Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024

इमेज
Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार ने शुरू की लाडली बहना योजना, महिलाओं को मिलेंगे ₹1500 हर महीने August 1, 2024  Ladli Behna Yojana Maharashtra 2024 Ladli Behna Yojana Maharashtra 2024 : जिस प्रकार महिलाओं के उत्थान के लिए मध्य प्रदेश राज्य में लाडली बहना योजना और छत्तीसगढ़ में महतारी वंदन योजना का संचालन किया जा रहा है, उसी प्रकार महाराष्ट्र सरकार ने भी लाडली बहना योजना महाराष्ट्र को लॉन्च करने का निर्णय लिया है। जिसके तहत पात्र महिलाओं को हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। यह राशि महिलाओं को संभवत: अगस्त माह से मिलनी शुरू हो जाएगी इसलिए जान लें कि Ladli Behna Yojana Maharashtra 2024 के तहत आवेदन कैसे करना है। पात्रता के अनुसार महाराष्ट्र राज्य की महिलाएं जो गरीबी रेखा से नीचे आती हैं, वे इस योजना का लाभ लेने हेतु आवेदन कर सकेंगी। फिलहाल आपके लिए इस नई योजना की पूरी जानकारी प्राप्त करना जरूरी है ताकि बिना किसी समस्या के समय सीमा के भीतर आवेदन पत्र जमा कर योजना का पूरा-पूरा लाभ लिया जा सके। अगर आप लाडली बहन योजना महाराष्ट्र क्या है, इस योजना के ला

हे सारं तुझ्यासाठीच ५

हे सारं तुझ्यासाठीच ५
हे सारं तुझ्यासाठीच ५

 

