हे सारे तुझ्यासाठीच ३
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
हे सारे तुझ्यासाठीच ३ |
इन्स्पेक्टर विजय पोलीस स्टेशनला निघाले. जेव्हा पोलीस स्टेशनला पोहोचले. तेव्हा त्यांनी कॉन्स्टेबल हरीशला विचारले ," कुठं आहे ती मुलगी ? तिला घेऊन या इथं."
तेवढ्यात तिचे आई-वडील देखील पोलीस स्टेशनला हजर झाले. तेव्हा इन्स्पेक्टर विजय ने त्याना विचारले की आपण कोण ?" तेव्हा मोहनराव म्हणाले ," ज्या मुलीला पोलिसांनी पकडून पोलीस स्टेशनला आणले आहे ना त्या मुलीचा मी बाप !" तशी लगेच त्यांची पत्नी सुशीला बाई म्हणाल्या ," आणि मी तिची आई !" इन्स्पेक्टर विजय म्हणाले," ठीक आहे बसून घ्या."
" इन्स्पेक्टर साहेब , आमच्या मुलीने खरंच काही केलं
नाही हो." इन्स्पेक्टर विजय म्हणाला ," मग चिंता कशाला
करताय ? तुमच्या मुलीला आम्ही फक्त चौकशी साठी पोलीस स्टेशनला आणलं आहे, बस्स !" तेवढ्यात पोलीस
कॉन्स्टेबल सुधा त्यांच्या मुलीला घेऊन येतात. तेव्हा इन्स्पेक्टर विजय ने तिला काही वाजवी प्रश्न विचारले. त्यानंतर तिला स्केच चित्र दाखवत म्हणाले ," या तरुणाला आपण ओळखता का ?" तिने ते स्केच चित्र पाहताच लगेच ओळखले की तो फोटो विवेक चा होता. परंतु आपल्या आई- वडीला समोर कसं बोलणार ना ? ती एकवेळ आपल्या आई-वडीला कडे पाही तर कधी इन्स्पेक्टर विजय कडे पाही तेव्हा इन्स्पेक्टर विजय ने विचारले ," तुम्ही ओळखता का ह्या तरुणाला ?" तशी ती अडखळत म्हणाली ," मी कुठंतरी ह्या तरुणाला पाहिल्या सारखे आठवते. परंतु कुठं ते आठवत नाही." इन्स्पेक्टर विजय म्हणाला," मी सांगू कुठं पाहिलं असेल ते " असे म्हणताच मात्र सौंदर्यांच्या पाया खालील जमीन सरकते की काय असा तिला भास झाला . म्हणजे आता आपल्या आई-वडिलांना आपलं प्रेम प्रकरण कळणार तर ! पण करणार तरी काय ? म्हणजे इन्स्पेक्टर विजय ला तर आपण सांगू शकत नाहींये ना , की माझ्या आई-वडिलांना ह्यातले काही माहीत नाहीये. आणि आपण त्याना ते माहीत करून देण्याचे काम करू नका. परंतु तिचा अंदाज चुकीचा ठरला. इन्स्पेक्टर विजय ने तिला विचारले की ह्याला आपण खंडाळ्याच्या देशमुखांच्या फार्म हाऊस वर पाहिलं असणार ? होय ना ?"
" नाही साहेब हा नव्हता आला तेथे."
" आला होता कदाचित आपण त्याला पाहिलं नसणार
किंवा आपण पोलिसांची दिशाभूल करताय."
" नाही साहेब हे खरं नाहीये."
" हे खरं नाहीये की तुम्ही सांगताय ते खरं नाहीये."
" नेमकं काय म्हणायचंय आपल्याला ?"
" मला हे म्हणायचंय की हा तरुण त्या दिवशी उपस्थित
होता. कारण तिथल्या चौकीदाराने ह्याला तेथे पाहिले आहे, आणि त्याने केलेल्या वर्णनावरूनच हे स्केच तयार केले आहे. आणि तुम्ही म्हणता ह्याला तेथे पाहिले नाहीये. कसे शक्य आहे हे ?" सौंदर्या एकदम गोंधळली आणि भीतीने तिला घाम ही फुटला. तिला काही कळेना चौकीदार ने ह्याला पाहिलं तर आपण कसं पाहिलं नाही ? पण चौकीदार तरी कुठं होता त्या दिवशी ? काय गोंधळ आहे, काही कळत नाहीये." तेव्हा मोहनराव म्हणाले ," साहेब ती नसेल ओळखत तर कुठून सांगणार ती तुम्हाला." तेव्हा इन्स्पेक्टर विजय म्हणाले ," आता तुम्ही सांगणार का मी सांगू तुमच्या
आई-वडिलांना की तुम्ही ह्या तरुणाला चांगले ओळखता.
इतकंच नाहीतर .....पुढे बोलणार असतात. तेव्हा सौंदर्या
पट्कन म्हणाली ," थांबा. मी सांगते."
" हूंss सांग बरं !" इन्स्पेक्टर विजय म्हणाले.
" हा माझा कॉलेज मित्र आहे."
" अच्छा हा तरुण तुमचा कॉलेज मित्र आहे बरोबर ?"
" येस सर !"
" हा त्या दिवशी ही आला होता ना , खंडाळ्याला."
" आला असेल पण मी त्याला पाहिलं नाही."
" पाहिलं नाही ? का न पाहिल्याचे नाटक करताय ?"
" खरंच मी पाहिलं नाही त्याला. माझ्यावर विश्वास ठेवा."
" ठीक आहे, खरं काय नि खोटं काय ते. आम्ही शोधून
काढूच, पण त्या अगोदर तुम्ही एक काम करा जरा आतल्या खोलीत जाऊन बसा." आणि तिच्या आई-वडिलांना सांगितले की तुम्ही जरा बाहेर जाऊन बसा. मी थोड्या वेळाने बोलावतो तुम्हांला." तसे ते दोघेही उठून बाहेर जातात. सौंदर्या उठून आतल्या खोलीत जाते. त्यानंतर धनराज च्या त्या पाच मित्रांना स्केच फोटो दाखविण्यात आला. तेव्हा पाचही जण म्हणाले ," हाच तो तरुण."
" ह्याचे नाव विवेक आहे." दुसरा उद्गारला
" ह्या विवेक शी सौंदर्यांचे प्रेम प्रकरण सुरू आहे."
" आणि हे खरे वाटत नसेल तर सौंदर्यालाच विचारा."
" हां साहेब आम्ही काहीच केलं नाहीये, जे काय केलं ते ह्यानेच केलं." पाचवा मित्र म्हणाला.
" हे कशावरून सांगतो आहेस की ह्यानेच सर्व केलं आहे म्हणून."
" कारण ह्याच्या अंगात समंध भूत आहे साहेब."
" समंध आणि ह्याचा काय संबंध ?"
" ते माहीत नाही साहेब , परंतु आम्हाला पूर्ण खात्री आहे
की खंडाळ्याला जे काय झाले त्यात ह्याचा पूर्ण हात आहे." विलास म्हणाला.
" बरं मग मला हे सांगा की ह्याला तुम्ही लोकांनी त्या दिवशी खंडाळ्याला पाहिलं होतं का ?"
" नाही साहेब आम्ही ह्याला पाहिलं नाही. परंतु हा नक्की
खंडाळ्याला आला असणार आणि ह्यानेच आमच्या मित्राला
गायब केले असणार "
" ठीक आहे, ते कळेलच लवकर. तुम्ही आता घरी जाऊ
शकता. परंतु शहर सोडून कुठं जाऊ नका. गरज पडली तर
आम्ही परत बोलवू तुम्हां लोकांना." तसे ते खुश होऊन
पोलीस स्टेशन मधून बाहेर पडले. तसे ते कॉन्स्टेबल हरीश ला म्हणाले ," ह्या पाच जनावर वाँच ठेवा." त्यानंतर इन्स्पेक्टर विजय मनात म्हणाले की ,सौंदर्या खरी बोलतेय तिने विवेकाला पाहिलं नाही. किंवा विवेक चे नि सौंदर्यांचे काहीतरी प्लॅन असावे. असा विचार करून ते लेडीज कॉन्स्टेबल सुधाला म्हणाले ," मिस सुधा त्या मुलीला इथं घेऊन या." लेडीज कॉन्स्टेबल सुधा गेली नि सौंदर्या ला घेऊन आली. तसे इन्स्पेक्टर विजय म्हणाले," सौंदर्या मघाशी तुम्ही तुमच्या आई-वडीला समोर सांगू शकला नाही. परंतु मला माहित आहे, त्या मुलासोबत तुमचे अफेर सुरू आहे, हे खरंय ना ?"
" होय सर !"
" आता मला सांगा तुम्ही आणि विवेक मिळून दोघांनी
धनराज ला गायब करण्याचे प्लॅन केलं होतं हे पण खरंय ना ?"
" नो सर ! आमचं त्याला गायब करण्याचे प्लॅन नव्हते."
" पण प्लॅन तर होतं ना ?"
" प्लॅन गायब करण्याचे नव्हे !"
" मग ?"
" त्याला अद्दल घडवायची होती आम्हाला."
" कशाबद्दल अद्दल घडवायची होती त्याला."
" मागच्या वर्षी अश्याच एका मुलीला फसवून त्याने
खंडाळ्याच्या फार्म हाऊस वर नेलं होतं."
" हे तुम्हाला कसं कळलं ?"
" कॉलेज मध्ये सर्वांना माहीत आहे, सर की त्या मुलीला
गायब करण्या मागे धनराज चा हात आहे."
" मिस सौंदर्या तुम्ही त्या विवेक च्या घरचा आड्रेस द्या."
नाईलाजाने का होईना तिला त्याचा आड्रेस सांगावा लागला.
त्यानंतर ते पुढे म्हणाले ," आता आम्ही तुम्हाला सोडतोय . परंतु आम्हाला तुमची गरज लागली तर पुन्हा बोलवू पोलीस स्टेशनला. कळलं का ? " सौंदर्या ने खुश होऊन आपली मान डोलावली. त्यानंतर तिच्या आई-वडिलांना ही तिथं बोलावण्यात आले. त्याना ही तेच सांगितले नि आपल्या मुलीला घेऊन जा म्हणून सांगितले. तेव्हा सौंदर्याला तिचे आई-वडील घेऊन निघाले. तसा इन्स्पेक्टर विजय एका कॉन्स्टेबल ला म्हणाले , जाधव, तुम्ही हिच्यावर पाळत ठेवा. कुठं जाते नि कुणाला भेटते वगैरे." कॉन्स्टेबल महेश जाधव ने होकारार्थी आपली मान डोलावली नि त्यांच्या मागोमाग निघून गेले. त्यानंतर हरीश कडे पाहत इन्स्पेक्टर विजय म्हणाले," हरीश तुम्ही त्या विवेक च्या घरी जा नि त्याला अटक करून पोलीस स्टेशनला आणा. हा त्याचा आड्रेस घ्या." कॉन्स्टेबल हरीश ने त्यांच्या हातून आड्रेस घेतला नि निघाला बाहेर.
सौंदर्या आपल्या आई-वडीला सोबत पोलीस स्टेशन
मधून निघाली खरी परंतु तिच्या मनात मात्र विचार सुरू होते. म्हणजे ती स्वतःलाच प्रश्न करत होती की विवेक खरंच आला होता का ? पण मला कसा दिसला नाही ? माझ्या मैत्रिणीच्या म्हणण्यानुसार तो खरंच समंध तर नसेल ना ? पण समंध असेल तर मग तो चौकीदार ला कसा काय दिसला ? काही कळत नाही बाबा ! काय खरे नि काय खोटे ते ? घरी आल्यानंतर सुशिलाबाई सौंदर्या वर भयंकर रागावल्या त्या म्हणाल्या की तुझ्यामुळे आज आम्हाला पोलीस स्टेशन ची पायरी ओलांडावी लागली. परंतु सौंदर्या काहीच बोलली नाही. सरळ आपल्या खोलीत निघून गेली. ते पाहून सुशिलाबाई आपल्या नवऱ्या कडे पाहत म्हणाल्या,
" पाहिलेत हे असं हिचं वागणं , एवढं सारं रामायण घडलं पण तिला आहे काही त्याचं."
" जाऊ दे गं तू नको घेऊस त्याचं टेन्शन ."
" हेच तर तुमचं चुकतं. तिला तिची चूक दाखवून देत नाहीत. म्हणून ती फार शेफारली आहे."
" तसं काही नाही गं , हे वयचं आहे तीचं !"
" कसलं वय असली लफडी करण्याचं !"
" काय लफडं केलं आहे तिनं ? कुणाचा खून केला आहे
का ?"
" खून केल्या नंतर तुम्ही तिला समजवणार आहात काय ?"
" अगं तू कुठला विषय कुठं नेतेस ? खून का करेल ती ?"
" वा ! छान ! आता तो देशमुखांचा मुलगा सापडला नाही
तर कोणावर येणार ? सांगा बरं."
" अगं तो सापडत नाही याचा अर्थ त्याचा खून झाला
असं तर नाही ना होतं ?"
" पण मी म्हणते हिने त्यांच्या सोबत जायचंच कशाला ?"
" तिला काही माहीत तिकडे गेल्यावर असं काही होणार
आहे ते."
" ठीक आहे, तिला नव्हतं माहीत. परंतु आता काय करायचं ?"
" पोलीस शोध घेत आहेत ना, त्याना त्याचं काम करू दे."
" ते घेतील हो शोध .पण तो सापडला नाहीतर आपल्या पोरीचं काय होईल ?" त्या काळजीच्या स्वरात बोलल्या.
" काही चिंता करू नकोस. आपल्या मुलीने काही गुन्हा
केलेला नाहीये. त्यामुळे ती कायद्याने गुन्हेगार ठरत नाही,
कारण पुरव्या शिवाय पोलीस कोणालाही अटक करू शकत
नाहीत."
" बघा बाबा काय ते, मला तर भीती वाटून राहिलीय."
" काही घाबरायचे कारण नाहीये."
पोलिसांची जीभ विवेक राहात असलेल्या इमारतीच्या समोर थांबली. पोलीस खाली उतरले नि विवेक राहात
असलेल्या मजल्यावर लिफ़्ट ने वर गेले नि दरवाजा वरच्या बेलचे बटन दाबले . तसे एका चाळीस वर्षीय महिलेने दरवाजा उघडला. समोर पोलिसांना पाहून ती मनातल्या मनात इतकी घाबरली की ती त्याना विचारायला पण फावली नाही की आपण आमच्याकडे का आलेत म्हणून.? परंतु कॉन्स्टेबल हरीश ने विचारले, विवेक फाळके इथंच राहतात ना ?" तेवढ्यात आतून त्या महिलेचा नवरा बाहेर येत म्हणाला , " राधा कोण आले गं बाहेर ?" परंतु दरवाजातून बाहेर पडताच त्यांची नजर जशी पोलिसांवर पडली तशी त्यांची सुध्दा गाळण उडाली. आणि मनात अनेक प्रश्न उभे राहिले. पहिला प्रश्न म्हणजे पोलीस
आपल्या कडे का बरं आले असावेत ? दुसरा प्रश्न हा की
आपल्या मुलाने बाहेर काही लफडं तर केलं नाही ना ?
वगैरे वगैरे....
ती महिला म्हणाली ," हो हे विवेक फाळके याचेच घर
आहे, परंतु आपले त्याच्या कडे काय काम आहे ?"
" आम्ही त्याला पोलीस स्टेशनला न्यायला आलो."
" काय पोलीस स्टेशनला .....काय केलं माझ्या मुलाने ?"
" त्याला चौकशी साठी पोलीस स्टेशनला न्यायचे आहे."
" कशाची चौकशी ?"
" ती पोलीस स्टेशनला गेल्यावर कळेल. कुठं आहे तो,
बोलवा त्याला बाहेर ?" तसे गोपाळराव म्हणाले ," अरे विवेक जरा बाहेर ये पाहू !" तसा विवेक बाहेर आला. पोलिसांना पाहून त्याच्या पाया खालील जमीन सरकते की काय असा त्याला भास झाला. पोलीस काही विचारण्या पूर्वी तोच पोलिसांना म्हणाला , " साहेब, मी खरं सांगतोय मी काहीच केलेलं नाहीये."
" मी कुठं म्हणतोय तू काही केलेस म्हणून. तुला फक्त
आमच्या बरोबर पोलीस स्टेशनला यायचं आहे."
" पण का ? काय केलं माझ्या मुलाने ?" विवेकच्या
वडिलांनी म्हणजे गोपाळराव नी विचारले.
" तुमचा मुलगा त्या दिवशी खंडाळ्याला गेला होता त्या
दिवशी विश्वासराव देशमुखांचा मुलगा त्यांच्या फार्म हाऊस
वरून अचानक गायब झाला आहे."
" पण त्यात आमचा मुलाचा काय संबंध ?"
" संबंध आहे किंवा नाही हे चौकशी नंतरच कळेल. चला रे ह्याला घेऊन." असे म्हणून कॉन्स्टेबल हरीश विवेक ला घेऊन गेले. तेव्हा इमारती मध्ये राहणारे सर्व लोक विवेक कडे संशयी नजरेने पहात होते. काही लोक तर आपसात कुजबुज त होते की वाटलं नव्हतं हा मुलगा इतका वाया गेला असेल तो , आज पोलीस आले आहेत घरी उद्या आणखीन कोण येईल." लगेच दुसरा व्यक्ती उद्गारला ,
" किती सज्जन वाटत होता मुलगा पण प्रत्यक्षात काय गुन्हेगार ? काय गुन्हा केला असेल हो ह्याने ?" तर लगेच तिसरा व्यक्ती म्हणाला," काढली असेल कुणाच्या तरी मुलीची छेड , आजकाल च्या मुलांना सगळ्या गोष्टी सोप्या वाटतात. विवेकची आई राधाबाई चुपचाप सारे ऐकून घेतात. काय करणार बिच्चाऱ्या ! " पोलीस विवेकला घेऊन गेल्या नंतर त्याचे आई-वडील पण पोलीस स्टेशनला जातात. इन्स्पेक्टर विजय काही प्रश्न विचारतात त्याची उत्तरे तो बरोबर देतो. त्याला जेव्हा सौंदर्या विषयी विचारतात तेव्हा तो खरे ते सांगतो की आम्हां दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे. " त्यावर इन्स्पेक्टर विजय म्हणाला,
" तुझं तिच्यावर इतके प्रेम आहे की तू तिच्यासाठी काहीही करू शकतोस ?"
" आफकोर्स ! मी काहीही करू शकतो तिच्यासाठी!"
" अर्थात खून सुध्दा !"
" हा काय झाला प्रश्न मी खून का करेन कुणाचा ?"
" तुझ्या प्रेयसीची कुणी छेड काढली तर !" त्याच्या नजरेत। पाहत इन्स्पेक्टर विजय बोलला.
" पण का कुणी तिची काढेल छेड ?"
" पण समज काढलीच तर !"
" तर मी त्याला ठार मारेन."
" जसं धनराज ला मारलं."
" काय धनराज .....त्याला कशाला मारेन मी ?"
" आताच तर तू म्हणालास की तुझ्या प्रेयसी ची जो
छेड काढेल त्याला तू ठार मारशील म्हणून."
" अहो, साहेब ते मी भावनेच्या भरात बोललो. मी कधी
साध्या मुंगीला मारलं नाही तर खून काय करणार कुणाचा !"
" बरं ते सोड, मला हे सांग तू खंडाळ्याला कशाला गेला होतास ?"
" सौंदर्यांच्या मागोमाग गेलो होतो."
" कशासाठी ?"
" तिची धनराज पासून रक्षा करायला."
" म्हणजे तुला माहीत होते की धनराज तिला खंडाळ्याला घेऊन चाललाय ते."
" हो माहीत होते."
" मग तेव्हाच का रोखले नाहीस ?"
" तिला परीक्षा घ्यायची होती माझी !"
" कशाची परीक्षा ?"
" माझ्या शरीरात समंध भुताचा वास्तव्य आहे की नाही ?"
" म्हणजे मी समजलो नाही."
" म्हणजे तिला असं म्हणायचंय की मी विवेकाच्या रुपात समंध आहे."
" मला अजूनही कळलं नाही तुला काय म्हणायचंय ते ?"
" तिला म्हणायचंय की माझ्या शरीरावर समंध भुताचा ताबा आहे."
" पण असं खरंच असतं का ?"
" माहीत नाही पण असं ती म्हणते."
" ती असं का म्हणते याला काहीतरी कारण असणार ना ?"
" तिला असं वाटतं की तिची छेड काढणाऱ्याला माझ्या
शरीरावर ज्या भुताचा ताबा आहे ते भूत त्याला ठार मारणार."
" पण भूत का मारणार ?"
" कारण ती माझ्या अंगात असणाऱ्या भुताला फार
आवडली आहे."
" काय ? " एकदम शॉक बसल्यागत म्हणाला," भुताला
आवडली. भुतं कधी पासून प्रेम करू लागली माणसावर ?"
" असं मी म्हणत नाही ती म्हणते."
" याचा अर्थ तुझ्या मधील भुताने धनराज ला ठार मारले."
" छे छे छे मी नाही कुणाला मारलं."
" तू नव्हे तुझ्या मधील भुताने मारले."
" पण मी तर तिथं बेशुध्द पडलेलो होतो."
" हां ते बरोबर तुझ्या मधील भुताने त्याला अगोदर गायब केलं नंतर त्याला ठार मारले नि मग तुझ्या शरीरातील त्याचा आत्मा तुझ्या शरीरातून निघून गेला नि बेशुध्द होऊन तिथं पडून राहिलास. असेच झालं असणार
होय ना ?"
" नाही साहेब मी कुणालाच मारलं नाही."
" तू नव्हे तुझ्या शरीरामध्ये वास्तव्य असणाऱ्या भुताने
त्याला ठार मारले. आय एम राईट !"
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा