रोबोट १४
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
रोबोट १४ |
तेव्हा सरकारी वकिलाने विचारले की, त्या स्वाप्टस्वेअर चा
माणसाला उपयोग काय ?" त्यावर जॉन म्हणाला," उपयोग
आहे तर मला फारसं माहीत नाही. परंतु एवढं माहीत
पडले होते की त्या स्वाप्टस्वेअर च्या मदतीनेच डॉक्टराना
समजले होते की आपल्या भारतात कुठल्या दिशेने शत्रू येतोय नि त्याच्या कडे विनाशकारी कोणते हत्यारे आहेत ?
कारण त्या मुळेच तर डॉक्टरांनी मुंबईला येणारे
दहशतवाद्यांचे विमान त्यांनी समुद्रात पाडीले होते. हे तुम्हांला ठाऊक तर आहेच. शिवाय काल पर्वा आलेले दहशतवादी कुठे उतरले आणि कुठे कुठल्या शहरात त्याना बॉम्ब स्फोट घडवावचा आहे हे त्याना त्या रिपोर्टर स्वाप्टस्वेअर मार्फत समजले मग त्यांनी योजना आखली. मला बँकेत पाठविले आणि स्वतः सलीमला सोबत घेऊन ज्या ज्या ठिकाणी बॉम्ब लावले होते ते त्या ठिकाणी जाऊन शोधले नि तेच बॉम्ब पाकिस्तानच्या शहरात स्फोट घडवून आणले. बाकीचे सर्व तुम्हांला माहीतच आहे."
" मग आता डॉ. विश्वजित कुठे आहेत ?"
" ते आता कुठे असतील माहीत नाही."
" कसं माहीत नाही तुम्ही त्यांच्या सोबतच होता ना ?"
" हो. मी त्यांच्या सोबतच होतो. परंतु ....."
" परंतु काय ?"
" ह्या गब्बर ने पळून जाण्याच्या दिवशी ह्याने आपल्या
बंगल्यात बॉम्ब लाविला. पूर्ण बंगला जमीनदोस्त केला.
मला स्वतःचा भाऊ समजून स्वतः सोबत घेतले आणि दोघांना कळू देखील दिले नाही. बॉम्ब स्फोट झाला त्यावेळी सलीम आणि डॉ. विश्वजित त्यावेळी बंगल्यातच होते त्यामुळे त्यांचे पुढे काय झाले माहीत नाही."
" पण आता तुम्ही तर म्हणाला होता ना की डॉक्टरांनी
रिपोर्टर स्वाप्टस्वेअर बनविला होता. मग त्या स्वाप्टस्वेअर
ने त्याना सूचना दिली नाही का ?"
" दिली असेल ही आणि ते वाचले ही असतील. पण आता कुठे असतील ते माहीत नाही." तेवढ्यात एक आवाज
उमटला की,आम्ही इथंच आहोत." सर्वजण आवाजच्या
दिशेने पाहू लागले. पण कुणी दिसेना." तेव्हा न्यायमूर्ती
महाशय म्हणाले," डॉ. विश्वजित इथं जर तुम्ही उपस्थित आहात तर सर्वां समोर या ." असे म्हणता क्षणी डॉ. विश्वजित
आणि सलीम एकदम शेवटच्या बाकावर बसलेले दिसू लागतात . तेव्हा न्यायमूर्ती महोदय म्हणाले," डॉ. विश्वजित
इथं या साक्षी पिंजऱ्यात येऊन उभे रहा आणि तुमच्या सोबत काय घडले ते कोर्ट जाणू इच्छित आहे." तेव्हा डॉ.विश्वजित नी त्यांच्या सोबत जे काय घडले ते त्यांनी एकदम संचिप्त स्वरूपात सांगू लागले की,मी जेव्हा कोमातून बाहेर आलो तेव्हा मला जाणवले की, मी अद्याप सिंगापूरला आहे याचा अर्थ मी माझ्या वैऱ्याच्या हाती सापडलो की काय ? असा मी प्राथमिक अंदाज लावला. पण तो नेमका कोण आहे आणि मला इथं आणण्याचा त्याचा उद्देश काय आहे हे जाणून फार गरजेचे होते म्हणून मी माझी याददाश्त म्हणजे स्मृतिभ्रश झाल्याचे नाटक केले आणि ते माझ्या फायद्याचेच ठरले. मुख्य म्हणजे मला वाचविणारा कोण आणि त्या मागचा त्याचा हेतू काय आहे हे मला कळाले. शिवाय तो मला घेऊन भारतात आला आहे. हे माझ्या साठी फार उपयुक्त पडले. मी माझे नाटक सुरूच ठेवले.
त्याचे नाव कळले आणि त्याचा इथे येण्याचा उद्देश ही कळला. मग मी त्याला मला काही आठवत नाही. तेव्हा म्युजियम मधून अगोदर च्या बॉडीलेस चे अवशेष घेऊन ये.
ते पाहून मला काही तरी आठवेल आणि तुला बॉडीलेस सारखे गायब ही होता येईल. त्या प्रमाणे गब्बर ने म्युजियम मधून बॉडीलेसचे अवशेष आणि चिप आणि ड्रिल मशीन चोरून आणली. मग चिप च्या मदतीने त्याने जबर खान पाशा खान आणि त्याचे सारे साथीदार सोडविले आणि दहशतवाद्यानाही पळविले. पण मी काहीच करू शकलो नाही. गप्प राहणे भाग होते मला. गब्बरने बब्बर बनून जफर खानची मदत करत होता इथपर्यंत ठीक होते .परंतु भोळ्या भाबड्या पोरींना फसवून त्याच्या इज्जतीशी खेळू लागला आणि त्यात बॉडीलेसचे नाव खराब करू लागला. खरं तर ते मला अजिबात आवडले नाही. मग मी ठरविले की यांच्या नजर कैदेतून बाहेर कसे पडणार ? म्हणून मी एक युक्ती केली मी गब्बर ला म्हटले," मला काही आठवत नाही, तेव्हा माझ्या दोन असिस्टंट सिंगापूर हुन घेऊन ये. त्या प्रमाणे गब्बर सिंगापूरला जाऊन आला. पण ते दोघे तेथे नाही सापडले. याचा अर्थ ते आपल्या गावलाच गेले असतील असा तर्क केला नि गब्बरला गावाला पाठविले. पण त्या अगोदर मी बॉडीलेसचा स्वाप्टस्वेअर बनवत आहे असे सांगून त्या स्वाप्टस्वेअर मधूनच जॉन आणि सलीम या दोघांना ईमेल केला नि त्या दोघांना मुंबईला यायला सांगितले आणि घरी कुणी चौकशीला आला तर काय सांगायचे ते सुद्धा मी मॅसेज पाठवून सांगितले. गब्बर गोव्याला गेला ही माझ्याठी एकदम सुवर्ण संधी होती. कारण गब्बरचा भाऊ सांबा एकटाच होता. मी झोपेचे सोंग केले. त्याला वाटले मी खरंच झोपलो असे समजून तो बिनदास्त पणे झोपला मग काय माझंच राज्य. मी त्याला पो. इन्स्पेक्टर च्या हवाली केले नि त्याना सांगितले की ह्याला एका गुप्त स्थानावर नेऊन बंदीस्त करून ठेवायला सांगितले आणि त्याच्या जागी जॉन ला अपॉइंट केले आणि माझ्या स्थानावर सलीमला अपॉइंट केले आणि मी चिपच्या मदतीने अदृश्य राहून माझे पुढील काम सुरू केले.
मी रिपोर्टर नावाचा नवीन स्वाप्टस्वेअर बनविला. तेव्हा
मला रिपोर्टर स्वाप्टस्वेअर द्वारे मला कळले की मुंबईच्या
किनाऱ्यावर पाकिस्तानी दहशतवादी येत आहेत. मग
मी लगेच बॉडीलेस बनून गेलो नि त्याना यमसदनास पाठवून
दिले. त्यानंतर गब्बरच्या महाली जाऊन त्याचे रेणू नावाच्या
मुली समक्ष त्याचे पितळ उघडे पाडले. त्यानंतर बँक लुटण्याचे नाटक गब्बर ने केले. त्या मागचा हेतू हाच होता की
बॉडीलेस तेथे गुंतून रहावा आणि दहशतवाद्याना भारतात
यायला अडथळा येऊ नये. हा उद्देश होता आणि मी तो सफल ही होऊ दिला. कारण दहशतवाद्याना पकडून
तुरुंगात डांबणे हा उद्देश माझा नव्हताच मुळी ! दहशतवाद्याना धडा शिकविणे हा तर खरा माझा उद्देश होता
आणि तो सफल ही झाला. पहिल्या बँक लुटीच्या नाटकात
यश आले म्हणून दुसऱ्या वेळी ही तोच डाव खेळला गेला.
पण त्या अगोदर मी प्लॅन तयार केले होते. पो. इन्स्पेक्टर
फोन करून ज्या बँकेत दरोडा पडणार आहे. त्या बँकेचा पत्ता
दिला. मी स्वतः न जाता जॉनला पाठविले. रिपोर्टर मध्ये मिळालेल्या लोकेशन नुसार ज्या ठिकाणी बॉम्ब स्फोट होणार
आहे. त्या ठिकाणचा पत्ता आणि दहशतवादी चा फोटो फारवर्ड केला. मग तेथील स्थानिक पोलिसांनी त्या दहशतवाद्याना पकडले आणि ठेवलेले बॉम्ब आम्ही त्याच्याच शहरात नेऊन ठेविले. कारण पाकिस्तान ला धडा शिकवायचा असेल तर तो अशाच प्रकारे शिकविता येईल. त्यांनी आपले दहा मारले तर आपण त्यांचे शंभर मारले पाहिजेल. तरच ते वठणीवर येतील.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही जफर खानच्या अड्यावर
जाऊन त्याला सुध्दा संपविले आणि आम्हाला मारण्यासाठी
गब्बरने मांडलेला डाव देखील आम्ही उधळून लाविला.
परंतु रिपोर्टर मशीनच्या मात्र मी तेथून बाहेर काढू शकलो
नाही. तेवढे एक नुकसान आमचे झाले खरे ! बस्स एवढीच आमची माहिती आता आम्हाला जी काय शिक्षा ध्याल ती आम्ही आनंदाने स्वीकारु." एवढे बोलून डॉ. विश्वजित ने
आपले वक्तव्य संपविले. त्यानंतर न्यायाधीश महोदयांनी
गब्बर आणि त्याचा धाकटा भाऊ साबाजी उर्फ सांबा याला
२० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठाविली आणि डॉ. विश्वजित, आणि त्यांचे असिस्टंट जॉन आणि सलीम याचा देशप्रेमी आणि थोर शात्रज्ञ म्हणून गौरव करण्यात आला.
समाप्त
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा