महाकाल २
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
महाकाल २ |
कुणीतरी सुशीला बाईला माहिती दिली की बाजूच्या
गुहे मध्ये कोणीतरी नवीन तांत्रिक बाबा आलाय तो
दुखयारी लोकांचे दुःख दूर करतो. सुशीला बाईंनी विचार
केला की जाऊन पाहायला काय हरकत आहे ? एके
दिवशी सौंदर्याला घेऊन त्या त्या तांत्रिक बाबा कडे गेल्या.
पाहतात तर काय पांढरी दाढी पंढरे केस, परंतु चेहऱ्या
वरून तो म्हातारा आहे असं वाटत नव्हतं म्हणा. जाऊ दे
कोणी का असेना, आपल्याला काय करायचंय ? असं
विचार करून त्या बोलणार ,पण त्या अगोदर तो म्हणाला,
" बसा आई साहेब,चिंता करू नका. तुमची मुलगी सौदर्याला आम्ही लवकरच त्या आत्म्याच्या तावडीतून
तिची मुक्तता करू ? मला माहित आहे तिला कोणत्या
भुताने झपाटले आहे."
" कोणत्या भुताने झपाटले आहे महाराज ?"
" महाकाल ?"
" पण तो तर मेला ना ?"
" हो; पण मनुष्य मेल्यानंतरच भूत बनतं ना ?"
" पण तो आत्मा तर स्वतःचं नाव समंध सांगत होता."
" हां मग बरोबर आहे ना, समंध कोण बनतो तर ज्याच्या आत्मा अतृप्त असतो. आणि महाकाल चा आत्मा
अतृप्त आहे, कारण तो तुमच्या मुलीवर प्रेम करत होता. "
" मग याला आता उपाय काय ?"
" उपाय आहे ना ?"
" काय उपाय आहे ?"
" लवकरात लवकर हिचं लग्न करून टाका त्या मुला
बरोबर ज्याच्या बरोबर हिचं लग्न ठरलं आहे."
" मग समंध सोडील का तिला ?"
" सोडणार नाही; पण त्यावर काहीतरी उपाय शोधून
काढू आम्ही ! आपण चिंता करू नका आई साहेब."
" पण तोपर्यंत काय ? ती झोपेतून किंचाळत उठते
नि वेड्या माणसासारखे हातवारे करते. हे जर विवेक च्या
आई-वडिलांना समजलं तर ते लग्न ही मोडून टाकतील.
म्हणून असं काहीतरी करा की निदान लग्न होईपर्यंत तरी तो तिच्या जवळ आला नाही पाहिजे."
" ठीक आहे, मी त्याचा तात्पुरता बंदोबस्त करतो,परंतु
अमावस्या येण्या अगोदर तिचं लग्न विवेक शी करून टाका. कारण अमावस्येला त्या लोकांची ताकद वाढते. तेव्हा आम्ही सुध्दा त्याच्या पुढे हतबल ठरतो."अमावस्या अगोदर आम्ही तिचं लग्न विवेक शी करून देतो असे आश्वासन सुशीला बाईंनी त्या तांत्रिक बाबाला आणि त्या घरी परतल्या.
सौंदर्या ला घेऊन सुशीला बाई घरी परतल्या. घरी
आल्यानंतर सविस्तर माहिती आपल्या नवऱ्याला दिली.
तेव्हा सौंदर्याचे वडील म्हणाले ," मी आजच गोपाळरावांची
भेट घेतो नि लग्नाचे पक्के करून टाकतो. कसं ?" त्यानंतर
मोहनराव विवेकच्या घरी म्हणजेच गोपाळरावांच्या घरी
जाऊन त्यांनी विवेकच्या आणि सौंदर्याच्या लग्न विषयी
चर्चा केली नि लग्नाची तारीख पक्की करून टाकली.
विवेक आणि सौंदर्या ह्या दोघांचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. सत्यनारायण पूजा वगैरे आटोपली. लग्नासाठी आलेले पे पाहुणे आपापल्या घरी
निघून गेले. विवेक आणि सौंदर्याला मधुचंद्रा साठी
महाबाळेश्वरला पाठविण्याचे निश्चित झाले. विवेक ची
आई राधाबाई म्हणाल्या ," सौंदर्या तू आपले कपडे पॅक
कर पाहू ! नाहीतर मग घाईगडबडीत काय काय सोबत
न्यायचे आहे ते विसरून जाशील." त्यावर सौंदर्या म्हणाली, " ठीक आहे सासूबाई !" त्यावर त्या प्रेमाने
म्हणाल्या," मला सासूबाई म्हणू नकोस तर आई म्हण.
विवेक मला आई म्हणतो, म्हणून तुही मला आईच म्हण.
कारण सासू हा शब्द ललिता पवारांची आठवण करून
देतो. म्हणजे कजाक सासू ! मला कजाक नाही बनायचंय
तर निरुपा रॉय सारखी प्रेमळ सासू बनायचंय. समजलं."
" हो आई समजलं. मला देखील सासूबाई पेक्षा आईच
म्हणायला आवडेल." तश्या त्या तिला जवळ घेऊन आपल्या हृदयाशी धरत म्हणाल्या ," गुणांची गं पोर तू
माझी !" इतक्यात तेथे विवेक आला त्याने आपल्या
आईचे वक्तव्य ऐकलं होतं म्हणून तो मुद्दाम म्हणाला,
" दोन दिवस झाले नाहीत सुनबाई ला ह्या घरात येऊन तर तिचे एवढे लाड. आणि आम्ही लहान पासून कुशीत
वाढलो तर आमचे काहीच लाड नाहीत."
" करीन रे तुझे पण लाड !"
" पण माझ्या पेक्षा कमी हां !" सौंदर्या मुद्दाम म्हणाली.
" ते का म्हणून ?"
" मी त्यांची सून पण आहे, आणि मुलगी पण !"
" तू मुलगी मग मी कोण ?"
" जावई !" सौंदर्या पटकन म्हणाली.त्यावर विवेकची
आई पण हसू लागली. त्यावर विवेक म्हणाला ," नाही हं !
असं नाही चालणार ! तू माझ्या आईला आपली केलीस
तर मी तुझ्या आईला माझी आई बनविण."
" अवश्य बनवा मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. तसं पण
माझी आई माझ्या जवळ आहे, आणि तुमची आई , तुमच्या पासून दूर आहे."
" दूर का ? मी लगेच जाईन आणि ताबडतोब घेऊन येईन मी तिला इकडे !"
" अवश्य आणा. पण मी खात्री ने सांगत आहे की आई
येणारच नाही इकडे."
" का नाही येणार ?"
" पाहुण्यांचा घरी असं उठ सूट कधीच जायचं नसतं."
" अगदी बरोबर !" राधाबाई दुजोरा दिला. तसा
विवेक नाराज होत म्हणाला की, आई तू माझी आहेस का
तिची ?"
" तुम्हां दोघांची पण मीच आई आहे." राधाबाई
" आता कळलं , झालं समाधान ?" सौंदर्या उद्गारली.
त्यावर विवेक काहीच बोलला नाही. चुपचाप तेथून
निघून गेला. सौंदर्याला वाटले की आपण विवेक ला हट
केलं. जाऊन समजूत काढायला पाहिजे त्याची !" असे
म्हणून ती त्याच्या पाठोपाठ निघाली. विवेक आपल्या
बेडरूम मध्ये येऊन बसला. तशी सौंदर्या ने विचारले.
" राग आला असेल ना माझा तुला ?"
" छे छे छे ! राग कशाचा ?"
" मग काही न बोलता निघून का आलास ?
" त्यात बोलायचं काय ? सासू-सुनेचं एकमेकांवर
असलेलं प्रेम पाहून मला उलटा आनंद झाला.बऱ्याचश: ठिकाणी सासू-सुनेचं अजिबात पटत नाही.पण आपल्या
घरात तसं नाही घडलं ही आनंदाची गोष्ट आहे ना , माझ्यासाठी ।"
" तुझ्याच साठी काय माझ्यासाठी पण .....सुनेला
आपल्या मुलीचा दर्जा देणाऱ्या सासू फार क्वचितच असतात. त्यात मी भाग्यवान निघाली. असं म्हणायला
काही हरकत नाही."
