु अजून एक सुद्धा पुरावा सापडला नाही आणि ह्या केश चा छडा लावणार कसा ? परंतु सध्या कोणत्याच प्रश्नाचे उत्तर नव्हते त्याच्याकडे. परंतु कुठून ना कुठून सुरुवात तर करावीच लागणारच ना ? म्हणून की काय  तांत्रिक महाकालावर नजर ठेवण्यासाठी एका कॉन्स्टेबल ची तेथे  नियुक्ती केली.

    धनराज चे सारे मित्र एक एक करून गायब होऊ लागले
होते.म्हणून बाकीच्या मित्रांनी एवढी धास्ती घेतली की त्यांनी कॉलेजमध्ये जायचंच सोडून दिले. प्रकाश आपल्या घरीच होता. त्याच्या आई ने त्याला विचारले कीं तू आज कॉलेज मध्ये का जात नाहीयेस ? त्यावर तो म्हणाला ,
      "  मम्मी आज माझी तब्बेत थोडी नरम आहे, म्हणून मी आज कॉलेज ला जात नाहीये ."
     " अरे मग डाँक्टर कडे तरी जाऊन ये जा ."
     " हो जातो थोड्या वेळाने."
     " थोड्या वेळाने नको आता जा . का मी येऊ तुझ्या सोबत ?"
     " नको नको मी जाईन ना एकटा. मी काय आता लहान
बाळ आहे ?"
     " ठीक आहे, मग जाऊन ये पट्कन."
     प्रकाशला  कळत नव्हतं की काय करावं ? कारण सत्य कारण आईला सांगू शकत नव्हता. आणि डॉक्टर कडे गेल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता त्याच्यापुढे . म्हणून तो घरातून निघाला. परंतु दवाखान्यात न जाता सरळ आपल्या मित्राच्या घरी गेला. पण तिथं ही तीच परिस्थिती होती घरच्याना सांगणार काय ? कॉलेजात का जात नाहीये ते.? म्हणून प्रताप ने देखील  आपल्या आईला थाप मारली होती , नि तोही निघाला आपल्या मित्रा सोबत. दोघेही एका गार्डनमध्ये आले नि एका ठिकाणी बाकावर बसले नि एकमेकांशी सल्लामसलत करू लागले होते की , काय असेल ही भानगड ? म्हणजे एक एक करून आपले सर्व मित्र गायब होताहेत आणि मुख्य म्हणजे त्यांची डेडबॉडी पण पोलिसांना सापडत नाहीये . अश्या परिस्थिती मध्ये शोध घेणार तरी कसा ? " त्यावर प्रकाश ने विचारले ," तुला खरंच वाटतं हे सर्व तो विवेक करत असेल ?"
     " अरे विवेक म्हणजे त्याच्या शरीरात शिरलेला समंध
करतोय हे सारं." प्रताप उत्तरला.
     " परंतु त्याची आमच्याशी काय दुश्मनी ?" प्रकाश ने प्रश्न
केला.
     " अरे आपण नाही का त्या दिवशी सौंदर्याला धनराजच्या फार्म हाऊस वर घेऊन गेलो होतो. " प्रताप उत्तरला.
      " पण आपण तिला काहीच केलं नव्हतं ना ? फक्त सोबत गेलो होतो." प्रकाश उद्गारला.
     " मग सोबत जाणे हा पण तर गुन्हाच आहे." प्रताप
     " पण आता काय करायचं ?" प्रकाश
     " मला वाटतं आपण तांत्रिकाची मदत घेऊ."
     " हां रे तांत्रिकच आपल्याला वाचवेल."
     " मग कधी जाऊ या म्हणतोस ?" प्रताप ने विचारले.
     " राजेश ला पण सोबत घेऊ. फोन कर त्याला." प्रकाश
बोलला. तसा प्रताप ने आपला  खिशातून मोबाईल  बाहेर काढला नि राजेशला फोन लावला. तेव्हा राजेश ने  कॉल घेतला. आणि त्याने त्याला विचारले," तू आता कुठं आहेस ?" तेव्हा प्रताप ने उत्तर दिलं की मी आणि प्रकाश गार्डनमध्ये बसले आहोत."
       " गार्डनमध्ये काय करताय तुम्ही दोघे ?"
       " आम्ही उपाय शोधत होतो."
       " कशाचा ?"
       " अरे त्या समंधा पासून स्वतःला वाचवायचे कसं ?"
       " मग सापडला का उपाय ?"
       " हो सापडला ना ? "
       " काय सांगतोस, खरंच  का ?"
       " हो ना बाबा !"
       " मग मला पण सांग ना !"
       " त्यासाठीच तर तुला फोन केला. तू आता येऊ शकतोस इथं ?"
       " हां पण कुठं ?"
       " अगोदर गार्डन मध्ये ये मग  तिघेही पण जाऊ तिथं."
      " बरं येतो."
      " हां पण लवकर ये."  राजेश ने झटपट कपडे बदली केले नि निघणारच होता. तेवढ्यात त्याच्या आई ने त्याला विचारले ," आता  कुठं निघालास रे ? "
      " जरा मित्राच्या घरी जाऊन येतो."  त्यावर त्याची आई म्हणाली ," काही जाऊ नकोस , आणि त्या मित्रांची संगत सोड."
     " अगं पण ..?"
     " एकदा सांगितलेले कळत नाहीये का तुला ? नाही जायचं म्हणजे नाही जायचं."
     " फक्त आजच्या दिवस ?"
     " बरं जा, पण लवकर ये."
     "  हां लवकर येतो." असे म्हणून तो गार्डनमध्ये आला.
ते दोघेजण त्याची वाटच पाहत होते. मग तिघेही मिळून
तांत्रिकाच्या गुहे जवळ जातात. परंतु साध्या वेषा मध्ये
असलेल्या पोलिसाला पाहून ते जागच्याजागी थांबतात.
     " अरे बाप रे, इथं पण पोलिसांचा पहारा आहे वाटतं."
प्रकाश म्हणाला.
       " मग काय करू या पुढे जाऊ या नको ?"
       " आपल्याला त्याने पाहिलं तर तो लगेच ओळखेल. आणि आपण पण तांत्रिका चे साथीदार आहोत असे समजला तर ?"
      " पण असं कसं समजेल तो ?"
      " अरे सांगून सवरून तो पोलीस. हे पोलिसवाले कोणाचा संबंध कोणा बरोबर जोडतील हे सांगता येणार नाहीये. पोलिसांचे काम काय तर सुतावरून स्वर्ग गाठणे."
      " मग काय करू या घरी जायचं का ?"
      " घरी तर काय घरीच जायला लागेल." ते तिघेही आपापल्या घरी परतले. रात्रीचे जेवण झाल्या नंतर झोपायच्या खोलीत प्रताप गेला. परंतु त्याला झोप कशी
ती येत नव्हती. राहून राहून भुताचा विचार मनात येत होता.
आणि त्यामुळे त्याची झोप पार उडून गेली होती. ह्या कुशीवरून त्या कुशीवर फक्त वळत होता. तेवढ्यात
त्याला अंधारात एक काळी आकृती दिसू लागली. भीतीने
त्याच्या अंगावर काटा उभा राहिला. थोड्या वेळाने त्या आकृती चा चेहरा स्पष्ट दिसू लागला. चेहरा ओळखीचा होता. परंतु आठवत नव्हता. क्षणभर वेळाने त्याला आठवले गेल्या वर्षी ज्या मुलीवर आपण रेप केला होता तीच मुलगी होती ती. तिला पाहताच त्याचे अंग भीतीने थर थर कापू लागले , त्याच्या तोंडून शब्द ही फुटत नव्हते. तरी पण अडखळत कसातरी तुटक शब्दात बोलला ," स..सी...मा ...तू sss ?"
      " हां मी ! तुला घेऊन जायला  आलेय."
      " क.. कु...कु.. ठं ?"
      " अरे वेड्या कुठं म्हणून काय विचारतोस जिथं मी आहे
तिथं तुम्ही सर्व ...काय मग येणार ना ?"
     " पण तू तर मेली होतीस ना ?"
     " हो मेलीच आहे मी. तुम्ही लोकांनी मला फार्म हाऊसच्या मागे गाडले होते. परंतु मी तिथं एकटी आहे रे माझ्या सोबत कोणी खेळायला नाही, म्हणून तुला न्यायला आली."
    " पण मलाच का ?"
    " अरे का म्हणून काय विचारतो आहेस  तू पण माझ्यावर रेप केला ना , त्याची शिक्षा नको का तुला ?"
    " मला माफ कर." प्रताप हात जोडून म्हणाला.
   " माफ, क्षमा, सॉरी ! हे सर्व माणसाच्या जगात माणसांनी
बनविलेले शब्द आहेत, आमच्या जगात त्याचा काही उपयोग नाही. आमच्या जगात कुणालाही माफ केलं जात नाही. तेव्हा तुला शिक्षा तर मिळणारच ! चल माझ्या सोबत."असे म्हणून तिने आपला हात लांब केला नि एका हाताने सहज उचलून त्याला आपल्या खांद्यावर घेतले नि ती निघाली एखाद्या पेहलवान माणसा सारखी तो मोठ्या ने आपल्या आई-वडिलांना सांगत होता , परंतु त्याचा आवाज त्यांच्या कानापर्यंत पोहोचत होता की नाही कोण जाणे! परंतु ते कावरा बावरा होऊन इकडे तिकडे पाहत होते. पण त्याना कुणीच दिसत नव्हता आणि सीमा बेसूर  आवाजात मोठ्या ने हसत होती. मुलगा आपला अचानक आपल्या खोलीतून  गायब झाला. अशी तक्रार पोलीस स्टेशनला नोंदविण्यात आली. परंतु पोलीस एकदम हैराण होते. नेमके काय घडत आहे, हे नेमके त्याना ही कळत नव्हतं. कारण पुरावा काहीच सापडत नव्हता.  अश्या परिस्थिती मध्ये गुन्हेगार ला पकडायचे कसे ? इन्स्पेक्टर विजय ने कॉन्स्टेबल हरीश ला फोन करून विचारले की तांत्रिक कुठं आहे ?" तेव्हा कॉन्स्टेबल म्हणाला," तांत्रिक महाकाल या क्षणी अग्निकुंडीत समिधा टाकत आहे नि मोठं मोठ्या ने मंत्र पठण करत आहे."
     " मग काम कर त्याच्या वर एकदम बारीक लक्ष ठेव. तेथे
काही चमत्कार घडतो का हे नीट पहा, कारण प्रताप आपल्या घरातून गायब झाला आहे, जर त्याला गायब
करण्यामागे तर त्या तांत्रिक चा हात असला तर तर तिथं
काहीतरी चमत्कार घडताना दिसेल."
      " जरूर पण तुम्हाला खात्री आहे का ?"
      "  तांत्रिका चा जर ह्यात काही हात असेल तर आज आपल्याला नक्कीच काहीतरी धागा दोरा सापडेल."
      "  ठीक आहे साहेब." एवढं बोलून फोन कट केला. आणि कॉन्स्टेबल हरीश च्या फोन ची वाट पाहत बसले. परंतु फोन काही आलाच नाही. फोन आला नाही म्हणून त्यांनी स्वतः फोन केला नि त्याला विचारले ," काय रे, फोन केला नाहीस तो ?"
    " विषेश काही घडलंच नाही तर फोन कशासाठी करू ?"
    " काहीच घडलं नाही असं कसं होईल ?"
    " खरं सांगतो साहेब, काहीच घडलं नाही. तांत्रिक ने आपली पूजा आटोपली नि झोपायच्या खोलीत निघून गेला."
    " नक्की झोपायलाच गेला होता का ?"
    " हो ना मी त्याला त्याच्या खोलीत जाताना पाहिले."
     इन्स्पेक्टर विजय ने फोन कट केला नि विचार करू लागला की ह्या मध्ये जर तांत्रिकाच्या हात नसेल तर मग
एकावरच संशय जातो आणि तो दुसरा कोणी नसून विवेकच
आहे, अर्थात विवेकच्या अंगात असलेल्या त्या समंधाचेच
काम आहे, परंतु हे कोर्टात सिध्द कसं करणार ? कारण कोर्ट आत्मा भूत हे मान्यच करणार नाहीत. मग काय करावं बरं ? किंचित विचारमग्न झाले. त्याला भले शिक्षा देऊ शकणार नाही. परंतु हे सिध्द करूच शकतो ? म्हणजे हे काम त्याच्या व्यतिरिक्त अन्य कोणाचे नाहीये. परंतु त्याचा साठी त्याला एक रात्र पोलीस लाँकप मध्ये ठेवावे लागेल. जर तो पोलीस स्टेशन मधून रात्रीचा फरार झाला तर आपल्याला नक्की कळेल की हे काम चाचेच आहे. मग ठरलं तर, उद्या त्याला अटक करून पोलीस स्टेशनमध्ये आणतो आणि लाँकप मध्ये बंद करून ठेवतो. मग सत्य काय आहे ते कळेल.

     दुसऱ्या दिवशी विवेकाला अटक करायला त्याच्या वडिलांनी इन्स्पेक्टर विजय ला विचारले ," आमच्या मुलाचा
अपराध काय ?" तेव्हा इन्स्पेक्टर विजय म्हणाले,
     "  आम्हाला संशय आहे, कीं आपल्या मुलाच्या शरीरात एका आत्म्याचा वास आहे, आणि तो मुलांना गायब करतो. म्हणून आजची रात्र आपला मुलगा पोलीस लाँकप मध्ये राहील. सकाळ होताच आम्ही त्याला सोडून देऊ ."
     " आणि माझ्या मुलाचे बरे वाईट काही झाले तर ?"
     " त्याची हमी मी देतो . कारण आम्ही सर्व तिथेच असणार आहोत."
      " परंतु माझ्या मुलाच्या शरीरात भुताचा वास आहे , हे
आपल्याला कशावरून वाटते ?"
      " पोलिसांचे कामच आहे ते संशयावरून अपराध्याला पकडणे. संशय खरा ठरला तर त्याच्यावर खटला भरला
जाईल. आणि निर्दोष असेल तर बा इज्जत त्याला सोडून
देण्यात येईल."
     " पण असं कसं  ? म्हणजे त्याच्या विरुध्द काही पुरावा तुमच्या जवळ नसताना तुम्ही माझ्या मुलाला अटक करायला आलात ?"
     " पुरावा कसा नाही. मागच्या केस मधून तो अजून  निर्दोष सुटलेला नाहीये. आणि ही चौकशी त्या केशच्या संदर्भातच आहे." असे म्हणून पोलिसांनी त्याला अटक केली नि पोलीस स्टेशनला आणले नि पोलीस कोठडीत बंद केले.

क्रमशः



टिप्पण्या

Popular posts

रामायण -१ | Ramayana episode 1 | Author :- mahendranath prabhu

Janmashtami 2022: 18 या 19 अगस्त कब मनाई जाएगी जन्माष्टमी?

शादी से पहले अपनी बेटी सोनाक्षी सिन्हा से अनबन पर शत्रुघ्न सिन्हा की प्रतिक्रिया..