         सौंदर्याचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय चार दिशेला बांधून
घातले होते. त्यामुळे तिला स्वतःचा बचाव करताच येणार नव्हता. थोड्या वेळाने तिच्या खोलीत धनराज च्या मित्राला
जायला सांगितले. तेव्हा एकजण गेला ही आंत आणि थोड्याच वेळात एक जोरदार किंकाळी बाहेर पडली. तसे सर्वजण  त्या रूमच्या दिशेने धावले. आंत जाऊन पाहतात तर आंत ना सौंदर्या होती. ना तो धनराज चा मित्र विलास होता. दोघेही कुठं गायब झाली कुणास ठाऊक ? फार्म हाऊस चा कोणा कोपरा शोधला. पण त्या दोघांचा काहीच पत्ता लागला नाही. नेमके काय घडलं म्हणून सी सी टीव्ही कॉमेऱ्यातील फुटेज तपासून पाहिले. परंतु त्यातही काहीच आले नाही. हा काय चमत्कार आहे हे कुणाला कळेना. हे सर्व विवेक ने केले असे म्हणायचे तर विवेक अध्याप बांधलेल्या अवस्थेत होता. तेव्हा त्याला विश्वासराव देशमुखांनी दरडावून विचारले ," खरं सांग हा सारा  प्रकार काय आहे ? " विवेक म्हणाला ," मला खरंच माहीत नाहीये.
हा सारा काय प्रकार आहे तो."
     " तू असा सांगणार नाहीस. थांब तुझा आता मी खेळच संपवितो. " असे म्हणून  त्यांनी त्याच्या अंगावर पिस्तुल रोखले. तेव्हा त्याना विवेक च्या जागी त्यांचा स्वतःचा मुलगा धनराज  दिसू लागला. आपल्या मुलाला पाहून हर्षभराने ते म्हणाले ," तू इथं कसा आलास "
     " यावं लागलं मला. कारण ह्याला मारलेत तर मी मरेन
कारण हयाच्या शरीरात जो आत्मा आहे तो माझा आहे. आणि माझ्या शरीरात ह्याचा आत्मा आहे."
     " पण असं झालं कसं ?"
     " हे सर्व त्या महाकाल ने केलं."
     " कोण महाकाल ?"
    " आहे एक तांतरीक "
    " कुठं राहतो तो ?"
    " पार त्या ढोंगराच्या पलीकडे. पण तुम्ही  जाऊ नका तिथं."
    " का रे ?"
    "  तुम्हाला देखील सोडणार नाहीये तो. तुमचा आत्मा
भीमाच्या बॉडीत टाकील नि भिमाचा आत्मा काढून तुमच्या बॉडीत टाकील , महा भयंकर आहे तो तांत्रिक बाबा ! त्याच्या वाटेला जाऊ नका तुम्ही ! म्हणून  ह्याला म्हणजेच मला सोडून द्या आता." तसे विश्वासरावांनी भीमाला आदेश
दिला  कीं ह्याला सोडून टाक बरं." भीमा पट्कन पुढे झाला नि त्याने  विवेक ला सोडले. तसा त्याचा चेहरा  विवेकच्या चेहऱ्यात रूपांतर झाला. विवेक आपल्या वास्तविक रुपात येताच त्याला आश्चर्य वाटले. काही वेळा पूर्वी आपल्याला जीवानिशी ठार मारायला निघालेला मनुष्य आपल्याला जीवदान कसे काय देतोय. कारण त्याला थोड्या वेळापूर्वीचे काहीच आठवत नव्हते. त्याने बळेच विचारले की मी आता जाऊ शकतो का ?" त्यावर विश्वासराव बोलला, " कुठं जायचंय तुला ?"
     " आपल्या घरी !" तो स्वतःच्या घरा बद्दल बोलत होता पण पण विश्वासरावांना वाटलं की तो आपल्या घरच्या बद्दल बोलतोय म्हणूनच की काय ते म्हणाले,  " थांब. एकदमच जाऊ घरी !" तेव्हा त्याने आश्चर्याने त्याना विचारले," तुम्ही
खरंच मला माझ्या घरी नेऊन सोडणार आहात  का ?" विवेक गाडीत बसत म्हणाला. त्याच्या पाठोपाठ विश्वासराव गाडीत बसत म्हणाले," अरे तुझं नि माझं घर वेगळे आहे का ?"
     " हो तुम्ही देशमुख आहात. आणि मी विवेक फाळके."
     " अरे म्हणजे पुन्हा आत्मा बदली झाला की काय ? हो असेच असेल, आता आयतीच  संधी चालून आली आहे ह्या संधि चा फायदा उचलायला पाहिजे. अर्थात ह्याला शूट करून  टाकायला पाहिजे. असे मनात बोलून त्यांनी आपले पिस्तुल त्याच्या वर रोखले. तसा धनराज च्या आवाजात विवेक म्हणाला ," अहो बाबा काय करताय तुम्ही  ? गोळी लागेल ना मला ?" तसे त्यांनी पिस्तुल खाली घेतले नि त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले तर आता त्याना विवेक च्या जागी धनराज दिसू लागला. तसे त्यांनी पिस्तुल खाली घेतले. नि स्वतःशीच म्हणाले ," आज काय होतंय माझ्या सोबत ? हा कधी धनराज झालेला मला दिसतोय तर कधी विवेक ? काय समजायचंय कोण आहे हा ? " असे म्हणून भीमा कडे पाहत म्हणाले , " आता खरंच मला वेड लागायची पाळी आली आहे."  तेव्हा  भीमा ने विचारले ," काय झालंय मालक ?"
    " भीमा तुला पण हा धनराज दिसतोय का ? कारण मला
हा कधी धनराज वाटतोय तर कधी विवेक नेमका आहे कोण  हा ?"
    " मालक हा ना धनराज ना विवेक "
     " काय वेड्या सारखं बोलतोस तू हा धनराजही  नाही
आणि विवेक ही नाही. मग आहे कोण हा , हे सांग बरं ?"
     " कधी धनराज असल्याचं सांगतो तरी कधी विवेक फाळके असल्याचे सांगतो. म्हणून मला काय वाटतं की  हा ना  धनराज आहे आणि नाही विवेक  हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे, मला तर ही भानामतीच वाटते बुवा !"
     तेव्हा विश्वासराव किंचित विचारमग्न झाले. भीमा म्हणतोय ते पण बरोबरच आहे, हा कधी धनराज असल्याचं
सांगतो तर कधी विवेक असल्याचे सांगतो खरे काय आहे ? हा भानामतीचा तर प्रकार नसेल ना ? असेलही कोणी सांगावे ? मग  काय करू ?  ह्याला इथंच उतरून टाकू का ? हो असेच करतो. असे म्हणून त्याच्या कडे पाहत म्हणाले ," तू विवेक आहेस ना ? " त्यावर तो म्हणाला ," हो मग मघापासून काय सांगतोय मी तुम्हाला. पण तुम्ही ऐकायलाच तयार नाहीत माझं मग काय करणार ना ?" त्यावर विश्वासराव म्हणाले ," अच्छा ठीक आहे, तू खाली उतर बरं !" असे म्हणून त्यांनी ड्रायव्हर गाडी थांबावायला सांगितली. तशी ड्रायव्हर ने गाडी थांबवली. तसा  विवेक खाली उतरला नि रस्त्याच्या कडेने चालू लागला.

    
         सौंदर्याच्या  मैत्रिणीनी तिच्या आईला फोन केला नि सौंदर्याचे काही गुंडांनी अपहरण केल्याचे सांगितले. सौंदर्याच्या आईने लगेच पोलीस स्टेशनला फोन लावला नि घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यावर पोलिसांनी त्याना
आश्वासन दिले की आम्ही लवकरच आपल्या मुलीचा शोध
घेऊ निश्चिंत रहा. कारण त्याना माहीत होतं की या क्षणी ती कुठं असेल ? परंतु मंत्री महोदयांनी अगोदरच कल्पना दिली आहे. परंतु सुशिला बाई ना ठाऊक होतं की आपल्या मुलीचा शोध कुठं नि कसा लागेल ? कारण त्यांचा तांत्रिक महाकाल वर पूर्ण विश्वास होता. म्हणून त्या माघारी न येता त्या तांत्रिकाच्या गुहेत शिरल्या. जेव्हा त्या गुहेत शिरल्या तेव्हा त्याना  दिसले की तांत्रिक महाकाल अग्निकुंडी समोर बसले आहेत नि मंत्र म्हणत अग्निकुंडीत समिधा टाकत आहेत आणि ते कुणालातरी आदेश देत  आहेत, जा आणि काम फत्ये करूनच ये माघारी ! " असे म्हणून हातातील भस्मावर  फुक मारली नि आपली मान न वळवीता तो म्हणाला," या, आई साहेब, मी आपलीच वाट पाहत होतो." तश्या सुशिलाबाई आश्चर्य व्यक्त करत म्हणाल्या ," म्हणजे तुम्हाला माहीत होतं महाराज मी इथं येणार आहे ती." त्यावर महाकाल बोलला," हां माते आमच्या पासून काहीही लपत नाही. कारण आम्ही त्रिकालदर्शी आहोत." त्यावर सुशिलाबाई उद्गारल्या ," मग तर महाराज आपल्याला हे देखील माहीत असेल की मी आपल्या कडे का आली आहे." महाकाल म्हणाला ," माहीत आहे मला. आपल्या मुलीचे अपहरण केले गेले आहे, परंतु तिची अजिबात चिंता करू नका. तिच्या केसालाही धक्का लागणार नाही. कारण आम्ही तशी व्यवस्था केली आहे. सुखरूप येईल ती आपल्या घरी !"
     " फार उपकार झाले बघा तुमचे माझ्यावर."
     " उपकार बोलू नका. एकदा मी आपल्याला आई म्हटल्यावर तुमच्यासाठी मला काही करावे लागले तरी ते मी
करेन. कारण ते मुलाचे कर्तव्यच असते नाही का ?"
     " हा झाला तुमचा मोठेपणा महाराज नाहीतर तुमच्या
वयात नि माझ्या वयात फारसा फरक नाही. असलाच तर दहा एक वर्षाचा फरक असेल. नाही का ?"
     " वयापेक्षा नात्याला महत्व आहे, कारण नातं मोठे असते वय मोठे नाही. समजले का ?"
    " होय होय बरोबर आहे तुमचं. महाराज अजून एक शंका
आहे मनात , विचारू का ?"
    "  अवश्य विचारा."
    " महाराज तुम्हाला आठवत असेलच तरी पण मी  सांगते. दहा वर्षांपूर्वी आपल्या कडे  आली होती."
     " हो चांगल्या आठवते की तुमच्या मुलीला एका समंधा ने झपाटले होते. मी त्यातून तिची सुटका केली."
     " महाराज मला काय वाटतं की तो समंध तुमच्या कैदीतून फरार झाला असावा." तसा तो महाकाल मोठ्या ने ओरडला, असंभव ! आमच्या कैदेतून मुंगी सुद्धा फरार होऊ शकत नाही. पाहायचंय तुम्हांला तो समंध कुठं आहे तो."
    " हां ! दाखविलात तर बरं होईल. म्हणजे माझ्या मनातील शंका दूर होईल.
    " ठीक आहे, मी आता घेऊन येतो त्याचा आत्मा !" असे
म्हणून एका बंद खोलीत गेला नि बाटली घेऊन आला. तिच्या समोर धरत त्याने विचारले की , ह्या बाटलीत काय दिसतेय तुम्हांला ?"
     " फक्त धुराचे वलय दिसतात."
     " हां ते धुराचे वलय म्हणजे समंधाचा आत्मा आहे आंत? बाहेर काढू का त्याला ? पण एक लक्षात ठेवा एकदा बाहेर काढले की तो आंत जाणार नाही. मग तो तुमच्या मुलीला स्वतः सोबत घेऊन जाईल. मग मी सुद्धा काही करू शकणार नाही. बोला काय करू ?"
    " नको महाराज त्याला सोडू नका. आता माझी खात्री झाली."
    " मग असाच विश्वास कायम ठेवा आमच्या वर. एकदा
तुमच्या मुलीची जबाबदारी घेतली ना आम्ही मग ती  आता मरेपर्यंत स्वीकारू चिंता करू नका जा घरी !"  त्या  महाकालच्या पाया पडण्यासाठी त्या खाली वाकल्या. तसा महाकाल पट्कन मागे सरकला. म्हणाला ," हे तुम्ही काय करत आहात आईसाहेब." त्यावर त्या म्हणाल्या ," मी आपल्या पाया पडत होते महाराज." महाकाल म्हणाला ," मी आपल्याला आई मानले मग आईने आपल्या मुलाच्या पाया पडायचे नसते. त्याने मुलाचे वय कमी होते आणि मला अजून भरपूर जगायचंय आहे आणि तुम्ही माझे वय कमी करायला निघालात ?"
     " चुकलं महाराज." सुशिलाबाई
     " पुन्हा अशी चूक करू नका." महाकाल उद्गारला. तश्या
त्या स्वतःच आपल्या हाताने आपल्या गालावर चापटी
मारून घेत म्हणाल्या ," चुकलं महाराज."
      " आता निश्चित मनाने घरी जा. तुम्ही घरी पोहोचण्या
अगोदर ती घरी पोचलेली असेल." तश्या त्या खुश होऊन
म्हणाल्या, " उदंड आयुष्य लाभू दे महाराज तुम्हांला."
    " आता तुमचा आशीर्वाद  मिळाला म्हणजे मला उदंड
आयुष्य लाभलेच समजायचे." महाकाल स्मित हास्य करत
बोलला. सुशिलाबाई एकदम आनंदित होऊन घरी निघाल्या.

     घरी येऊन पाहतात तर खरोखरच सौंदर्या घरी पोहोचलेली होती. तिला घरी पाहताच त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्या आनंदाच्या भरात तिला त्या विचारणार होत्या की तुझं अपहरण  करून गुंड तुला
कोठे घेऊन गेले होते? परंतु लगेच त्याना महाकाल ने सांगितले शब्द आठवले की तिला काहीच विचारू नका. काहीच घडले नाही. असे तिला दाखवा. त्यांचा प्रश्न मनातच राहून गेला. तिला मायेने मिठी मारली नि आनंदाचे अश्रू त्यांच्या डोळयातून ओंघळून तिच्या पाठीवर पडले. तशी तिने आपली मान वर केली नि आपल्या आईच्या डोळ्यात अश्रू पाहून ती म्हणाली ," आई तू रडतेस ?" त्यावर त्या म्हणाल्या ," नाही गं , हे आनंदाचे अश्रू आहेत." त्यावर सौंदर्या ने न कळून विचारले ," कशाचा गं तुला आनंद झाला एवढा ?" त्या म्हणाल्या ," तू सुखरूप आलीस ना ? हाच आनंद." त्यावर सौंदर्या ने विचारले, " म्हणजे तुला माहीत पडलं होतं .... माझं अपहरण झालं होतं ते."
    " हां तुझ्या मैत्रिणीनि मला फोन करून सांगितले होते."
    " मग मला विचारणार नाहीस मी कशी सुटून आली ती."
    " आता नको उद्या सांग माझं फार डोकं दुखतंय." त्या
मुद्दामच म्हणाल्या."
     " मग बाम लावून देवू का ?"
     " तू नको मी लावते स्वतःच बाम . तू फक्त आताच्या स्वयंपाकाचे बघ. तुझे पप्पा पण यायला झालेत."
     " तू झोप मी बघते स्वयंपाकाचे." सुशिलाबाई आपल्या
बेडरूम मध्ये गेल्या नि अंथरुणावर पडल्या आणि सौंदर्या
किचनमध्ये गेली नि लाईटर ने गॅस पेटविला. प्रथम ने चहाचे
आधण ठेवले. कारण तिच्या वडिलांची ऑफिस मधून घरी
यायची वेळ झाली होती. त्याना घरी आल्या आल्या चहा लागतो. बाकी नंतर सर्वकाही. चहा तयार होतो ना होतो तेवढ्यात दरवाजा वरील कॉलबेल वाजली. सौंदर्या ने जाऊन दरवाजा उघडला तर खरोखरच तिचे वडील आले होते. आज आपल्या मुलीने दरवाजा उघडलेला पाहून त्यांनी तिला विचारले ," आज तू दरवाजा उघडलास तर तुझी मम्मी कुठं गेली." सौंदर्या उद्गारली ," ती काय झोपली आहे बेडरूम मध्ये." त्यावर त्यांनी काळजीयुक्त स्वरात विचारले,
    " तब्बेत तर ठीक आहे ना तिची ?"
    " हां तशी ठीक आहे, थोडेसे डोके दुखत होते म्हणून
झोपली आहे."
    " असं असं ! बरं ही बॅग आंत नेऊन ठेव. मी आलोच !" असे म्हणून कपडे न बदलता तसेच ते बेडरूम मध्ये गेले नि बेडवर  आपल्या पत्नीच्या बाजूला बसले नि तिच्या कपाळावर हात ठेवला. त्या सरशी सुशिलाबाई डोळे उघडून त्यांच्या कडे पाहत विचारले,
     " का हो तुम्ही कधी आलेत ?"
     " हा काय आताच येतोय."
     " म्हणजे अजून कपडे पण बदली नाही केले आणि
तसेच आले बेडरूम मध्ये . जावा आधी कपडे बदली करा नि फ्रेश व्हा !" त्यावर मोहनराव म्हणाले," कपडे होतील गं बदली ते कुठं पळताहेत  ? मी अगोदर तुझी चौकशी करायला आलोय." त्यावर त्या म्हणाल्या ," मला काय धाड
भरली आहे, चांगली तर आहे."
     " तसं नाही गं सौंदर्या म्हणाली, तुझं डोकं दुखतंय म्हणून."
    " हो दुखत होतं पण आता थांबलं."
    " मग थांबणारच मी आलोय ना आता , मी आल्यानंतर
डोकंच काय तुझा आजार पण पळून जाईल."
    " हो खरंय. पण अगोदर कपडे बदली करा नि फ्रेश व्हा !
तोपर्यंत मी चहा टाकते करायला." असे म्हणत त्या बेडवरून खाली उतरल्या. तेवढ्यात सौंदर्या आंत प्रवेश करत म्हणाली,
     " चहा तयार आहे मम्मी !" त्यावर त्या हर्षभराणे उद्गारल्या
    " तू बनविला का ?"
    " दुसरे कोण आहे घरात आपल्या तिघांशिवाय ."
    " हो तेही खरं !" मोहनरावानी प्रथम चहा घेतला नि फ्रेश
व्हायला वाँश रूम मध्ये शिरले.

       दुसऱ्या दिवशी सौंदर्या कॉलेज मध्ये गेली तर सर्वजण
तिच्याकडे एका वेगळ्याच नजरेने पाहू लागले. कदाचित
त्याना असा प्रश्न पडला असावा की ज्या मुलीचे कालच
काही गुंडांनी अपहरण केले नि तिच्या सोबत त्या गुंडांनी
काय केलं असेल ते देव जाणे ! पण तरी देखील उजळ
मात्याने कॉलेज मध्ये आली आहे. जनाची नाहीं तर नाही कमीत कमीत मनाची तर लाज पाहिजे तिला. परंतु ती देखील नाही. तिच्या जागी दुसरी कुणी असती तर तिने सरळ आत्महत्या च केली असती. त्या मुली आपसात कुजबुजत होत्या. तिला त्यांचे बोलणे  समजले नाही हे खरे ! परंतु तिला संशय मात्र जरूर आला. ती मनात
म्हणाली ," त्या मुली आपल्या बद्दलच बोलत असाव्यात.
तिच्या मैत्रिणी ने मात्र तिला विचारले," कोण होते गं ते ज्यांनी तुला जबरदस्ती ने गाडीत बसविले." त्यावर सौंदर्या म्हणाली,
     " अगं ते गुंड विश्वासरावानी पाठविलेले होते. त्यानंतर
तिने घडलेली सविस्तर हकीकत त्याना सांगितली. शेवटी सौंदर्या  म्हणाली ," मला त्यांनी आपल्या फार्म हाऊस वर नेले. माझे हात- पाय पलंगा च्या चारी टोकांना बांधून घातले. आणि अचानक एक भयानक  चेहरा माझ्या दिशेने येत असलेला मला दिसला. तो भयानक चेहरा पाहून मी घाबरली नि मोठ्या ने किंकाळी मारली नि लगेच बेशुद्ध झाली आणि जेव्हा शुद्धीवर आली. तेव्हा मी घरात झोपलेली होती. मला मोठं आश्चर्य वाटलं की मी इथं
कशी आले वगैरे  ? कारण मला तर विश्वासरावांच्या फार्म हाऊस वर असायला पाहिजे होते. पण नंतर माझ्या लक्षात आलं की मला इथं माझा विवेक च घेऊन आला असणार ? कारण तोच माझा रक्षक आहे."
     " अगं रक्षक नाही भक्षक म्हण."
      " हे काय गं तुम्ही लोकं त्याला भक्षक म्हणता ? माझा
लव्हर आहे तो."
     " हां पण त्याच्या अंगात कोण आहे ते माहीत आहे ना तुला ?"
     " कुणी का असेना माझं रक्षण करतो ना, मग झालं तर !
शिवाय मला त्याचा पासून काही त्रास पण  नाही. तू तर म्हणत होतीस की फार भयानक असतो. काय तर म्हणे तो स्वतः सोबत घेऊन जातो. त्याच्या पासून गर्भधारणा होते वगैरे पण माझ्या सोबत तर असं काहीच घडलं नाही गं मग मी तू जे सांगते आहेस  ते खरे कसे मानावे  ? सगळं थोतांड आहे ते सर्वकाही !"
    त्यावर सीमा म्हणाली ," हे बघ तुला नसेल मानायचं तर
नको मानूस. पण थोतांड बोलू नकोस. आमच्या गावात घडलंय असं म्हणून मी तुला सांगितले."
      " रिअली !" सौंदर्या एकदम उपहास पूर्ण स्वरात बोलली.
  
क्रमशः



टिप्पण्या

Popular posts

रामायण -१ | Ramayana episode 1 | Author :- mahendranath prabhu

Janmashtami 2022: 18 या 19 अगस्त कब मनाई जाएगी जन्माष्टमी?

शादी से पहले अपनी बेटी सोनाक्षी सिन्हा से अनबन पर शत्रुघ्न सिन्हा की प्रतिक्रिया..