" खरंय तुझं." असे म्हणून त्याने तिला आपल्या
मिठीत घेतले नि तिच्या कपाळावर किस केलं. मग गालावर नि मग तिच्या ओठावर किस केलं. तशी ती
त्याला अधिकच बिलगली.
आज मधुचंद्राची रात्र होती , म्हणून विवेक तिला आपल्या मिठीत घेतले नि तिच्यावर चुंबनाचा वर्षाव केला.
पण त्या वेळी सौंदर्या त्याला म्हणाली ," आज नको, मी
फार थकली आहे, उद्या आपण महाबळेश्वर ला गेल्यावरच
श्रीगणेशा करू या ना ?"
" हो चालेल." असे म्हणून तो बाजूला झाला.दोघेही
एकमेकांना बिलगून झोपले. रात्री बारा चा सुमार असावा.
तिच्या अंगावरून हात फिरत असल्याचा तिला जाणीव
झाली ती झोपेतच म्हणाली," आता नको ना प्लिज !"
पण तो हात काही थांबला नाही.तो सरकत सरकत तिच्या
उरोज जवळ आला नि धाडकन उठत म्हणाली," एकदा
सांगितलेले कळत नाही का ? आज नको म्हटलं तरी
पुन्हा पुन्हा तेच !" असे म्हणून डोळे उघडून आपल्या
शेजारी पाहिले तर कोणीच नाही.तेव्हा ती आपल्या
मनात म्हणली ," कुठं गेला हा ? आता तर इथंच होता."
असे म्हणत तिने आपल्या आजूबाजूला पाहिले.तीच
समोर काळी आकृती दिसली.तिचे सारे अंग भीती ने
थर थर ले.ती इतकी घाबरली की तिच्या तोंडून आवाज
ही फुटत नव्हता. विवेक विवेक करून मोठ्या ने ओरडू
लागली.तेवढ्यात ती काळी आकृती म्हणाली," तुला
सांगितले होते ना, की विवेक शी लग्न करू नकोस म्हणून
पण तू ऐकली नाहीस.आता भोग आपल्या कर्माची फळे!
तुझ्या विवेक चा जीवनाचा उद्या शेवटचा दिवस आहे."
" माझ्या विवेक ला मारू नकोस , तुला काय हवे ते घे."
" मला फक्त तू हवी आहेस दुसरे काही नको."
" पण तू आहेस तरी कोण ?
" मी महाकाल आहे."
" महाकाल तर मेला होता ना ?"
" महाकाल जो कभी मरता नहीं, मरता है तो सिर्फ
उसका शरीर और जिसे वो पाना चाहता है उसे पाकर ही
दम लेता हैं, आ हा हा हा ssss " असे म्हणून तो गायब
झाला. सौंदर्या घामाघूम झाली होती.तिने विवेक कुठं गेली
म्हणून पाहू लागली ती अडखळली तिने पाय खाली
पाहिले तेव्हा तिला विवेक खाली झोपलेला दिसला.
ती त्याला उठवू लागली. पण तो काही उठत नव्हता.शेवटी
तिने त्याच्या तोंडावर पाणी शिंपडले तसा तो उठून बसला.
" काय ग ?"
" तू खाली कसा ? वर झोपला होतास ना ?"
" माहीत नाही, मी कसा खाली आलो."
" चल वर झोप."
विवेक उठला नि बेडवर झोपला त्याला बिलगून सौंदर्या
झोपण्याचा प्रयत्न करत होती पण तिला महाकाल च्या
भीतीने झोप येत नव्हती.नंतर कधी डोळा लागला ते तिलाच कळले नाही.सकाळी उठल्या वर रात्री घडलेला
प्रसंग तिने विवेकला सांगितला. पण विवेकचा तिच्या
सांगण्यावर विश्वास बसला नाही.तो म्हणाला," तू स्वप्न
पाहीले असशील.महाकाल कधीच मेला.आणि मेलेली
माणसं पुन्हा जिवंत होत नाहीत.काहीतरीच तुझं आपलं
कधी समंध म्हणतेस तर कधी महाकाल ? खरं कोणतं
समजायचं ?" सौंदर्याचे म्हणणे कोणालाही पटेना.शेवटी
तिला गप्प बसावे लागले."
दुसऱ्या दिवशी ते दोघेही मधुचंद्रासाठी महाबळेश्वर ला जायला निघाले. मोटार मध्ये लव्ह सॉंग लावले होते.
तुम जाते हो जा ना जा ना
हमारा आख़री सलाम लेके जा ना
सौंदर्या वैतागून म्हणाली," हे कसले सॉंग लावलेस ?
बंद कर ते.दुसरे एखादे प्रेम गीत लाव." विवेक ने लगेच
ते गाणं बंद करून दुसरे लावले.
भूल गया सब कुछ
याद नहीं अब कुछ
ओ s हो s म s आ
एक यहीं बात नहीं भूली
ओ s हो sआ s
जुली आय लव्ह यू
अरे जुनी गाणी लावतोस ,नवीन लाव ना एखादे ।
ओल्ड इज गोल्ड नवीन गाण्यामध्ये काही दम आहे
का ? काय बोलतात ते धड कळत पण नाही. फक्त
संगीत चांगलं असतं म्हणून लोक ऐकतात तरी !"
ओ s हो s ओ s हो ओ s हो ओ s
हो ओ s हो ओ s हो ओ s हो ओ s हो
भिगी भिगी सड़कों पर , मैं तेरा इंतजार करूँ
धीरे धीरे दिलकी जमीपर, मैं तेरे ही नाम करूँ
खुद को मैं खो दु,फिर कभी ना पाऊँ
हौले हौले ज़िन्दगी को मैं तेरे ही नाम करुं
सनम रे सनम रे तू मेरा सनम हुआ रे
करम रे करम रे मैं तेरा मुझपे करम हुआ रे
सनम रे सनम रे मैं तेरा सनम हुआ रे
" हां आता कसं छान गाणं लावलं."
" मग अगोदर लावलेली बोरिंग होती का ?"
" बोरिंग नाही ती पण छानच होती , पण हे जरा विशेष
आहे." तिच्या कडे पाहून बोलण्याच्या समोर लक्ष दिलं
नाही.आणि जेव्हा लक्ष गेलं तेव्हा फार उशीर झाला होता.
त्यांची मोटार समोरून येणाऱ्या ट्रक वर आदळली असती
पण विवेक एकदम स्टेरिंग फिरविली. त्यामुळे मोटार गर्रकन वळली नि ट्रक शी टक्कर होण्यापासून वाचली; परंतु गर्रकन वळल्या मुळे रस्त्याच्या कडेवर असलेल्या झाडावर जाऊन आदळली. टक्कर एवढी जबदस्त होती की विवेकचे डोके फुटून त्यातून रक्ताच्या धारा वहात होत्या. सौंदर्या ला देखील डोक्याला मार लागला होता. दोघेही बेशुध्द झाले. तेथे जवळपास राहणाऱ्या लोकांची गर्दी जमली. कोणीतरी पोलीस स्टेशनला फोन करून दुर्घटनेची खबर दिली. थोड्या वेळातच तेथे पोलीस पोहोचले. दोघांना मोटारीतून बाहेर काढले. आणि घटना स्थळाचा पोलीस पंचनामा केला नि त्या दोघांना जवळच असलेल्या सिटी इस्पितळात दाखल केले. त्यांच्या खिशात सापडलेल्या मोबाईल वरून त्यांच्या घरच्यांशी संपर्क साधला नि दुर्घनेची त्यांना खबर दिली. खबर ऐकताच गोपाळरावांच्या हातातून रिसिव्हर सुटून खाली पडला. ते पाहून त्यांच्या पत्नी धावत त्यांच्या जवळ पोहोचल्या विचारू लागल्या की, कोणाचा फोन होता ?" तेव्हा गोपाळराव म्हणाले ," पोलिसांचा."
" पोलिसांचा ....पोलीस कशाला फोन करतील आपल्याला ?"
" अगं आपल्या पोरांच्या मोटारीला अपघात झाला."
" काय ? अपघात झाला ? " आणि त्यांना एकदम
भोवळ आली नि बेशुध्द होऊन खाली कोसळणार तोच
गोपाळरावांनी त्यांना सावरलं. त्यांना सोफ्यावर बसविले
नि किचनमध्ये जाऊन पाणी आणले नि त्यांच्या तोंडावर
पाणी शिंपडले तश्या त्या शुध्दीवर आल्या. आणि विचारू
लागल्या की कसा आहे माझा बाळ ?" त्यावर गोपाळराव
म्हणाले, " आपल्याला आताच्या आता निघायला हवं."
" मग चला लवकर." दरवाजा ला कुलूप लावले नि दोघंही निघाले. जेव्हा इस्पितळात पोहोचले तेव्हा त्याना
डॉक्टर कडून कळले की सून वाचली परंतु आपल्या
मुलाला नाही वाचवू शकलो. " असे म्हणताच त्यांनी
हंबरडा फोडला. सौदर्या जशी शुद्धीवर आली तशी तिने
प्रथम विवेक ची चौकशी केली. विवेक आता ह्या जगात
नाही हे ऐकताच ती म्हणाली," मला तिथं जायचं आहे,
माझ्या हाताला लावलेलं सलाईन काढा. मला त्यांच्या
जवळ जायचंय मला त्यांना पहाचंय." त्यावर नर्स म्हणाली, " तुम्ही जखमी आहात तुम्हाला जाता येणार नाही." त्यावर ती चिडून म्हणाली," तुम्ही काढताय की मी काढून टाकू ?" तेव्हा नाईलाजाने नर्स ने सलाईन बंद करून सुई काढली तशी सौंदर्या चालता येत नव्हतं तरी लंगडत बाहेर गेली. जेव्हा ती विवेक च्या कॉट जवळ पोहोचली. तेव्हा तिने विवेक च्या छातीवर आपले डोके ठेवून टाहो फोडला. थोड्या वेळा नंतर तिला बाजूला करून मृतदेह शवविच्छेदना साठी पाठविण्यात आला.
जेव्हा शवविच्छेदन करणारा हत्यार घेऊन मृतदेह जवळ
आला तसा विवेक ने एकदम डोळे उघडले नि विचारले
की , जिवंत माणसांचे कुणी पोष्टमार्टम करतं का ?"
तसा तो पोष्टमार्टम करणारा हातातील कैची वगैरे तिथंच
टाकून भूत भूत म्हणत बाहेर पळाला. डॉक्टराना मोठे
आश्चर्य वाटले की मृत झालेला माणूस परत जिवंत कसा
झाला म्हणून पुन्हा तपासणीसाठी त्याला आणलं जातं.
पाहतात तर त्याचं शरीर एकदम थंडगार पडले आहे.
हे तर मृत शरीर आहे, घेऊन जा ह्याला पोष्टमार्टम ला
पण तो पोष्टमार्टम करणारा इतका घाबरला होता की
मी नाही करणार ह्याचे पोष्टमार्टम !" शेवटी पोष्टमार्टम
न करता त्याचा मृतदेह त्याच्या आई-वडिलांकडे स्वाधीन
केला. त्याचे आई -वडील मुलाचा मृतदेह घरी घेऊन येतात
अंत्यसंस्काराची सारी तयारी करून त्याची प्रेतयात्रा निघाली. परंतु अर्ध्या रस्त्यावर जाताच विवेक उठून बसला
नि विचारू लागला की मला कोठे घेऊन चालले ?
तशी अंत्यसंस्कार ला आलेली मंडळी घाबरून त्याची
तिरडी तिथंच टाकून पळत सुटले. भूत भूत म्हणत. त्याने
पाहिले सगळे पळाले तसा तो महाकाल च्या गुहेच्या
दिशेने निघाला.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा